निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून 'इंडिया' (INDIA) आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. कॅनेडियन लेखिका अन्ना कार्सन (Anne Carson) यांना २०२६ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा थेट आढावा घेण्यासाठी केंद्रीय केंद्रीय पथक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पोहोचले आहे. पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून न्यायालयाने रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी परिसर खाली करण्याचे आवाहन केले आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस २ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मेट्रो मार्गावरील आणखी पाच स्थानकांना रेल्वे मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एकूण २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या राजकीय वादाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीत उमटू लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत शिवसेना पदाधिकारी कमलेश निकम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी केल्याने दोन्ही पक्षांमधील शाब्दिक संघर्ष तीव्र झाला आहे. लांडगे यांच्या विधानानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या वादाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षांतराचे ‘घटनात्मक पाप’ केल्याचा आरोप असलेल्या लोकांनाही पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित भावना आणि अधिकार लागू व्हावेत का, असा सवाल न्यायालयाने तोंडी निरीक्षणादरम्यान उपस्थित केला.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh ) आणि सहआरोपी विनोद तोमर यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे. या फौजदारी अपिलावर शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता २८ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर...
शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचा 23 हफ्ते वितरित झाले आहेत. आता शेतकरी 24 व्या हफ्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहेत. ही प्रतिक्षा आता कधी संपणार याबाबत कृषी मंत्रालयाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पण तसं असलं तरीही 24 वा हफ्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळेल असं बोललं जात आहे. या हफ्त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेत थेट 4000 मिळणार आहेत? सविस्तर जाणून घेऊयात.
रात्रीच्या वेळी विनाकारण थांबून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणींना तेथून जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून टोळक्याने पोलीस अंमलदारावर हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील करोडी परिसरात घडली. आंबेडकर चौकात मध्यरात्री घडलेल्या या प्रकारात एका तरुणीने चाकूने वार केल्याचा आरोप आहे. फकिरा नब्बास तडवी (वय ३७) असे जखमी पोलीस अंमलदाराचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तीन तरुणींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर संजय इंगळे याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभी गायकवाड आणि रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अन्य दोघांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
कॉकरोच जनता पार्टीच्या उद्याच्या (10 ऑक्टोबर) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, महत्त्वाच्या रस्त्यावरही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतरही सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके आणि सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास ट्रेनने दिल्लीला निघाल्याची माहिती आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“तुम्हाला एवढी भिती कशाची वाटते, जर तुम्हाला एवढी भिती वाटत अशेल तर आख्खा देश बंद करुन टाका, मला हसू येतयं. दिल्ली ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आंदोलनामुळे त्रास होतो म्हणून तुम्ही मेट्रो बंद करता, रेल्वे बंद करता आता रस्तेही बंद करुन टाकले, आता सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही का?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या सत्रामुळे नियमबाह्य कामकाज करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत नशा आणणाऱ्या औषधांचा २२ लाख ३ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. याशिवाय, वाठोडा परिसरातील एका फार्मसीमध्ये आवश्यक कागदपत्रांशिवाय औषध विक्री सुरू असल्याचे आढळल्याने संबंधित दुकानाचा औषध परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
जागतिक पातळीवर उपग्रह इंटरनेट सेवा (Satellite Internet Service) पुरवणाऱ्या इलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ (Starlink) कंपनीच्या भारतातील व्यावसायिक शुभारंभावरून वाद चांगलाच पेटला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात पाऊल ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मस्क (Elon Musk) यांनी अचानक सोशल मीडियावर एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. भारतातील दूरसंचार बाजारावर काही उद्योगपतींचे वर्चस्व असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत मस्क यांनी विचारले आहे की, “अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का?” मस्क यांच्या या विधानामुळे जागतिक उद्योग जगतात आणि भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Swiggy Instamart Quick India Movement Sale : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील आघाडीचे क्विक कॉमर्स व्यासपीठ Instamart ने आपल्या प्रमुख क्विक इंडिया मूव्हमेंट (QIM) विक्रीची पुनरागमनाची घोषणा केली आहे. ही विक्री आता Instamart अॅप तसेच Swiggy अॅपवर सुरू आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून प्रीमियम उत्पादनांपर्यंत विविध विक्रेत्यांच्या उत्पादनांवर 50-90% पर्यंत सूट* दिली जात आहे. ( Swiggy Instamart Quick India Movement Sale )
Tanushree Dutta: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या कथित वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. तनुश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांच्यासाठी ‘ईव्हिल डेड’ असा उल्लेख केल्याचा दावा केला जात आहे. या वक्तव्यावर अभिनेत्री रोझलिन खानने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तनुश्रीवर टीका केली आहे.
भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारवर मीरा-भाईंदर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान १५ ग्राहकांसह बारमधील व्यवस्थापक, कर्मचारी आणि कॅशियर अशा एकूण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील बारमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबई/अमरावती : विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Air India Singapore Airlines Partnership : एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्स (SIA) यांनी त्यांच्या ‘व्यावसायिक सहकार्य फ्रेमवर्क करारा’ंतर्गत (Commercial Cooperation Framework Agreement) उपक्रमांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली; या करारावर जानेवारी २०२६ मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. ( Air India Singapore Airlines Partnership )
पश्चिम आशियात वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये (Air India Riyadh) सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येमेन मधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियातील विविध महत्त्वाच्या शहरांवर सातत्याने क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत. या बिघडत्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रियाध येथील भारतीय दूतावासाने तेथे वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीय नागरिकांसाठी तातडीची मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केली आहे. दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना कमालीची सतर्कता बाळगण्याचे, विनाकारण बाहेर न पडण्याचे आणि गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी किंवा घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हॉकी संघाने नुकतेच २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आता पुन्हा एकदा संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबरपासून जालंधर आणि मोहाली येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानचाही या स्पर्धेत सहभाग जवळपास निश्चित झाला होता. मात्र, पाकिस्तानने आपले सामने भारतात खेळण्याऐवजी दुसऱ्या देशात खेळवण्याची विनंती केली होती. परंतु, एचएफने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आणि पाकिस्तानी हॉकी संघाला स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.(Bangladesh Replace Pakistan In 2026 Asian Hockey Champions Trophy)
आम्हाला कुठलीही चौकशी समिती नको आहे, आम्हाला राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा हवा आहे. चौकशी समिती नेमली आणि आयोगाचे अध्यक्ष भीमनवार हेच असतील तर त्या समितीचा काय उपयोग होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरच तोडगा काढला पाहिजे, असे उपोषणकर्ते शिवराज मोरे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने वडार समाजाला मोठा दिलासा दिला आहे. पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत देण्यात आली आहे. वार्षिक उत्खनन मर्यादा 200 ब्रासवरून 500 ब्रास करण्यात येणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, 1968 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना निवृत्त एसपी भीमराव घाडगे यांनी एक हजार कोटींच्या मानहानीची नोटिस बजावण्यात आली आहे. अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणी परमवीर यांच्या भूमिकेच्या तपासाकरिता एनआय कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबर रोजीच्या प्रतिज्ञापत्रातील उल्लेखामुळे बदनामी होत आहे, असा दावा घाडगे यांनी केला आहे. प्रतिज्ञापत्रातील आरोप बदनामीकारक आणि खोटे आहेत, असाही दावा करण्यात आला आहे.
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठे यश आलं आहे. पुर्णेकर यांच्या हत्येकरिता वापरण्यात आलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे. ठाणे क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलातून ही हत्यारे जप्त केली आहेत. आरोपींनी पूर्णेकरांची हत्या करुन कर्नाळा जंगलात फेकली होती. एक देशी पिस्तुल आणि आरोपीचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केली आहे. SIT प्रमुख अमरसिंह जाधव आणि विशेष तपास अधिकारी शैलेस साळवी यांच्या टीमने केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत राज्यात 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच पुढील 10-12 ऑक्टोबरपर्यंत सर्व 100 टक्के पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेचे आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे स्वतःला मसीहा समजणारे कुठे गेले? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याचा मुडदा पाडला तेव्हा इकडे का नाही आले? असंही म्हटलं आहे. तसेच लोकशाहीचा हा महाराष्ट्र असणार आहे. जनता रस्त्यावर उतरेल आणि मस्ती जिरवेल असा इशाराही दानवेंनी यावेळी दिला आहे.
