Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates: बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

Maharashtra Breaking LIVE: सोमवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. त्यामुळे काही गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बेंचमार्क निफ्टी ५० २५,६०० च्या पातळीच्या खाली घसरला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 20, 2026 | 06:27 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:  

भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

India Share Market Update: जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सपाट किंवा काहीशी मंदावण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमध्ये (Gift Nifty) झालेली किरकोळ घसरण हे याचे मुख्य संकेत आहेत. मागील सत्रात (सोमवारी) सेन्सेक्स ३२४ अंकांनी घसरून ८३,२४६ वर, तर निफ्टी १०८ अंकांनी घसरून २५,५८५ वर बंद झाला होता. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने अदानी पॉवर, आयटीसी हॉटेल्स, एलटी माइंडट्री आणि टाटा कॅपिटल यांसारख्या प्रमुख शेअर्सवर राहणार आहे.

The liveblog has ended.
  • 20 Jan 2026 06:24 PM (IST)

    20 Jan 2026 06:24 PM (IST)

    Karjat News : कर्जतमध्ये बिबट्याचा वावर ; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    कर्जत / संतोष पेरणे : तालुक्यातील जिते आणि कुंभे गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहेत.  गेले काही दिवस  बिबट्याचा  वावर असल्याची कुजबुज होती,मात्र स्थानिक ग्रामस्थ अंकुश शेळके यांनी वन विभागाला बिबट्याच्या पावलांचे ठसे यांची माहिती दिल्यानंतर वन विभागाची टीम त्या भागात पोहचली आहे. दरम्यान वन विभागाने बिबट्याच्या पावलांचे ठसे लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी सतर्क राहावे,एकटे फिरू नये अशा सूचना दिल्या आहेत.

  • 20 Jan 2026 06:05 PM (IST)

    20 Jan 2026 06:05 PM (IST)

    “वृक्षवल्ली आम्हा सोयरी?” 'या' पालखी मार्गावर वृक्षलागवड नाहीच? ठेकेदाराचे पर्यावरणाकडे दुर्लक्ष

    बारामती/अमोल तोरणे: संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू होत असताना पर्यावरणपूरक विकासाचे मोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली वड, पिंपळ, लिंब, चिंच, आंबा , नारळ यांसह अनेक महाकाय आणि शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली असून, त्याऐवजी नव्याने वृक्षलागवड करण्याबाबत ठेकेदार कंपनी अनुत्सुक असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • 20 Jan 2026 05:49 PM (IST)

    20 Jan 2026 05:49 PM (IST)

    सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

    पुरंदर तालुक्यातील कॉलेजवयीन युवक व्यसनांच्या जाळ्यात अडकले असून आता गुन्हेगारी क्षेत्राकडे त्यांची वाटचाल सुरु आहे. यातून एकमेकांना शिवीगाळ करतानाच आता एकमेकांना जीवे मारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे यांच्याकडे पिस्तुलही सहज उपलब्ध होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुरंदर तालुक्यातील हॉटेल, धाबे गुन्ह्यांचे हॉट स्पॉट झाले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

  • 20 Jan 2026 05:20 PM (IST)

    20 Jan 2026 05:20 PM (IST)

    मारुती सुझुकीकडून गुजरातमध्ये 35000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय

    मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड गुजरातमधील खोर्जा येथे नवीन प्लांट बांधण्यासाठी 35000 कोटींची गुंतवणूक करत आहे. कंपनीची या प्लांटमध्ये दरवर्षी एकूण 10 लाख कारचे उत्पादन करण्याची योजना आहे. शिवाय, नवीन ऑटो प्लांटमुळे अंदाजे 12000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

  • 20 Jan 2026 05:05 PM (IST)

    20 Jan 2026 05:05 PM (IST)

    थाटात पार पडला प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा!

    मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनसराई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय मराठी कलाकार लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले. गेल्या वर्षात अनेक मराठी कलाकारांच्या मुलांनी आयुष्यात एक नवीन सुरूवात केली आहे. अलीकडेच आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधणात अडकला. आता या पाठोपाठ प्रसाद ओकच्या घरातून देखील एक आनंदाची बातमी येत आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या घरी ही लवकरच सनई चौघडे वाजवणार आहेत.

