हार्दिक पंड्या आणि अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
MI vs KKR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील १२ वा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर केकेआर प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात मुंबई १८ व्या हंगामातील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल तर केकेआर विजयी रुळावर परतण्यास उत्सुक असणार आहे. आतापर्यंत मुंबईने २ सामने खेळले आहेत आणि दोन्हीमध्ये हार्दिक पंड्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्ससाठी केकेआरविरुद्ध जिंकणे तितकेसे सोपे असणार नाही.
उल्लेखनीय बाब अशी की, कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा मूळचा मुंबईचाच आहे. त्यामुळे तो लहानपणापासून वानखेडेवर क्रिकेट खेळत आला आहे, तर त्याच्या विरोधी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचे देखील होमग्राउंड वानखेडेच आहे. त्यामुळे आज या दोन्ही संघामधील सामना रोमांचक असाच होणार आहे.
हेही वाचा : Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…
मुंबईसाठी आयपीएल २०२५ ची सुरवात खराब राहिली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी केकेआरविरुद्ध जिंकणे सोपे असणार नाही. संघाचा सर्वात वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्यापही खेळण्यासाठी सज्ज झाला नाहीये. तर दुसरीकडे, दिग्गज अष्टपैलू खेळाडू आज केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने १८ व्या हंगामात त्यांचे दोन सामने खेळले असून त्यापैकी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाने एक सामना जिंकला आहे तर एक पराभव पत्करला आहे. पहिल्या सामन्यात केकेआरला आरसीबीकडून पराभभावाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आपल्या नावे केला होता. आता केकेआरला तिसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी फलदायी मानली जाते. या मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी हॉट असते आणि धावांचा डोंगर उभा राहत असतो. खेळपट्टीवर चांगला उसळी असल्याने चेंडू बॅटवर अगदी सहज येतो.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, विल जॅक, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर.
केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.