Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. तर रिकल्टनने 80 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपला इरादे स्पष्ट केले.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 30, 2026 | 06:58 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’

Tata IPL 2026 MI vs KKR Live: अखेर तब्बल 14 वर्षांची आपली परंपरा मुंबई इंडियन्सने मोडीत काढली आहे. 14 वर्षांनी मुंबई इंडियन्सने आपला लीग मधला पहिला सामना जिंकला आहे. हिटमॅन रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. मुंबई इंडियन्सने केकेआरवर विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच पहिला सामना जिंकत 14 वर्षांची परंपरा देखील मोडीत काढली आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 30 Mar 2026 06:58 PM (IST)

    30 Mar 2026 06:58 PM (IST)

    भाजपा सरकार शेतकरी विरोधी, जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण; काँग्रेसची टीका

    तुळजापूर : शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून, फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • 30 Mar 2026 06:45 PM (IST)

    30 Mar 2026 06:45 PM (IST)

    Jaslok Hospital मध्ये मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

    मुंबई: भारतातील नी प्रिझर्व्हेशन शस्त्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रगतीसह जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एकाच संस्थेमध्ये दान केलेल्या, प्रक्रिया केलेल्या आणि प्रत्यारोपित केलेल्या ग्राफ्टचा वापर करून (Health) मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही शस्त्रक्रिया केली. सर्जरीसाठीच्या ॲनेस्थेसीयासाठी डॉ. रजनी एम आर, कन्सल्टन्ट ॲनेस्थेसीयोलाॅजी, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे मोलाचे सहाय्य लाभले. ही शस्त्रक्रिया भारतातील गुडघा जतन शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, ज्‍यामधून सिद्ध झाले आहे की, देशातील संस्था आता उती दान, जतन आणि प्रत्यारोपण या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकतात.

  • 30 Mar 2026 06:22 PM (IST)

    30 Mar 2026 06:22 PM (IST)

    April 2026 मध्ये ‘या’ 5 नवीन कार मार्केट गाजवण्याचा तयारीत! जाणून घ्या एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स

    एप्रिल 2026 हा महिना ऑटो बाजारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या महिन्यात अनेक नवीन वाहनांचे लाँचिंग, किमतींची घोषणा आणि नवीन मॉडेल्सची ओळख करून दिली जाण्याची शक्यता आहे. काही वाहने यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आली असली, तरी त्यांच्या किमतींविषयीचे डिटेल्स एप्रिलमध्ये जाहीर केले जातील. या कालावधीत, विविध सेगमेंटमधील अनेक प्रमुख वाहने बाजारात एंट्री मारतील अपेक्षा आहे.

  • 30 Mar 2026 06:07 PM (IST)

    30 Mar 2026 06:07 PM (IST)

    आधी फलंदाजी, मग फिरकीची जादू! Australia ने West Indies ला लोळवलं; 10, 20 नव्हे तर…

    Australia Vs West Indies: सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला आहे.

  • 30 Mar 2026 05:59 PM (IST)

    30 Mar 2026 05:59 PM (IST)

    देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले!

    भारतातील जनगणेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, मृत्युंजय कुमार नारायण यांनी २०२७ च्या जनगणनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जनगणनेची तयारी आता प्रगत टप्प्यावर पोहोचली आहे आणि अवघ्या काही दिवसांतच अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील – घरांची यादी आणि गृहगणना – क्षेत्रीय कामाला सुरुवात होईल. जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाते आणि यावेळी माहिती संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल.”

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 30 Mar 2026 05:21 PM (IST)

    30 Mar 2026 05:21 PM (IST)

    Australia ने West Indies ला लोळवलं

    सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला आहे.

