Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 21.11.2026
Maharashtra to World Breaking News :
जपानमध्ये संपन्न झालेल्या आशियाई खेळ २०२६ च्या अंतिम तक्त्यात भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदके जिंकून चौथे स्थान पटकावले.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘सत्याग्रह’ नावाचे नवीन डिजिटल व्यासपीठ सुरू केले.
राज्यात मान्सूनने बहुतांश भागांतून माघार घेतली असली तरी मुंबई, ठाणे आणि कोकणातील किनारपट्टीच्या भागांत उकाडा वाढल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जीएसटी (GST) कायद्यांतर्गत किरकोळ कर गुन्ह्यांसाठी होणाऱ्या थेट अटकेचे अधिकार शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असून ७ ऑक्टोबरच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मध्य-पूर्वेतील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तिसरी विमानवाहू युद्धनौका तैनात करण्याची घोषणा केली असून इराणी संसदेच्या वक्तव्यानुसार होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.नागपुरात एनसीबीने (NCB) मोठी कारवाई करत ५०० किलो गांजा जप्त केला असून आंतरराज्यीय तस्करी टोळीतील ३ जणांना अटक केली आहे.
05 Oct 2026 05:59 PM (IST)
भारतीय संघाचा स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. दरम्यान, भुवनेश्वरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमारची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली भारत ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. कृणाल पांड्या आणि नितीश राणा यांसारख्या आयपीएलच्या मोठ्या खेळाडूंना ७ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
05 Oct 2026 05:45 PM (IST)
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगू लागली आहे. विविध राजकीय पक्ष आणि गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. संगमनेर तालुक्यातून तीन, तर शेवगावमधून एक उमेदवार मैदानात उतरवण्यात आल्याने जिल्हा बँकेतील राजकीय चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.
05 Oct 2026 05:30 PM (IST)
नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यूवरून मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर बाळ मृत अवस्थेत जन्मल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
05 Oct 2026 05:15 PM (IST)
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. आंदोलनस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा मागण्या मेनी होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे विद्यार्थी आंदोलकांचे म्हणणे आहे, अश्यातच आता या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
05 Oct 2026 04:57 PM (IST)
ऊस दराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करू नये. अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘काटा बंद’ आंदोलन छेडून जिल्ह्यातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. अजिंक्यतारा कारखान्याला भेट देऊन त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 04:47 PM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका २-१ ने जिंकली. परंतु, भारताने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजने तिसरा सामना जिंकला. एकदिवसीय मालिका संपली असली तरी, दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने भारत आणि वेस्ट इंडिजवर मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटमुळे कठोर शिक्षा झाली आहे. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 04:37 PM (IST)
“आयुष्यात कधीच वाटले नव्हते की, दादा नसताना मला अशा सभा घ्याव्या लागतील. दादांनी आयुष्यभर आपल्या सर्व सहकाऱ्यांवर प्रेम केले. त्यामुळे यावेळी जुने सहकारी दादांच्या कुटुंबाची आणि विशेषतः वहिनींची परिस्थिती समजून घेतील, अशी अपेक्षा होती,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी नाझरे सुपे येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत केले. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 04:27 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. माध्यमांतील वृत्तांच्या आधारे निलंबनाचे आदेश देता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. एसआयआरसंबंधी इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या संमतीशिवाय एसआयआर (SIR) संबंधित सुमारे १४ निर्णय घेतल्याचा आरोपाप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 04:17 PM (IST)
मध्य पूर्वेतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या येमेनमध्ये राजकीय आणि लष्करी घडामोडींना अचानक वेग आला आहे. येमेनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अध्यक्ष रशाद मोहम्मद अल-अलिमी यांनी हुथी विद्रोही (Yemen Houthi war) गटांच्या तावडीतून देशाचे उर्वरित भाग पूर्णपणे मुक्त करण्यासाठी एका व्यापक लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. देश सध्या आपल्या इतिहासातील अत्यंत नाजूक आणि निर्णायक टप्प्यावर उभा असल्याचे स्पष्ट करत अध्यक्षांनी थेट सैन्याला रणनीतिक आदेश दिले आहेत. दीर्घकाळ शांततेचा मार्ग अवलंबून देशाने मोठे बलिदान दिले, मात्र आता नागरिकांचे मूलभूत हक्क, सुरक्षा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी ही लष्करी कारवाई अनिवार्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 04:09 PM (IST)
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे २० वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणाची केरळ सरकारने पुन्हा चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. २००६ मध्ये ज्ञानेश कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) सचिव असताना एका रस्ते प्रकल्पाशी संबंधित अनियमितता आणि लाच मागितल्याच्या आरोपांशी हे प्रकरण जोडले गेले होते. मलेशियन अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेली दक्षता चौकशी आता पुन्हा उघडण्यात आली आहे. हे सर्व आरोप असून नव्या चौकशीत त्यांची सत्यता तपासली जाणार आहे. वाचा सविस्तर...
