Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : सचिन अहिर शिंदे सेनेत; पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचा दावा, ‘आता विकेट पडतच राहतील’

Marathi Breaking Live Updates : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकत्रित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी यापुढेही विकेट पडत राहतील, असे सूचक विधान केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2026 | 06:29 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकत्रित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी यापुढेही विकेट पडत राहतील, असे सूचक विधान केले आहे.

भाजपने पुढील सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाने होईल, तसेच भाजपच्या संघटनेत मोठे बदल केले जातील, ज्यात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली नवीन टीम स्थापन करण्याचाही समावेश आहे. या संदर्भात भाजपमध्ये बैठका सुरू आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप मुख्यालय यांच्यात बैठका झाल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करून नितीन नवीन टीमची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून परतण्याची प्रतीक्षा आहे. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही वृत्त आहे.

भाजपच्या संघटनात्मक रचनेत, मार्गदर्शक मंडळ हे संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या वर आहे. मात्र, ही एक सल्लागार समिती आहे जी पक्षाच्या व्यापक धोरणांवर आपले विचार मांडते. सध्या, भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पंतप्रधान मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह या चार नेत्यांचा समावेश आहे.

The liveblog has ended.
  • 30 Jun 2026 06:28 PM (IST)

    30 Jun 2026 06:28 PM (IST)

    लग्नानंतर नवरदेव जातो सासरी! मुले आईचे आडनाव लावतात! मेघालयात इथे चालते मातृसत्ताक पद्धत!

    भारतातील बहुतांश राज्यांमध्ये लग्न झाल्यानंतर मुलगी आपले घर सोडून पतीच्या घरी म्हणजेच सासरी जाते. मुलाच्या नावाने वंश चालतो आणि मालमत्तेचा हक्कही मुलांकडे जातो. परंतु, ईशान्य भारतातील मेघालय राज्यामध्ये याच्या अगदी उलट आणि थक्क करणारी कौटुंबिक व्यवस्था पाहायला मिळते. मेघालयातील ‘खासी’ आणि ‘गारो’ या प्रमुख आदिवासी जमातींमध्ये शतकानुशतके ‘मातृसत्ताक’ परंपरा पाळली जाते. ही अनोखी जीवनशैली आणि तिचे विविध पैलू खालीलप्रमाणे आहेत:

  • 30 Jun 2026 06:21 PM (IST)

    30 Jun 2026 06:21 PM (IST)

    E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?

    एकीकडे इथेनॉलकडे आपला देश वळत आहे. नितीन गडकरी यांनी E 100 ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अनेक लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत की इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होत आहे आणि इंधन टाकीत पाणी जमा झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. सध्या एक पोस्टर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सरकार स्वतःच मूळ मुद्द्याला बगल देत असल्याचे दिसत आहे. यामागील संपूर्ण कहाणी आणि यात किती तथ्य आहे, हे तुम्ही येथे जाणून घेऊयात.

  • 30 Jun 2026 06:09 PM (IST)

    30 Jun 2026 06:09 PM (IST)

    ‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अहिर यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला.

  • 30 Jun 2026 06:00 PM (IST)

    30 Jun 2026 06:00 PM (IST)

    Mumbai School bus Accident: मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 10 विद्यार्थी जखमी

    Chembur School Bus Incident News Marathi : मुंबईतील चेंबूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. हा अपघात चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर घडला. या घटनेच्या वेळी बसमध्ये शाळकरी मुले होती. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

  • 30 Jun 2026 05:50 PM (IST)

    30 Jun 2026 05:50 PM (IST)

    मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम!

    नीता परब : विद्यार्थ्यांना आधुनिक आण्विक जीवशास्त्रातील प्रगत ज्ञान आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने रिअल-टाइम पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) विषयावरील दोन आठवड्यांचा ऑन-द-जॉब ट्रेनिंग या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच संशोधन संस्था, आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील अपेक्षांनुसार आवश्यक व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

  • 30 Jun 2026 05:40 PM (IST)

    30 Jun 2026 05:40 PM (IST)

    ‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज

    ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे दोन स्रोत आहेत आणि या विचाराचा माणूस जातीच्या पलीकडे पहात असतो. महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • 30 Jun 2026 05:30 PM (IST)

    30 Jun 2026 05:30 PM (IST)

    Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी!