  • 30 Mar 2026 05:07 PM (IST)

    30 Mar 2026 05:07 PM (IST)

    FASTag News: १ एप्रिलपासून ‘या’ राज्यांत प्रवास महागणार

    जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल, तर तुमचा प्रवास आता अधिक महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोल प्लाझाचे दर वाढवले ​​जाणार असून, ही दरवाढ १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षापासून लागू होणार आहे. याचा अर्थ असा की, पुढील महिन्याच्या १ तारखेपासून या मार्गांवरून प्रवास करताना तुम्हाला तुमच्या खिशातून थोडे अधिक पैसे मोजावे लागतील. महत्त्वाचं म्हणजे देशभरातील टोल दरांमध्ये सरासरी ४ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नेमके कोणत्या महामार्गावर किती टक्क्यांनी वाढ होणार आहे समजून घेऊयात.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 30 Mar 2026 04:50 PM (IST)

    30 Mar 2026 04:50 PM (IST)

    कणकवलीत सीएनजी कारला आग

    कणकवली-नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनरोडवर बांधकरवाडी नजीक उभी असलेली एक कार अचानक पेट घेऊन जळाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कणकवली कनकनगर येथील रहिवासी गुरुदास मेस्त्री हे कणकवलीवरून दारिस्ते तेथे आपल्या घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबे होते ते सुदैवाने यामध्ये बचावले.

  • 30 Mar 2026 04:45 PM (IST)

    30 Mar 2026 04:45 PM (IST)

    भोस्ते घाटातील अपघातग्रस्थ केमिकल टँकर हटवला

    पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तज्ञाच्या मदतीने टँकर हटवण्यात यश आलं आहे. मध्यरात्रीच अपघातग्रस्त टँकर मधून दुसऱ्या रिकाम्या टँकर मध्ये केमिकल  शिफ्ट करण्यात आलं. लोटे येथील बहुचर्चित लक्ष्मी ऑरगॅनिक या केमिकल कंपनी मधून परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या येथील केमिकलच्या टँकरला अपघात झाला होता. मध्यरात्री काही तास गटातील एक लेन ठेवली होती पूर्णपणे बंद झाली. अपघात झाल्यानंतर इथाईल ऍसिटेट केमिकल ला काही प्रमाणात  गळती लागली होती.

  • 30 Mar 2026 04:40 PM (IST)

    30 Mar 2026 04:40 PM (IST)

    महामार्ग ४८ पेल्हारजवळ आंबे पाडा परिसरात संशयास्पद मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

    मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ४८ लगत पेल्हार नजीकच्या आंबे पाडा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.महामार्गा पासून सुमारे हजार मीटर अंतरावर असलेल्या पायवाटे जवळ एका तरुणाला संशयास्पद वस्तू आढळून आली.पायवाटेचा वापर करणाऱ्या संबंधित तरुणाने तत्काळ याबाबत पेल्हार पोलीस ठाण्याला माहिती दिली.माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, फॉरेन्सिक टीम तसेच परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास भावचे घटनास्थळी दाखल झाले.प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी गोणीत भरलेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पेलार पोलिस अधिक तपास सुरू आहे.

  • 30 Mar 2026 04:35 PM (IST)

    30 Mar 2026 04:35 PM (IST)

    वसईत बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक; भाताणे वनपरिक्षेत्राची धाडसी कारवाई

    वसई परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली असून भाताणे वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे.ही कारवाई खानिवडे टोल नाक्याजवळील अंधाऱ्या आणि जोखमीच्या ठिकाणी पार पडली.मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील भाताणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गुप्त सूत्रांकडून बिबट्याच्या कातडीची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यानुसार वनाधिकारी विजय बारब्दे व त्यांच्या पथकाने स्वतः ग्राहक असल्याचे भासवून सापळा रचला. योग्य क्षणी कारवाई करत त्यांनी दोघा संशयितांना कातड्यासह ताब्यात घेतले.

  • 30 Mar 2026 04:30 PM (IST)

    30 Mar 2026 04:30 PM (IST)

    महामार्ग ४८ पेल्हारजवळ आंबे पाडा परिसरात संशयास्पद मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

    मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ४८ लगत पेल्हार नजीकच्या आंबे पाडा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीआहे. महामार्गापासून सुमारे हजार मीटर अंतरावर असलेल्या पायवाटे जवळ एका तरुणाला संशयास्पद वस्तू आढळून आली. पायवाटेचा वापर करणाऱ्या संबंधित तरुणाने तत्काळ याबाबत पेल्हार पोलीस ठाण्याला माहिती दिली.माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, फॉरेन्सिक टीम तसेच परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास भावचे घटनास्थळी दाखल झाले.

