Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: संसदेत विरोधक पुन्हा आक्रमक; लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड झाली, तेव्हा शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने १८ जागा जिंकल्या. यासोबतच इतर निवडणुकाही लढल्या गेल्या. या सर्व २०१३ आणि २०१८ च्या घटनेनुसार झाल्या

  • By anuradha sagar
Updated On: Aug 06, 2026 | 06:35 PM
Maharashtra Breaking News Today 22. 09.2026

Maharashtra Breaking News Today 22. 09.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Politics:  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर बुधवारी सुनावणी झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे हे नेते नाहीत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. आता याप्रकरणावर आज पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा ठरवत ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे २०१२ मध्ये मृत्यूपर्यंत पक्षाचे प्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळली. एकनाथ शिंदेंनी २०२२ पर्यंत पक्षाच्या घटनेला आव्हान दिले नव्हते. २०१८ मध्ये उद्धव यांनी शिंदेंची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाला याची माहिती दिली.

 

 

The liveblog has ended.
  • 06 Aug 2026 06:35 PM (IST)

    06 Aug 2026 06:35 PM (IST)

    Ganesh Murti Price Hike: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

    रोहन नाईक, सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असताना कोकणातील गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. मात्र, यंदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाहतूक खर्च, शाडू माती, रंग, मजुरी आणि वीज समस्यांमुळे गणेशमूर्ती व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी, यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गणेशभक्तांना बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

  • 06 Aug 2026 06:20 PM (IST)

    06 Aug 2026 06:20 PM (IST)

    ‘देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, जनतेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले’; मनोज जरांगेंना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

    मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत जरांगेंना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला.

  • 06 Aug 2026 06:10 PM (IST)

    06 Aug 2026 06:10 PM (IST)

    Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    Nashik Earthquake News Marathi: नाशिक जिल्ह्याला गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सुरगाणा, कळवण आणि पेठ या तीन तालुक्यांतील विविध भागांत हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

  • 06 Aug 2026 06:04 PM (IST)

    06 Aug 2026 06:04 PM (IST)

    Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    Nashik Earthquake News Marathi: नाशिक जिल्ह्याला गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सुरगाणा, कळवण आणि पेठ या तीन तालुक्यांतील विविध भागांत हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

  • 06 Aug 2026 05:59 PM (IST)

    06 Aug 2026 05:59 PM (IST)

    Analogue Paneer कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

    पनीर हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक लोकप्रिय भाग आहे. परंतु, अलीकडच्या काळात बाजारात मिळणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः ‘अॅनालॉग पनीर’ या नावाने विकल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पारंपरिक पनीर हे दुधापासून तयार केले जाते, मात्र अॅनालॉग पनीरमध्ये दूध किंवा दुधातील फॅटऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर अन्नघटकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची चव आणि पोत पनीरसारखी वाटली तरी त्याचे पोषणमूल्य वेगळे असते.

  • 06 Aug 2026 05:51 PM (IST)

    06 Aug 2026 05:51 PM (IST)

    ‘आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा…’, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका

    शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय, अशा अर्विभावात राऊत पतंगबाजी करत आहेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • 06 Aug 2026 05:45 PM (IST)

    06 Aug 2026 05:45 PM (IST)

    धुरळा उडणार अन् मैदान मारणार! भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक बदलले

    या वर्षाच्या अखेरीस भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटने महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याचे वेळापत्रक देखील बदलले आहे. या वर्षाअखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सामने खेळणार होता. मात्र आता या दौऱ्यात टी 20 सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • 06 Aug 2026 05:30 PM (IST)

    06 Aug 2026 05:30 PM (IST)

    दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांना मोठा दिलासा; उपचारांसाठी १ लाखांपर्यंत आर्थिक मदत

    दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • 06 Aug 2026 05:17 PM (IST)

    06 Aug 2026 05:17 PM (IST)

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे राजकीय सल्लागार होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीत आगामी निवडणुका, पक्षाची संघटनात्मक रणनीती आणि जनमत चाचण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