    Why Eknath Shinde chose Sachin Ahir : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मुंबईच्या राजकारणातील एक प्रभावशाली मानले जाणारे नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात सामील झाल्यानंतर लगेचच, अहिर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • 30 Jun 2026 05:20 PM (IST)

    30 Jun 2026 05:20 PM (IST)

    सामान्यांना लुबाडलं जातंय… कच्च तेल इतकं स्वस्त तरीही Petrol-Diesel महाग का?

    जागतिक स्तरावर उलथापालथ सुरु असताना त्याचा सगळ्याच जास्त परिणाम कच्च्या तेलावर झाला आहे. त्याच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे संपूर्ण जगात महागाईचे वारे वाहून लागले. मुख्य म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून आला. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड १% पेक्षा जास्त घसरून ७२.४० डॉलर प्रति बॅरलवर आले. दरम्यान, डब्ल्यूटीआय क्रूड ०.८३% घसरून ७०.१६ डॉलर प्रति बॅरलवर आले.

  • 30 Jun 2026 05:10 PM (IST)

    30 Jun 2026 05:10 PM (IST)

    सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा?

    भारतात वाढती महागाई, नवीन वाहनांच्या वाढत्या किमती आणि मध्यमवर्गीयांची बदलती जीवनशैली यामुळे जुन्या सेकंड हँड गाड्या आणि बाईक्सचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढत आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करून उत्तम नफा मिळवून देणारा एक चांगला करिअर पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू करण्यासाठी खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या भागात कोणत्या प्रकारच्या गाड्यांना (उदा. कौटुंबिक कार, मायलेज देणाऱ्या बाईक्स किंवा स्कूटर्स) जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा. शोरूम किंवा ऑफिससाठी अशी जागा निवडा जिथे लोकांची ये-जा जास्त असेल आणि ग्राहकांना गाड्या सहज पाहता येतील. सुरुवातीला तुम्ही अगदी छोट्या ऑफिसमधून किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करूनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

  • 30 Jun 2026 05:02 PM (IST)

    30 Jun 2026 05:02 PM (IST)

    Deool Band 2 : आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो

    ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून, मुख्य भूमिकेत त्यांची पत्नी स्नेहल तरडे झळकली आहे. स्नेहलने साकारलेल्या पात्राभोवती संपूर्ण कथा फिरते. विशेष म्हणजे, या पात्राची संकल्पना स्वतः स्नेहलनेच प्रवीण यांना सुचवली होती. याचा खुलासा स्वतः प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत केला. विशेष म्हणजे, आज ‘देऊळ बंद 2’ या नावाने प्रदर्शित झालेल्या सिनेमाची मूळ कथा यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

  • 30 Jun 2026 04:57 PM (IST)

    30 Jun 2026 04:57 PM (IST)

    ‘सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो…’; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता आणखी एक मोठा राजकीय धक्का ठाकरे गटाला बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीनंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा सविस्तर... 

  • 30 Jun 2026 04:47 PM (IST)

    30 Jun 2026 04:47 PM (IST)

    IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?

    उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि इंग्लंडचा संघ क्रिकेटमधील ताकदवान संघ म्हणून ओळखले जातात. सलग टी 20 सामने जिंकण्याची परंपरा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खंडित झाली आहे. दरम्यान आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.

  • 30 Jun 2026 04:37 PM (IST)

    30 Jun 2026 04:37 PM (IST)

    Chennai Colleges Co-Education: १०० वर्षापूर्वीची परंपरा बदलली! ‘या’ मुलांच्या कॉलेजचे दरवाजे आता मुलींसाठीही उघडले

    सुमारे एक शतकाहून अधिक काळ केवळ मुलांनाच शिक्षण देणारे चेन्नईतील अनेक प्रतिष्ठित कॉलेजेस आता विद्यार्थिनींसाठीही आपले दरवाजे खुले करत आहेत. कधीकाळी फक्त पुरुष विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेले लोयोला कॉलेज, पचैयप्पा कॉलेज आणि द न्यू कॉलेज यांसारख्या नामवंत संस्था आता को-एज्युकेशनच्या (Co-Education) दिशेने पावले टाकत आहेत. बदलत्या गरजा, सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना आणि विद्यार्थिनींची वाढती मागणी यामुळे या कॉलेजेसना आपली जुनी परंपरा बदलण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता या संस्थांमध्ये मोठ्या संख्येने मुली प्रवेश घेत असून एक नवीन शैक्षणिक वातावरण तयार होत आहे. वाचा सविस्तर... 