     

  • 20 Jan 2026 04:50 PM (IST)

    20 Jan 2026 04:50 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी

    Australia Shark Attack News : सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) न्यू वेल्स येथील किनारपट्टीवर गेले तीन दिवस मृत्यचे सावट उभे राहिले आहे. गेल्या तीन दिवसांत किनारपट्टीवर चार वेळा शार्कचे हल्ले झाले आहे. मंगळवारी (२० जानेवारी २०२६) रोजी झालेल्या हल्ल्यात एक सर्फर जखमी झाला आहे. यामुळे किनारपट्टीवर जाण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 20 Jan 2026 04:40 PM (IST)

    20 Jan 2026 04:40 PM (IST)

    भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर

    टोयोटाने अर्बन क्रूझर एबेला ही इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. ही कंपनीची भारतात सादर केलेली पहिली ऑल-इलेक्ट्रिक (BEV) एसयूव्ही आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. यामध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, अँबियंट लाइटिंग, स्लाईड आणि रिक्लाइन रिअर सीट्स, वायरलेस मोबाईल चार्जर, जेबीएल ऑडिओ सिस्टम, लेव्हल-2 एडीएएस, 360-डिग्री कॅमेरा, सात एअरबॅग्ज, ड्युअल-टोन इंटीरियर, 10.1-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एलईडी लाईट्स आणि 18-इंच अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.

  • 20 Jan 2026 04:30 PM (IST)

    20 Jan 2026 04:30 PM (IST)

    भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही

    पनवेल ग्रामीण ( वा ) भाजपा पक्षाने अखेर निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय दिला नाही.म्हणून संपूर्ण बौद्ध समाजाची नाराजी आशा आषयांचे बॅनर सध्या कामोठे वसाहतील लावण्यात आले आहेत. अनामिक नावाने लावण्यात आलेले हे बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत भाजपा ने कामोठे वसाहतीत बौद्ध समाजाच्या उमेदवारांना निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व दिले नाही असा आरोप असलेल्या या बॅनर बाबत अधिक माहिती घेण्यासाठी भाजपा सोबत युती करून निवडणूक लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष ऍड. मंगेश धिवार यांच्याशी संपर्क साधला असता कोणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी आणि भाजपा आणि बौध्द समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे बॅनर लावले असल्याचा आरोप करत,भाजपा च्या पाठिंब्या वर निवडणूक रिंगणात उतरलेल्या बौद्ध समाजाच्या उमेदवारांना पडण्याच काम आशा प्रकारच्या प्रवृततीनी केले असल्याचे वक्तव्य केले आहे.

  • 20 Jan 2026 04:25 PM (IST)

    20 Jan 2026 04:25 PM (IST)

    पोलादपूरमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन करीत शिवसेना उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

    रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रत्येक राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. आज पोलादपूर तालुक्यातील लोहारे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे व कापडे बुद्रुक जिल्हा परिषदेचे उच्च शिक्षित उमेदवार डॉ निलेश कुंभार यांसोबतच कापडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल दळवी, लोहारे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अनिता भिलारे, कोतवाल बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार अविनाश शिंदे यांचे नामनिर्देश पत्र तहसील कार्यालय पोलादपूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी मिनाक्षी राठोड यांच्याकडे दाखल करण्यात आले. पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून शिवसेना पक्षातर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भगव्या पताका, भगवे झेंडे, फटाक्यांच्या अतिषबाजीने संपूर्ण पोलादपूर शहर दुमदुमून गेला.