  • 06 Aug 2026 04:57 PM (IST)

    06 Aug 2026 04:57 PM (IST)

    Pratap Sarnaik: १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी घेतले व्यवहारिक मराठीचे धडे; १५ ऑगस्टपर्यंत उर्वरितांना संधी

    “महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:47 PM (IST)

    06 Aug 2026 04:47 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

    मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात पडताळणी समितीने प्रमाणपत्रे रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयानंतर मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:37 PM (IST)

    06 Aug 2026 04:37 PM (IST)

    महिलांचे कपडे घालून 3 मुलांच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कोणतीही सुसाईड नोट नाही; प्रत्येक पैलूचा तपास सुरू

    जयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांचे कपडे घालून एका ३ मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही. या व्यक्तीने टोकाचे पाऊल का उचलले त्याने महिलांचे कपडे घालण्यामागे काय गूढ आहे, अश्या सर्व पैलूंचा शोध पोलीस घेत आहेत. वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:27 PM (IST)

    06 Aug 2026 04:27 PM (IST)

    Crude Oil: व्हेनेझुएलापासून रशियापर्यंत भारताचा दबदबा! कच्च्या तेलावर आली मोठी बातमी

    भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. देशातील सरकारी तेल कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) आता दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये तेल उत्पादनाशी संबंधित प्रकल्पांमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीला आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर तेथील दोन महत्त्वाच्या तेल क्षेत्रांच्या संचालनासाठी करार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:17 PM (IST)

    06 Aug 2026 04:17 PM (IST)

    Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

    भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. हर्षित इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर बाहेर पडला. परंतु, आता असा दावा केला जात आहे की, हर्षित गंभीर दुखापतीमुळे नाही, तर खराब फिटनेस आणि स्नायूंच्या क्रॅम्प्स येण्याच्या (cramps) समस्येमुळे मैदानाबाहेर गेला होता. ही बाब समोर आल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) नाराजी असल्याचेही वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे टीम इंडियाच्या फिटनेस प्रणालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:10 PM (IST)

    06 Aug 2026 04:10 PM (IST)

    शिंदे गटाला मोठा झटका? ‘…उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडले’, कपिल सिब्बल यांचा दावा

    महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर बुधवारी सुनावणी झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे हे नेते नाहीत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. आता याप्रकरणावर आज (गुरुवार, 6 ऑगस्ट ) पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे.ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी युक्तिवाद करताना महत्वाच्या गोष्टी मांडल्या. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाला पक्षाची घटना अमान्य करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल विचारला. वाचा सविस्तर... 

  • 06 Aug 2026 04:00 PM (IST)

    06 Aug 2026 04:00 PM (IST)

    DPL 2026: गडी सुसाट सुटलाय! Yash Dhull चे तुफानी शतक; डीपीएलमध्ये उडवला धुरळा..

    Yash Dhull Centruty: सध्या दिल्ली प्रीमियर लीग सुरू आहे. भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारा माजी कर्णधार यश धुलने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शानदार खेळी केली आहे. त्याने आपल्या बॅटचा तडाखा दिला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर सेंट्रल दिल्लीचा कर्णधार यश धूलने जुनी दिल्ली या संघाविरुद्ध 47 बॉलमध्ये आक्रमक खेळी केली आहे. त्याने शानदार शतकी खेळी केली आहे.

  • 06 Aug 2026 03:50 PM (IST)

    06 Aug 2026 03:50 PM (IST)

    Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

    Atiq Ahmed News Marathi: उत्तर प्रदेशातील झाशी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा आबान अहमद याचा मृत्यू झाला. या अपघातात आबानसह त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण प्रयागराजहून झाशी कारागृहात बंद असलेल्या आबानच्या मोठ्या भावाला अली अहमद याला भेटण्यासाठी जात होते. ही दुर्घटना झाशी जिल्ह्यातील पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.