  • 30 Jun 2026 04:27 PM (IST)

    30 Jun 2026 04:27 PM (IST)

    काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

    भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. भारताला पुढील वर्षी पहिली बुलेट ट्रेन मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार असून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी ५०८ किमी आहे. या मार्गापैकी ३४८ किमी गुजरातमध्ये, १५६ किमी महाराष्ट्रात आणि ४ किमी दादरा आणि नगर हवेलीमध्ये असेल. वाचा सविस्तर... 

  • 30 Jun 2026 04:17 PM (IST)

    30 Jun 2026 04:17 PM (IST)

    बड्या उद्योगपतीच्या ‘त्या’ एका विधानाने खळबळ, IT हबला ‘कचऱ्याचं शहर’ म्हणून दिली उपमा, बंगळुरु शहराची अशी अवस्था का?

    बंगळूरूला कोणत्याही परिचयाची गरज नाही. IT हब, स्मार्ट सीटी आणखी काय काय नावाने या शहराला गौरवण्यात आलं आहे. पण हेच शहत आता ‘कचऱ्याचे शहर’ बनत चाललं आहे. हे विधान कोणा सामान्याच नाही तर बड्या उद्योगपतींनी हे विधान केलं आहे. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार हे बंगळूरूच्या शहरी नियोजनावर चर्चा करत होत्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमुळे बंगळुरुची होत असलेली गंभीर परिस्थिती समोर येत आहे. वाचा सविस्तर... 

  • 30 Jun 2026 04:07 PM (IST)

    30 Jun 2026 04:07 PM (IST)

    ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

    ‘ऑपरेशन टायगर 2.0′ च्या यशानंतर आता पुन्हा ‘ऑपरेशन टायगर 3.0′ सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकीय वर्तुळात हा मोठा धक्का मानला जात असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.

    यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सचिन अहिर यांचा चुकून उल्लेख सचिन तेंडुलकर असा केला. एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकाच हशा पिकला.  वाचा सविस्तर... 

  • 30 Jun 2026 04:00 PM (IST)

    30 Jun 2026 04:00 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant?

    South Africa Anti Migrant Protests News in Marathi : दक्षिण आफ्रिकेत सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. परदेशी नागरिकांविरोधात मोठे आंदोलन आणि हिंसाचार सुरु असून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या देश सोडून जाण्याचा अल्टीमेट दिला आहे. ३० जून पर्यंत देश सोडावा असा इशारा काही स्थानिक कट्टर गटांनी दिला आहे. यामुळे भीतीने आतापर्यंत २५ हजार स्थलांतरितांनी दक्षिण आफ्रिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण?

  • 30 Jun 2026 03:55 PM (IST)

    30 Jun 2026 03:55 PM (IST)

    १ जुलैपासून देशात मोठे बदल! LPG, Petrol आणि Aadhaar Card संबंधी नवीन नियम लागू

    India Major Rules Change: देशात १ जुलै, २०२६ पासून एलपीजी, पेट्रोल आणि आधार कार्डशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहेत. या नवीन आणि महत्त्वाच्या नियमांचा देशातील प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात येत असलेल्या या आर्थिक बदलांमुळे काही बाबतीत सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल असेही बोलले जात आहे. दुसरीकडे, पासपोर्ट आणि महागड्या गाड्यांसंबंधीच्या नवीन नियमांमुळे लोकांना आणखी जास्त खर्च करावा लागू शकतो. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:50 PM (IST)

    30 Jun 2026 03:50 PM (IST)

    IRCTC कडून ‘सप्त ज्योतिर्लिंग विशेष यात्रा’ जाहीर

    पुणे: रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) भारत गौरव पर्यटक रेल्वे उपक्रमांतर्गत “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही विशेष आध्यात्मिक यात्रा 11 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर येथून प्रारंभ होणार असून भाविकांना देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगे आणि पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहे. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:45 PM (IST)

