Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 16.11.2026
Earthquake in Peru: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता
इका : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी भूकंप होताना दिसत आहे. त्यातच पेरू या देशामध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. दक्षिण पेरूभर तीव्र धक्के जाणवले. गुरुवारी पेरूच्या दक्षिण अँडीज पर्वतरांगेत ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. इका आणि अरेक्विपासह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वाचा सविस्तर-
21 Aug 2026 05:27 PM (IST)
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मनुस्मृतीवादी विचारांच्या लोकांसोबत जाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. राज्यातील काँग्रेसचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने चुकीच्या राजकीय चौकटीत बसवतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
21 Aug 2026 05:17 PM (IST)
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, यावेळी ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी देशातील पहिली शाळा सुरू केलेल्या पुण्यातच राहुल गांधी सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार असल्याचे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपने राहुल गांधींचा धसका घेतला असल्याचे म्हंटले आहे.”
21 Aug 2026 05:07 PM (IST)
तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी बचत सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज नाही. जर तुम्ही दरमहा फक्त ₹१,२०० गुंतवू शकत असाल, तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (SSY) हळूहळू एक भरीव निधी तयार करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही वार्षिक ₹१४,४०० जमा कराल. जर तुम्ही १५ वर्षे सातत्याने गुंतवणूक केली, तर तुमच्याकडे एकूण ₹२१६,००० जमा होतील. त्यानंतर, २१ वर्षांची मुदत संपेपर्यंत तुम्हाला कोणतीही नवीन ठेव जमा करण्याची गरज भासणार नाही, परंतु व्याज जमा होत राहील. याचा अर्थ असा की, थोड्या रकमेने सुरुवात केल्यास दीर्घकाळात तुमच्या मुलीसाठी एक भरीव निधी तयार होऊ शकतो. ८.२% वार्षिक व्याजदराचा विचार केल्यास, दरमहा ₹१,२०० ची बचत करून अंदाजे ₹६.९० लाखांचा निधी तयार होऊ शकतो, ज्यापैकी अंदाजे ₹४.७४ लाख व्याजातून मिळतील. लक्षात ठेवा की सरकार वेळोवेळी SSY व्याजदर बदलू शकते, त्यामुळे प्रत्यक्ष रक्कम बदलू शकते.
21 Aug 2026 05:00 PM (IST)
साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे, तर व्यापाऱ्यांना होणार आहे. या फटका सर्वसामान्य ग्राहकांना जास्त बसणार आहे. अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, देशात साखरेच्या दरात अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याची शंकाही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
21 Aug 2026 04:50 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
21 Aug 2026 04:40 PM (IST)
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने आर्थिक स्थिरता, खर्चाचे नियोजन आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांमध्येही आपली आघाडी कायम ठेवली आहे. होम क्रेडिट इंडियाच्या वार्षिक ‘द ग्रेट इंडियन वॉलेट २०२६’ (GIW 4.0) अहवालातून मुंबईकरांच्या आर्थिक सवयी आणि बदलत्या ग्राहक मानसिकतेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या वर्षीच्या अभ्यासाची मध्यवर्ती संकल्पना ‘कर दिलाशापासून ते प्रत्यक्ष पर्यायांपर्यंत – भारतातील वॉलेट्स कशी बदलत आहेत’ अशी आहे. कर्जाची सहज उपलब्धता आणि जीएसटी सुधारणांमुळे मिळालेला आर्थिक दिलासा याचा ग्राहकांच्या खर्च, बचत आणि आर्थिक नियोजनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
21 Aug 2026 04:30 PM (IST)
शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठा, पक्षांतर आणि गद्दारीच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते निलेश राणे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. शिंदे गटात प्रवेश नाकारताना ‘गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको’ अशी भूमिका घेतल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार टीका केली.
21 Aug 2026 04:20 PM (IST)
भारताच्या बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली (Treesa Jolly) आणि गायत्री गोपीचंद ( Gayatri Gopichand ) यांनी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप (BWF World Championships 2026) स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिना येथे झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी चिनी जोडी जिया यिफान आणि झांग शू जियान यांचा पराभव केला. या प्रभावी विजयासह, त्यांनी भारतासाठी किमान एक कांस्य पदक निश्चित करून इतिहास रचला आहे.
