AIIMS मिळवण्यासाठी NCERT आधारित अभ्यास, नियमित MCQ सराव, टेस्ट सिरीज आणि सतत पुनरावलोकन हीच यशाची चार प्रमुख सूत्रे आहेत. योग्य नियोजन, सातत्य आणि स्मार्ट अभ्यास ठेवला, तर AIIMSमध्ये प्रवेश स्वप्न न राहता वास्तव बनते.
अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.
परराज्यात काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांसाठी HKRN मार्फत बाईक रायडर, केअरगिव्हर, मेसन, टाइलिंग आणि इतर कौशल्याधारित पदांसाठी मोठी भरती सुरू आहे.
व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी–स्वयंसेवकांनी तांदुळवाडीतील निवासी शिबिरात व्यसनमुक्ती, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीवर मार्गदर्शन घेतले.
वडाळा येथील S.I.W.S. ज्युनियर कॉलेजमध्ये उपप्राचार्या शीला कृष्णन यांचा जबरदस्तीने राजीनामा घेतल्याच्या आरोपांवरून शिक्षक सेना पेटून उठली आहे. मोर्च्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याणमध्ये अॅप-आधारित वाहतुकीला प्रतिसाद म्हणून टेरिफ मीटरप्रमाणे रिक्षा सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात कल्याणच्या यश ढाकणेने राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
राज्यात टीईटी परीक्षा सक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.