  • 20 Jan 2026 04:20 PM (IST)

    20 Jan 2026 04:20 PM (IST)

    आश्रफ आझमी यांची मुंबई काँग्रेस गटनेते पदी नियुक्ती

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर मुंबईतील काँग्रेसचे २४ नगरसेवक सीबीडी बेलापूर मधील कोकण भवन मध्ये आले होते. यावेळी कॅाग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची आणि पक्षाच्या गटाची नोंदणी केली असून आश्रफ आझमी यांची मुंबई काँग्रेस गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्ही भाजपा आणि शिवसेना शिंदे गटा विरुद्ध आम्ही लढलोय आणि त्यात आम्हाला चांगल्याप्रकारे यश मिळालंय.तसेच भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या वर टिका केली असली तरी, एकीकडे ठाकरे गट , राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप यांना अपेक्षित यश मिळाले नसताना कॅाग्रेस पक्षाने चांगले यश संपादन केले आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी मुंबई अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भाई जगताप यांनी केलेल्या टिकेत काहीही तथ्य नसल्याची आश्रफ आझमी यांनी म्हटलंय.

  • 20 Jan 2026 04:13 PM (IST)

    20 Jan 2026 04:13 PM (IST)

    रत्नागिरी नगरपरिषद सभापती निवड प्रक्रिया पार

    रत्नागिरी नगरपरिषदेत नव्या सभापतीच्या निवडीची प्रक्रिया आज अत्यंत साधेपणाने पार पडली. निवड प्रक्रिया मुख्यधिकारी श्री. प्रसाद गारावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सहभाग घेतला होता. सभापती निवडीची प्रक्रिया पार पडल्यावर, नव्या सभापतींचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सभापती निवडीसह, नगरपरिषद कमिटी देखील स्थापन करण्यात आली. नगरसेवकांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेला गती देण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

  • 20 Jan 2026 04:05 PM (IST)

    20 Jan 2026 04:05 PM (IST)

    Shiv Sena Symbol Case: भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर?

    Shiv Sena Symbol Case: मुंबई महापौरपदावरील सुरू असलेल्या वादात, सर्वोच्च न्यायालय २१ जानेवारी रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या वादाशी संबंधित अंतिम याचिकांवर सुनावणी करणार आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे (Eknath Shinde) गटाविरुद्ध निकाल दिला तर संपूर्ण खेळ पलटू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी त्यांच्या याचिकेत शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण निवडणूक चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे उद्या (२१ जानेवारी) होणाऱ्या सुनावणीवर बारकाईने लक्ष लागले आहे.

  • 20 Jan 2026 03:55 PM (IST)

    20 Jan 2026 03:55 PM (IST)

    Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट!

    Industrial Crisis Marathwada News: काल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सीएसआर निधीअभावी स्थितीवर प्रकाश टाकल्यानंतर आज मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग बंद पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण १८ औद्योगिक वसाहतींमध्ये ६०२ उद्योग आजारी अवस्थेत बंद असल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने सीएसआर निधीसाठी केलेले आवाहन या भागात कितपत परिणामकारक ठरेल, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योग बंद पडल्यामुळे हजारो कामगार थेट बेरोजगार झाले असून संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक, कंत्राटी सेवा, लघुउद्योग तसेच स्थानिक बाजारपेठांवरही त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 20 Jan 2026 03:40 PM (IST)

    20 Jan 2026 03:40 PM (IST)

    ३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… सुरु होणार नव्या हत्येचा तपास!

    “कोहरा” च्या ओटीटीवरील प्रचंड यशानंतर, बरुण सोबती आणि त्यांची टीम “कोहरा २” या नवीन सीझनसह परतत आहेत. यावेळी, मोना सिंग एका कडक पंजाबी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शोमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. आज, निर्मात्यांनी “कोहरा २” ची ओटीटी रिलीज तारीख जाहीर केली. बरुण सोबती आणि मोना सिंग अभिनीत ही वेब सीरिज प्रेक्षकांना कुठे पाहता येणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. “कोहरा २” ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग सुरू होणार आहे. ही मालिका केवळ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. आज, निर्मात्यांनी “कोहरा २” चे नवीन पोस्टर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सत्य धुक्यात हरवले. चला या नवीन शहरात सत्य शोधूया.” ही मालिका गुन्हेगारी, गूढता आणि ड्रामाने भरलेली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 20 Jan 2026 03:25 PM (IST)