21 Aug 2026 04:10 PM (IST)
वी मुंबईतील डी. वाय. पाटील परिसरात आयोजित ‘कॅम्पस कनेक्ट’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौरा उद्या म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता असून नवी मुंबईत चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. या हाय-प्रोफाइल व्हीआयपी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व डान्स बार, लेडीज बार आणि नाईट क्लब बंद ठेवण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत. कोणत्याही अधिकृत परिपत्रकाशिवाय किंवा कायदेशीर नोटीसशिवाय हे निर्बंध लादल्याने हॉटेल व नाईटलाईफ व्यवसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
21 Aug 2026 03:50 PM (IST)
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
गणेशोत्सवासाठी एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातून दिलासा
अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आदेश
21 Aug 2026 03:40 PM (IST)
India Vs Sri Lanka 2st Test Match Updates: २३ ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. हा सामना कोलंबोत होणार आहे. हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलंबोत दाखल झाला आहे. या ठिकाणी भारतीय संघाचे शानदार स्वागत करण्यात आले आहे. पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून सिरिज नावावर करण्याचे लक्ष्य भारताचे असणार आहे.
21 Aug 2026 03:25 PM (IST)
वाशिममध्ये गुळाच्या दरातही वाढगूळही 75 रुपयांवर पोहोचलासणासुदीच्या तोंडावर गुळाच्या दरातही मोठी वाढ वीस दिवसांत गुळाच्या दरात किलोमागे 25 रुपयांची वाढ
21 Aug 2026 03:15 PM (IST)
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दलची चिंता सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा वाढू शकते. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. २० ऑगस्ट रोजी, ब्रेंट क्रूड ऑइल २.४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९३.७८ डॉलरवर पोहोचले, जी २४ जुलैनंतरची सर्वोच्च पातळी आहे. यूएस डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किमतीतही जवळपास २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
21 Aug 2026 03:01 PM (IST)
मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनाने लेबनॉनमधील हिजबुल्लाह या सशस्त्र संघटनेविरुद्ध एक अत्यंत मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या (America) ट्रेझरी विभागाने (US Department of the Treasury) हिजबुल्लाहच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी आणि रोख रकमेच्या हस्तांतरणाशी जोडलेल्या १० प्रमुख व्यक्तींवर कठोर आर्थिक निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. या नव्या पावलामुळे हिजबुल्लाहची जागतिक स्तरावरील आर्थिक नाकेबंदी अधिक घट्ट झाली असून, मध्य-पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींना एक नवे वळण मिळाले आहे.
21 Aug 2026 03:00 PM (IST)
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आता अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गुरुवारपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवसाच्या तपासणीत व्यवहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरात १२६८ चालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. मराठी न येणाऱ्या चालकांना सुधारणेसाठी एक महिन्याची संधी देण्यात आली आहे.
21 Aug 2026 02:55 PM (IST)
टाटा मोटर्स १ सप्टेंबर २०२६ पासून भारतातील आपल्या सर्व गाड्यांच्या एक्स-शोरूम किंमतीत २५,००० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या गाड्यांच्या सेगमेंटमध्ये हा दरबदल लागू होईल. वाढत्या इनपुट उत्पादन खर्चामुळे आणि महागाईच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, खर्चातील काही भाग कंपनी स्वतः सहन करणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
21 Aug 2026 02:50 PM (IST)
चंद्रपूर: ग्रामीण भागातील पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘बोडी’ आता काळाच्या ओघात हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी जिल्ह्यातील बहुतांश धान उत्पादक शेतांमध्ये मोठ्या तुकड्याच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठविण्यासाठी बोडी असायची. तलावापेक्षा आकाराने लहान असलेल्या या पाणीसाठ्याला ग्रामीण भागात ‘बोडी’ म्हणून ओळखले जात होते. मात्र आधुनिक शेती, वाढती लागवडीची गरज आणि बदलत्या शेतीपद्धतीमुळे अनेक बोड्या बुजवून त्या ठिकाणी शेती केली जात आहे. परिणामी पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारच कमी होत चालला आहे.