  • 06 Aug 2026 03:40 PM (IST)

    06 Aug 2026 03:40 PM (IST)

    US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

    मध्य पूर्वेतील (Middle East) अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष आज संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात उघड युद्ध सुरू नसले तरी, दोन्ही देशांमधील तणाव आतापर्यंतच्या सर्वात टोकाच्या टप्प्यावर पोहोचला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकताच एक खळबळजनक खुलासा करताना सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणवर ‘दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा आणि भीषण हल्ला’ (Biggest Attack Since World War II) करण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभे होते. मात्र, शेवटच्या क्षणी ट्रम्प यांनी हा विनाशकारी हल्ला रोखण्याचा निर्णय घेतला. लष्करी ताकदीचा वापर करून इराणचे संपूर्ण अस्तित्व धोक्यात आणण्याऐवजी ट्रम्प यांनी शांतता, मुत्सद्देगिरी आणि राजनैतिक कराराला (Diplomatic Deal) प्राधान्य का दिले? यामागे जागतिक राजकारण, अर्थकारण आणि आखाती देशांची मोठी मध्यस्थी कारणीभूत ठरली आहे.

  • 06 Aug 2026 03:30 PM (IST)

    06 Aug 2026 03:30 PM (IST)

    भेसळ करताय? मग सावधान! रत्नागिरीत FDA ची अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम

    रत्नागिरी: राज्यभरात अन आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई सुरू असताना, रत्नागिरी जिल्ह्यातही अन्न भेसळ, अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे या कारवाईमुळे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात एफडीएने तब्बल १५० हून अधिक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे.

  • 06 Aug 2026 03:20 PM (IST)

    06 Aug 2026 03:20 PM (IST)

    Yellamma First Look: डीएसपीच्या अभिनय पदार्पणावर अनीस बज्मी फिदा; ‘येल्लम्मा’च्या फर्स्ट लुकचं केलं भरभरून कौतुक

    Yellamma First Look: रॉकस्टार डीएसपी (देवी श्री प्रसाद) यांच्या अभिनयातील पहिल्या चित्रपट ‘येल्लम्मा’च्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डीएसपीच्या वाढदिवसानिमित्त २ ऑगस्ट रोजी ‘पर्शी’ या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याचे कौतुक केले असून, प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनीही त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 06 Aug 2026 03:10 PM (IST)

    06 Aug 2026 03:10 PM (IST)

    Gurugram Crime: ‘नवऱ्याने मला बेदम मारहाण केली’… वडिलांशी झाला शेवटचा संवाद; काही तासांतच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

    गुरुग्राम: गुरुग्राम मधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून विवाहितेने वडिलांना फोन करून, “नवऱ्याने मला बेदम मारहाण केली,” अशी व्यथा मांडली. मात्र, त्या फोननंतर अवघ्या काही तासांतच तिचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले असून, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

  • 06 Aug 2026 03:00 PM (IST)

    06 Aug 2026 03:00 PM (IST)

    ‘माझी नार्को टेस्ट करा,’ मनोज जरांगे यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता बावनकुळे यांनी प्रथमच यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप फेटाळताना त्यांनी, “माझी नार्को टेस्ट करता येईल, त्यासाठी माझी पूर्ण परवानगी आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तोफ डागली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

  • 06 Aug 2026 02:55 PM (IST)

    06 Aug 2026 02:55 PM (IST)

    MHADA Lottery Results: म्हाडा सोडतीचा मोठा दिवस! 2,640 सदनिकांचा निकाल घरबसल्या LIVE पाहा

    Mumbai MHADA Lottery Results 2026: मुंबईत स्वतःच्या घराची वाट पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) मुंबई मंडळाच्या 2026 गृहनिर्माण योजनेतील 2,640 घरांची संगणकीय सोडत आज पार पडत आहे. या सोडतीकडे राज्यभरातील अर्जदारांचे लक्ष लागले असून, अनेकांच्या आयुष्यात आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच हजारो लोकांनी नोंदणी केली. अंतिम आकडेवारीनुसार 97 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यापैंकी आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या 69 हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीत आपला सहभाग निश्चित केला.