    20 Jan 2026 03:25 PM (IST)

    पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं

    लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला लोणचं पाहिल्यानंतर पाणी सुटते. लोणचं हा पदार्थ सगळेच खूप जास्त आवडीने खातात. चटकदार चवीचे झणझणीत लोणचं डाळभातासोबत अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. काहींना रोजच्या जेवणात काहींना काही झणझणीत पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही हिरव्यागार मिरच्यांचे आंबट तिखट लोणचं तयार करून ठेवू शकता. लोणचं मुरल्यानंतर हिरव्या मिरच्यांमधील तिखटपणा कमी होतो आणि पदार्थाची चव संतुलित राहते. हिरव्या मिरच्यांचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे लोणचं चपाती किंवा भाकरीसोबत खावे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हिरव्या मिरच्यांचा ठेचा आवडीने बनवला जातो. याशिवाय तळलेल्या मिरच्या, ताकातल्या मिरच्या, दही मिरची हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.

    वाचा सविस्तर 

  • 20 Jan 2026 03:10 PM (IST)

    20 Jan 2026 03:10 PM (IST)

    Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच!

    Greenland Dispute : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन एक वादग्रस्त फोटो शेअर केला आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेतली तणाव वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प वारंवार ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा करत आहेत. यामुळे जगातिक राजकारणात मोठा वाद सुरु आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ग्रीनलँड अमेरिकेच्या भाग असलेल्या दृश्याचा एक एआय फोटो शेअर केले आहे. या फोटोत उपराष्ट्रपती जे.डी व्हॅन्स आणि परराष्ट्र संरक्षण सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत ट्रम्प अमेरिकेचा झेंडा घेऊन ग्रीनलँडमध्ये उभे आहेत. तर बाजूला एक फलक लावण्यात आला आहे. ज्यावर ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टोबल्ड २०२६ असे लिहिले आहे. ट्रम्प यांनी हा फोटो शेअर करत ग्रीनलँडला अमेरिकेत सहभागी करुन घेण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे युरोपीय देशांमध्ये आणि ग्रीनलँडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 20 Jan 2026 03:03 PM (IST)

    20 Jan 2026 03:03 PM (IST)

    Tromelin Island: समुद्राच्या मध्यात, वाळूच्या बेटावर फसला जहाज!

    ट्रोमॅलिन बेट हे जगातील सर्वात एकाकी आणि लहान बेटांपैकी एक मानले जाते. या बेटाचा इतिहास जितका थरारक आहे, तितकाच तो मानवी क्रूरता आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. या बेटावर घडलेला थरार, या बेटाचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 1761 मध्ये येथे धडकलेला Utile हा जहाज. ‘युटिल’ (Utile) हे जहाज जेव्हा या प्रवाळ बेटाला धडकले, तेव्हा तिथे फक्त वाळू आणि काही झुडपे होती. जहाजावरील फ्रेंच खलाशांनी आपल्यासाठी एक छोटी नौका तयार केली आणि ते तिथून निघून गेले. जाताना त्यांनी वचन दिले की ते मदतीसाठी परत येतील, पण फ्रेंच सरकारने एका ‘बेकायदेशीर’ मानवी तस्करीसाठी पैसे खर्च करण्यास नकार दिला. परिणामी, ८० हून अधिक मालगासी (Madagascar) लोक तिथेच सोडून देण्यात आले.

    वाचा सविस्तर 

  • 20 Jan 2026 02:55 PM (IST)

    20 Jan 2026 02:55 PM (IST)

    कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…

    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चिपळुणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची राजकीय दिशा स्पष्ट झाली असून, ही निवडणूक पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव-राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी बिपळुणातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

  • 20 Jan 2026 02:50 PM (IST)

    20 Jan 2026 02:50 PM (IST)

    मंडणगडमध्ये माणुसकीला काळिमा; दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार

    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ग्रामीण भागातील दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (१७ जानेवारी) रोजी घडली. पोलिसांनी संशयित चुलत काकाला अटक केली आहे.

