Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले सुरु होते. इराणकडूनही या जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते. यामध्ये वित्तहानी, जीवितहानीही झाली आहे. मात्र, हे तिन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर मंगळवारी (दि.8) रात्री मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर –
08 Apr 2026 06:48 PM (IST)
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीनंतर आता न्यायालयीन लढाईचाही निकाल लागला आहे. भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आज (8 एप्रिल 2026) फेटाळून लावली. या निकालामुळे निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची खासदारकी आता निर्धोक झाली आहे.
08 Apr 2026 06:38 PM (IST)
नाशिक जिल्हयात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने ५७ हजार ४६ हेक्टरवरील पिके उद्ध्दवस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे संथगतीने सुरु असून पंचनामे तातडीने पूर्ण करून राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
08 Apr 2026 06:30 PM (IST)
Zahir Kazmi Pakistan tweet on India nuclear : भारताने अणुऊर्जा क्षेत्रात मिळवलेल्या ऐतिहासिक यशाने शेजारील देश पाकिस्तानमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण केली आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्वदेशी बनावटीच्या ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर’ने (PFBR) यशस्वीपणे ‘क्रिटिकॅलिटी’ (Criticality) प्राप्त केली आहे. हे यश भारतासाठी ऊर्जेच्या दृष्टीने वरदान असले तरी, पाकिस्तानला मात्र यामुळे आपल्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. पाकिस्तानचे सामरिक योजना विभागाचे सदस्य झहीर काझमी यांनी यावर अत्यंत संतापजनक आणि भीतीदायक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
08 Apr 2026 06:17 PM (IST)
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असून इतरांनीही त्यांच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. शासकीय निवासस्थानी आयोजित गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
08 Apr 2026 06:11 PM (IST)
US Israel Iran Casefire : तेहरान/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव (US Iran War) सध्या निवळताना दिसत आहे. परंतु इस्रायलच्या लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवण्याच्या ठाम भूमिकेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील युद्धंबदीबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
08 Apr 2026 06:05 PM (IST)
MI vs RR IPL 2026 Match Updates: काल गुवाहाटीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत मुंबईला 151 धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने मुंबईचा 27 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचे फलंदाज वाऱ्याच्या वेगाने एकामागोमाग बाद झाल्याने मुंबईला 151 धावांचा पाठलाग करणे अशक्य झाले.
08 Apr 2026 05:48 PM (IST)
दिग्दर्शक होमी अदजानिया ‘कॉकटेल २’ या चित्रपटाची तयारी करत असून, हा चित्रपट १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आज, बुधवारी, निर्मात्यांनी ‘जब तलक’ या नवीन गाण्याची घोषणा केली आहे. या गाण्यात शाहिद कपूर, कृती सॅनेन आणि रश्मिका मंदाना तुम्हाला नाचायला लावणार आहेत. या गाण्याचे संगीत अरिजित सिंग, ‘आपला आवाज उठवते’ आणि प्रीतम चक्रवर्ती यांनी दिले आहे. याचे गीत अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे.
08 Apr 2026 05:40 PM (IST)
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
08 Apr 2026 05:30 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धबंदीबाबत जगभरात चर्चा सुरु असतानाच भारतातून एक वेगळीच वृत्त समोर आले आहे. एका भारतीय युवकाने नोकरीसाठी असे काही केले आहे की पाहून सगळेच आश्चर्यात पडले आहे. सहसा लोक नाकरीसाठी लिंकडइन किंवा जॉब पोर्टलची मदत घेतात. परंतु या तरुणाने थेट एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरुन नोकरीसाठी विचारले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने थेट भारतातील इराणच्या दूतावासाकडे नोकरी मागितली आहे. यावर त्याला मिळालेल्या उत्तराने देखील लोकांना आश्चर्यात पाडले असून अनेकांची मने जिंकली आहेत.
08 Apr 2026 05:06 PM (IST)
या महिन्यात Honda City वर दमदार ऑफर्स मिळत आहेत. जुन्या स्टॉक (MY2025) वर तब्बल 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर 2026 च्या नवीन मॉडेलवर सुमारे 35,000 रुपयांची सूट मिळते. याशिवाय, कोणत्याही व्हेरिएंटच्या खरेदीवर कंपनीकडून 7 वर्षांची अपघात वॉरंटीही दिली जात आहे.