    30 Jun 2026 03:45 PM (IST)

    ‘या’ तारखेला येतोय सिनेमा ‘इंद्रजाल’

    ‘इंद्रजाल’ सिनेमा जरी हिंदी भाषेत असला तरी दिग्दर्शक Jageshhwar Lalita Dhoble या मराठी पठ्ठयाने सिनेमाचे दिग्दर्शन तसेच एडिटिंग केली आहे. सिनेमा पाहण्यासाठी जागेश्वर ढोबळे या दिग्दर्शकाचे चाहतेमंडळी तर आधीपासूनच उत्सुक होते. पण जेव्हापासून सिनेमाचा Teaser Out झाला आहे. तेव्हापासून सिनेमासाठी उत्सुक असणाऱ्या सिनेप्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सिनेमा थरारक सिनेमाच्या श्रेणीमध्ये येतो, त्यामुळे ज्या कुणाला सिनेमाघरात थरार अनुभवायचा असतो त्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा म्हणजे सुवर्णसंधीच आहे. हिंदी भाषेत असणारा हा सिनेमा 24 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:40 PM (IST)

    30 Jun 2026 03:40 PM (IST)

    दिल्ली हाय-कोर्टाची अल्पवयीन मुलाला वडिलांना यकृत दान करण्याची परवानगी

    दिल्ली उच्च न्यायालयाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृताचा काही भाग दान करण्याची परवानगी दिली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने या प्रत्यारोपणास मंजुरी दिली. न्यायालयाने सर्व आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश 'आयएलबीएस' (ILBS) ला दिले आहे. रुग्ण आणि यकृत दाता या दोघांच्याही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा निर्णय देण्यात आला.

  • 30 Jun 2026 03:35 PM (IST)

    30 Jun 2026 03:35 PM (IST)

    NEET-UG फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू; निकाल लवकरच जाहीर होणार

    NEET-UG फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. फेरपरीक्षेला बसलेले उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

  • 30 Jun 2026 03:30 PM (IST)

    30 Jun 2026 03:30 PM (IST)

    पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

    पिंपरी : पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि अपघातांचा धोका असलेला मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड चौक आता पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित बनला आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकावर ६० मीटर लांबीचा भव्य पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) यशस्वीरीत्या उभारला आहे. विशेष म्हणजे, केवळ मेट्रो प्रवासीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करता येणार आहे. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:25 PM (IST)

    30 Jun 2026 03:25 PM (IST)

    केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणावर गायक Amal Malik ची संतप्त प्रतिक्रिया

    गायक-संगीतकार अमाल मलिकने केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, भारतात महिलांच्या संरक्षणासाठी मजबूत कायदे असले तरी, व्यवस्थेचा गैरफायदा घेण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जाऊ नये. अमाल याने ट्विटरवर महिलांसाठी एक विस्तृत पोस्ट लिहिली असून, त्यात लिंगभेद, उत्तरदायित्व आणि देशभरात संताप निर्माण करणाऱ्या अलीकडील हत्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:20 PM (IST)

    30 Jun 2026 03:20 PM (IST)

    भारतीय क्रिकेटरला मोठा धक्का! PBKS मधील स्टार खेळाडूविरूद्ध FIR दाखल, Cook ला मारहाणीचा आरोप

    भारतीय क्रिकेटसाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो. IPL संपल्यानंतर, पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचा खेळाडू शशांक सिंगविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शशांकने स्वयंपाकी कर्मचारी विपेंद्र सिंग याला मारहाण करून त्याचा छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मारहाणीसह अनेक आरोपांखाली तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

  • 30 Jun 2026 03:15 PM (IST)

    30 Jun 2026 03:15 PM (IST)

    IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार

    India Vs England T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका हरल्यावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन सामन्यात चांगली कामगिरी न केल्याने संजू सॅमसन ऐवजी वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड हे सामने कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहे ते जाणून घेऊयात.