21 Aug 2026 02:45 PM (IST)
लडाखमधील मिनिमार्ग चेकपोस्टवर एका महिलेने लष्करी अधिकाऱ्यांसोबत राडा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा तपासणीमुळे झालेल्या जवळपास पाच तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक तास प्रतिक्षा केल्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांची निराशा राैद्र रुपात बाहेर पडली. याचवेळी एका महिलेने या घटनेसाठी भारतीय सेनेच्या लष्करी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आणि त्यांना खरीखोटी ऐकवायला सुरुवात केली. महिलेचे तीव्र बोल तिच्या रागाचे प्रतीक करत होते देशाच्या संरक्षणकर्त्यांवर हा राग बाहेर काढणे चुकीचे आहे असे मानत यूजर्सने तिच्यावर टिका व्यक्त करायला सुरुवात केली. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे आणि याचा व्हिडिओ वेगेवगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर शेअर केला जात आहे.
If Army had closed the road, they must have had a reason. Instead of understanding the situation, she is shouting at the armed forces.
She said, these people lock Kashmiris and now doing the same with us tourists. I hope she gets a little famous and regret this moment.
These…
— Incognito (@Incognito_qfs) August 19, 2026
credit - social media and Twitter
21 Aug 2026 02:40 PM (IST)
India Vs Sri Lanka 2st Test Match Updates: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू आहे. त्यातील दुसरा सामना २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कोलंबो येथील स्टेडियमवर हा सामना होणार असून, भारतीय संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. पहिला सामना कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकला आहे. भारताने या सिरिजमध्ये १-० आघाडी घेतली आहे. तर कोलंबोची खेळपट्टी कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
पहिला सामना भारताने १६५ रन्सने श्रीलंकेविरुद्ध जिंकला आहे. दुसरा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. कोलंबोचे पीच कसे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्पिनर्ससाठी अनुकूल पीच तयार केले गेले तर ते श्रीलंकेच्या संघासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. गॉल टेस्ट प्रमाणे या ठिकाणचे पीच देखील संतुलित तयार केले जाण्याची शक्यता आहे.
21 Aug 2026 02:35 PM (IST)
Maharashtra SSC Application Form: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापासूनच बोर्ड परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती वेळेत जमा करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. या परीक्षेला नियमित विद्यार्थ्यांसोबतच पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी, खासगी पद्धतीने नोंदणी केलेले विद्यार्थी, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणारे तसेच काही निवडक विषयांसह परीक्षेला बसणारे विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. म्हणजेच दहावीची परीक्षा देणाऱ्या विविध गटांसाठी ही प्रक्रिया लागू आहे.
21 Aug 2026 02:30 PM (IST)
माथेरान: गेल्या १० दिवसांपासून धरणातील गाळ बाहेर काढण्याऐवजी तो धरणामधील नाल्यांमध्ये सोडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा गाळ नाल्यांमधून वाहत जाऊन माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये पसरत असल्याने स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. धरणातील गाळाचा योग्य प्रकारे पुनर्वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
21 Aug 2026 02:25 PM (IST)
वणी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील गोळशी शिवारात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका २९ वर्षीय सोमवार (दि. १७) तरुणाचा हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
21 Aug 2026 02:20 PM (IST)
नायजेरियाच्या (Nigeria) वायव्य भागातील सोकोटो राज्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या पोटापाण्याच्या आणि शेतीच्या कामासाठी निघालेल्या मजुरांवर काळाने अचानक घाला घातला. नदीतून प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट अचानक अनियंत्रित होऊन पात्रात उलटली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत किमान ४७ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण सोकोटो राज्यासह गोराऊ शहरावर शोककळा पसरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
21 Aug 2026 02:15 PM (IST)
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : पालिकेची शुक्रवार (21 ऑगस्ट 2026) आज रोजी असलेली महासभा आंदोलनाने गाजली. काही दिवसांपूर्वी भाजपाचे सभागृह नेते सागर नाईक यांच्याकडे असलेल्या मर्सिडीज वाहनावरून शिवसेनेने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तुर्भे येथील कचरा प्रकल्पाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले आहे. त्या कंत्राटदारांच्या नावावर सभागृह नेते सागर नाईक वापरत असलेली मर्सिडीज गाडी रजिस्टर आहे. मुख्य म्हणजे गाडी रजिस्टर झाल्यावर दुसऱ्याच दिवशी संबंधित कंत्राटदारासोबत पालिकेने एग्रिमेंट केल्याचा आरोप शिवसेनेने (Shiv Sena Protest) केला आहे. या निषेधार्थ शिवसेनेचे सर्व ४२ नगरसेवक शुक्रवारी पालिकेत निषेधाचे जॅकेट घालून आले होते. यावर कचरा शेठचा निःशेष असो, मर्सिडीज द्या, टेंडर घ्या अशी टीका करणारी वाक्ये यावर लिहिली होती.