  • 06 Aug 2026 02:50 PM (IST)

    06 Aug 2026 02:50 PM (IST)

    IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

    भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध लाल चेंडूच्या क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याआधी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. चार दिवसांसाठी नियोजित असलेला हा सराव सामना, संघ व्यवस्थापन आणि आयोजक यांच्या परस्पर संमतीने नंतर तीन दिवसांचा करण्यात आला आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, जाणून घेऊयात.

  • 06 Aug 2026 02:45 PM (IST)

    06 Aug 2026 02:45 PM (IST)

    Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

    Sanjay Raut PC Delhi: शिवसेना पक्ष फुटलेला नाही. विधीमंडळ पक्षात फूट पडली पण शिवसेना फुटलेली नाही, पक्ष आणि चिन्ह उद्धव शिवसेनेकडे राहायला हवी. काही लोक अमित शाहांपोटी, काहीजण लोभापोटी फुटले. पण मुळ पक्ष आणि आणि चिन्ह हे शिवसेनेकडेच राहायला हवं ,अशा प्रकारची भूमिका आमच्या वकीलांनी मांडली.” अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, “हा एक ऐतिहासिक खटला देशाच्या लोकशाही संदर्भात सुरू आहे. याची जाणीव सर्वोच्च न्यायालयाला आहे. देशातील भविष्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे.”

  • 06 Aug 2026 02:40 PM (IST)

    06 Aug 2026 02:40 PM (IST)

    Elon Musk Net Worth: एका दिवसात मुकेश अंबानीच्या आयुष्याची कमाई एलॉन मस्कने गमावली, नक्की काय घडले

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एलॉन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत बुधवारी लक्षणीय घट झाली. त्यांच्या कंपनी, स्पेसएक्सचे शेअर्स १३.६१% नी घसरले, तर टेस्लाच्या स्टॉकमध्येही १.७७% ची घसरण झाली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, यामुळे Elon Musk Net Worth  मध्ये तब्बल ८९.६ अब्ज डॉलर्सची घट झाली. ही घट रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ८५.७ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीपेक्षा जास्त आहे. यामुळे मस्क यांची निव्वळ संपत्ती ६८७ अब्ज डॉलर्सवर आली आहे. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत ६८.१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

  • 06 Aug 2026 02:35 PM (IST)

    06 Aug 2026 02:35 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच

    अकोला : ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना अकोला जिल्ह्यात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत असतानाही तब्बल १५ शाळा अद्याप एक शिक्षकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ३७ शाळा एक शिक्षकी होत्या. आता ही संख्या कमी होऊन १५ वर आली आहे. या शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत होते; मात्र त्यापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक झाले आहे.

  • 06 Aug 2026 02:30 PM (IST)

    06 Aug 2026 02:30 PM (IST)

    शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

    ज्या वडिलांनी लहानपणापासून मुलींचे संगोपन केले, त्यांना शिकवलं, मोठ केलं त्याच मुलींना वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याय वेळ नाही. ही घटना ऐकताच अनेकांना धक्का बसेल पण वास्तवात असे घडून आले आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. माहितीनुसार, हरियाणातील सेनीपतमधून ही घटना समोर आली आहे. येथील एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांना तीन मुली आहेत. ज्या मुलींना लहाणाचे मोठे केले त्या मुलींपैकी एकही मुलगी शिवचरण यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली नाही. त्यांचे अंतिम संस्कार वृद्धाश्रमातील स्टाफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पार पडला. यावेळी मुलींनी फक्त व्हिडिओ काॅलवर आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांचे दर्शन घेतले. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले असून मुलींच्या अनुपस्थितीवर लोकांनी टिका व्यक्त केली आहे.