  • 20 Jan 2026 02:45 PM (IST)

    20 Jan 2026 02:45 PM (IST)

    अर्थसंकल्प २०२६ आधी शेअर बाजार सावध! १५ वर्षांचा ट्रेंड सांगतो ‘सावध राहा’

    २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजार मंदी आणि सुस्ती अनुभवत आहे. गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असून ज्यामुळे तेजीऐवजी घसरण होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड नवा नाही; गेल्या १५ वर्षांच्या आकडेवारीत हे वारंवार दिसून आले आहे. २०१० ते २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास, अर्थसंकल्पापूर्वीचा काळ बाजारासाठी अनेकदा आव्हानात्मक राहिला आहे. निफ्टीने सरासरी कमकुवतपणा आणि बाजूला हालचाली पाहिल्या आहेत.

  • 20 Jan 2026 02:40 PM (IST)

    20 Jan 2026 02:40 PM (IST)

    भाजपला मोठे भगदाड? ‘या’ निवडणुकीत डावलले गेल्याने…

    नुकत्याच पार पडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीपासुन राजापूर भाजपामध्ये असणारी खदखद आता जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आणखीनच वाढलेली असून अनेक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीला लागल्याने राजापूरात भाजपाची नाव बुडण्याची शक्यता राजकिय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकत्यांच्या निवडणुका असतात से वरिष्ठ नेते सांगत असले तरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र विचारात घेतल जात नाही.

  • 20 Jan 2026 02:35 PM (IST)

    20 Jan 2026 02:35 PM (IST)

    जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात

    US Denmark Tension over Greenland : नूक : ग्रीनलँड (Greebland) आता युद्धाचे मैदान बनत चालले आहे. डेन्मार्कने आपली लष्करी उपस्थिती ग्रीनलँडमध्ये वाढवली आहे. सोमवारी (१९ जानेवारी २०२६) डॅनिश लष्कर प्रमुख पीटर बॉयसेन यांच्यासह लष्कराची आणखी नवी तुकडी ग्रीनलँडमध्यै तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामुळे डेन्मार्क अमेरिकेत तणाव वाढला आहे.

  • 20 Jan 2026 02:30 PM (IST)

    20 Jan 2026 02:30 PM (IST)

    नितीन नबीन यांच्यासमोर असणार आव्हानांचा डोंगर; बंगाल- आसाममध्ये लागणार कस

    n: भारतीय जनता पक्षाला (BJP Politics) नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP national president) निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन  (BJP Politics)  यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

  • 20 Jan 2026 02:25 PM (IST)

    20 Jan 2026 02:25 PM (IST)

    नितीन नबीन हे माझे नवीन बॉस..! भाजप संघटन पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

    भारतीय जनता पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष (BJP President Election) मिळाले आहेत. नितीन नबीन यांची भाजपचे नवीन सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांना माळ घालून त्यांचे अभिनंदन केले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजप संघटन पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी. विनोद तावडे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी नितीन नबीन हे माझे नवीन बॉस असल्याचे म्हटल्याने एकच हास्यकल्लोळ सुरु झाला.

  • 20 Jan 2026 02:20 PM (IST)

    20 Jan 2026 02:20 PM (IST)

    ” एखाद्याच्या चारित्र्यावर…”, सोनाली पाटीलचा अनुश्रीवर संताप, राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली

    कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 च्या घरात खेळ आता रंजक होत चाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासून घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहे. नुकताच या सीझनचा पहिला भाऊचा धक्का पार पडला. ज्यामध्ये रितेश देशमुखने पहिल्या आठवड्यात धिंगाणा घालणाऱ्या कलाकारांची चांगलीच शाळा घेतल्याचे आपण पाहिले. त्यानंतर सुरू झालेल्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एक मोठा वाद झाला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात टोकाच भांडण झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. राकेशने माझा हात खेचला, मला परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही असं वक्तव्य अनुक्षीने केलं.

  • 20 Jan 2026 02:11 PM (IST)

    20 Jan 2026 02:11 PM (IST)

    आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?

    चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली, भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून चिपळूणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविली जाणार असून भाजपाकडून ३ जिल्हा परिषद गट तर ७ पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले जाणार आहेत. भाजपाचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे नेते प्रशांत यादव आणि जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या नेतृत्कखाली चा निवडणुका लढविल्या जाणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

  • 20 Jan 2026 02:02 PM (IST)

    20 Jan 2026 02:02 PM (IST)

    'Bigg Boss OTT' चा चौथा सीझन नाही होणार रिलीज, निर्मात्यांचा मोठा निर्णय

    "बिग बॉस" हा वादग्रस्त रिॲलिटी शो गेल्या १९ वर्षांपासून टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. त्याला टक्कर देण्यासाठी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन सीझन देखील काढण्यात आले होते, प्रत्येक सीझन १.५ ते २ महिने चालायचा. आता, जर प्रेक्षक "बिग बॉस ओटीटी ३" नंतर चौथ्या सीझनची वाट पाहत असतील, तर त्यांनीती पाहू नये. कारण निर्मात्यांनी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. 'बिग बॉस' ओटीटी आता बंद होणार असल्याचे समजले आहे.

  • 20 Jan 2026 01:55 PM (IST)

    20 Jan 2026 01:55 PM (IST)

    कोल्हापुरात रणसंग्राम; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चिन्हे,जनता दल, भाजपा युतीचे संकेत

    जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर गडहिंग्लज उपविभागात विविध राजकीय पक्षांनी सोयरीकतेसाठी दंड थोपटले आहेत. चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या धरतीवर आता गडहिंग्लज उपविभागातील बारा जिल्हा परिषद मतदार समिती संघात जोडण्यांना वेग आला आहे. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या धर्तीवर जिल्हा परिषद पंचायत निवडणुकात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा असली तरी जागावाटपाचे गुऱ्हाळ अजून संपलेले नाही. दरम्यान नगरपालिका निवडणुकी प्रमाणे जनता दल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपा सोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत.

  • 20 Jan 2026 01:45 PM (IST)

    20 Jan 2026 01:45 PM (IST)

    भाजपमधील इच्छुकांचे आरक्षण साेडतीकडे लक्ष; पुण्याचा महापौर कोण होणार?

    पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर पुण्याचा महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या २२ जानेवारी रोजी काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाने अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली असून, महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • 20 Jan 2026 01:35 PM (IST)

    20 Jan 2026 01:35 PM (IST)

    चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट

    भारत आणि बांगलादेश (Bangladesh) संबंधामध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेश चीनसोबत मुळे भारताविरोध कट रचत आहे. दोन्ही देशांनी भारताच्या चिकन नेक जवळ तीस्ता प्रकल्पाच्या बहाण्याने हालचाली सुरु केल्या आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.नुकतेच चीनच्या राजदूताने तिस्ता प्रकल्प क्षेत्राला भेट दिली आहे. यावेळी या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच राजदूतांनी तीस्ता प्रकल्प जलद करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

  • 20 Jan 2026 01:20 PM (IST)

    20 Jan 2026 01:20 PM (IST)

    कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू

    कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू झल्याचे समोर आले आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. समीर गायकवाड हा चार वर्षांपूर्वी गोविंद पानसरे हत्या प्रकरणातून जामिनावर बाहेर आला होता. सोमवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाला.

  • 20 Jan 2026 01:15 PM (IST)

    20 Jan 2026 01:15 PM (IST)

    भाजप पक्षाला मिळाले सर्वात तरुण अध्यक्ष; नितीन नबीन यांनी स्वीकारला पदभार

    भारतीय जनता पक्षाला (BJP Politics) नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP national president) निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना माळ घालून त्यांचे अभिनंदन केले.नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.