21 Aug 2026 02:10 PM (IST)
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी iQOO ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO Z11 या नावाने सादर करण्यात आला आहे. हे नवीन हँडसेट कंपनीच्या Z सीरीजमधील एक नवीन मॉडेल म्हणून सादर करण्यात आले आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.
21 Aug 2026 01:54 PM (IST)
कॉकरोच जनता पार्टीच्या २० जुलै 2026 रोजी झालेल्या संसद मार्ग मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चा वापर करण्यात आला होता, या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमीही झाला होता. या विद्यार्थी मोर्चात विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यत आपण इथून जाणार नाही, असा इशाराच राहुल गांधी यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पॅलेट गन हल्ल्यातील जखमी तरुणदेखील असल्याचे दिसत आहे.
21 Aug 2026 01:40 PM (IST)
Jacob Martin: १९९९ ते २००१ दरम्यान भारतासाठी १० एकदिवसीय सामने खेळलेले माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांची २२ वर्षांनंतर एका फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. वडोदरा येथील ५४ वर्षीय फलंदाजाची पटियाला हाऊस न्यायालयाने सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली. हा खटला २००४ मध्ये दाखल झालेल्या एफआयआरमधून उद्भवला होता.
21 Aug 2026 01:30 PM (IST)
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ आपल्या दमदार कथानकामुळे सातत्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अंडरकव्हर कॉप म्हणून तारिणीने आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करत सत्य समोर आणलं आहे. आता तिच्यासमोर देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी आणि धोकादायक जबाबदारी येणार आहे
देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या भावना, वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका गुप्त मोहिमेवर निघालेली ‘तारिणी’ आता अमृतसरमध्ये पोहोचली आहे. झी मराठीवरील या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ‘तारिणी’ची प्रमुख भूमिका साकारत असून, तिच्या आगामी मिशनमध्ये थरार आणि देशभक्तीची सांगड पाहायला मिळणार आहे.
21 Aug 2026 01:20 PM (IST)
अमेरिकेतील (America) अलास्का प्रांतातील अत्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारा विमान अपघात घडला आहे. अँकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Ted Stevens Anchorage International Airport) उड्डाण केलेले दोन इंजिन असलेले सेसना ४४१ (Cessna 441) हे चार्टर विमान लष्करी रडार साइटवर लँडिंगच्या तयारीत असताना अचानक कोसळले. या भीषण अपघातात विमानातील दोन अनुभवी वैमानिक आणि ६ प्रवाशांसह सर्व ८ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमेरिकन लष्कराच्या ‘अलास्कन कमांड’ने (Alaskan Command) या दुर्दैवी घटनेची आणि सर्व प्रवाशांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे.
