
Top Marathi News Today Live
Iran attack Israel ballistic missiles 2026 : मध्य पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय परिस्थिती आता अत्यंत भयानक आणि स्फोटक वळणावर येऊन पोहोचली आहे. रविवारी रात्री उशिरा इराण आणि लेबनॉनमधील कट्टरपंथी संघटना हिजबुल्लाहने मिळून इस्रायलच्या भूमीवर एक मोठा आणि भीषण संयुक्त लष्करी हल्ला केला. या अचानक आणि पूर्वनियोजित हल्ल्यामुळे संपूर्ण इस्रायल हादरून गेला असून देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये युद्धाचे धोक्याचे सायरन (Air Raid Sirens) वाजू लागले आहेत.
08 Jun 2026 06:00 PM (IST)
‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आमदार प्रसाद लाड बैठकीस उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील (अंडर पास) रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध निर्देश दिले.
08 Jun 2026 05:50 PM (IST)
एटीएम चालकांची संघटना असलेल्या CATMi ने RBI आणि बँकांकडे चिंता व्यक्त केली आहे की, अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये पुन्हा पैसे भरण्यासाठी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध नाही. संघटनेचे म्हणणे आहे की, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील एटीएममध्ये रोख रक्कम पोहोचवण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे रोख रकमेचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.
08 Jun 2026 05:36 PM (IST)
जालना-जळगाव या महत्त्वाकांक्षी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेशी संबंधित हरकती दाखल करण्यासाठी आठ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत भूसंपादन विभागाकडे २५० हरकत अर्ज प्राप्त झाले आहेत. हरकती दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सुनावणी होणार असून त्यानंतर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जालना-जळगाव या १७७ किलोमीटर लांबीच्या, अजिंठा लेणी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
08 Jun 2026 05:23 PM (IST)
पश्चिम बंगालच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षातही फूट पडल्याचे निश्चित झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र व्यवस्थेची मागणी केली आहे. या खासदारांनी आपल्या पत्रात एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये अरूप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, शताब्दी रॉय, जगदीश वसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, वापी हल्दर, असित माल आणि सुवेंदू शेखर रॉय यांचा समावेश आहे. काकोली घोष दस्तीदार यांना बंडखोर गटाच्या नेत्या म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
08 Jun 2026 05:10 PM (IST)
मानव सुथारने आपल्या कसोटी कारगिर्दीची ऐतिहासिक सुरुवात केली आहे. मुल्लांपूर येथे सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात मानव सुथारने २२ ओव्हरमध्ये ६ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १५२ धावांत गारद झाला. आतापर्यंत केवळ १० भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संघासाठी ही कामगिरी करणारा तो सातवा फिरकी गोलंदाज ठरला. भारतासाठी कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे.
08 Jun 2026 04:57 PM (IST)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत संतापजनक घटना घडली आहे. तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08 Jun 2026 04:48 PM (IST)
पलूस : तालुक्यातील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यालगतच्या उसाच्या फडात मगरीने केलेल्या विणीतील नऊ पिलांचा तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. तर पाच पिलांना वनविभागाने सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. मात्र, घटनेची माहिती तातडीने देऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तब्बल पाच तास घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
08 Jun 2026 04:36 PM (IST)
इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मुद्द्यावंर चर्चा झाली. यात नीट परीक्षेतील घोटाळ्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. आजच्या बैठकीत एकूण २५ पक्षांचा समावेश होता. अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश होता. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत खर्गे बोलत होते. वाचा सविस्तर...
08 Jun 2026 04:27 PM (IST)
पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात वसलेला आणि दुष्काळप्रवण प्रदेश म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा, भूजल पातळी घटल्यामुळे आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे गंभीर कृषी संकटाचा सामना करत आहे. दुष्काळप्रवण परिस्थिती असूनही, कृषी हा या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या प्रदेशातील अंदाजे ४३ लाख एकर लागवडीयोग्य जमीन पाणीटंचाई, हवामानातील बदल आणि अनियमित मान्सून यांसारख्या आव्हानांमुळे प्रभावित झाली आहे. वाचा सविस्तर...