  • 30 Mar 2026 04:25 PM (IST)

    30 Mar 2026 04:25 PM (IST)

    इंधन तुटवड्यामुळे मासे महागले

    आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सिंधुदुर्गातील मासेमारी व्यवसायावर झाल्याची दिसून येतेय. इंधन तुटवड्यावर झाल्याने मासळी बाजारात माशांच्या किंमती गगनाला भिडल्याचे दिसून येतेय. वेंगुर्ला बाजारात पापलेट, बांगडा, कोळंबी, मोरी, सुरमई, हलवा (सरंगा) या माशांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे.

  • 30 Mar 2026 04:20 PM (IST)

    30 Mar 2026 04:20 PM (IST)

    चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या; विरार गुन्हे शाखेकडून अंधाऱ्या गुन्ह्याचा छडा

    मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-३ ने एका धक्कादायक हत्याकांडाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे.अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी पतीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.काही दिवसांपूर्वी शिरवली गावच्या हद्दीत, वज्रेश्वरी ते शिरसाड मार्गावर एका शेतात २५ ते ३० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता.धारदार शस्त्राने गळा चिरून आणि डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला.मुंबई, ठाणे, पालघर ते थेट उत्तर प्रदेशपर्यंत बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली.तसेच पोलिसांनी ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग ७२ तासांचे फुटेज तपासले.या तपासातून पोलिसांना संशयित आरोपींचा सुगावा लागला.

     

  • 30 Mar 2026 04:15 PM (IST)

    30 Mar 2026 04:15 PM (IST)

    पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला मारून टाका

    पाण्यासाठी भाजप नगरसेवक मनोज राय, शिंदे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि पूजा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.  नगरसेवक मधुर म्हात्रे पाणी प्रश्नावर आक्रमक झाले आहेत.

  • 30 Mar 2026 04:10 PM (IST)

    30 Mar 2026 04:10 PM (IST)

    रत्नागिरी नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत नगरसेवक सौरभ मलुष्ठेनी विचारला जाब

    रत्नागिरी नगरपरिषद ची आज जनरल सभा पार पडली यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ही चर्चा करत असताना प्रशासकीय कालावधी मध्ये सन 24/25 ची घरपट्टी भरून देखील चालू वर्षाच्या घरपट्टी पावतीमध्ये ॲड करून आली आहे.आणि ती वजा करून घेण्यासाठी जेष्ठ नागरिक अनेक फेऱ्या मारत आहेत तरी देखील ती वाढीव रक्कम वजा केली जात नाहीये सर्वसामान्य नागरिकांना सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल आजच्या सभेत नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी जाब विचारला. त्यावर प्रसासानाकडून सारावसराव करण्यात आली. सदर विषयाबाबत नगराध्यक्षांनी तातडीने प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याची सूचना केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही त्रास होता कामा नये याबाबत देखील प्रशासनाने काळ

  • 30 Mar 2026 04:02 PM (IST)

    30 Mar 2026 04:02 PM (IST)

    कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा वाद विकोपाला

    कल्याणमधील हाय प्रोफाईल वाधवा मेडोज या सोसायटीमध्ये प्राणी मित्र आणि रहिवासीयांचा वाद टोकाला पोहचला आहे. भटक्या कुत्र्यांचा दुसऱ्या ठिकाणी सोडण्याकरीता प्राणी मित्रांनी रहिवासीयांकडे पैसे मागितल्याचा आरोप झाल्यावर खडकपाडा पोलिसांनी दोन प्राणी मित्रांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आत्ता एका भटक्या कुत्र्याला मारुन टाकले आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिस ठाण्यात रहिवासियांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र प्राणी मित्र आणि रहिवासी यांच्यामधील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

  • 30 Mar 2026 03:52 PM (IST)

    30 Mar 2026 03:52 PM (IST)

    अशोक खरात प्रकरणी मंत्री-अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, राष्ट्रपतींना पत्र

    माजी मंत्री सुबोध सावजी यांनी द्रौपदी मुर्मू यांना लेखी पत्र देत अशोक खरात संबधित प्रकरणातील सर्व केंद्र व राज्यातील मंत्री व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सावजी यांनी पत्रात नमूद केले की, या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून सत्य समोर येण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला गती मिळून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • 30 Mar 2026 03:45 PM (IST)

    30 Mar 2026 03:45 PM (IST)

    कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

    कणकवली नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनसमोर उभी असलेल्या कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. काही वेळातच कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. या रस्त्यावरील वाहतूकही काही वेळ ठप्प झाली होती.