अमेरिकेच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक निर्णय समोर आला आहे. २००९ मध्ये टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळावर १३ जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या माजी सैन्याधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ निदाल हसनला (Nidal Hasan) या वर्षाच्या अखेरीस गोळीबार पथकाद्वारे (Firing Squad) फाशी दिली जाणार आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फाशी केवळ सार्वजनिकरित्या दिली जाणार नाही, तर संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण (Livestream) देखील केले जाईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेसह जगभरात मानवाधिकार आणि कायदेशीर चौकट यांवरून तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
कॉकरोच जनता पार्टीने १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई-विरार महापालिका नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही शहरात उद्भवणाऱ्या भीषण पूरपरिस्थितीवरून विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. नालेसफाईच्या कामात होणारी आर्थिक उधळपट्टी तात्काळ थांबवून आगामी पावसाळ्यासाठी ऑक्टोबर महिन्यातच पारदर्शक व वेळेवर ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
Konkan Railway Corporation Limited: रेल्वेमध्ये चांगल्या पदावर जायचं स्वप्न पाहताय का? तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच KRCL ने आपल्या विभागासाठी नवीन भरती काढली आहे.या वेळी त्यांनी उप-मुख्य विद्युत अभियंता या पदासाठी लोक मागवले आहेत. इंग्रजीत या पदाला Dy. Chief Electrical Engineer असं म्हणतात. ऑक्टोबर 2026 मध्ये याची अधिकृत जाहिरात आली आहे आणि एकूण 3 पदं भरली जाणार आहेत.ही भरती फ्रेशर्ससाठी नाही, तर जे आधीपासून रेल्वे सेवेत आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे पात्रता नीट वाचून मगच अर्ज करा. Konkan Railway Recruitment 2026:
Flipkart Big Billion Days Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरु झाला आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल 24 तास आधीच सुरु झाला आहे. आजपासून हा सेल सर्व ग्राहकांसाठी सुरु करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना होम अप्लायंसेज, होम एक्सेसरीजसोबतच स्मार्टफोन देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनवर अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागडे स्मार्टफोन देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही स्मार्टफोन डिल्सबाबत आता जाणून घेऊया.
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची भरदिवसा चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.७) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली आहे. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींसोबत त्यांचा गाडीचा कट लागण्यावरून वाद झाला, असे सांगितले जाते. रागाच्या भरात या दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांची चाकूने भोकसून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला प्लास्टिक बकेट, नंबर प्लेट व दगडाने मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. येवलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रतीक दळवी, आर्यन एलवंडे, वेदांत जगताप (तिघे रा. चांबळी, ता. पुरंदर), सनी गावडे (रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार्तिक लालासाहेब भिसे (वय २०, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गारवा हॉटेलसमोर, बोपदेव घाटाजवळ, येवलेवाडी येथे घडली आहे.
मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हटकल्याचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने थेट पोलिसांवरच हल्ला केला आहे. पोलिस अंमलदाराला दोघांनी घट्ट पकडून ठेवले, तर एका तरुणीला याला जिवंत सोडू नको असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर तरुणीने चाकूने पोलिस अंमलदाराच्या पाठीवर सपासप पाच वार केले आहेत. डाव्या बरगडीसह दोन्ही हातांवरही वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. करोडीतील आंबेडकर चौकात गुरुवारी मध्यरात्री १.१० वाजता हा प्रकार घडला आहे. शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभि गायकवाड, रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सागर इंगळेसह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फकीरा नब्बास तडवी (३७, रा. पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर) असे जखमी अंमलदाराचे नाव आहे. ते दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत असून, ७ ऑक्टोबरच्या रात्री अंमलदार गाडे व होमगार्ड नईम यांच्यासह वाहनातून गस्तीवर होते.
पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत वृद्धाच्या गळ्यातील एक लाख ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दाताने तोडून चोरणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन चोरीला गेलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अन्य तीन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अनिल तमा गायकवाड (वय ३२, रा. थिटेनगर, खराडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार सतीश गायकवाड, सुमित ऊर्फ सुमाड्या सतीश गायकवाड आणि सनी सतीश गायकवाड (तिघे रा. कटकेवाडी फाट्याजवळ, वाघोली, पुणे) हे अद्याप पोलिसांना पाहिजे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे.