08 Jun 2026 04:16 PM (IST)
भंडारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्येवरून मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष केले. “विदर्भातील शेतकरी असूनसुद्धा रोज १० ते १५ शेतकरी आत्महत्या करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांना बघण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. यावरूनच चर्चाना उधाण आले आणि महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अश्यातच आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही मोठे विधान केले असून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बघण्याची माझीही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
08 Jun 2026 04:10 PM (IST)
आज सोमवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही तासांतच त्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक बुडाली. सोमवारी सकाळच्या सत्रात निफ्टी ५० आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली. जागतिक पातळीवरील कमकुवतीचे येत असलेले संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली मोठी विक्री आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे शेअर बाजार अस्थिर झाला. आज, मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांनी घसरला आणि निफ्टी २३,१०० च्या जवळपास पोहोचला. या प्रचंड घसरणीमुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले. परिणामी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल अंदाजे ४५६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले.
08 Jun 2026 04:00 PM (IST)
CBSE Three Language Policy: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान मोदी (Digvijaya Singh letter to PM Modi) यांना पत्र लिहून चालू शैक्षणिक सत्राच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईच्या(CBSE) त्रि-भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:55 PM (IST)
ब्रेन ट्यूमरचे निदान होणे हा रुग्णाच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक क्षणांपैकी एक क्षण ठरतो. मात्र, शस्त्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गेल्या दशकात ब्रेन ट्यूमर मेंदूच्या उपचारात उल्लेखनीय प्रगती झाली आहे, ज्यामध्ये अशा प्रगतीचा समावेश आहे, जी उपचारांचे परिणाम बदलत आहे आणि रुग्णांना नवी आशा देत आहे. याबद्दल डॉ. नितीन नारायण डांगे, सल्लागार न्यूरोसर्जरी, लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:50 PM (IST)
पलूस : तालुक्यातील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यालगतच्या उसाच्या फडात मगरीने केलेल्या विणीतील नऊ पिलांचा तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. तर पाच पिलांना वनविभागाने सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. मात्र, घटनेची माहिती तातडीने देऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तब्बल पाच तास घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:45 PM (IST)
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत संतापजनक घटना घडली आहे. तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:40 PM (IST)
Israel attack Iran petrochemical plant : पश्चिम आशिया म्हणजेच मिडल इस्टमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसपुसत असलेल्या तणावाचा अखेर स्फोट झाला आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन्ही देशांमध्ये झालेली शस्त्रसंधी आता पूर्णपणे मोडीत निघाली आहे. बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच ७ जूनच्या रात्रीपासून इराण आणि इस्रायल (US-Israel Iran War) यांच्यात थेट आणि भीषण लष्करी कारवाई सुरू झाली आहे. इस्रायली हवाई दलाने सोमवारी (८ जून २०२६) पहाटे इराणच्या आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील औद्योगिक क्षेत्रांवर जोरदार बॉम्बहल्ला केला. या विनाशकारी हल्ल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले असून जागतिक बाजारावरही याचे मोठे सावट पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:35 PM (IST)
India Alliance PC: इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मुद्द्यावंर चर्चा झाली. यात नीट परीक्षेतील घोटाळ्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. आजच्या बैठकीत एकूण २५ पक्षांचा समावेश होता. अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश होता. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत खर्गे बोलत होते. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:30 PM (IST)
मान्सूनच्या वाटचालीचा परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दिसून येत आहे. रविवारी दिवसभर अधिकांश ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवली. शहरवासीयांना आता पावसाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. मात्र मान्सूनचा वेग आणि पुढील अंदाजित वाटचाल पाहता १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:25 PM (IST)
India vs Afghanistan Live 2026: सध्या भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम 564 रन्सवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर अफगणिस्तान 152 वर ऑल आउट झाला. भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. मात्र या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने दुहेरी शानदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील त्याने 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. वाचा सविस्तर