  • 30 Mar 2026 03:37 PM (IST)

    30 Mar 2026 03:37 PM (IST)

    बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

    बैलगाडा घाटात शर्यतीची बारी सुटताच बैलजोडी वाऱ्याच्या वेगाने धावत असताना अचानक समोर घोडी आणि घोडेस्वार आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रसंगावधान राखत बैलाने थेट घोडीवरून उडी घेत संभाव्य अनर्थ टाळला. या घटनेत घोडेस्वार आणि घोडी दोघेही सुखरूप बचावले असून बैलाच्या चपळतेचे आणि नियंत्रणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 30 Mar 2026 03:28 PM (IST)

    30 Mar 2026 03:28 PM (IST)

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निदर्शने; जादूटोणा विरोधी कायद्यात दुरुस्तीकरून फलज्योतिषालाही कायद्यात समाविष्ट करण्याची मागणी

    महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून, समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी जादूटोणा विरोधी कायद्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीसह रुपाली चाकणकरांसहित सर्व संबंधित राजकारण्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • 30 Mar 2026 03:20 PM (IST)

    30 Mar 2026 03:20 PM (IST)

    लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा

    लातूर शहरात घरगुती गॅसचा तुटवडा अद्यापही सुरूच असून अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे राहत आहेत. बुकिंग करूनही १५ ते २० दिवसांपर्यंत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

  • 30 Mar 2026 03:12 PM (IST)

    30 Mar 2026 03:12 PM (IST)

    भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांवर परिणाम होत आहेत. मात्र भारत सरकारकडे गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. विविध मार्गाद्वारे गॅस आयात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढील तीन महिन्यांच्या आत नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  • 30 Mar 2026 03:01 PM (IST)

    30 Mar 2026 03:01 PM (IST)

    "पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क नाही" : हायकोर्टाचा निकाल

    एखाद्या हिंदू महिलेचा मृत्यू मृत्युपत्र तयार न करताच झाला असेल तर तिला वारशा हक्काने मिळालेली मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल. त्यावर तिचा पती किंवा त्याच्या वारसांचा कोणताही हक्क असणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

  • 30 Mar 2026 02:55 PM (IST)

    30 Mar 2026 02:55 PM (IST)

    नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

    आजचा दिवस शिवसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते म्हणजे शंकरअण्णा धोंडगे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. लोहा येथील बैल बाजार मैदानावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

  • 30 Mar 2026 02:50 PM (IST)

    30 Mar 2026 02:50 PM (IST)

    किरकोळ वादातून भीषण हत्या; कामगाराला मजल्यावरून ढकलून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका बांधकाम साईटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • 30 Mar 2026 02:42 PM (IST)

    30 Mar 2026 02:42 PM (IST)

    साऊथ सुपरस्टारवर कोसळला दुःखाचा डोंगर!

    साऊथ सुपरस्टार प्रकाश राज यांच्या आईचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. त्यांच्या आईने वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून त्या वयामोनानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी बंगळूरमध्ये त्यांचे निधन झाले.

  • 30 Mar 2026 02:35 PM (IST)

    30 Mar 2026 02:35 PM (IST)

    आनंदाच्या रात्रीनंतर गूढ मृत्यू; दीर-वहिनीचे मृतदेह सापडल्याने गाव हादरले

    उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हादरलं आहे. १८ वर्षांचा अखिलेश आणि त्याची वहिनी सोहिनी हे दोघे काही तासांपूर्वी घरात चाललेल्या उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते. रात्रीच्या वेळी डीजेच्या तालावर मनसोक्त दीर आणि वाहिनी नाचले होते आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी संशयास्पद आढळले. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेमुळे आनंदाचे वातावरण असलेल्या घरात आता केवळ शोककळा पसरली आहे.