  • 20 Jan 2026 01:05 PM (IST)

    20 Jan 2026 01:05 PM (IST)

    नागपुरात काँग्रेस सक्रिय, ठाकरे गट बॅकफूटवर? राजकीय गणितं बदलतली

    काँग्रेस व भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने आता सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. सत्तेच्या चाव्या हातात घेण्यासाठी भाजप व काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ऑपरेशन लोटस येथे होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सगळ्या नगरसेवकांना नागपुरात पाचारण केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान खा. धानोरकर व आ. वडेट्टीवार यांच्यात गटनेतेपदाबाबत वाद सुरू झाल्याने दोघांतील वर्चस्वाची लढाई काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

  • 20 Jan 2026 01:00 PM (IST)

    20 Jan 2026 01:00 PM (IST)

    कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

    पुण्याच्या कोथरूड भागात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला. शाळेतील जुन्या वादातून दोन तरुणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केला. मुलगा गंभीर जखमी असून आरोपी पसार आहेत.

  • 20 Jan 2026 12:50 PM (IST)

    20 Jan 2026 12:50 PM (IST)

    मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

    नोएडामध्ये निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात कार कोसळून 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता बुडाला. निष्काळजीपणामुळे झालेल्या या मृत्यूनंतर सरकारने CEO हटवून SIT चौकशीचे आदेश दिले.

  • 20 Jan 2026 12:45 PM (IST)

    20 Jan 2026 12:45 PM (IST)

    काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत केली आघाडी

    काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय घेतला आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

  • 20 Jan 2026 12:40 PM (IST)

    20 Jan 2026 12:40 PM (IST)

    रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

    बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका अज्ञात तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

  • 20 Jan 2026 12:35 PM (IST)

    20 Jan 2026 12:35 PM (IST)

    हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम?

    जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्‌यातही महाराष्ट्रात पहाटेच्या थंडीचा प्रभाव कायम असून, अंतर्गत भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव होत आहे.

  • 20 Jan 2026 12:30 PM (IST)

    20 Jan 2026 12:30 PM (IST)

    मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात

    मनमाड-मालेगाव रस्त्यावर तालुक्यातील वऱ्हाणे शिवारात सोमवारी (दि.१९) पहाटे पिकअप व खासगी टेम्पो ट्रॅव्हलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. त्यात मालेगावच्या तिघा बारदान व्यावसायिकांचा व सेंधवा (मध्यप्रदेश) येथील एकाचा अशा चौघांचा मृत्यू झाला.

  • 20 Jan 2026 12:25 PM (IST)

    20 Jan 2026 12:25 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा

    मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी पहाटे सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने थेट गोळीबार करून दहशत निर्माण केली. घरावर दगडफेक करत एका नागरिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

  • 20 Jan 2026 12:20 PM (IST)

    20 Jan 2026 12:20 PM (IST)

    देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

    बीड जिल्ह्यातील माजलगाव–गढी महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात 26 वर्षीय अमर बापमारे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

  • 20 Jan 2026 12:15 PM (IST)

    20 Jan 2026 12:15 PM (IST)

    DGP रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

    बेंगलोर गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील आरोपी रान्या रावचे वडील DGP रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेतली असून राव यांनी व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा केला आहे.

  • 20 Jan 2026 12:10 PM (IST)

    20 Jan 2026 12:10 PM (IST)

    ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल

    छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेयसीने नातं तोडलं या संशयातून तरुणाने तिचा गळा आवळून खून केला. पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार याला जन्मठेप व 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली.

  • 20 Jan 2026 12:00 PM (IST)

    20 Jan 2026 12:00 PM (IST)

    T20 मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू घेतला जंगल सफारीचा आनंद

    न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय टी-२० संघातील सदस्य जंगल सफारीचा आनंद घेताना दिसले. दोन्ही संघांमधील पहिला टी-२० सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात खेळला जाणार आहे. त्याआधी संघातील सदस्य जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. जंगलात उघड्या जीपमध्ये फिरणाऱ्या भारतीय खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 20 Jan 2026 11:50 AM (IST)

    20 Jan 2026 11:50 AM (IST)

    बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड

    बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

  • 20 Jan 2026 11:40 AM (IST)

    20 Jan 2026 11:40 AM (IST)

    BMC Election 2026 : नव्या चक्राकार पद्धतीमुळे बदलणार राजकीय समीकरणे ?

