Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Breaking: पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातही चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 20, 2026 | 09:36 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 20 Aug 2026 09:36 AM (IST)

    20 Aug 2026 09:36 AM (IST)

     Monsoon Rain Deficit: नागपुरात दोन आठवड्यांपासून पावसाची दडी;  पिकांवर कीड, शेतकरी चिंतातुर

     Monsoon Rain Deficit: गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नागपूर जिल्ह्यात पावसाची तब्बल ३१ टक्के तूट निर्माण झाली आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाने उसंत घेतल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी शेतातील पिके सुकू लागली असून बळीराजा पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे.

    पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि धान यांसारख्या मुख्य पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला असून पाने खाल्ली जात आहेत. वेळेवर पाऊस न आल्यास पिकांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती वर्तवली जात आहे.

  • 20 Aug 2026 09:25 AM (IST)

    20 Aug 2026 09:25 AM (IST)

    Gen Z Campus Outreach:  'जेन झेड'शी थेट संवादासाठी केंद्र सरकारची नवी योजना 

    Gen Z Campus Outreach:   केंद्र सरकारकडून  जेन झेड शी थेट संवाद वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना आखली असून, या अंतर्गत दररोज एका केंद्रीय मंत्र्याने एका विद्यापीठाला भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. तरुणांच्या समस्या जाणून घेणे आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांचे विचार समजून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

    NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात तरुण पिढी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या सर्व घडामोडींनंतर तरुणांमधील असंतोष दूर करण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करणार असल्याचे समजते.

  • 20 Aug 2026 09:20 AM (IST)

    20 Aug 2026 09:20 AM (IST)

     Mumbai Crime News : दुबईहून आलेल्या सुनेची ३ लाखांची सुपारी देऊन सासूनेच घडवून आणली हत्या, ५ जणांना अटक

    Mumbai Crime News :  दारूच्या नशेत बाथरूममध्ये पाय घसरून पडून सुनेचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव करणाऱ्या सासूचा मुंबईतील पंतनगर पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. जुन्या वादाच्या रागातून सासूने माजी मोलकरणीच्या कुटुंबाला तब्बल ३ लाख रुपयांची सुपारी देऊन दुबईहून परतलेल्या ३५ वर्षीय सुनेची निर्घृण हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सासू धनलक्ष्मी गंजी (६०) हिच्यासह सुपारी घेणारी माजी मोलकरीण मंगलाबाई जाधव (४५), शिवानी जाधव (२१), सुरेश जाधव (४६) आणि साजन जाधव (१९) या ५ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने सासू धनलक्ष्मीला २४ ऑगस्टपर्यंत, तर मोलकरीण आणि तिच्या कुटुंबाला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 20 Aug 2026 09:15 AM (IST)

    20 Aug 2026 09:15 AM (IST)

    West Bengal Politics  पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंपानंतर भाजपला मोठा धक्का!

    West Bengal Politics:   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठे राजकीय संकट झेलणाऱ्या तृणमूल काँग्रेसने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता, तर तब्बल २० खासदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

    ममता बॅनर्जी यांच्या हातातून पक्ष निसटत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, अवघ्या दोन महिन्यांत तृणमूलने पुन्हा एकदा कमबॅक करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. सतत बसणाऱ्या राजकीय धक्क्यांनंतर तृणमूल काँग्रेसने मारलेल्या या मुसंडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 20 Aug 2026 09:05 AM (IST)

    20 Aug 2026 09:05 AM (IST)

    Supreme Court: पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवावे, सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद

    Shivsena Symbol Case Supreme Court: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष (Political Party) हा कायमस्वरूपी असतो, तर विधिमंडळ पक्ष (Legislative Party) हा केवळ ५ वर्षांच्या कालावधीपुरता मर्यादित असतो; त्यामुळे केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर मूळ पक्ष ठरवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा मुख्य दावा ठाकरे गटाकडून मांडण्यात आला.

    कपिल सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, राजकीय पक्ष ही मूळ संस्था असते आणि तिच्या अंतर्गत विधिमंडळ पक्ष कार्य करतो. निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या संख्येवर (विधिमंडळ पक्ष) भर देऊन एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला, जो पूर्णपणे चुकीचा आहे. जर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला दिले जात नसेल, तर ते तातडीने गोठवले (Freeze) जावे, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टात केली.

Maharashtra to National And International Breaking News:

IMD Alert: दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने पश्चिम हिमालयीन प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

उत्तराखंडमधील पिथोरगड येथे बेली ब्रिज कोसळल्याने सीमावर्ती भागांशी संपर्क तुटला. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातही चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वायव्य भारतात किमान पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

Web Title: 20 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Maharashtra Rain
  • Mumbai News
  • national news
  • pune news

संबंधित बातम्या

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द
1

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून बंधनकारक; नियम न पाळल्यास परमिटच होणार रद्द

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड
2

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
3

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार
4

Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.