05 Oct 2026 03:59 PM (IST)
Delhi Riots 2020: ईशान्य दिल्ली 2020 मधील दंगल आणि 2019 मधील जामिया हिंसाचारासंदर्भातील विविध याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या घटनांची स्वतंत्र किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच भडकाऊ भाषणे करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात FIR नोंदवण्याची आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही न्यायालयाने स्वीकारलेली नाही.
05 Oct 2026 03:50 PM (IST)
CJP Leaders Claim Arrest Plan : राज्यासह देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)ची जोरदार चर्चा सुरू आहे. नीट परिक्षा फुटीप्रकरणात धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. असे असतानाच सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
05 Oct 2026 03:40 PM (IST)
Hardik Pandya: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघाने आपल्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल केला आहे. फिटनेसच्या अटीवर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु नवीन दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे पांड्याला मालिकेतून वगळण्यात आले आहे. आता, त्याच्या जागी एका युवा अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ६ ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.
05 Oct 2026 03:35 PM (IST)
मुंबई : ठाकरे बंधूंच्या कालच्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना ‘गजनी’ अशी उपमा दिली होती. फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या अखेरच्या काळाचा दाखला देत, “ब्रिटिशांचा मेंदू हलला होता, तसाच भाजपचा मेंदू हलला आहे,” अशी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील मोर्चाला लाखो लोक उपस्थित होते, असा दावा राऊत यांनी केला आहे. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
05 Oct 2026 03:25 PM (IST)
Asian Games 2026: जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन गेम्स 2026 मध्ये आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय तिरंगा फडकवून देश आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे सोमवारी साताऱ्यात अत्यंत धुमधडाक्यात आणि भव्य दिव्य स्वागत करण्यात आले आहे. या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सातारा शहरात मोठी तयारी आणि लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
05 Oct 2026 03:10 PM (IST)
Sanjay Dutt Statement: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ‘शेखर टुनाइट’ या कार्यक्रमात संजय दत्तने “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही” असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि त्यावरून वादही निर्माण झाला. आता संजय दत्तने या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
05 Oct 2026 03:04 PM (IST)
Supreme Court: दिल्ली-NCRमध्ये अलीकडे समोर आलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या घटनांची यापूर्वीच स्वतःहून दखल घेतली होती.
05 Oct 2026 02:59 PM (IST)
पुणे पदवीधरमतदासंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भैय्या माने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगलीच्या हर्षदा जाधव-देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना मोठा द्विस्ट आला आहे. भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.
05 Oct 2026 02:50 PM (IST)
प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी पप्प्या शिंदे याची पोलीस कोठडी संपत आहे. त्याला आज दुपारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहेत.
