मुंबई- शिवसेनेमधून (Shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत राज्यात भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन केले. शिंदे गटातील १६ आमदार अपात्र असल्याचं म्हणत शिवसेनेनं न्यायालयाचे (Court) दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणावर १४ फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाने पक्ष व चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाने चिन्ह गोठावले आहे. हा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे, दरम्यान, यावर उद्या सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाणाचे चिन्ह कुणाला मिळणार याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घेण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे (सोमवारी ३० जानेवारी) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत अंतिम सुनावणी होणार असून, याच दिवशी निर्णय जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, उद्याच्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागलेले असताना, आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत, दरम्यान, आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स मागील आठवड्यातही कायमच राहिला. यावर आता उद्या(३० जानेवारी) सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येण्याची शक्यता दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत सांगितलं होतं, की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे पूर्ण सांभाळतील. तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा रहा आणि युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे त्यामळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी. असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळं उद्या उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी निकाल येईल, असं पवार म्हणाले.