आजच्या न्यूज अपडेट एका क्लिकवर
27 Nov 2025 12:40 PM (IST)
नाशिकच्या हिरावाडीत नवविवाहित नेहा पवारने सासरच्या सततच्या मानसिक छळाला, चारित्र्यावरच्या संशयाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली. सहापानांच्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप.
27 Nov 2025 12:30 PM (IST)
डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ज्योती धाहीजेचा खून करून पती पोपट धाहीजे फरार झाला. तीन अपत्यांसह कुटुंब उद्ध्वस्त; मानपाडा पोलिसांचा तपास सुरू
27 Nov 2025 11:05 AM (IST)
अक्कलकोट तालुक्यातील भाजप लढवत असलेल्या तीन नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत. अक्कलकोट तालुक्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा तिन्ही नगर परिषदेत होणार आहे सामना, दोन्ही पक्षांना काँग्रेसचा आव्हान असणार आहेत. माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी नगरपरिषद तिरंगी लढत होणार आहे. तीन वर्षात अक्कलकोट तालुक्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
27 Nov 2025 10:59 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या जर्सीवर परतला. मालिकेतील त्याची कामगिरी प्रभावी होती, त्याने तीन सामन्यांमध्ये २०२ धावा केल्या. त्याने एक अर्धशतक आणि एक शतकही झळकावले. या दमदार कामगिरीमुळे तो आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर १ वर पोहोचला.
27 Nov 2025 10:52 AM (IST)
सोन्याच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) २०१७-१८ सिरीज IX २७ नोव्हेंबर २०२५ रोजी परिपक्व होणार आहे. या सिरीजमधील गुंतवणूकदारांना आता प्रति ग्रॅम ₹१२,४८४ परतावा मिळेल, जो प्रति ग्रॅम ₹२,९६४ वरून वाढून सुमारे २८८% इतका वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने या टप्प्यासाठी अंतिम रिडेम्पशन किंमत प्रति युनिट ₹१२,४८४ निश्चित केली आहे. ही किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने प्रकाशित केलेल्या गेल्या तीन दिवसांत (२४, २५ आणि २६ नोव्हेंबर २०२५) ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किमतीवर आधारित आहे. ज्या गुंतवणुकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी हा बाँड कमालीचा ठरणार आहे.
27 Nov 2025 10:44 AM (IST)
दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान (Pakistan) स्वत:च दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दररोज पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये दहशतवादी हल्ले होत आहे. पेशावरमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा खैबरपख्तुनख्वामध्ये हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
27 Nov 2025 10:38 AM (IST)
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगचा आगामी चित्रपट “धुरंधर” ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला व्यापक प्रशंसा मिळाली. संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याची कथा पाकिस्तानातील लियारी शहरात घडते, जे एकेकाळी गुन्हेगारीचे केंद्र होते. यासगळ्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे.
27 Nov 2025 10:26 AM (IST)
रशिया–युक्रेन (Russia Ukraine War)युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या २८ कलमी शांतता योजनेबाबत नवा आणि गंभीर दावा समोर आला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या बैठकीनंतर रशियाने जाहीर केलेल्या या योजनेत “मॉस्कोच्या स्पष्ट अटी” असल्याचा आरोप आता चर्चेत आहे. या आराखड्यामुळे रशियालाच हवा तसा फायदा मिळाल्याचा मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
27 Nov 2025 10:19 AM (IST)
भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाचे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे पुनरागमन होणार आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी रांची येथे पोहोचला आहे. बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी रोहित शर्मा त्याच्या फार्महाऊसवरील कामाची देखरेख करण्यासाठी मुंबईहून अलिबागला गेला. त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी मुंबईहून रांचीला विमानाने गेला.
27 Nov 2025 10:11 AM (IST)
हॉंगकॉंगमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर) ताई पो भागाता एका रहिवाशी इमारतील भीषण आग लागली होती. एका वांग फुक कोर्ट गुहनिर्माण इमारती बाहेर अनेक टॉवर्समध्ये ही आग पसरली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या आगीत ४४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. सध्या आग विझवण्याचे आणि बचाव कार्य सुरु आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नउपस्थित केले जात आहेत.