08 Apr 2026 04:55 PM (IST)
जागतिक राजकारणात आज एक अत्यंत ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. मध्य-पूर्वेतील रणांगणावर (US-Israel Iran War) गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेला अमेरिका आणि इराणमधील रक्तरंजित संघर्ष अखेर तात्पुरता थांबला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या ‘सीझफायर’वर (युद्धविराम) स्वाक्षरी केली आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एकत्र येऊन कायमस्वरूपी करारावर चर्चा करणार आहेत. इराणमधील ही शांततेची बातमी येताच, गेल्या चार वर्षांपासून रशियाच्या (Russia Ukraine War) आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
08 Apr 2026 04:50 PM (IST)
जलसंधारणावर मागील दहा वर्षांपासून राज्य सरकार पाण्यासारखा टाकत आहे. पैसा पाण्याबरोबर अभियंत्यांच्या घराकडे वाहून त्यांचे ‘योग्य सिंचन’ होत असल्याचे आत्तापर्यंतच्या अनेक घोटाळ्यावरुन उघड झालेले आहे. सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे भले व्हावे हा या योजनेमागचा उद्देश असताना शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी योजना राबविणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारांचे भले झाल्याचे दिसते. योजनेवर झालेला खर्च पाहता लाखो हेक्टर जमीन सिचंनाखाली येणे गरजेचे असताना मागील दहा वर्षांत झालेल्या अनेक लाखों कोटींच्या खर्चात अवघे आठ लाख हेक्टर सिंचन क्षमतेत वाढ झाल्याचे आथिर्क पाहणी अहवालात नमुद करण्यात आले आहे.
08 Apr 2026 04:40 PM (IST)
उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनं राज्य हादरून गेल आहे. रात्रीच्या वेळी पाऊस कोसळत होता. अशा वेळी पावसात एका तरुणीने आसरा मागितला आणि त्या नंतर ती तरुणी एका इमारतीच्या खाली गेली. तरुणी पावसात आसरा शोधत आली आहे. हा डाव नराधमानी ओळखला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारच्या रात्रीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
08 Apr 2026 04:35 PM (IST)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून चार वर्षांच्या ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सध्या तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे
08 Apr 2026 04:30 PM (IST)
आज आयपीएलच्या महासंग्रामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. गुजरात टायटन्स आज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ तिसरा विजय प्राप्त करण्यासाठी खेळेल. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
08 Apr 2026 04:20 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.
08 Apr 2026 04:15 PM (IST)
जागतिक राजकारणात गेल्या काही तासांत अशा घडामोडी घडल्या आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. इराणवर विनाशकारी हल्ले करण्याची भाषा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अचानक १५ दिवसांचा युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला आहे. या निर्णयाने जगाला दिलासा मिळाला असला तरी, खुद्द अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये मात्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या या ‘यू-टर्न’मुळे संतप्त झालेल्या हजारो अमेरिकन नागरिकांनी व्हाईट हाऊसला घेराव घातला असून, तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.
08 Apr 2026 04:10 PM (IST)
गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता निवळताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिलासा मिळला आहे. दरम्यान भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तर याच वेळी इराणमधील नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
08 Apr 2026 03:42 PM (IST)
Indian Embassy Iran Advisory : भारतीय दूतावासाची सुरक्षा सूचना: इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक नवीन सुरक्षा सूचना जारी केली आहे. त्यात इराणमध्ये (US Iran War) राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने आपत्कालीन आणि समन्वयासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. दूतावासाच्या सूचनेनुसार, “७ एप्रिल २०२६ रोजीच्या सूचनेच्या आणि अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय नागरिकांना दूतावासाच्या मार्गदर्शनानुसार आणि सुचवलेल्या मार्गांनुसार शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, दूतावासाशी पूर्व सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही या सुचनेत सांगण्यात आले आहे.
08 Apr 2026 03:32 PM (IST)
पुणे : शहरातील ओव्हरहेड केबलचा विषय सध्या जोरात चर्चेत असून, यातून तोडगा काढण्यासाठी काही पर्याय समोर येऊ लागले आहे. स्ट्रीट लाईटच्या खांबांचा वापर या केबल्स टाकण्यासाठी करता येऊ शकतो, अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. शहरात अनियंत्रितपणे पसरलेल्या ओव्हरहेड केबल्सवर सध्या रोज कारवाई केली जात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे याविषयी आग्रही असून, या केबल काढून त्या भूमिगत केल्यातर महापालिकेला चौदाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. कारवाई सुरु झाल्यानंतर इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी व्यावसायिकांच्या अडचणी सांगितल्या, कारवाई स्थगित करण्याची मागणी केली. यावेळी चर्चेत भिमाले हे देखील सहभागी झाले होते. संबंधित व्यावसायिकांनी एक ‘एसओपी’ (नियमावली ) तयार करुन ती सादर करावी असा निर्णय या बैठकीत झाला.