21 Aug 2026 01:10 PM (IST)
लिव्ह-इन सज्ञान रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले नाते हे विवाहाच्या समकक्ष आहे. पालक, नातेवाईक किंवा मित्र त्यांच्या निवडींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत किंवा त्यांच्या जीवाला किंवा स्वातंत्र्याला धोका निर्माण करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने कुटुंबाकडून धमक्यांना सामोरे जाणाऱ्या एका लिव्ह-इन जोडप्याला पोलिस संरक्षणही दिले. न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी जोडप्याच्या याचिकेवर हा आदेश दिला. याचिकाकर्ते, जे दोघेही ३० वषपिक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी न्यायालयाला सांगितले की ते काही काळापासून एकत्र राहत आहेत आणि एकमेकांशी लग्न करण्याचा त्यांचा मानस आहे. न्यायालयाला सांगण्यात आले की, मुलीचे वडील आणि भाऊ या नात्यामुळे नाखूश होते आणि त्यांना सतत
21 Aug 2026 01:02 PM (IST)
एका तेरा वर्षीय मतीमंद भोळसर चिमुकलीवर गावातील चार जणांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. अल्पवयीन चिमुकलीचे कुटुंबीय घरी नसताना चिमुकलीच्या मतीमंदपणाचा गैरफायदा घेत तिला बिस्किटे व पन्नास रुपये देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांकडून दुचाकीवर बसून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. यापूर्वी देखील एका आरोपीने अशाच प्रकारे बिस्किट देऊन चिमुकलीच्या मंतीमंदपणाचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. हे चारही नराधम आरोपी त्याच गावातील रहिवासी आहेत. ही घटना समोर आल्यानंतर सुन्न झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार नराधमापैकी तिघा जणांना पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत. चौथ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
21 Aug 2026 12:50 PM (IST)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) बुधवारी, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली विमानतळावर दोन भारतीय प्रवाशांकडून ६८.५३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्यानंतर, पुढील कार्यवाहीसाठी ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. हे प्रवासी इंडिगोच्या विमानाने गुवाहाटीला जाणार होते आणि त्यानंतर ते आगरतळाला जाणार होते. वर्तणुकीचे निरीक्षण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून सीआयएसएफ (CISF) जवानांनी ही बाब ओळखून कारवाई केली आहे.
21 Aug 2026 12:40 PM (IST)
व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यावरून तसेच जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाचा विद्या महाविद्यालयाच्या टेकडीवर दोन अल्पवयीन मुलांनी लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नील नाईक (वय १४, रा. श्रावनाधारा, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून, बुधवारी सकाळी मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
21 Aug 2026 12:30 PM (IST)
पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत असताना दुसरीकडे दुध खरेदीच्या लाईनप्रमाणे गांजाची लाईन लावून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने उघडकीस आणला आहे. या किरकोळ विक्रेत्याला पकडल्यानंतर त्याचा म्होरक्याला देखील पथकाने अटक करून तब्बल २ किलो गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, यांच्याकडून गांजा खरेदी करणारे अन् पिणाऱ्या ४० जणांना पकडून त्यांचे समुपदेशन देखील केले आहे. या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडवली आहे. अजु अहमद शेख (वय ३९, रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे (वय २९, रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचा आणखी एक साथीदार पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 Aug 2026 12:21 PM (IST)
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 Aug 2026 11:45 AM (IST)
ठाणे आणि मिरा भाईंदरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेच्या कामाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार आता ही संपूर्ण ९.६७६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उन्नत स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ८,५३५ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
21 Aug 2026 11:35 AM (IST)
अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बेकायदा ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणांवर धडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून महामार्गालगतच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण व माहिती संकलन सुरू करण्यात आले आहे.
21 Aug 2026 11:30 AM (IST)
आंबेगावमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देवयानी पारधी यांनी पोषण आहाराच्या कच्च्या मालाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला होता.
21 Aug 2026 11:25 AM (IST)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापक समितीची 2026-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत 21 नोव्हेंबरला संपणार असून, जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागवले आहेत. त्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा संचालक होता येणार नाही, असा रिझर्व्ह बँकेचा नियम होता. मात्र, इतर जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्ये या नियम लागू झाला नाही.
