Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर राडा: पोलीस बंदोबस्त वाढवला; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचे सर्वपक्षीयांना आवाहन, म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस आयुक्तांनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शोधून अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 30, 2023 | 07:55 AM
संभाजीनगर राडा: पोलीस बंदोबस्त वाढवला; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचे सर्वपक्षीयांना आवाहन, म्हणाले…
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर– संभाजीनगर (Sambhaji nagar)नामांतरावरुन शहरात गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम अखेरीस पाहायला मिळाला. रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे (बुधवारी) रात्री किराडपूर परिसरात दोन गटांत मोठी वाद झाला. रामनवमीच्या तयारीसाठी युवक एकत्र जमा झालेले होते. या वादातून काही वेळात दंगल पेटल्याची माहिती देण्यात येते आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. मात्र अनियंत्रित झालेल्या जमावानं पोलिसांवरही (Police) हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करुन काही गाड्या जाळल्याचीही माहिती आहे. या दगडफेकीत दोन पोलिसांसह 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा सुरु झालेला हा प्रकार पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरु होता. दरम्यान, यानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये आले असून, पोलिसांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शांतता पाळण्याचं पोलिसांचे आवाहन…

दरम्यान, संभाजीनगरमध्ये काल रात्री नागरिक व पोलिसांमध्ये झालेला हा राड्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच रामनवमीच्या दिवशी दंगल किंवा दोन गटात हाणामारी होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही धार्मिक भडकावू संदेशावर विश्वास ठेवू नका. किंवा त्याला बळी पडू नका, असं पोलीस आयुक्तांनी सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शोधून अटक करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

नेमका कशावरुन झाला वाद?

रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काही जण या गोंधळात मंदिरात गेले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

Web Title: Sambhajinagar rada increased police presence dont believe rumours police commissioner appeals to all parties says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 07:55 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
1

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
2

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
3

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
4

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.