05 Oct 2026 02:41 PM (IST)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार मैदानात उतरले आहेत. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, नाझरे कप, नाझरे सुपे, जवळार्जुन, राख, गुळंचे, निरा, पिंपरे खुर्द, वाल्हे आणि जेजुरी मध्ये ते सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
05 Oct 2026 02:30 PM (IST)
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मेरठमध्ये नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एकत्र पाहिल्यानंतर बायकोने असा काही राडा केला की बघणारे सगळेच हादरून गेले. बायको कारच्या बोनेटवर लटकली आणि नवरा तरीही कार पळवत राहिला. या सगळ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.सविस्तर वाचा सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:20 PM (IST)
वाईच्या पश्चिम भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जललक्ष्मी सिंचन योजनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली गळती यंदा तरी थांबणार का, असा सवाल स्वप्निल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. योजनेच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी लागलेली गळती, नादुरुस्त व्हॉल्व्ह आणि वेळेवर न होणारी दुरुस्ती यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाचा फटका पश्चिम भागातील शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:15 PM (IST)
मालाड पूर्व परिसरात अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:10 PM (IST)
शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि पवित्र सणांपैकी एक आहे. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि भक्त उपवास, प्रार्थना, आरती आणि कन्या पूजन यांसारखे धार्मिक विधी करतात. असे मानले जाते की नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा केल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो आणि देवीचा आशीर्वाद लाभतो. म्हणूनच या काळात केल्या जाणाऱ्या अनेक शुभ कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते.सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:05 PM (IST)
सिरोंचा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नेमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गंभीर अवस्था समोर आली आहे. शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने जुलै महिन्यापासून इयत्ता पहिली ते चौथीतील चिमुकल्यांना चक्क झाडाखाली बसवून शिकविले जात आहे. पावसाळा, ऊन आणि बदलत्या हवामानाचा सामना करीत खुल्या मैदानात विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:00 PM (IST)
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघाने आपल्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल केला आहे. फिटनेसच्या अटीवर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु नवीन दुखापतीमुळे त्रस्त असल्यामुळे पांड्याला मालिकेतून वगळण्यात आले आहे.सविस्तर वाचा
05 Oct 2026 02:00 PM (IST)
महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे ही केवळ अपेक्षा नसून सामाजिक जबाबदारी आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये. ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
05 Oct 2026 01:55 PM (IST)
बंगळुरू सारख्या शहरात नोकरी करणं म्हणजे वाटते तरी सोप्पी गोष्ट नाहीये. तिथे जगणं तितकचं महाग आहे. महिन्याच्या एक तारखेला पगार जमा होतो आणि एक-दोन आठवड्यात खिसा रिकामा होतो. पैसे कुठे जातात हे समजत नाही. असाच काहीसा अनुभव बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षाच्या मुलीला आला. तिने सप्टेंबर महिन्यात किती खर्च केला आणि याचा पूर्ण हिशोब इंस्टाग्रामवर टाकला. ते पाहून लोकांचे पांढरे झाले आहेत. एका महिन्यात तिने 63 हजार रुपये खर्च केले आहेत.
05 Oct 2026 01:50 PM (IST)
टेक कंपनी विवोने त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y600k Turbo लाँच केला आहे. खरं तर विवोने अलीकडेच त्यांच्या Y600-सीरीजचे Y600i हे नवीन डिव्हाईस सादर केले होते. त्यानंतर आता कंपनीने या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Y600 Turbo चे नवीन वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. चला तर मग या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सवर नजर टाकूया.
05 Oct 2026 01:45 PM (IST)
ईशान्य दिल्ली 2020 मधील दंगल आणि 2019 मधील जामिया हिंसाचारासंदर्भातील विविध याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या घटनांची स्वतंत्र किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच भडकाऊ भाषणे करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात FIR नोंदवण्याची आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही न्यायालयाने स्वीकारलेली नाही.
