Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर
16 Oct 2025 01:00 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यात संघर्ष सुरु होता. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप करत होते. या संघर्षामुळे दोन्ही देशांच्या शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. पण अखेर बुधवारी (१५ ऑक्टोबर) संध्याकाळपासून ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू केली आहे.
16 Oct 2025 12:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरुन निशाणा साधला आहे. त्यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला आहे, पण त्यांच्या या दाव्यावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे मोठे पाऊल असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
16 Oct 2025 12:27 PM (IST)
राजस्थानमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली पूर्ण रिक्षा रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात पडली. यावेळी विद्यार्थी देखील रस्त्यावर आणि खड्ड्यात पडले. याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
Place: Rajgarh
District: Churu
State: Rajasthan
Chief Minister: BJP
Prime Minister: BJP
MLA: BJP#ModiHaiTohMumkinHai pic.twitter.com/fFydSO0j3R— Mohit Chauhan (@mohitlaws) October 14, 2025
16 Oct 2025 12:19 PM (IST)
सिम्बायोसिस कॉलेजमधील पदवी प्रदान सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच प्रमुख मंचावर बसणार होते. मात्र मंचावर साप रांगताना दिसून आला. या सापाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मंचाच्या आसपासच्या परिसरामध्ये साप दिसून आला. प आढळल्यामुळे उपस्थित यंत्रणांची धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा साप मंचाच्या खाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सापाला बाजूला करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. तसेच या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमापूर्वी साप पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
16 Oct 2025 12:00 PM (IST)
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या ग्रुपने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिना शोधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये त्यांनी केसाळ गोगलगायींच्या एका नवीन प्रजातीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे या लहान प्रजातींच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.
16 Oct 2025 11:50 AM (IST)
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, याच व्हायरल व्हिडीओंमध्ये काही कैद्यांनी मोबाईलवर रील्स देखील बनवल्याचे उघड झाले आहे
16 Oct 2025 11:40 AM (IST)
केंद्र सरकारनुसार, राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास 31.01 लाख असे लाभार्थी आहेत, जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत. तर नियमानुसार, एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ घेता येतो. त्यांच्या खात्यात वार्षिक 6 हजार रुपये जमा होतात. याविषयीच्या काही वृत्तानुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात अर्जांची, ईकेवायसीची पडताळणी सुरू केली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पीएम किसान निधी योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. त्यांची नावं या यादीतून बाद होणार आहे.
16 Oct 2025 11:33 AM (IST)
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली.
16 Oct 2025 11:25 AM (IST)
बागेश्वर धामचे आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री हे मधुरामधून म्हणाले की,"... ब्रिज धाममधील मांस आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करावेत आणि त्यांना ब्रिज परिसरातून बाहेर ठेवावे. या शुभ इच्छेने, आम्ही ही पदयात्रा काढू. आज मथुरा येथे त्यासाठी एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथे आम्ही शपथ घेतली की, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून, आम्ही भगवान कृष्णाला सांगितले की, कृष्ण लल्ला, आम्ही लवकरच येऊन येथे मंदिर बांधू."
16 Oct 2025 11:15 AM (IST)
उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरीची दीपावली ही नेहमीच खास मानली जाते. अयोध्यामध्ये होणार नेत्रदीपक दीपोत्सव पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात. १९ ऑक्टोबर रोजी अयोध्येत होणाऱ्या दीपोत्सवापूर्वी राम की पैडी येथे लेसर आणि लाईट शोची चाचणी घेण्यात आली आहे.