Cockroach Janata Party Delhi Protest:
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या तातडीच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदान येथे भव्य आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच केंद्र सरकार आणि प्रशासनाने राजधानीत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) १० ऑक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशातील विविध राज्यांत आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सीजेपीच्या (CJP) प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली असून काहींची धरपकड केली जात आहे.
खेड तालुक्यातील कुरुळी येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत रस्त्यालगतच्या पत्र्याच्या टपऱ्या आणि तात्पुरती बांधकामे हटविण्यात आली, तर नऊ मीटर रस्त्याच्या हद्दीत येणारी पक्की बांधकामे काढून घेण्यासाठी संबंधितांना १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, आता रस्त्याचे काम कधी सुरू होणार, याकडे कुरुळीकरांचे लक्ष लागले आहे.
भारतातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या जिओहॉटस्टारने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात देखील आता विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता अधिकृतपणे घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनीच्या वेगाने वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीतील ही नवीन झेप आहे. यूके, कॅनडा आणि सिंगापूरमधील लाँचला यूजर्सचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला. MENA (मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका) प्रदेशातील हा प्रवेश जिओहॉटस्टारच्या जागतिक उपस्थितीला दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी जगातील अत्यंत महत्त्वाच्या अशा एका प्रदेशाशी जोडतो.
बंगळुरुत अचानक झालेल्या ट्रांसफॉर्मर ब्लास्टने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरूंमध्ये घबराट पसरवली. ध्यानी ना मनी असताना ट्रांसफॉर्मरचा मोठा स्फोट झाला ज्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणेच लोक फूटपाथवरुन आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात होते, पण अचानक मोठा धमाका झाला आणि आगीचा भीषण प्रवाह हवेत विलिन होऊ लागला. या घटनेने उपस्थित अनेकांचा थरकाप उडवला तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
एकीकडे डिजिटल शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांची चर्चा सुरू असताना कोरची तालुक्यातील दंवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र चक्क झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. बेळगाव केंद्रातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी केवळ दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक उपलब्ध आहेत. पाच वर्गांसाठी दोनच खोल्या असल्याने दोन वर्गांचे अध्यापन झाडाखाली घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
कामावरून घरी निघालेले धनंजय शेटे अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर कारच्या आरशाचे आणि इंडिकेटरचे तुटलेले तुकडे सापडले आणि शोधाला महत्त्वाचा धागा मिळाला. विहिरीत कोसळलेल्या कारमध्ये धनंजय यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमेरिकेत नोकरी करणाऱ्या आणि ग्रीन कार्डचे (US PERM Suspended) स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Department of Labor) कडक पाऊल उचलत भारत आणि अमेरिकेतील प्रमुख आयटी दिग्गजांवर मोठी कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (दि.8) महाराष्ट्राच्या उर्वरित भागातूनही माघार घेतली. त्यामुळे संपूर्ण राज्यातून मान्सूनची एक्झिट झाली आहे. गोवा, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या काही भागांतूनही मान्सून परतला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघारी जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आणि कॉक्रोच जनता पार्टीने मोठ्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क झाले आहे. १० ऑक्टोबर रोजी सीजेपीने जंतर-मंतरला वेढा घालण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राजधानीला किल्ल्याचे स्वरूप आले आहे.
Pune Graduate Seat NCP Internal Dissent: विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची हक्काची जागा महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पक्षाकडे (BJP) गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत नाराजी आणि धुसफूस उफाळून आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या जागेबाबत उघडपणे केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षातील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी, "पुणे पदवीधर हा पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ होता. ही जागा भाजपला गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते पूर्णपणे हताश व खचले आहेत," असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.
