Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
22 Jan 2026 10:37 AM (IST)
२०२६ मध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा आणखी एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘ओ’ रोमियो’ सोबत चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांची समीक्षकांनी प्रशंसा केलेली जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाली आहे. शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांचा हा चौथा चित्रपट आहे, जो खऱ्या घटनांवर आधारित एक रोमांचक प्रेमकथा आहे.ज्यामध्ये शाहिद कपूरने त्याच्या भयंकर शैलीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
22 Jan 2026 10:30 AM (IST)
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी (२२ जानेवारी) एक ऐतिहासिक घोषणा केली, ज्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रस्तावित केलेल्या ‘शांतता मंडळा’ (Board of Peace) मध्ये सामील होण्यासाठी आणि गाझासह युक्रेनमधील शांतता प्रक्रियेसाठी रशिया आपला गोठवलेला निधी देण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.
22 Jan 2026 10:21 AM (IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवार, २१ जानेवारी रोजी स्पष्ट केले की २०२६ च्या पुरुषांच्या T20 विश्वचषक वेळापत्रकात शेवटच्या क्षणी कोणताही बदल होणार नाही. बांगलादेशला आता T20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जावे लागेल किंवा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. बांगलादेशकडे फक्त आज, २२ जानेवारीपर्यंतच वेळ आहे. परिणामी, बांगलादेशच्या क्रीडा सल्लागाराने संघ भारतात जाईल की नाही हे ठरवण्यासाठी खेळाडूंसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
22 Jan 2026 10:15 AM (IST)
एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि नामीबियाचे संबंध आता केवळ राजकीय मैत्रीपुरते मर्यादित राहणार नसून बहुआयामी भागीदारीचे स्वरुप घेत आहेत. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासामुळे हे संबंध अधिक दृढ होणार आहेत. आता भारत आणि नामीबियाचे संबंध जागतिक सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दोन्ही देश उर्जा, खनिज, आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देणार आहेत.
22 Jan 2026 10:05 AM (IST)
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे.ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळतो.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) या योजनेसाठी ५८५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यावे लागते, ज्यामुळे वर्षभर प्रवास मोफत करता येतो.
22 Jan 2026 09:55 AM (IST)
वाई तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या एका घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जयकुमार गोरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे युवा नेते विराज शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या रुतुजा शिंदे यांच्यासह बावधन व शेंदुरजणे गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
22 Jan 2026 09:45 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील तणाव आणि पैशांच्या वादातून एका 51 वर्षीय व्यक्तीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेरूळ (ता. खुलताबाद) येथील हॉटेल शिवसेवा रेसिडेन्सी लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे घडली.
22 Jan 2026 09:35 AM (IST)
स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) वार्षिक शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाच्या (Trade War) चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. “मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे, ते माझे मित्र आहेत आणि आम्ही लवकरच एक मोठा व्यापार करार करणार आहोत,” असे विधान ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
22 Jan 2026 09:25 AM (IST)
झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. सव्वा तीन कोटींच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली.
22 Jan 2026 09:15 AM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील हवामान बदलत आहे. तीव्र थंडीचा कालावधी आणि नंतर दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानंतर आता पावसाळा जवळ येत आहे. गुरुवारपासून पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्याचे परिणाम नंतर पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशात पसरतील. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Marathi Breaking News Updates : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचे निकालही हाती आले आहेत. त्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (दि.२२) आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
१६ जानेवारी रोजी २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर सत्ता स्थापनेचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण निश्चित होणे. मात्र, आरक्षणाची सोडत न निघाल्याने संबंधित महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. सोडतीनंतर संबंधित महापालिका आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.