16 Oct 2025 11:05 AM (IST)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक कटू अध्याय म्हणजे बंगालची फाळणी. बंगालच्या फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग झाले. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा झाला. फाळणीमागे इंग्रजांची “फोडा आणि राज्य करा” हा हेतू होता. लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. याविरोधात नंतर जोरदार आंदोलन झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
16 Oct 2025 10:56 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियन तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी भारताच्या या आश्वासनाला रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून वर्णन केले आहे. मात्र, अद्याप भारताकडून ट्रम्प यांच्या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
16 Oct 2025 10:46 AM (IST)
सध्या सोशल मीडियावर Meta AI हा चर्चेचा विषय बनला आहे. आणि आता अश्यातच दीपिका पादुकोणने एक इतिहास रचला आहे. बॉलीवूडमध्ये धमक केल्यानंतर आता ती मेटा एआय वर राज्य करताना दिसणार आहे. अभिनेत्री मेटा एआयला आवाज देणार असल्याचे समजले आहे. हे करणारी भारतातील पहिली महिला ठरली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममध्ये समाकलित केलेला व्हर्च्युअल असिस्टंट आहे, ज्यामध्ये रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे. दीपिका आता या एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे, ज्यात हॉलिवूड स्टार अवक्वाफिना आणि जुडी डेंच यांचा समावेश आहे.
16 Oct 2025 10:39 AM (IST)
जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर गेल्या आठवड्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे हा पेट्रोल पंप केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा असल्याने पोलिसांनी तातडीने आपली तपासाची चक्रे फिरवत सशस्त्र दोराड्याप्रकरणी पोलिसांनी आता सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
16 Oct 2025 10:31 AM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमातील तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरल्या. परंतु, या अफवा पसरू लागताच, तिचा पती झहीर इक्बालने अशी प्रतिक्रिया दिली की चाहत्यांना ती पाहून खूप मजा आली. आता झहीरने नक्की काय असे केले की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे जाणून घेऊयात.
16 Oct 2025 10:24 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्यातच आता पंतप्रधान मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय, कुर्नूलमध्ये सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही ते सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे.
16 Oct 2025 10:18 AM (IST)
पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये आतापर्यत 19 संघानी त्याची जागा पक्की केली आहे. बुधवार, १५ ऑक्टोबर हा दिवस नेपाळ आणि ओमानच्या संघांसाठी खास होता. नेपाळने सलग दुसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. नेपाळसोबतच ओमाननेही भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२५ च्या टी२० विश्वचषकात स्थान मिळवले. नेपाळ आणि ओमानने आशिया आणि आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून या मेगा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. अशाप्रकारे, २० पैकी १९ संघ या वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.
16 Oct 2025 10:06 AM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका संपल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात टीम इंडियाचे सर्व टॉप खेळाडू होते. सिराज आणि बुमराह मैदानावर सराव करताना एकत्र फिरत असतानाचा एक क्षण चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, जसप्रीतने सिराजची खिल्ली उडवत म्हटले, “मोहम्मद सिराज अधिकृत आहे, बाकी सर्व काही बनावट आहे. मी हे वापरेन.”
16 Oct 2025 09:59 AM (IST)
रायगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. आधी इन्स्टाग्रामवर बनावट नावाने खाते उघडून प्रेमाच्या जाळ्यात टाकले. नंतर त्यालाला भेटायला बोलावून अपहरण केले आणि जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटूनये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला. हि हत्या आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीसोबत मिळून केली.
16 Oct 2025 09:53 AM (IST)
बंगळुरू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डॉक्टर पतीनेच केली डॉक्टर पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. डॉक्टरने आपल्या पत्नीला बेशुद्धीचं एनेस्थिसीया इंजेक्शन देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवलं. या प्रकरणाचा खुलासा सहा महिन्यानंतर झाला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरला अटक करण्यात आली असून आरोपी डॉक्टरच नाव महेंद्र रेड्डी आहे.
16 Oct 2025 09:42 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आता लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेबसाईटवर वारंवार एरर येत असून, ओटीपी येत नसल्याने लाडक्या बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्यातच आता पंतप्रधान मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय, कुर्नूलमध्ये सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही ते सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमला भेट देऊन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करतील. आंध्र प्रदेशात पोहोचल्यानंतर पंतप्रधान सकाळी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानात पूजा करतील. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एकाच संकुलात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे सहअस्तित्व, ज्यामुळे ते संपूर्ण देशातील अशा प्रकारच्या एकमेव मंदिरांपैकी एक बनले आहे.