08 Apr 2026 03:22 PM (IST)
मोटोरोलाने त्यांच्या नव्या स्टाइलस स्मार्टफोनसह Moto Pad 2026 देखील लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या नव्या लेटेस्ट लाँच टॅब्लेटमध्ये 11-इंच स्क्रीन दिली आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन टॅब्लेट रोजची काम सोपी करतो. या नव्या टॅब्लेटमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. तसेच दमदार स्पेसिफिकेशन्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही नवा टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Moto Pad 2026 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
08 Apr 2026 03:12 PM (IST)
ग्रामीण महाराष्ट्रातील गप्पा, अफवा आणि छोट्या-मोठ्या चर्चांच्या रंगतदार दुनियेला हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत उलगडणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, २४ एप्रिल २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पोस्टर पाहताच चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मोशन पोस्टरमध्ये ‘भागूबाई’चा खोडकर आणि गमतीशीर अंदाज पाहायला मिळतो. ओठांवर बोट ठेवत ‘श्श…’ असा इशारा करणारी तिची शैली आणि तिच्यामुळे गावात पडलेली फूट याचे संकेत पोस्टरमधूनच मिळतात. यामुळे हा चित्रपट केवळ विनोदी नसून त्यात काहीतरी रहस्य आणि नाट्यमय वळणही दडलेलं असल्याचं स्पष्ट पाहायला मिळणार आहे.
08 Apr 2026 03:02 PM (IST)
Pune Metro News : वडगाव मावळ : सतीश गाडे : पुणे शहरामध्ये मेट्रोचे (Pune Metro) जाळे विस्तारत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखरक झाला असून यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान, हिंजवडी शहरातून मावळ तालुक्यातील तळेगाव–नवलाख उंब्रे एमआयडीसीपर्यंत तसेच निगडी ते लोणावळा नवीन मेट्रो प्रकल्पास मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांनी ही मागणी मांडली. (Maval News)
08 Apr 2026 02:56 PM (IST)
ऐन लग्नसराईच्या हंगामात अमरावतीमध्ये नैसर्गिक फुलांचे दर अक्षरशः कोसळले आहेत. सामान्यतः या काळात फुलांना मोठी मागणी असते, मात्र यंदा परिस्थिती अगदी उलट दिसून आली.
08 Apr 2026 02:44 PM (IST)
'माही' यात्रेचे औचित्य साधत कोल्हापुरात मटन खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील शिवाजी पेठ परिसरात नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात्रेनिमित्त साधत ८०० रुपये किलोला विकले जाणारे मटण आज अवघ्या ६२० रुपयांत उपलब्ध होत आहे.
08 Apr 2026 02:35 PM (IST)
तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगाचे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी होची. या सगळ्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू दिव्यांग बांधव हे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले.
08 Apr 2026 02:26 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी शिक्षकाला काठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
08 Apr 2026 02:14 PM (IST)
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे झालेल्या सुहासिनी जेवणाच्या कार्यक्रमात भोजन केलेल्या १९ महिलांसह ३ पुरुष व २ लहान मुलांना विषबाधा झाली. त्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे व पोटदुखीची तक्रार जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुहासिनी जेवणात भाकरी, वरणभात, बेसनवडी व खीर खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याची माहिती महिलांनी दिली असून, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
08 Apr 2026 02:01 PM (IST)
राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर केली जाणार आहे. तालुका समितीकडून सखोल छाननी करून अहवाल जिल्हा समितीकडे पाठवले जातील. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेग येऊन शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
08 Apr 2026 02:00 PM (IST)
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामधील सर्वात जास्त चर्चा ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सुरु आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये सुरुंग लावण्यास भाजपला यश मिळणार का याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यासाठी भाजप विविध राजकीय डाव देखील आखत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) तृणमूल काँग्रेसला इशारा दिला आहे. निवडणूक आयोगाने एक्स या सोशल मीडिया साईटवर ऑफिशियल अकाऊंटवरुन ममता बॅनर्जी यांचा पक्षाला अंतिम इशारा देण्यात आला आहे. भाजप नेत्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा इशारा दिला आहे.
08 Apr 2026 01:55 PM (IST)
टेक कंपनी मोटोरोलाने भारतात आणखी एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने Moto G Stylus (2026) नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवा फोन मोटोरोलाच्या Stylus लाइनअपमधील लेटेस्ट डिव्हाईस आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड दिले आहेत. लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये शार्प डिस्प्ले, अधिक चांगली ड्यूरेबिलिटी, AI-बेस्ड फीचर्स आणि एक मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ.