क्रिकेटचा सामना संपल्यानंतर पोहण्यासाठी डोहात उतरलेल्या कल्याण येथील दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. सौरभ पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृत मुलांची नावे आहेत. पोहण्यासाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या आणि बंदी असलेल्या डोहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
US PERM Program Suspension IT Giants: अमेरिकेच्या कामगार विभागाने (US Department of Labor) देशातील परमनंट लेबर सर्टिफिकेशन (PERM) कार्यक्रमाबाबत एक अत्यंत कठोर आणि मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील आघाडीच्या IT कंपन्या इन्फोसिस (Infosys), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), विप्रॉ (Wipro), एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Tech) सोबतच कॉग्निझंट (Cognizant) आणि कॅपजेमिनी (Capgemini) यांना या कार्यक्रमातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय अमेरिकेतील नामांकित टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि ॲडोबी (Adobe) या कंपन्यांवरही हीच कारवाई करण्यात आली आहे
Central Team Jalna Drought Soybean Crop Losses: जालना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, सोयाबीन-कपाशीवरील रोगाचे संकट आणि फळबागांच्या प्रचंड नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक विशेष पाहणी पथक आज जालन्यात दाखल होत आहे. हे पथक जिल्ह्यातील नानेगाव, किनगाव वाडी आणि जामखेड या भागांत भेट देऊन शेतीची पाहणी करणार असून बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. मात्र, हे पथक पोहोचण्यापूर्वीच नानेगाव येथील शेतकरी अत्यंत भावुक आणि संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
नवी मुंबई शहरात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर अन्नपदार्थांचे स्टॉल्स आणि चायनीज गाड्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. यापूर्वी व्यावसायिक उत्पादक कव्हर किंवा आडोसा करून फास्ट फूडचे व्यवसाय चालवत असत. मात्र, आता दिघा ते उरणपर्यंत संपूर्ण शहरात, थेट मुख्य हायवे आणि महत्त्वाच्या चौकांमध्येच बिंदासपणे रात्रीच्या वेळी चायनीज, भुर्जीपाव आणि आईस्क्रीमचे स्टॉल्स मांडले जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतच आहे, पण रस्त्यावर उघड्यावर चालणाऱ्या सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ODI Cricket : आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या (ODI) ५० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात कोणत्याही संघाला एका डावात ५०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे, त्यांनी २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध ४९८/४ धावांचा अवाढव्य डोंगर उभारला होता. ५० षटकांच्या क्रिकेटमधील ही धावसंख्या पाहून संपूर्ण क्रिकेट जगत थक्क झाले होते. मात्र, आता वेस्ट इंडिजचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) च्या ‘ॲक्वा लाईन’ने ७ कोटी प्रवासी प्रवासांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आरे जेव्हीएलआर ते कप परेड या संपूर्ण मार्गावर सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना, ‘ॲक्वा लाईन’वर आतापर्यंत ७,१८,५२,४७३ प्रवासी प्रवासांची नोंद झाली आहे. मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद यामुळे अधोरेखित होतो
Pune MLC Elections BJP : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) पूर्ण ताकदीनिशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस असल्याने दोन्ही मतदारसंघांतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः पुणे दौऱ्यावर दाखल झाले असून, पक्षांतर्गत आणि महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी कंबर कसली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दिवसभर पुण्यात भाजप आणि महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि निवडणूक समन्वयकांची बैठक पार पडणार आहे
आजच्या काळात स्मार्टफोन केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी नाही तर फोटोग्राफीसाठी देखील वापरला जातो. कारण सध्या अनेक कंपन्या तगड्या कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लाँच करतात, ज्यामुळे यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार होतो. पण अनेकदा असं घडतं की आपण महागडा स्मार्टफोन खरेदी करतो आणि जेव्हा फोटो क्लिक करतो, तेव्हा फोटो ब्लर येतात, ज्यामुळे आपला अनुभव खराब होतो. अशावेळी आपल्याला वाटते की, आपल्या स्मार्टफोनचा कॅमेारा खराब झाला आहे आणि आपण चुकीचा स्मार्टफोन खरेदी केला आहे.
Amravati Builder Suicide Government: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरुड येथून एक अतिशय सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. स्थानिक कंत्राटदार सुनील वागद्रे (वय ४२) यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय कामांचे कोट्यवधी रुपयांचे बिल वेळेवर न निघाल्यामुळे व थकित कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेमुळे जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांतील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचे प्राथमिक आणि रंजक चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर (Scrutiny) सर्वच मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष व बंडखोरांचे आव्हान समोर आल्याने लढती चुरशीच्या ठरणार आहेत.
पुणे विभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोठा भरणा पाहायला मिळाला.या मतदारसंघासाठी तब्बल ८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्जांच्या छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यातील ६९ अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघासाठी एकूण ६७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.