    People often claim daughters always take care of their parents. But every situation is different. This father passed away in an old-age home, and his daughter couldn't attend his last rites, asking on a video call to hurry up. Heartbreaking. 💔 pic.twitter.com/uzZIOdzog2

    — Byomkesh (@byomkesbakshy) August 6, 2026

    credit - social media and Twitter

  • 06 Aug 2026 02:20 PM (IST)

    06 Aug 2026 02:20 PM (IST)

    क्रिकेटच्या इतिहासात मोठी खळबळ! ‘हा’ संघ ICC World Cup 2027 मधून बाहेर होणार? एकेकाळी…

    ICC World Cup 2027: पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये आयसीसी मेन्स वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. यासाठी पहिले 8 संघ थेट क्वालिफाय झाले आहेत.  मात्र वेस्ट इंडिज संघासाठी वर्ल्डकप खेळणे म्हणजे आता त्यांत अवघड दिसून येत आहे. एक काळ असा होता जेव्हा क्रिकेट जगतावर वेस्ट इंडिजचे एकछत्री साम्राज्य होते. परंतु, आता त्याच वेस्ट इंडिज संघावर सलग दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कपला मुकण्याची वेळ आली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर, आता दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश मिळवणे शे होपच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघासाठी अत्यंत कठीण झाले आहे.

  • 06 Aug 2026 02:15 PM (IST)

    06 Aug 2026 02:15 PM (IST)

    Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

    १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. यावर प्रत्येकाचे काही ना काही मत नक्कीच आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन डावांमध्ये अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावा करून संघर्ष केल्यानंतर, वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध आपली लय पकडला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ५०, २० आणि ८१ धावांची शानदार खेळी केली. IPL मधील त्याच्या कामगिरीमुळे या तरुण फलंदाजाच्या भविष्याबद्दल तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नुकताच निवृत्त झालेला खेळाडू अजिंक्य रहाणेनेदेखील याबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

  • 06 Aug 2026 02:10 PM (IST)

    06 Aug 2026 02:10 PM (IST)

    Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज

    PM Vidyalaxmi Scheme Education Loan: जर आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होत असेल, तर केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कोणतीही हमी न देता आणि कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता एज्युकेशन लोन दिले जाते. एवढेच नाही तर, सरकार कर्जावर व्याजात सूट आणि बँकांना क्रेडिट हमी यांसारख्या सुविधा देखील देते, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणे सोपे होते.

  • 06 Aug 2026 02:05 PM (IST)

    06 Aug 2026 02:05 PM (IST)

    NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती

    SVKM’s NMIMS School of Business Management: गेल्या 45 वर्षांहून अधिक काळापासून SVKM’s NMIMS School of Business Management (SBM) धोरणात्मक विचार, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची दृष्टी असलेले व्यवस्थापन व्यावसायिक घडवण्यावर भर देत आहे. व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांकडून अपेक्षा सातत्याने बदलत असताना, SBM ने शैक्षणिक गुणवत्ता, उद्योग क्षेत्राशी संवाद आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थापन शिक्षणाचा दृष्टिकोन अधिक सक्षम केला आहे.

    वाचा सविस्तर : Business Management: NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती!
  • 06 Aug 2026 02:00 PM (IST)

    06 Aug 2026 02:00 PM (IST)

    पाकिस्तानच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियालाही बसला फटका

    पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात पाकिस्तानसमोर चौथ्या डावात विजयासाठी फक्त ७५ धावांचे लक्ष्य होते. जे त्यांनी दोन विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयामुळे पाकिस्तानने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ च्या गुणतालिकेत (WTC) गुणतालिकेत मोठी झेप घेतली. या विजयाचा परिणाम भारतीय संघाच्या स्थानावरही झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून, त्यात चार विजय, चार पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. अंतिम फेरीच्या शर्यतीत भारताला आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना आगामी सामन्यांमध्ये विजय नोंदवावे लागतील.

  • 06 Aug 2026 01:55 PM (IST)

    06 Aug 2026 01:55 PM (IST)

    पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

    ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी ‘डिमांड’ (पिणारे) करणाऱ्यांवर देखील वक्रदृष्टी वळविली आहे. डिमांड करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू केली असून, शहरात या मोहिमेअंतर्गत तब्बल २०८ जणांवर कारवाई केली आहे. यासोबतच पोलिसांकडून आता डिमांड करणाऱ्यांना पुनर्वसनाची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यांना एक महिना व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे कारवाईसोबतच पोलिसांनी व्यसनांच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  • 06 Aug 2026 01:50 PM (IST)

    06 Aug 2026 01:50 PM (IST)

    eSIM की फिजिकल SIM? नवीन फोन घेण्यापूर्वी दोन्हीमधला फरक नक्की समजून घ्या….