  • 30 Mar 2026 02:30 PM (IST)

    30 Mar 2026 02:30 PM (IST)

    केमिकल कंपनीत भीषण स्फोटांची मालिका

    तासवडे येथील औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी भीषण आग आणि स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. (Satara News) केमिकल कंपनीत झालेल्या या दुर्घटनेने काही काळ भीतीचे सावट पसरले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम्ब्रोजिल बेस’ उत्पादनाशी संबंधित एसकेएस फाईन केम (प्लॉट नं. B-1/47) या कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीचे मालक सर्जेराव किसन साळुंखे (रा. उंब्रज, मूळ पाटण) असून व्यवस्थापक सचिन व्यंकटराव मानकर आहेत.

  • 30 Mar 2026 02:25 PM (IST)

    30 Mar 2026 02:25 PM (IST)

    गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात

    केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) पुण्यासह राज्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहांना सूचना दिल्या आहेत. ग्राहकांकडून ‘गॅस अधिभार’ किंवा याप्रकारच्या कोणत्याही कारणांखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रकारांना स्पष्ट मनाई केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी देशभरातून प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाने याबाबत कडक भूमिका घेत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही उपाहारगृह चालकांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी या अतिरिक्त आकारणीचा उल्लेख थेट बिलामध्येही केल्याचे निदर्शनास आले.

  • 30 Mar 2026 02:12 PM (IST)

    30 Mar 2026 02:12 PM (IST)

    भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती

    भारतीय सैन्यात भरती व्हावं आणि देशसेवा करावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पाहणं जितकं सोपं आहे तितकंच ते पूर्ण करणं कठीण आहे. कठीण परिक्षण आणि पुरेपूर मेहनत याची सांगड घालूनच हे मोठं देशसेवेचं ध्येय साध्य केलं जावू शकतं. आताही ही संधी इंडियन आर्मीने दिलेली आहे. टेरिटोरियल आर्मी ने वर्ष २०२६ साठीची भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३,८०६ सैनिकांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया ‘रॅली’च्या स्वरूपात केली जाणार आहे. जी ऑगस्ट ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्यंत चालणार आहे.

  • 30 Mar 2026 01:55 PM (IST)

    30 Mar 2026 01:55 PM (IST)

    अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांवर पक्ष हायजॅक करण्याचे सातत्याने आरोप होत आहेत. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. अशातच रायगडमधील एका कार्यक्रमातील बॅनर चर्चेत आले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमातील बॅनर्सवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे फोटोच लावण्यात आले नाहीत. या मुद्द्यावर पक्षाचे नेते अमोल मिटकरी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

  • 30 Mar 2026 01:45 PM (IST)

    30 Mar 2026 01:45 PM (IST)

    विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे

    दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ते एकत्रित देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यापूर्वी गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जात होते. यापुढे मात्र ते एकत्रित म्हणजेच एकाच कागदावर दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फाईलमधील बोझा कमी होणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्ताऐवज सांभाळणे सोपे व्हावे, यासाठी शिक्षण मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थी ज्या काही पदवी व पदविका प्राप्त करता, त्यासाठी बोर्ड व विद्यापीठाकडून गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्ररित्या दिले जाते.

  • 30 Mar 2026 01:40 PM (IST)

    30 Mar 2026 01:40 PM (IST)

    बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम

    आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे. विशेषतः यवतमाळ जिल्हा येथे रब्बी हंगामातील गव्हाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

  • 30 Mar 2026 01:35 PM (IST)

    30 Mar 2026 01:35 PM (IST)

    खासदारकीचा मान, आमदारकीला निरोप; राजीनामा देताना नितीन नबीन भावूक

    बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) (BJP Politics) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नबीन यांनी सोमवारी विधानसभेचा राजीनामा दिला. नितीन नवीन यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली आहे. यामुळे त्यांनी राज्यातील राजकारणातून बाहेर पडत दिल्लीतील राजकारणामध्ये (Political News) सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. 20 वर्षांहून अधिक काळ बिहार राज्याच्या राजकारणामध्ये असणारे नितीन नबीन हे राजीनाम्यावेळी भावूक झाले.