27 Nov 2025 10:03 AM (IST)
: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामध्ये झालेल्या अपवादानंतर सोशल मिडियावर यांची मोठी चर्चा पाहायला मिळाली आहे. सोशल मिडियावर अनेक आरोप प्रत्यारोप लावले जात आहेत. पण आता याचदरम्यान स्मृती मानधना हिला थोडा दिलासा मिळाला आहे. स्मृती मानधना हिचे वडील श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, जो कुटुंबासाठी मोठा दिलासा आहे. श्रीनिवास यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
27 Nov 2025 09:57 AM (IST)
बॉलीवूडमधील कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा सध्या त्याच्या “किस किस को प्यार करूं २” या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलरही आज प्रदर्शित झाला. ट्रेलर लाँच कार्यक्रमात, कॉमेडी किंगने कॅप्स कॅफेमधील गोळीबाराच्या घटनेबाबतचे पहिले विधान शेअर केले. अभिनेत्याने पहिल्यांदाच स्वतःच्या कॅफेवर झालेल्या गोळीबाराबद्दल स्पष्ट बोलला आहे.
27 Nov 2025 09:49 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश केले. मालिका ०-२ अशी गमावल्यानंतर एकता आणि दृढनिश्चय दाखवत शुभमन गिल म्हणाला की या पराभवानंतरही संघ अधिक मजबूत होईल. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका भारतासाठी लाजिरवाणी होती. दक्षिण आफ्रिकेने कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यात ३० धावांनी आणि गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात ४०८ धावांनी पराभव करून यजमान संघाला क्लीन स्वीप केले.
27 Nov 2025 09:41 AM (IST)
२००० ते २०२३ दरम्यान, चीनने जगातील ८०% पेक्षा जास्त देशांना आणि प्रदेशांना २ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कर्जे आणि अनुदाने दिली. या काळात अमेरिका सर्वांत मोठा लाभार्थी होता. व्हर्जिनियातील विल्यम्सवर्ग येथील कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी येथील संशोधन संस्थेच्या एंडडेटाने जारी केलेल्या डेटावरून असे दिसून येते की, या काळात चिनी सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी जवळजवळ २,५०० प्रकल्प आणि उपक्रमांसाठी अमेरिकन कंपन्यांना २०० अब्ज डॉलर्स कर्ज दिले. हे चीनच्या एकूण कर्जाच्या ९% पेक्षा जास्त आहे. या रकमेपैकी ९५% पेक्षा जास्त रक्कम चिनी सरकारी मालकोच्या बँका, उपक्रम आणि मध्यवर्ती बँकेने दिली होती, तर उर्वरित रक्कम गैर-सरकारी संस्थांनी दिली होती.
27 Nov 2025 09:35 AM (IST)
राज्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. तस्करीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांविरोधात राज्य परिवहन प्राधिकरणाने कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तस्करी करणारे वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यास, परवाना ३० दिवस निलंबित ठेवून वाहन अडकवले जाईल. दुसरा गुन्हा झाल्यास ६० दिवस परवाना निलंबित व वाहन अडकवले जाईल. तिसरा गुन्हा झाल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे राज्य परिवहन प्राधीकरणाचे निर्देश आहेत. महसूल व वन विभागाने याबाबतचे शासन परिपत्रक काढले आहे.
27 Nov 2025 09:28 AM (IST)
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितले.
27 Nov 2025 09:18 AM (IST)
अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ही घटना अहिल्यानगर- बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर झाल्याचे समोर आले आहे. हल्ला झालेल्या नेत्याचे नाव राम खाडे असे आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
27 Nov 2025 09:10 AM (IST)
अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना घडली. यात दोन नॅशनल गार्ड सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी गोळीबाराच्या या घटनेत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
Marathi Breaking News Updates : हॉंगकॉंगमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर) ताई पो भागाता एका रहिवाशी इमारतील भीषण आग लागली होती. एका वांग फुक कोर्ट गुहनिर्माण इमारती बाहेर अनेक टॉवर्समध्ये ही आग पसरली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या आगीत ४४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. सध्या आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरु आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नउपस्थित केले जात आहेत.
हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील वांग कुफ कोर्ट रहिवाशी इमारतीमध्ये दुपारी ३ वाजता ही घटना घडवी आहे. या इमारतींमध्ये सुमारे ४००० लोक राहतात. एका ३२ मजली इमारतील लागलेली आगे आसपासच्या इमारतींमध्ये पसरली आहे. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण परिसक काही क्षणांतच धुराने आणि आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला आहे.