  • 30 Jun 2026 03:10 PM (IST)

    30 Jun 2026 03:10 PM (IST)

    सचिन अहिरांवर आदित्य ठाकरेची संतप्त प्रतिक्रिया

    Aaditya Thackeray On Sachin Ahir News Marathi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही महायुतीच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत सचिन अहिर यांच्यावर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

  • 30 Jun 2026 03:05 PM (IST)

    30 Jun 2026 03:05 PM (IST)

    SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी?

    Ram Mandir Donation: अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या चोरी प्रकरणी आता एक मोठे प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाला सुमारे तीन महिन्यांपूर्वी देणग्यांमध्ये अनियमितता असल्याचा संशय आला होता. बँकेने रोकड मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शिफारस देखील करण्यात आली होती. पण असं असताना देखील त्यांच्या जागी नवे कर्मचारी नेमण्यात आले नाहीत. आता मात्र या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय?

  • 30 Jun 2026 02:59 PM (IST)

    30 Jun 2026 02:59 PM (IST)

    मुंबईत रक्ताच्या पिशव्यांचा काळाबाजार?

    मुंबईतील सर जे. जे. महानगर सरकारी रक्तपेढीतील कथित रक्तचोरी, आर्थिक गैरव्यवहार, प्रशासकीय अनियमिततेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांचे विशेष ऑडिट केले जाईल. प्रत्येक रक्तपिशवीचा मागोवा घेण्यासाठी 'क्यूआर कोड' आधारित ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत केली. नियमभंग करणाऱ्या रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केले जातील. अधिक पारदर्शकतेसाठी 'थर्ड पार्टी ऑडिट'चाही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 30 Jun 2026 02:50 PM (IST)

    30 Jun 2026 02:50 PM (IST)

    10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणात सूट

    CBSEने त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामुळे या वर्षी दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकण्याच्या सक्तीमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याशिवाय, नववीच्या विद्यार्थ्यांनाही दोन परदेशी भाषा शिकण्याची परवानगी देण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, इयत्ता सहावीपासून हा नियम पूर्णपणे लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असेल, मात्र त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे.

  • 30 Jun 2026 02:41 PM (IST)

    30 Jun 2026 02:41 PM (IST)

    सर्वपक्षीय आमदारांची उपवर्गीकरणाविरोधात एकजूट; विधानसभेत स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता

    अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर पक्षीय राजकारण विसरून अनूसुचित जातीचे सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहे. 15 आमदारांनी निवेदन सादर केल्यावर मुख्यमंत्र्यांनी याविषयी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, उपवर्गीकरणाविरोधात मंगळवारी महामोर्चा धडकणार असून याविषयावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

  • 30 Jun 2026 02:29 PM (IST)

    30 Jun 2026 02:29 PM (IST)

    राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; प्रताप सरनाईक यांचा इशारा

    राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. एक महिन्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. उत्पन्नात अपेक्षित वाढ झाल्याचे दिसले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह बदली, पदावनती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

  • 30 Jun 2026 02:21 PM (IST)

    30 Jun 2026 02:21 PM (IST)

    ठाकरेंना आणखी एक धक्का; आमदार सचिन अहिर शिंदे गटात दाखल

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरू असून राज्यातील राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे.

  • 30 Jun 2026 02:10 PM (IST)

    30 Jun 2026 02:10 PM (IST)

    विधानपरिषद उपसभापतीपदासाठी मविआचा उमेदवार निश्चित; अंबादास दानवेंची घोषणा

    विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक जमू अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज आज दाखल होणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे मविआने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

  • 30 Jun 2026 02:00 PM (IST)

    30 Jun 2026 02:00 PM (IST)

    महा टीईटी परीक्षा पुढच्या वर्षापासून ऑनलाईन होणार

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २८ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती, परंतु परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर लीक झाल्याची घटना समोर आल्यानंतर ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी पुढील वर्षापासून (२०२७) टीईटी परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर आधारित (CBT) मोडमध्ये आयोजित केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

  • 30 Jun 2026 01:55 PM (IST)

    30 Jun 2026 01:55 PM (IST)

    आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन

    झारखंडच्या पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आजारी पडल्यावर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचारांऐवजी जादूटोण्याचा आधार घेतला आणि एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून कथितरित्या अस्थींचे सेवन केले.