  • 30 Mar 2026 01:30 PM (IST)

    30 Mar 2026 01:30 PM (IST)

    US संरक्षण सचिवांच्या विधानावर पेंटागॉनने दिले स्पष्टीकरण

    इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ क्षेपणास्त्रे आणि विमानांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. या युद्धाला आता चक्क धार्मिक वळण मिळाले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव (Secretary of Defense) पीट हेगसेथ यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाने व्हाईट हाऊसपासून ते पेंटागॉनपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहेत. हेगसेथ यांनी इराणविरुद्धच्या कारवाईला ‘येशू ख्रिस्तासाठीचे युद्ध’ म्हटले असून, दुष्ट लोकांशी लढताना दया दाखवू नका, असे आदेशही दिले आहेत.

  • 30 Mar 2026 01:20 PM (IST)

    30 Mar 2026 01:20 PM (IST)

    ”माझ्या डिवोर्सचं का बोलास…”, बिग बॉसच्या घरात राकेश आणि विशालमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी

    बिग बॉस मराठीचा ६ वा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. या शोमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जोरदार तयारी करत आहे. बिग बॉसच्या घरात ८० दिवस घालवल्यानंतर नॉमिनेट न होण्याचा सदस्य प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर गेले यानंतर आता घरातील खेळ रंजक होत चालला आहे. अशातच या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने एक मोठा टास्क दिला.

  • 30 Mar 2026 01:15 PM (IST)

    30 Mar 2026 01:15 PM (IST)

    रू. 1,000 पर्यंत Zero Referral Fee लहान व्यवसायांसाठी कशी ठरेल गेम चेंजर?

    अनेक लहान व्यवसायांसाठी, ऑनलाइन विक्रीचा खर्च त्यांच्या व्यवसायाची वाढ किती वेगाने होईल हे थेट ठरवतो. कमी शुल्कांमुळे बचत वाढू शकते; विक्रेते अधिक स्पर्धात्मक किंमती ठेवू शकतात आणि त्यांच्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करण्यासाठी आत्मविश्वास मिळवू शकतात. March 16 पासून, Amazon India ने ₹1,000 पेक्षा कमी किंमतीच्या 12.5 crore उत्पादनांवर 1,800+ categories मध्ये झिरो रेफरल फी लागू केले आहेत, तसेच ₹300 पेक्षा कमी किंमतीच्या उत्पादनांसाठी Easy Ship fees मध्ये 20% पेक्षा अधिक कपात केली आहे. एकत्रितपणे, या बदलांमुळे विक्रेत्यांना एकूण selling fees मध्ये 70% पर्यंत बचत होऊ शकते. झिरो रेफरल फी लहान व्यवसायांच्या वाढीस कशा प्रकारे मदत करू शकतात याचे सात मार्ग खाली दिले आहेत:

  • 30 Mar 2026 01:10 PM (IST)

    30 Mar 2026 01:10 PM (IST)

    नेपाळमध्ये सत्तांतर होताच भारतीय सीमेवर हालचालींना वेग

    नेपाळमध्ये बलेंद्र शाह (Balen Shah) यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून केवळ अंतर्गत राजकारणातच नाही, तर आंतरराष्ट्रीय सीमांवरही मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे नेपाळमध्ये माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या अटकेने राजकीय भूकंप आला असताना, दुसरीकडे भारत-नेपाळ सीमेवर (India Nepal Border) दोन्ही देशांचे अधिकारी एकत्र आले आहेत. श्रावस्तीपासून रक्सौलपर्यंत पसरलेल्या या १७०० किलोमीटरहून अधिक लांब सीमेवर आता ‘स्वच्छता मोहीम’ सुरू झाली आहे.