Edged and caught! ☝️
Washington Sundar gets his second wicket as Shubman Gill takes a fine catch at slip 🙌
Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @Sundarwashi5 | @ShubmanGill pic.twitter.com/z3FQv9om3p
— BCCI (@BCCI) June 8, 2026
08 Jun 2026 03:20 PM (IST)
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीसमोरील पेच अधिकच गहिरा झाला आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे गेल्या दोन दिवसांतील प्रयत्न अपयशी ठरल्याने, संकटमोचक मानले जाणारे राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन रविवारी (७ जून) पुन्हा तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील आव्हान सुकर करण्यासाठी महाजन यांनी नाशिकमध्येच मुक्काम ठोकत विविध स्तरांवर गुप्त बैठका आणि संपकांचे सत्र सुरू केले आहे. मात्र, उशिरापर्यंत सुरू असलेल्या या चर्चामधून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा तोडगा समोर आलेला नाही. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:15 PM (IST)
Indian Embassy Advisory : तेहरान : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल संघर्ष पुन्हा पेटला आहे. रविवारी-सोमवारी दोन्ही देशांत भीषण हल्ले झाले असून अस्थिरता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने दूतावासाने भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर
— India in Iran (@India_in_Iran) June 8, 2026
08 Jun 2026 03:10 PM (IST)
Pakistan Spy Satellite Launch 2026 : भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Conflict) यांच्यातील पारंपरिक सीमावाद आता जमिनीवरून थेट अंतराळात (Space War) पोहोचला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने चीनच्या साथीने भारताची नाकेबंदी करण्यासाठी अंतराळात एक भयंकर चक्रव्यूह रचण्यास सुरुवात केली आहे. ‘द प्रिंट’च्या एका खळबळजनक अहवालानुसार, पाकिस्तानने गेल्या अवघ्या १६ महिन्यांत ६ अत्याधुनिक पृथ्वी-निरीक्षण उपग्रह (Earth Observation Satellites) यशस्वीरीत्या कक्षेत प्रस्थापित केले आहेत. हे उपग्रह दिसायला नागरी असले, तरी त्यांचा खरा वापर भारताच्या प्रत्येक लष्करी हालचालीवर २४ तास बारीक नजर ठेवण्यासाठी केला जात आहे. या घडामोडींमुळे भारताच्या सुरक्षेसमोर एक मोठे आणि अभूतपूर्व आव्हान उभे राहिले आहे. वाचा सविस्तर
08 Jun 2026 03:05 PM (IST)
सातारा: साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाला सुरक्षा देणाऱ्या खाकी वर्दीतील एका महिला पोलिसाने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. वाचा नेमकं काय घडलं
08 Jun 2026 03:00 PM (IST)
Santacruz Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये मुंबई लोकलचे आणि रेल्वे स्टेशनवरील अनेक धक्कादायक घटनांचेही व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सांताक्रूझ स्टेशनवरील एक अत्यंत किळसवण्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्टेशनवर ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका केली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर
Mumbai 🚨
Santa Cruz railway station ke overpass se ek aadmi ka railway tracks par urinate karte video viral ho raha hai.
Aadmi ne allegedly medical urgency ka reason diya, lekin social media par public hygiene ko lekar debate chhed gayi hai.#Mumbai #ViralVideo #CivicSense pic.twitter.com/RRKP2ZeK1K— Trending Topics with Faiz (@newswithaftab14) June 7, 2026
08 Jun 2026 02:59 PM (IST)
केंद्र सरकारच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेली पंतप्रधान कौशल्य विकास योजना गंभीर प्रश्नाच्या जाळ्यात अडकली आहे. सरकारच्याच महालेखापरीक्षकांच्या अहवालाने या योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी अर्थसंकल्पात केंद्रीय योजनांअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांसाठी मोठी रक्कम मंजूर केली जात असूनही, या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु २०१५ मध्ये सुरू झाल्यापासून या योजनेने एकाही वर्षी संपूर्ण रक्कम खर्च केलेली नाही.
08 Jun 2026 02:50 PM (IST)
जागतिक स्तरावर वाढलेला दबाव आता महागाईच्या स्वरुपात समोर येत आहे. याचा झटका म्हणजे भारतात घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. त्यांच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे स्वयंपाकघराच्या बजेटमध्ये लक्षणीय वाढ होईल. तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, १४-किलोग्रामच्या सिलिंडरची किंमत आता ९१३ रुपयांऐवजी ९४२ रुपये झाली आहे.
08 Jun 2026 02:41 PM (IST)
ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभाग चौथा मजला येथील कार्यालयात सकाळी किरकोळ आग लागली होती. ही आग आटोक्यात आणली आहे.
08 Jun 2026 02:29 PM (IST)
काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासातील त्याग आणि मेहनतीचे कौतुक केले. ते नाराज आहेत की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत बोलताना त्यांनी वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
08 Jun 2026 02:20 PM (IST)
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या बनावट पुजारी आणि एजंटांविरोधात मंदिर संस्थानने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत पथकाने 5 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी 2 जणांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. उर्वरित तिघांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आले आहेत.