    स्मार्टफोनमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल झाले आहेत. कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत सर्वच गोष्टी आधुनिक झाल्या आहेत. आता त्यात आणखी एक बदल वेगाने दिसत आहे, तो म्हणजे eSIM. अनेक नवीन प्रीमियम स्मार्टफोनमध्ये eSIM ची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, पारंपरिक SIM कार्ड वापरावे की eSIM वर स्विच करावे?

  • 06 Aug 2026 01:45 PM (IST)

    06 Aug 2026 01:45 PM (IST)

    भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता

    रँडस्टैड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च २०२६ नुसार गुगल हा भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता म्हणून समोर आला आहे. या यादीत टाटा ग्रुप दुसऱ्या आणि ॲमेझॉन तिसऱ्या स्थानावर आहेत. देशातील सुमारे ३,५०० लोकांच्या मतांच्या आधारे रँडस्टॅड इंडियाने हे सर्वेक्षण तयार केले आहे. हा अभ्यास ३४ देशांमधील जागतिक सर्वेक्षणाचा एक भाग होता, ज्यामध्ये १.७५ लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. अहवालानुसार, कर्मचारी आता केवळ उच्च वेतनच नाही, तर उत्तम कामाचे वातावरण आणि करिअरच्या संधी देखील शोधत आहेत.

  • 06 Aug 2026 01:40 PM (IST)

    06 Aug 2026 01:40 PM (IST)

    दौंड तालुक्याच्या दुष्काळी गावांच्या हद्दीत मुरुम माफियांचा धुडगूस

    दौंड तालुक्यातील रोटी, हिंगणी गाडा, वासुंदे, जिरेगाव, कुरकुंभ, कुसेगाव, पडवी, देऊळगाव गाडा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा मुरुम उत्खनन आणि विना परवाना वाहतुकीचा मोठा उद्योग सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या या प्रकरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, महसूल विभाग आणि वाहतूक पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • 06 Aug 2026 01:35 PM (IST)

    06 Aug 2026 01:35 PM (IST)

    बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू शकिब अल हसनच्या घरावर अज्ञात समाजकंटकांचा हिंसक हल्ला

    बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचा महान अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) मागुरा जिल्ह्यातील पैतृक घरावर बुधवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी हिंसक हल्ला केला. या घटनेत हल्लेखोरांनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून थेट घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मागुरा परिसरात प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

     

  • 06 Aug 2026 01:25 PM (IST)

    06 Aug 2026 01:25 PM (IST)

    ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये रंगणार अन्यायाविरुद्धची लढाई

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिकांमध्ये आता कथेला नवी वळणं मिळणार आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सत्यासाठी लढणाऱ्या या दोन्ही मालिकांमधील नायिका प्रेक्षकांना प्रेरणादायी संघर्षाचा अनुभव देणार आहेत.

  • 06 Aug 2026 01:15 PM (IST)

    06 Aug 2026 01:15 PM (IST)

    इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा

    पाकिस्तानमधील (Pakistan News) राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा प्रचंड वेग आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या तुरुंगवासाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच, त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पीटीआयने पुन्हा एकदा आरपारच्या संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी पेशावर येथील एका विशाल जनसभेला संबोधित करताना थेट केंद्र सरकारला कडक अल्टिमेटम दिला आहे. जर इम्रान खान यांना लवकरात लवकर कायदेशीर न्याय मिळाला नाही, तर येत्या २७ सप्टेंबर रोजी देशभरातील लाखो समर्थक राजधानी इस्लामाबादवर मोर्चा काढतील आणि सरकारला घेराव घालतील, अशी अधिकृत घोषणा आफ्रिदी यांनी केली आहे.