  • 30 Mar 2026 01:05 PM (IST)

    30 Mar 2026 01:05 PM (IST)

    दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती

    सरकारी नोकरी मिळवायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण या नोकऱ्या मिळवण्यासाठी बऱ्याच पदव्यांची गरज असते तरच आपल्याला सरकारी नोकरी मिळते. तर तसं नाहीये. तुम्हीही जर असा विचार करत असाल तर हा विचार बदला. तुमची दहावीची गुणपत्रिका ही केवळ शाळेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नाही, तर भारतीय रेल्वे, एसएससी आणि टपाल विभागासारख्या विभागांमध्ये प्रवेश मिळवण्याची पावती आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत धावण्याची गरज नाही जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर दहावीच्या पात्रतेवर आधारित सरकारी नोकरी मिळू शकते. ही नोकरी फक्त आर्थिक सुरक्षाच देत नाही, तर तरुण वयातच आपलं करिअर सेट करण्यासाठी मदत करते.

  • 30 Mar 2026 01:00 PM (IST)

    30 Mar 2026 01:00 PM (IST)

    तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’, ‘त्या’ आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले

    हिलांचे शोषण आणि अवैध संपत्तीच्या आरोपाखाली पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपी अशोक खरात विरोधात आता तपासाचा फास अधिक घट्ट झाला आहे. या तपासादरम्यान सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेचे (स्टाईस) चेअरमन नामकणं आवारे आणि खरात यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. विशेष म्हणजे खुद्द आवारेंनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख ‘सिद्धपुरुष’ आणि ‘गुरू’ असा केल्याने तसेच त्याच्या चमत्काराचे दाखले दिल्याने हे पुस्तक तब्बल १४ वर्षांनी चर्चेत आले आहे.

  • 30 Mar 2026 01:00 PM (IST)

    30 Mar 2026 01:00 PM (IST)

    ‘एआय’च्या मदतीने टीबीवर उपचार! १०० दिवसांत उच्च-जोखीम भागांची झडती; ‘निक्षय’ प्रणालीचे नियंत्रण

    पारंपरिक तपासणीपद्धतीला छेद देत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या आधारे क्षयरोग शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत २४ मार्चपासून सुरू होणाऱ्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यातील ११ हजारांहून अधिक जोखीमग्रस्त गावे आणि शहरी भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, संपूर्ण मोहिमेवर ‘निक्षय’ प्रणालीद्वारे तत्काळ नियंत्रण ठेवण्यात येणार असून दिवसनिहाय नियोजनावर भर देण्यात आला आहे. यामुळे रुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार आणि मृत्यूदरात घट साध्य करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

  • 30 Mar 2026 12:55 PM (IST)

    30 Mar 2026 12:55 PM (IST)

    अनीत पड्डाच्या ‘शक्ती शालिनी’मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपट नक्कीच होणार सुपरहिट!

    विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी खळबळ माजवली की त्याने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. या चित्रपटात विनीत सिंगने दमदार अभिनय केला होता. त्यानंतर त्याने सनी देओलच्या ‘जाट’ या चित्रपटातून आपली छाप पाडली. दरम्यान, विनीत सिंगच्या आगामी चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. असे वृत्त आहे की तो अनित पड्डासोबत आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

  • 30 Mar 2026 12:50 PM (IST)

    30 Mar 2026 12:50 PM (IST)

    वडील बनताच केलेल्या कृत्यावर अनुराग डोभालला पश्चात्ताप; रातोरात बदलले सूर, पत्नी रितिका आणि कुटुंबासोबत पॅचअप?

    प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल यांचे आयुष्य गेल्या काही दिवसांत पूर्णपणे बदलले आहे. नुकत्याच घडलेल्या काही प्रसंगामुळे त्याला आत्महत्या करायची होती आणि त्याने लाईव्ह असताना अपघाताचे नाटकही केले होते, पण आता अनुराग वडील झाला आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर अनुरागची पत्नी रितिका चौहानने एका मुलाला जन्म दिला, ज्यानंतर या यूट्यूबरने आपले नवीन आयुष्य मुलाला समर्पित केले. आता, वडील झाल्यानंतर अनुरागने आपला पहिला व्लॉग बनवला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर, त्याने आपल्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे.