    बई महापालिकेच्या महापौरपदाच्या सोडतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आता नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाण्याची जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुला प्रवर्ग यांचा समावेश असेल. जर जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब केला, तर यंदा मुंबईचे महापौरपद ‘अनुसूचित जमाती’ प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता आहे.

  • 20 Jan 2026 11:30 AM (IST)

    20 Jan 2026 11:30 AM (IST)

    गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार

     इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) कराची येथे शनिवारी (१७ जानेवारी २०२६) संध्याकाळी प्रसिद्ध मॉल गुल प्लाझाला भीषण आग (Fire Accident) लागली होती. या आगीत आतार्यंत २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ५० हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण कराची हादरला आहे. सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

  • 20 Jan 2026 11:29 AM (IST)

    20 Jan 2026 11:29 AM (IST)

    बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

     

    भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने स्पर्धात्मक खेळांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. व्यावसायिक खेळांसाठी आवश्यक असलेली शारीरिक तंदुरुस्ती आता गाठता येत नसल्याचे तिने मान्य केले. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाने २०२३ मधील 'सिंगापूर ओपन'मध्ये आपला शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता.

    एका पॉडकास्टमध्ये निवृत्तीविषयी बोलताना सायना म्हणाली, "मी दोन वर्षांपूर्वीच खेळणे थांबवले होते. मला वाटले की मी माझ्या अटींवर खेळायला सुरुवात केली आहे, तर निवृत्तीही माझ्याच अटींवर घेईन; त्यासाठी स्वतंत्र घोषणेची गरज वाटली नाही. आता खेळणे शक्य नसेल, तर त्यात काही गैर नाही."

    २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीचा सायनाच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. तरीही तिने जिद्दीने पुनरागमन करत २०१७ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मात्र, गुडघ्याच्या सततच्या त्रासामुळे तिला अखेर हा कठीण निर्णय घ्यावा लागला.

  • 20 Jan 2026 11:16 AM (IST)

    20 Jan 2026 11:16 AM (IST)

    मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन

    सोशल मीडियावर एक पोस्ट आणि दावा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा आरोप केला जात आहे की एका मुस्लिम तरुणाने त्याच्या ब्राह्मण मैत्रिणीला न सांगता सोयाबीनऐवजी चिकन खाऊ घातलं. ती मुलगी म्हणते की ती ब्राह्मण आहे आणि तिच्या धार्मिक श्रद्धेनुसार तिने आधीच स्पष्ट केले होते की ती मांसाहारी अन्न खात नाही. खाण्याच्या निवडी बहुतेकदा वैयक्तिक श्रद्धा आणि संगोपनाशी जोडल्या जातात, म्हणूनच स्पष्टता आणि मोकळेपणा महत्त्वाचा असतो. बरेच प्रेक्षक यावर भर देत आहेत की, कोणत्याही नात्याला, विशेषतः भिन्न सांस्कृतिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या नात्याला प्रामाणिक संवाद आणि सीमांचा आदर आवश्यक आहे. मुलीच्या धर्माचा आदर न करता मुलाने तिला नकळत चिकन खाऊ घातलं ज्यावर युजर्स आता चांगलेच भडकले असून इंटरनेटवर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

  • 20 Jan 2026 10:59 AM (IST)

    20 Jan 2026 10:59 AM (IST)

    मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून तरुण इंजिनिअरचा मृत्यू

    नोएडामधील एका मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याने तब्बल २ तास मदतीसाठी त्याने आर्त हाक मारली पण, ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव युवराज मेहता (२७) असे आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत तात्काळ कारवाईचे संकेत दिले आहेत.

Web Title: Maharashtra breaking news live updates in marathi maharashtra municipal election 2026 marathi news maharashtra politics sports crime national international war news share market updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल
1

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट
2

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Govt Jobs For Agniveers: अग्निवीरांसाठी मोठी बातमी ! सेवेनंतर राज्य सरकारच्या ४ विभागांत मिळणार नोकरीची संधी
3

Govt Jobs For Agniveers: अग्निवीरांसाठी मोठी बातमी ! सेवेनंतर राज्य सरकारच्या ४ विभागांत मिळणार नोकरीची संधी

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’
4

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.