  • 30 Jun 2026 01:50 PM (IST)

    30 Jun 2026 01:50 PM (IST)

    प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

    सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी धर्म बदलण्याच्या अटीमुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागविला आहे. त्यानंतर सविस्तर तपास होणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.

  • 30 Jun 2026 01:45 PM (IST)

    30 Jun 2026 01:45 PM (IST)

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार?

    राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही तशाच काहीशा बातम्या पसरू लागल्या आहेत. या अंतर्गत बंडाळीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या चर्चा सुरू आहेत. तोच दुसरीकडे एक गट एनडीए मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  • 30 Jun 2026 01:40 PM (IST)

    30 Jun 2026 01:40 PM (IST)

    अभिनेता समीर परांजपेचं व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल

    मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार अभिनयासोबतच उद्योजकतेतही यशस्वी वाटचाल करत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच अनेकांनी स्वतःचा व्यवसाय उभारून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, मृणाल दुसानीस, अभिनेता निरंजन कुलकर्णी, सत्या मांजरेकर आणि अनघा भगरे यांसारख्या कलाकारांनी खाद्यव्यवसायात पाऊल टाकत स्वतःचे उपहारगृह किंवा फूड ब्रँड सुरू केले आहेत. याच पावलावर पाऊल ठेवत आता मराठी अभिनेता समीर परांजपे यानेही उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडल्यानंतर समीरने आता स्वतःचे उपहारगृह सुरू करत नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे.

  • 30 Jun 2026 01:35 PM (IST)

    30 Jun 2026 01:35 PM (IST)

    ने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

    सोनं भारतीयांसाठी जीवाभावाचा विषय आहे. जरा तो अलंकार म्हणून आवडीने जोपासला जातो तसंच त्याच्याकडे गुंतवणूक म्हणूनही तितकंच महत्त्व देतात. पण सध्याची परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. जागतिक उलथापालथ आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर वेळोवेळी दिसून आला आहे. आताही बाजाराने वेगळंच वळण घेतलं आहे. सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून झपाट्याने घसरत असल्याने, अनेक भारतीय कुटुंबे आपले जुने दागिने विकण्याकडे वळले आहेत. पण नेमकं का? लोकांच्या मनात नेमकी कोणती अशी भीती वाटत आहे.

  • 30 Jun 2026 01:25 PM (IST)

    30 Jun 2026 01:25 PM (IST)

    रेल्वेत टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती; आजपासून अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता

    रेल्वेमध्ये टेक्निशियन बनण्याची सुवर्णसंधी उमेदवारांसमोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ६,५६५ टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी संक्षिप्त अधिसूचना जारी केली आहे. यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच ३० जून २०२६ पासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवार २९ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकतील. या भरतीचा संपूर्ण तपशील आता आपण पाहणार आहोत.

  • 30 Jun 2026 01:15 PM (IST)

    30 Jun 2026 01:15 PM (IST)

    सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा

    सिंधु पाणी करारावरुन भारत पाकिस्तानमधील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनी भारताला दिलेल्या धमकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर कोणताही अडथळा निर्माण केल्यास त्याचे हात तोडू अशा आक्रमक भाषा धमकी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मलिक यांनी पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मलिक यांनी पाकिस्तानची जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंहून असल्याचे म्हटले.

  • 30 Jun 2026 01:05 PM (IST)

    30 Jun 2026 01:05 PM (IST)

    सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ?

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीच्या पाठिंब्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांनी प्रत्यक्षात शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात महत्त्वाची भूमिका बजवणारे सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला, विशेषतः मुंबईतील संघटनात्मक राजकारणात, मोठा धक्का मानला जात आहे.