  • 30 Mar 2026 12:45 PM (IST)

    30 Mar 2026 12:45 PM (IST)

    हे कधी सुधारणार…? बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा हादरले, PSL सामन्याचा निकालच बदलला

    पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये कराची किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान लाहोर कलंदर्स वादात सापडले. चेंडू छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर दंड आकारण्यात आला. अंतिम षटकाच्या अगदी आधी पंचांनी कराचीला पाच पेनल्टी धावा दिल्या. हा एक असा क्षण होता ज्याचा सामन्याच्या निकालावर खोलवर परिणाम झाला आणि अखेरीस कराचीने तीन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

  • 30 Mar 2026 12:40 PM (IST)

    30 Mar 2026 12:40 PM (IST)

    कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

    भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने त्यांच्या यूजर्सना एक खास गिफ्ट दिले आहे. कंपनीने काही निवडक क्षेत्रांमध्ये त्यांचा 399 रुपयांचा प्रीपेड पुन्हा एकदा लाँच केला आहे. हे अपडेट अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांना रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तीचे फायदे पाहिजे आहेत. कंपनीने हा प्लॅन पुन्हा लाँच करण्यासोबतच प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये काही बदल देखील केले आहेत. हे फायदे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे आहेत. ज्या यूजर्सना मिड रेंज किंमतीत फायदे आणि ओटीटी सबस्क्रिप्शन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन पुन्हा एकदा लाँच केला आहे.

  • 30 Mar 2026 12:35 PM (IST)

    30 Mar 2026 12:35 PM (IST)

    मिनीच्या वादातून सावंतवाडीत रक्तरंजित हल्ला; 65 वर्षीय महिलेची कोयत्याने हत्या, पिता-पुत्र अटकेत

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेला जमीचा वाद अचानक रक्तरंजित हल्ल्यात बदलला. एका ६५ वर्षीय महिलेची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सरस्वती सावंत असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील ओवलीये-मधलीवाडी येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे.

  • 30 Mar 2026 12:30 PM (IST)

    30 Mar 2026 12:30 PM (IST)

    आता 45 व्या वर्षातही मिळणार सरकारी नोकरी, 100+ रिक्त जागा; पगारा ते पात्रता तपशील

    सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार बँकेतील नोकरीसाठी पात्र मानले जातात. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांना ऑनलाइन चाचणी आणि सायकोमेट्रिक चाचणीसह एक निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या बँकेत ४५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लोकांसाठी १०० हून अधिक जागा उपलब्ध आहेत. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

  • 30 Mar 2026 12:20 PM (IST)

    30 Mar 2026 12:20 PM (IST)

    राज्यातील शाळांसाठी ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

    एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी देण्यात येणार असून, पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा एकाच दिवशी सुरू होणार आहेत.

  • 30 Mar 2026 12:10 PM (IST)

    30 Mar 2026 12:10 PM (IST)

    जेरुसलेममध्ये धार्मिक युद्ध? अल-अक्सा नंतर आता ‘चर्च’वरही निर्बंध; ख्रिस्ती जगतात संताप अन् नेतन्याहू बॅकफूटवर

    जेरुसलेम, जे जगातील तीन प्रमुख धर्मांचे श्रद्धास्थान मानले जाते, तिथे सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अल-अक्सा मशिदीतील निर्बंधांनंतर आता इस्रायलने (Israel) ख्रिश्चन धर्मीयांच्या अत्यंत पवित्र स्थळावर, म्हणजेच ‘चर्च ऑफ द होली सेपल्कर’वर कडक निर्बंध लादले आहेत. या कारवाईचा सर्वात मोठा फटका व्हॅटिकनचे कार्डिनल पियरबतिस्ता पिझाबाला यांना बसला, ज्यांना पोलिसांनी चर्चमध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव केला. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत अशा प्रकारे वरिष्ठ धर्मगुरूंना रोखण्याची ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण ख्रिस्ती जगतातून इस्रायलचा निषेध केला जात आहे.

Web Title: Maharashtra breaking news 30th march live updates maharashtra politics national international politics crime viral video ipl 2026 breaking in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल…
1

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल…

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
2

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
3

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर
4

भीषण! PMP मध्ये मनुष्यबळाचा ‘दुष्काळ’; सुधारणा, बदल करायचा तरी कसा? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.