08 Jun 2026 02:11 PM (IST)
नागपूर येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक संकटावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. देशातील तरुणांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नांवर संयुक्तपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रातील शेतकरी नुकसान, पाणीटंचाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवर सरकारवर टीका करत तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली.
08 Jun 2026 02:09 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घडामोडीत उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ठाकरे बंधूंच्या या भेटीकडे राज्यातील सर्व पक्षांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
08 Jun 2026 02:00 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मराठी माध्यम शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2026 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका (मार्कशीट) आणि शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) मिळालेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि लिविंग सर्टिफिकेट त्वरित देण्याचे आदेश देत संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा आश्वासन पीडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले आहे.
08 Jun 2026 01:55 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्ध सध्या भडकलं आहे. त्यामुळे जागतिक तणाव अचानक वाढला आहे. इराण, हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या मालिकेने कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ घडवून आणली आहे त्यासगळ्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आधीच गंभीर झालेल्या तेल आणि वायू संकटाबद्दल जगभरातील देशांमध्ये इराण-इस्रायल युद्धामुळे चिंता आणखी वाढली आहे. इराणने एक नवीन, चिंता वाढवणारी धमकी दिली आहे.
08 Jun 2026 01:50 PM (IST)
यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या स्पाय थ्रिलरमुळे अभिनेत्री आलिया भट्टचे नाव गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया बॉबी देओल, अनिल कपूर आणि शर्वरी वाघ या कलाकारांसोबत दिसणार आहे. दरम्यान, ‘अल्फा’च्या टीझरच्या प्रदर्शनाबाबत नवीन माहिती समोर येत आहे. याच माहितीच्या आधारे, आलियाच्या आगामी चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होईल, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
08 Jun 2026 01:45 PM (IST)
न्यू चंदीगड येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात, अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, रहमत शाहने ४४.४४ च्या स्ट्राईक रेटने १३५ चेंडूंमध्ये ६० धावांचे अर्धशतक झळकावत सर्वाधिक धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ४८ चेंडूंमध्ये २० धावा केल्या, तर डावाची सुरुवात करणाऱ्या सिद्दीकुल्ला अटलने २७ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या. इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागला.
08 Jun 2026 01:40 PM (IST)
नुकतेच दिल्लीतून सीबीएसी बोर्ड संदर्भात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थ्याची गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिका यामधील गोंधळ उघडकीस आला आहे. तनिष्क नावाच्या विद्यार्थ्याने असा दावा केला आहे की, १२ वीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने मार्कशीट डाउनलोड केली. तेव्हा गुणपत्रिकेत विषय लिहले होते पण कोणत्याही विषयाचे मार्क लिहले नव्हते. त्यानंतर त्याने पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुरू केली, तेव्हा त्याला कोरी उत्तरपत्रिका मिळाली. आता असेच एक प्रकरण मेरठमधूनही समोर आले आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत आणि गुणपत्रिकेतील गुणामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.
08 Jun 2026 01:35 PM (IST)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरली आहे त्याची पत्नी संजना हिच्या प्रेग्नन्सीबाबत रंगलेल्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजना गरोदर असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं.
08 Jun 2026 01:25 PM (IST)
भारतीय नौदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने ‘१०+२ (बीटेक) कॅडेट एंट्री स्कीम’ अंतर्गत जानेवारी २०२७ च्या कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या विषेश एंट्री स्कीमच्या माध्यमातून अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेत अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन १८ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
08 Jun 2026 01:15 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) हे दोन दिवसांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील दौऱ्यासाठी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे दाखल होत आहेत. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये उत्तर कोरियाला भेट दिली होती. या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या नव्या दौऱ्याकडे जागतिक राजकीय विश्लेषक केवळ एक औपचारिक किंवा मैत्रीपूर्ण भेट म्हणून पाहत नाहीत. यामागे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सत्ता संतुलन आणि रशिया-चीन-उत्तर कोरिया या तिघांमधील छुपे अंतर्गत मतभेद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
08 Jun 2026 01:06 PM (IST)
दरवर्षीप्रमाणे यंदाही टेक जायटंट कंपनी अॅपलने वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2026 ईव्हेंटपूर्वी जगातील सर्वात जबरदस्त अॅप्स आणि गेम्सना सन्मानित केले आहे. अॅपल डिझाईन अवॉर्ड्स 2026 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. यावेळी भारताचा डंका संपूर्ण जगभरात वाजला आहे. जगभरातील तीव्र स्पर्धेदरम्यान भारतातील एका छोट्या आणि स्वतंत्र डेवलपरने तयार केलेल्या अॅपने यावेळी सर्वोच्च स्थान पटकावले आहे. बंगळुरुमधील रहिवाशी संगीतकार आणि सोलो डेव्हलपर बिजॉय थंगराज (Bijoy Thangaraj) यांनी तयार केलेल्या ‘Guitar Wiz’ अॅपला अॅपल डिझाईन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट ॲप म्हणून सन्मानित केले आहे.