21 Aug 2026 11:20 AM (IST)
भंडारा येथील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी, जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या असता तिथेही अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचा मध्यान्ह भोजनाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला. हा आहार शिजवण्यासाठी जे मसालायुक्त किंवा अन्य साहित्याचा जो पुरवठा करण्यात आला आहे, ते कालबाह्य झालेली आढळली.
21 Aug 2026 11:10 AM (IST)
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी याचिका सुनावणीच्या अनुक्रमांकापर्यंत पोहोचू शकली नव्हती
21 Aug 2026 11:05 AM (IST)
तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर बुधवारी सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५) यांच्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. त्याचवेळी हा प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचले. त्यामुळे नंदिनी यांचा जीव वाचला.
21 Aug 2026 10:59 AM (IST)
जेव्हा क्रिकेट विश्वात एखादा बाल-प्रतिभा उदयास येतो, तेव्हा अपेक्षा आणि चिंता यांचा काळ एकाच वेळी सुरू होतो. जेव्हा भारताचा १५ वर्षीय युवा खेळाडू, Vaibhav Sooryavanshi, प्रकाशझोतात आला, तेव्हा १९९६ मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार अर्जुन रणतुंगाचे लक्ष त्याच्यावर गेले. स्वतः किशोरवयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेल्या रणतुंगाकडे वैभवबद्दल एक अत्यंत गंभीर आणि विचारपूर्वक संदेश आहे. त्यांचा स्पष्ट विश्वास आहे की, या १५ वर्षीय मुलावर दबाव टाकण्याऐवजी त्याला त्याचा नैसर्गिक खेळ मुक्तपणे खेळू दिला पाहिजे.
21 Aug 2026 10:50 AM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘द ट्रेटर्स २’मधील स्पर्धक श्वेता तिवारीने सोशल मीडियावर महिलांविरोधात वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद भाषेविरोधात आवाज उठवला आहे. महिलांना वैयक्तिकरित्या ओळखत नसतानाही त्यांच्याबद्दल अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स करण्याचा अधिकार युझर्सना कोणी दिला, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. यासोबतच श्वेताने स्वतःला अभिमानाने ‘मराठी माणूस’ म्हणवणाऱ्या ट्रोलर्सनाही सुनावलं आहे.
21 Aug 2026 10:40 AM (IST)
कॉकरोच जनता पार्टीच्या स्कूल ठिक करो अभियानादरम्यान लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमधील महापालिकेच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांना या शाळेत आणून बसवण्यात आल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरदेखील शेअर केला आहे
21 Aug 2026 10:30 AM (IST)
तेलंगणातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका कल्लू रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणात दहावीतील 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रूपा रेड्डी या कोंडा मल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका होत्या. १२ ऑगस्टला सकाळी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर चाकूने २७ वार करण्यात आले होते.
21 Aug 2026 10:20 AM (IST)
प्राइम व्हिडीओचा रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स 2’ सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये ट्रेटर्स आणि इनोसेंट्स यांच्यातील खेळ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. करण जोहर होस्ट करत असलेल्या या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
21 Aug 2026 10:10 AM (IST)
‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋचा गायकवाड सध्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ऋचाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातही एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऋचा गायकवाड हिचा प्रथमेशसोबत थाटात साखरपुडा पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचे व्हिडिओ फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
21 Aug 2026 09:58 AM (IST)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्स प्रमुख, चंदन तापारिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया), ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि इटरनल शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार हिंदुस्तान एरोनॉटिक्स, रेलटेल कॉर्प, टाटा मोटर्स प्रवासी वाहने, केफिन टेक्नॉलॉजीज, लेमन ट्री हॉटेल, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अमागी मीडिया लॅब्स, निवा बुपा आरोग्य विमा, सात्विक ग्रीन एनर्जी या शेअर्सवर फोकस करू शकतात.
21 Aug 2026 09:48 AM (IST)
भारतात 21 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,928 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,601 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,947 रुपये आहे. भारतात 21 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,010 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,59,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,470 रुपये आहे. भारतात 21 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 255.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,55,100 रुपये आहे.