08 Apr 2026 01:50 PM (IST)
आंबेगाव तालुक्यात गॅस टंचाईमुळे होणारे लग्न सोहळे देखील आता अडचणीत आले आहेत. लग्न सोहळ्यात होणाऱ्या जेवणावळीसाठी गॅसची नितांत गरज असून, स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस मिळत नसल्याने गॅस टंचाईचे संकट देखील आता लग्न सोहळ्यात अडचणीचे ठरू लागले आहे.इस्त्राइल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिकांना गॅस टाकीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे उपहारगृह, खानावळ या व्यवसायांसह आता लग्न समारंभ कार्यालयांवर देखील आता याचा फटका बसू लागत्याचे दिसून येते. काहींकडून तर गॅस तुमचा आणि स्वयंपाक आमचा अशीच अट घातली जाऊ लागली आहे.
08 Apr 2026 01:45 PM (IST)
स्वयंघोषीत भोंदू अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत असतांनाच आता नाशिक जिल्हा परिषदेने देखील प्रशासकीय राजवटीत खरातच्या मीरगावच्या फार्महाऊससाठी कोट्यवधीची उधळण केल्याची माहिती समोर येत आहे. खरातवर करण्यात आलेल्या शासकीय खैरातीचे कारण समजू शकले नसले तरी, एका महिला अधिकाऱ्याने या माध्यमातून दिलेली गुरूदक्षिणा मानली जात आहे.
08 Apr 2026 01:40 PM (IST)
मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. इराणने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून होर्मुझ मार्ग दोन आठवड्यांसाठी खुला केला आहे. पण इस्रायलने मात्र शांततेच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे.पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या हा या कराराचे जगभरात स्वागत करण्यात येत आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक मोठी अट घातली आहे. त्यांनी इराणसोबतच युद्धविराम लेबनॉनमध्ये लागू होणार नाही आणि हिजबुल्लाविरोधात लष्करी अभियान सुरुच राहिल असे म्हटले आहे.
08 Apr 2026 01:35 PM (IST)
एसटी महामंडळातील विविध विभागामध्ये भ्रष्टाचार तसेच इतर आरोप असलेल्या १७ अकार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. यामध्ये आरोप असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्याने समितीतील सदस्य अधिकाऱ्यांना कुणाला, कुठले काम द्यावे या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या असून समितीचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी अजूनही मोकाटच असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
08 Apr 2026 01:27 PM (IST)
भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झालीय. तर तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेणार असून त्यानंतर 24 तासाच्या आत पुन्हा त्याला कोर्टात हजर करणार आहेत.
08 Apr 2026 01:25 PM (IST)
भारतीय चित्रपटसृष्टीतील पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज घेऊन समोर आला आहे. आपल्या दमदार अभिनय, अनोख्या स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारा हा अभिनेता आता एका भव्य अॅक्शनपटासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो दिग्दर्शक ॲटली सोबत पहिल्यांदाच काम करत असून त्याच्यासोबत दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे.
08 Apr 2026 01:15 PM (IST)
आयपीएल २०२६ चा १३ वा सामना गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरआरने मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव करून गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. आयपीएलचा सीझन सुरू झाल्यापासूनच राजस्थान रॉयलने सर्व सामन्यांवर आपले वर्चस्व राखले आहे आणि प्रत्येक सामान्यात वैभव सूर्यवंशीचा मोठा वाटा आहे. पण याशिवाय यशस्वी जयस्वाल आणि रवी बिष्णोईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या संघातील प्रत्येकाने यावर्षी कमालीचा खेळ केला आहे. यामुळेच तिन्ही सामने जिंकून या हंगामावर सध्या राजस्थान रॉयलने आपला डंका वाजवला आहे. चला, गुणतालिकेवर एक नजर टाकूया.
08 Apr 2026 01:05 PM (IST)
कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिका एका भयानक वळणावर येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक योगायोग, संघर्ष आणि भावनिक वळणांनंतर अखेर अमरापूरमध्ये मोहिनी आणि प्रतापराव पहिल्यांदाच समोरासमोर येतात. मालिकेत आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या ज्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सेटवरच जन्मलेली, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना चुकून हिरोईन समजली गेलेली मोहिनी, तिच्या स्मार्टनेसने सतत परिस्थिती हाताळताना दिसते. आरकेसोबतचा तिचा डान्स, त्याच्या रागावर तिने दिलेलं उत्तर, त्याच्या मेकअपचं केलेलं कौतुक या सगळ्यांतून दोघांमधील नात्याला एक वेगळीच दिशा मिळते.
