Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live breaking News in Marathi: मान्सूनची बहुतांश भागांतून माघार

Maharashtra Breaking 5 Oct: ५ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. आरबीआयच्या पतधोरण बैठकीला सुरुवात, आशियाई खेळ २०२६ मधील भारताची ऐतिहासिक कामगिरी, कोकणात ऑक्टोबर हीटचा तडाखा आणि नागपुरात ५०० किलो गांजा जप्त; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 05, 2026 | 09:52 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 05.10.2026

Maharashtra Breaking News Today 05.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 05 Oct 2026 09:52 AM (IST)

    05 Oct 2026 09:52 AM (IST)

    Brazil Election 2026 Runoff: अति-उजव्या फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांच्याकडून अध्यक्षांना तगडे आव्हान

    Brazil Election 2026 Runoff:   ब्राझीलमधील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रंगतदार वळण आले असून पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक मतांचे स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता २५ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीचे (Run-off) निर्णायक मतदान होणार आहे. ९९.९% मतांची मोजणी पूर्ण झाली असता, वादग्रस्त ठरलेल्या माजी अध्यक्षांचे ४५ वर्षीय पुत्र आणि अति-उजव्या विचारसरणीचे उमेदवार फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांनी ४७% मते (५ कोटी ६१ लाख) मिळवत आघाडी घेतली आहे, तर विद्यमान ८० वर्षीय अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना ४५.१% मते (५ कोटी ३८ लाख) मिळाली आहेत. पहिल्या फेरीत मिळालेल्या या अनपेक्षित कौलामुळे डाव्या विचारसरणीचे लुला दा सिल्वा यांच्या सत्ता राखण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असून, २५ ऑक्टोबरच्या अंतिम लढतीत संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

  • 05 Oct 2026 09:42 AM (IST)

    05 Oct 2026 09:42 AM (IST)

    या पोरांनी  मोदी शहा वैगरेंची दहशत नष्ट केली- संजय राऊतांनी शेअर केला दिल्लीतला व्हिडीओ 

    दिल्ली ची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ; मोदी शहा वैगरेंची दहशत या पोरानी नष्ट केली

    नेहा बोरा यांना ज्या गाडीत बंदिस्त केलं होतं, त्याच गाडीला पोरांनो खेळणं बनवून टाकलं! 😂
    दिल्ली पोलीस पूर्णपणे हतबल झालेत. विद्यार्थ्यांनी गाडी उलट्या दिशेनं पळवून नेली, पोलीस काहीच करू शकले नाहीत.
    किमान चार वेळा गाडी १०० मीटर पुढे आणि १०० मीटर मागे धावत राहिली.
    अमीत शहा भूमिगत आहेत;
    थांबा ; आणखी बरच काही बघायचं आहे!
    महाराष्ट्रत आज ट्रेलर दिसला आहे!
    जय महाराष्ट्र!
    https://t.co/rgQ6YanV8B

    — Sanjay Raut (@rautsanjay61) October 4, 2026

  • 05 Oct 2026 09:32 AM (IST)

    05 Oct 2026 09:32 AM (IST)

    Indian Women’s Hockey Team: बेंगळुरूमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार स्वागत Video Viral

    बेंगळुरूमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार स्वागत

    Amazing welcome for Gold winning Indian Women’s Hockey Team in Bengaluru 😍🫶 https://t.co/qIc2R5FlkZ

    — The Khel India (@TheKhelIndia) October 4, 2026

  • 05 Oct 2026 09:32 AM (IST)

    05 Oct 2026 09:32 AM (IST)

    Students Video: फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे?; व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचा सवाल

    फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे?

    आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत.

    मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय.
    इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.

    आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध!
    सुलतान फडणवीस,
    विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे.

    विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही!

    आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे!

    @MahaPolice @Dev_Fadnavis @drashokuike_mla

    — Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 4, 2026

  • 05 Oct 2026 09:22 AM (IST)

    05 Oct 2026 09:22 AM (IST)

    Majhi Ladki Bahin Yojana September Installment: लाडक्या बहिणींचे  ऑक्टोबरअखेर ₹१,५०0 खात्यात जमा होण्याची शक्यता

    Majhi Ladki Bahin Yojana September Installment:  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता नुकताच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवरात्रोत्सव आणि आगामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या हप्त्याचे वितरण करण्याची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २५ ऑक्टोबरनंतर थेट महिलांच्या डीबीटी (DBT) लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; त्यामुळे सणासुदीच्या काळात पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 05 Oct 2026 09:12 AM (IST)

    05 Oct 2026 09:12 AM (IST)

    India vs West Indies 3rd ODI Result: भारताने २-१ ने जिंकली एकदिवसीय मालिका; तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ५ गड्यांनी विजय

    India vs West Indies 3rd ODI Result: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने आपल्या खिशात घातली आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी मिळवली होती; मात्र न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने पुनरागमन करत भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने राखीव खेळाडूंना संधी देत बेंच स्ट्रेंथ अजमावण्यावर भर दिला होता. अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी करत भारतीय संघाने मालिकेच्या चषकावर आपले नाव कोरले आहे.

  • 05 Oct 2026 09:05 AM (IST)

    05 Oct 2026 09:05 AM (IST)

    Eknath Shinde Delhi Visit Pune MLC Seat: एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौऱ्यावर 

    Eknath Shinde Delhi Visit Pune MLC Seat:   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी काही महत्त्वाच्या राजकीय बैठकांसाठी अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत पुणे शिक्षक-पदवीर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजी व ताणतणावाचे चित्र निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा होत असल्याचा दावा केला जात आहे.

Maharashtra to World Breaking News : 

जपानमध्ये संपन्न झालेल्या आशियाई खेळ २०२६ च्या अंतिम तक्त्यात भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदके जिंकून चौथे स्थान पटकावले.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘सत्याग्रह’ नावाचे नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू केले.

 राज्यात मान्सूनने बहुतांश भागांतून माघार घेतली असली तरी मुंबई, ठाणे आणि कोकणातील किनारपट्टीच्या भागांत उकाडा वाढल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जीएसटी (GST) कायद्यांतर्गत किरकोळ कर गुन्ह्यांसाठी होणाऱ्या थेट अटकेचे अधिकार शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असून ७ ऑक्टोबरच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मध्य-पूर्वेतील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तिसरी विमानवाहू युद्धनौका तैनात करण्याची घोषणा केली असून इराणी संसदेच्या वक्तव्यानुसार होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.नागपुरात एनसीबीने (NCB) मोठी कारवाई करत ५०० किलो गांजा जप्त केला असून आंतरराज्यीय तस्करी टोळीतील ३ जणांना अटक केली आहे.

Web Title: Maharashtra and india breaking monsoon world war asian games 2026 news live updates 5 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Monsoon 2026
  • national news

संबंधित बातम्या

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा
1

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
2

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
3

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.