05 Oct 2026 01:35 PM (IST)
मराठी सिनेसृष्टीत ‘भूतम भय्यम’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दंतकथेच्या जगाभोवती उलगडणाऱ्या या सिनेमात मित्रांचा एक ग्रुप एका गूढ नाण्याच्या रहस्यात अडकतो. या वेगळ्या संकल्पनेला पडद्यावर साकारण्यासाठी संपूर्ण टीमने जवळपास दोन वर्षं मेहनत घेतली. विशेष म्हणजे कलाकारांच्या कास्टिंगपासून ते वर्कशॉप, व्हिज्युअल लँग्वेज आणि बॅकग्राउंड म्युझिकपर्यंत अनेक गोष्टींवर दिग्दर्शक आणि टीमने सुरुवातीपासूनच बारकाईने काम केलं.
05 Oct 2026 01:30 PM (IST)
ठाकरे बंधूंच्या कालच्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना ‘गजनी’ अशी उपमा दिली होती. फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या अखेरच्या काळाचा दाखला देत, “ब्रिटिशांचा मेंदू हलला होता, तसाच भाजपचा मेंदू हलला आहे,” अशी टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील मोर्चाला लाखो लोक उपस्थित होते, असा दावा राऊत यांनी केला आहे.
05 Oct 2026 01:25 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्म’वर अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे संशयास्पद चित्रीकरण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याची तीव्र शंका व्यक्त करीत आमदार खडसे यांनी जळगावचे पोलिस उपअधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
05 Oct 2026 01:20 PM (IST)
जागतिक स्तरावर विविध साथीच्या रोगांची भीती अजूनही ताजी असतानाच आता रशियातून एका मोठ्या आरोग्यविषयक चिंतेची बातमी समोर येत आहे. रशियाच्या (Russia Plague Scare) सायबेरियन प्रदेशातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एका प्लेग-विरोधी संशोधन संस्थेत कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात आणि वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर न्यूमोनिक प्लेग किंवा इतर एखाद्या अत्यंत धोकादायक संसर्गाची लागण झाली असावी अशी तीव्र शंका व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलत सुमारे २०० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात (Quarantine) ठेवले आहे.
05 Oct 2026 01:15 PM (IST)
भातशेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यावर आता दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. १५ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी कमी झाले असून भातपीक संकटात सापडले आहे. अनेक ठिकाणी अद्याप भाताचे कोंब बाहेर आलेले नसल्याने पीक हातात येईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
05 Oct 2026 01:05 PM (IST)
राज्यासह देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)ची जोरदार चर्चा सुरू आहे. नीट परिक्षा फुटीप्रकरणात धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. असे असतानाच सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
05 Oct 2026 12:48 PM (IST)
भवानी पेठ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेपर ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. आकाश उर्फ अक्या विठ्ठल पाटोळे (वय २९, रा. काशेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत मृत आकाश याच्या वहिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
05 Oct 2026 12:36 PM (IST)
वर्क फ्रॉम होम जॉबच्या नावाखाली सुरुवातीला किरकोळ परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर नवीन कुमार कुष्णप्पा यांची ४ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर लिंक पाठवून अकाऊंट तयार करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला परतावा दिल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांत रक्कम वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. १७ ते १९ जुलैदरम्यान हा प्रकार घडला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.
05 Oct 2026 12:24 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून एसआयआरमध्ये नाव जुळत नसल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ९ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वडगाव खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून, ते वडगाव खुर्द येथे राहतात. १५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्वारे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या नावाने मेसेज पाठविला. तक्रारदारांच्या वडिलांचे नाव एसआयआरमध्ये जुळत नसल्याचे सांगून त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर बँक खात्याचा तपशील घेऊन पैसे वर्ग करण्यास सांगण्यात आले. तसेच मेसेज आणि ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून ९ लाख ९२ हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.