08 Apr 2026 01:00 PM (IST)
ऑस्ट्रेलियाने मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदना अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात जाहीर करण्यात आलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचे स्वागत केले आहे. मध्यपूर्वेतील तणाव निवळण्यासाठी संवादाद्वारे समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
— Anthony Albanese (@AlboMP) April 8, 2026
08 Apr 2026 12:50 PM (IST)
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे गँगवॉरची घटना घडली आहे. या घटनेत रोहित गोदारा गँगने काका राणा नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे. गँगने सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली. सध्या स्थानिक पोलिस या घटनेचा तपास करत आहे. याबाबत अद्याप कोणतेही तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
08 Apr 2026 12:40 PM (IST)
बुधवारी(०८ एप्रिल) अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जागाला दिलासा मिळाला आहे. यावर संयुक्त राष्ट्राने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिका इराणच्या दोन आठवड्याच्या युद्धबंदीचे स्वागत केले आहे. तसेच यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान आणि इतर राष्ट्रांचे त्यांनी कौतुक केले आहे.
08 Apr 2026 12:30 PM (IST)
इराणची राजदानी तेहरानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. भारतीय नागरिकांना लवकरात लवकर इराण सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
⚠️ Advisory as on 08 April 2026. pic.twitter.com/pusFQIAKKI
— India in Iran (@India_in_Iran) April 8, 2026
08 Apr 2026 12:20 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धबंदीची घोषणा केली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी या युद्धात अमेरिकेने संपूर्ण आणि निर्णायक विजय मिळवला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी येत्या आठवड्यात इराणच्या युरेनियम साठ्याची पूर्णपणे योग्य ती व्यवस्था केली जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी चीनने इराणला वाटाघाटीच्या टेबल्यावर आणल्याबद्दल आभारही मानले आहेत.
08 Apr 2026 12:10 PM (IST)
गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला अमेरिका इराण संघर्ष अखेर थांबला आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. याच युद्धविरामाचे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी स्वागत केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, या वाटाघाटींच्या प्रक्रिया सद्भावनेने पार पडेल आणि प्रादेशिक समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा निघेल अशी आशा आहे. शांतता चर्चा कपट आणि दुटप्पी धोरणांवर आधारित नसावी, तर शांतता टीकून राहिल असेही त्यांनी म्हटले.
08 Apr 2026 12:00 PM (IST)
मणिपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेकडो स्थानिकांनी हिंसक आंदोलने केली आहे. या आंदोलनांना रोखण्यासाठी सीआरपीएफच्या गोळीबारा गेला होता, ज्यामध्ये आणखी दोन नागरिकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी याला अमानुष कृत्य म्हटले आहे. तसेच त्यांनी या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला आहे आणि मे २०२३ पासून पुन्हा सुरू झालेल्या वांशिक संघर्षात आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
08 Apr 2026 12:00 PM (IST)
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे अहवाल समोर येत आहेत. या जनमत चाचणीच्या आकडेवारीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. राज्यसभेतील टीएमसीचे नेते, डेरेक ओ’ब्रायन यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले आहे. डेरेक ओब्रायन यांनी, जर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात एक जरी जागा जिंकली, तर त्यांच्या पक्षाचा एक खासदार जाहीरपणे आपले टक्कल करेल, असे खुले आव्हान दिले आहे.
08 Apr 2026 11:55 AM (IST)
“माझ्या मित्रा… टीप: मी चित्रपट तुमच्या सर्वांच्या खूप आधी पाहिला आहे. आता विनोद कोणाचा झाला?”तसेच दीपिकाने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पण यावेळी तिने आपल्या उत्तराने चाहत्यांना आनंदित केले आहे. लोक आता दीपिकाच्या समर्थनार्थ कमेंट्स करत आहेत आणि ट्रोलर्सची खिल्ली उडवत आहेत.
08 Apr 2026 11:50 AM (IST)
पॉवरप्लेमध्ये आम्ही जसे चेंडू टाकायला हवे होते तसे टाकले नाहीत. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर चांगले खेळले. गोलंदाजांनी जबाबदारी घेतली पाहिजे. एक गोलंदाजी गट म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली नाही. मी या पराभवासाठी फलंदाजीला दोष देणार नाही. गोलंदाजी विभागाने जबाबदारी घ्यायला हवी होती. नेहमी चांगले चेंडू टाकणे महत्त्वाचे असते. जर आम्ही व्यवस्थित गोलंदाजी केली असती, तर आम्ही सामन्यात टिकून राहिलो असतो.
08 Apr 2026 11:45 AM (IST)
अहमदाबादमध्ये डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर आहेत. प्रशासनाने नमुने तपासणीसाठी पाठवले असून नेमकं कारण शोधलं जात आहे.