08 Jun 2026 01:02 PM (IST)
पिंपरी-चिंचवड शहरात संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक अत्यंत धडक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, शहरातील विविध भागांत दहशत माजवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या तब्बल ५ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईत एकूण ४५ हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मकोकाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
08 Jun 2026 12:48 PM (IST)
एका १२ वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे. विपुल विश्वकर्मा (वय १९, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), कोझी कॅफेचे चालक यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी ३ जून २०२६ रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
08 Jun 2026 12:36 PM (IST)
औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात महाळुंगे वाहतूक विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागाने विविध नियमभंग प्रकरणांमध्ये एकूण ३ हजार १५४ वाहनचालकांवर कारवाई करत २८ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. महाळुंगे वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि नामांकित कंपन्या असल्याने जड-अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. अनेक वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडी वाढण्याबरोबरच अपघातांचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली.
08 Jun 2026 12:24 PM (IST)
महामार्गावर एसटी महामंडळाने ठरवून न दिलेल्या अनधिकृत हॉटेल्सवर बस थांबवून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या स्वत:चा वैयक्तिक फायदा पाहणाऱ्या चालक व वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाने गेल्या दोन महिन्यांत अशा तब्बल १३१ बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकृत हॉटेल्स सोडून इतरत्र बस थांबवल्यास कारवाईचा इशारा देऊनही नियम मोडणाऱ्या चालकांवर आता थेट दंडात्मक कारवाई करून हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्यास सुरुवात झाली आहे.
08 Jun 2026 12:12 PM (IST)
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात अवघा ५.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार काही दिवसांत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
08 Jun 2026 12:00 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषदेच्या तोंडावर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असताना, त्यांच्या एका अटीमुळे संपूर्ण समीकरण बदलल्याचे सांगितले जात आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी घातलेली अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळून लावल्यामुळे हे नाराजी नाट्य रंगल्याचे बोलले जात आहे.
08 Jun 2026 11:50 AM (IST)
टीव्हीवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली जेनिफर विंगेट, तिच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. जेनिफरने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आजही ती इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेत तिने श्वेता तिवारीच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ही अभिनेत्री ‘दिल मिल गये’, ‘बेहद’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये दिसली.
08 Jun 2026 11:40 AM (IST)
अभिनेता ओम यादवने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जान्हवी नुकतीच जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं. हा व्हिडीओ पोस्ट करताना ओम यादवने “जेजुरी दर्शन” असे कॅप्शन दिले होते. त्यावर जान्हवीने “यळकोट यळकोट जय मल्हार” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने, “नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते… पण जेवढ्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत त्यावरून लोकांना प्रश्न नक्कीच पडणार ना… बाकी तुमचं जे असेल ते,” अशी कमेंट केली.
08 Jun 2026 11:30 AM (IST)
पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांची वर्दी घालून PSI असल्याचा आव आणणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली. क्लिनिकमध्ये लवकर अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तिने खाकी वर्दीचा वापर केला होता. चौकशीत ती तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.
08 Jun 2026 11:20 AM (IST)
NEET UG 2026 Re-Exam: च्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या उमेद्वारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सिटी इंटिमेशन स्लिप जाहीर केली आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन त्यांचे परीक्षा शहर तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.ही स्लिप विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची आगाऊ माहिती देते. जेणेकरून ते प्रवासाची आणि इतर आवश्यक व्यवस्था वेळेत करू शकतील.