  • 30 Jun 2026 12:48 PM (IST)

    30 Jun 2026 12:48 PM (IST)

    डिलिव्हरी फ्रँचायझीच्या बहाण्याने ५ लाखांची फसवणूक

    डुडुळगाव येथे एका व्यक्तीला इंस्टाग्राम आणि ई-मेलद्वारे डिलिव्हरी फ्रँचायझी देऊन मोठा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ मे ते २२ जून दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली. या प्रकरणात अतुल नामदेव वहिले (३८, डुडुळगाव, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ कुमार, प्रियांका सिंग, ई-मेल आयडी आणि बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इंस्टाग्रामवरील जाहिरात आणि ई-मेलवरून संपर्क करण्यात आला. आरोपींनी वेगवेगळे व्हॉट्सॲप मेसेज आणि व्हॉईस कॉल करून आम्ही डिलिव्हरी फ्रँचायझीमधून चांगला फायदा करून देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून खोटी कागदपत्रे पाठवली आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ५ लाख २२ हजार ८३७ रुपये भरायला लावून फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

  • 30 Jun 2026 12:36 PM (IST)

    30 Jun 2026 12:36 PM (IST)

    अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त

    भोसरी एमआयडीसी परिसरातील लेबर कॅम्पजवळ एका अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (२८ जून) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा भोसरी एमआयडीसी मधील क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला संशयास्पदरित्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ४० हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत कारतूस आढळून आले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

  • 30 Jun 2026 12:24 PM (IST)

    30 Jun 2026 12:24 PM (IST)

    दापोडीत १० लाखांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

    जुना पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तब्बल १० लाख ८५ हजार रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२८ जून) पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील सुदामाचे पोहे हॉटेल समोर करण्यात आली. या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रणधिर माने यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आर्यन रविंद्र यादव (२०, पुणे) आणि शोएब शकिल शेख उर्फ वस्ताद (२५, रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

  • 30 Jun 2026 12:12 PM (IST)

    30 Jun 2026 12:12 PM (IST)

    आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाची आत्महत्या

    राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या कारणावरुन अनेक जण जिलन संपवत आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने या धक्क्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना पर्वती दर्शन परिसरात घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली होती. मंदा गणेश दोडके (वय २५), साहिल गणेश दोडके (वय २५, रा. पर्वती दर्शन) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

  • 30 Jun 2026 12:00 PM (IST)

    30 Jun 2026 12:00 PM (IST)

    नागपुरात उघडपणे हल्ला; तलवारीने वार करत कुख्यात गुंडाच्या पुतण्याची निर्घृण हत्या

    नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. फुटाळा तलाव परिसरात अमन शेख याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला करण्यात आला. अमन हा शहरातील कुख्यात गुंड शेखूचा पुतण्या असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • 30 Jun 2026 11:50 AM (IST)

    30 Jun 2026 11:50 AM (IST)

    क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले

    बांग्लादेशातून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत रस्त्याच्या बाजूला काही लोक तरुण श्वानाला त्रास देताना दिसून येतात. कुत्रा प्रचंड घाबरलेला असतो आणि त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी तो अगदी कोपऱ्याला तोंड लपवून बसलेला असतो. अशातच जमलेल्या तरुणांमधील एकजण श्वानाला उचलतो आणि पुलावरुन थेट खाली फेकून देतो. पुलाच्या खाली एक खोल नदी असते ज्यात श्वानाला निर्दयीपणे फेकून दिले जाते. मुख्य म्हणजे यावेळी त्याच्या गळ्याला एक वीट देखील बांधलेली असते. गळ्याला वीट बांधूनच त्याला खोल नदीत फेकले जाते. नदीत फेकल्यानंतर श्वान पाण्यात बचावासाठी संघर्ष करताना दिसतो पण काहीच सेकंदात त्याची ही धडपड कमी होते. व्हिडिओतील दृष्यांवर आता यूजर्स भडकले असून नेटकऱ्यांनी तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे.

  • 30 Jun 2026 11:40 AM (IST)

    30 Jun 2026 11:40 AM (IST)

    आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

    मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपसाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर आता अखेर रिलीज करण्यात आले आहे. आता यूजर्सना इंस्टाग्रामप्रमाणेच व्हॉट्सॲपमध्ये देखील यूजरनेम सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. खरं तर कंपनीने बऱ्याच काळापूर्वी या फीचरबाबत घोषणा केली होती. त्यामुळे यूजर्स या नव्या फीचरसाठी प्रचंड उत्सुक होते. आता अखेर कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी हे फीचर रिलीज केले आहे.

Web Title: Marathi breaking news live updates national and international news latest updates current issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Marathi Breaking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.