  • 06 Aug 2026 01:05 PM (IST)

    06 Aug 2026 01:05 PM (IST)

    ‘तो मला मारहाण करतोय’… बहिणीला फोन, दुसऱ्याच दिवशी B.Ed विद्यार्थिनीची हत्या

    छत्तीसगढ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका हाऊसिंग बोर्ड कॉलनीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका बीएड विद्यार्थिनींची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना रायपूर येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 06 Aug 2026 12:59 PM (IST)

    06 Aug 2026 12:59 PM (IST)

    आजपासून निवासी डॉक्टर संपावर

    बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी मध्ये नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याला ऍलोपथी डॉक्टरांचा विरोध आहे. याच मुद्द्यावरून आजपासून निवासी डॉक्टर संपावर जाणार ससून मधील 250 डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिकलकडून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मकॉलजी बीएचएमस डॉक्टरांना प्रमाणपत्र दिले जात आहे.

  • 06 Aug 2026 12:52 PM (IST)

    06 Aug 2026 12:52 PM (IST)

    वाल्मीक कराडला व्हीआयपी सुविधा दिल्याच्या आरोपांवर कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण

    बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला विशेष सुविधा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कारागृह प्रशासनाने हे दावे पूर्णपणे नाकारले आहेत. सर्व कैद्यांना नियमांनुसार समान सुविधा दिल्या जात असून, कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नसल्याचे अधिकृत पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • 06 Aug 2026 12:52 PM (IST)

    06 Aug 2026 12:52 PM (IST)

    सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीने वाढल्या राजकीय चर्चांना उधाण

    बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून विजयी झालेले आमदार प्रशांत किशोर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काँग्रेसकडून झालेल्या टीकेनंतर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

  • 06 Aug 2026 12:31 PM (IST)

    06 Aug 2026 12:31 PM (IST)

    संविधानावर विश्वास - संजय राऊत

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे! यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय..या बाबत आमच्या मनात शंका नाही! जय महाराष्ट्र

  • 06 Aug 2026 12:26 PM (IST)

    06 Aug 2026 12:26 PM (IST)

    मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत बैठक

    अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधीची बैठक होणार आहे. बैठकीसाठी लोकप्रतिनिधी भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चा करत आहेत.

  • 06 Aug 2026 12:20 PM (IST)

    06 Aug 2026 12:20 PM (IST)

    15 कृषी अधिकारी निलंबित

    धाराशिवमध्ये १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे.

  • 06 Aug 2026 12:14 PM (IST)

    06 Aug 2026 12:14 PM (IST)

    आमदार सत्यजित तांबे रास्ता रोको करणार

    नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, चाकण मार्गे पुणे असा अपेक्षित आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी तो अत्यंत अनुकूल आणि उपयुक्त आहे. याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी येथे 9 ऑगस्ट ला रास्ता रोको करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तज्ज्ञ समिती नियुक्त झाली तरीही 9 ऑगस्ट च रास्ता रोको आंदोलन होणारच असा इशारा आमदार तांबे यांनी दिला आहे.

  • 06 Aug 2026 11:50 AM (IST)

    06 Aug 2026 11:50 AM (IST)

    महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

    कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC Politics) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • 06 Aug 2026 11:40 AM (IST)

    06 Aug 2026 11:40 AM (IST)

    दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून… शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी

    फरिबादच्या सिकरोना गावात सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये सोमवारी एका नकाबपोशाद्वाने शाळेच्या शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने शिक्षिकेला भेटण्यासाठी वर्गाबाहेर बोलावले आणि असंख्य वेळा चाकूने वार करत दिवसाढवळा शाळेच्या आवारात शिक्षिकेची निघृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून सर्वच हादरुन गेले. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण केले असून शाळेतील सुरक्षेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २६ वर्षांय शिक्षिकेचा तडफडत मृत्यू झाला आणि ही हत्या चूक नसून एक पूर्वनियोजित कट होता. हत्येमागचं कारण आणि आरोपी शाळेत घुसला कसा याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

Web Title: 6 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • CJP
  • international news
  • Maharashtra Breaking
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
1

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
3

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
4

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.