मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची चार दिवसांपूर्वीच युती झाली. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता व युतीत मिठाचा खडा पडला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंबेडकर यांचा हा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी बोलतेवेळी जपून शब्द वापरावेत, असं राऊत म्हणाले.
शरद पवार देशातील मोठे नेते…
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे भाजपचे आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं राऊत म्हणाले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची चार दिवसापुर्वी युती झाली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याविषयी अश्या प्रकारचे वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अख्या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. शरद पवार भाजपचे आहेत असं म्हणणं, हे आतापर्यंतच्या कारकिर्दीवरचा फार मोठा आरोप आहे.
शब्द जपून वापरावे
जर ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापुर्वी भाजपच सरकार दुर ठेवुन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊच दिलं नसतं. अश्या प्रकारच्या भुमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपुन वापरावे, असं राऊत म्हणाले. भूतकाळातील मतभेद आपल्याला दुर ठेवले पाहिजे. राहुल गांधी यांच्यासोबत माझं त्यांच्याविषयी बोलणं झालं आहे. एका रात्री पारड पलटण्याची धमक ही फक्त भाजपमध्ये आहे. याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. ज्या दिवशी निवडणुक होईल त्यादिवशी समजेल, असा इशारा देखील राऊतांनी दिला.