05 Oct 2026 12:12 PM (IST)
सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर टीका झाल्यानंतर त्यांना आक्रमक भाषेत उत्तर देणारा नेता म्हणून ओळखला जाणारा, ठाकरेंच्या शिवसेनेचा उपनेता शरद विठ्ठल कोळी (वय ३७ . अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे. शरद कोळी याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक आणि इतर विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या 'एमपीडीए' (MPDA) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार शरद कोळीला एका वर्षाकरिता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
05 Oct 2026 11:50 AM (IST)
दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानात हवेतच एक अत्यंत भयानक आणि थरारक घटना घडली आहे. इटालियन वृत्तपत्र ‘कॉरिअर डेला सेरा’च्या एका विशेष अहवालानुसार आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, विमानाचा २९ वर्षीय ओमानी सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी (Hamam al-Hammami) याने विमान तेल अवीवमधील उंच इमारतींवर आदळवून ९/११ सारखा भीषण दहशतवादी अपघात घडवून आणण्याचा कट रचला होता. मात्र, विमानाचे भारतीय मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर (Captain Smit Machchhar) यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा प्रयत्न उधळून लावला आणि विमानावरील १७४ प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले
05 Oct 2026 11:40 AM (IST)
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील शास्त्री रस्त्यावरील MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यावेळी धनंजय मुंडेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या असल्याचं सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल, असा घरचा आहेर सरकारला धनंजय मुंडेंनी दिला आहे.
05 Oct 2026 11:35 AM (IST)
मुंबईतील शिवाजी पार्क येथे 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि इतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जेल भरो आंदोलन पुकारले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून पात्र मतदारांची नावे यादीतून हटवली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे.
05 Oct 2026 11:25 AM (IST)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. या हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच आता पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. हत्याकांडात चर्चेत आलेल्या ‘टल्ली’ची ओळख पोलिसांनी पटवली असून, त्याचे नाव संतोष कनोजिया उर्फ टल्ली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागून तो जखमी झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे. हा जखमी मारेकरी टल्लीच असण्याची शक्यताही तपासात व्यक्त केली जात आहे.
05 Oct 2026 11:20 AM (IST)
मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार ऑनस्क्रीन जोडीदार असण्यासोबतच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जवळचे मित्र असतात. अभिनेत्री अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली यांची मैत्रीही अशीच आहे. तिघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी असून अनेकदा त्यांचं बॉन्डिंग सोशल मीडियावर पाहायला मिळतं. सध्या या तिघींनीही कामाच्या धावपळीतून ब्रेक घेतला असून त्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
05 Oct 2026 11:10 AM (IST)
आपली भारतीय संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात न राहता जगभरात पसरली आहे. आपले योग, आयुर्वेद, श्लोक आणि प्रार्थना परदेशातल्या लोकांना पण खूप आवडायला लागल्या. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून सगळे व्हिडिओ पाहून थक्क झाले. एक गोरा विदेशी तरुण अगदी एखाद्या भारतीयांला लाजवेल असे स्पष्ट शब्दात त्याने संपूर्ण हनुमान चालीसा म्हणतोय. ते सुद्धा ते अडखळता, आणि पाठातंर केलेले आहे
05 Oct 2026 11:08 AM (IST)
मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनात काही हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी भाषणं सुरु असताना या तरुणांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
05 Oct 2026 11:05 AM (IST)
मानवी समाजाच्या प्रगतीचा आणि संस्कृतीच्या विकासाचा पाया जर कोणी रचला असेल, तर तो म्हणजे शिक्षक. एका लहान बालकाला ज्ञानाचे धडे देण्यापासून ते त्याला एक जबाबदार, सुसंस्कृत आणि संवेदनशील नागरिक बनवण्यापर्यंतचा प्रवास शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण होतो. शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवतात, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देतात आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करतात.
05 Oct 2026 10:56 AM (IST)
टीव्हीवरील लोकप्रिय आणि थरारक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15’चा ग्रँड फिनाले रविवारी 4 ऑक्टोबरला पार पडला. संपूर्ण सीझनमध्ये एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करत स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अखेर अभिनेता अविनाश मिश्रा याने आपल्या धाडसी कामगिरीच्या जोरावर या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
05 Oct 2026 10:46 AM (IST)
स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांच्या एस-सीरीजअंतर्गत आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo S60t हा कंपनीचा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये विवोच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर जाणून घेऊया.






