Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: व्यावसायिक गॅस महागला, पण घरगुती LPG बाबत सरकारचा मोठा दिलासा!

Maharashtra Breaking News: या जागतिक संकटामुळे भारतातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder) किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका व्यावसायिक क्षेत्राला बसत असल्याने हॉटेल व्यावसायिक आणि लहान व्यापाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 29, 2026 | 06:14 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Global Energy Crisis:  व्यावसायिक गॅस महागला, पण घरगुती LPG बाबत सरकारचा मोठा दिलासा!

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भू-राजकीय तणावाचा थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला (Supply Chain) बसला असून, यामुळे एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा (Crude Oil) तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  महागाईचा भडका मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुज खाडी (Strait of Hormuz) गेल्या ६० दिवसांपेक्षा जास्त काळापासून पूर्णपणे बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्यामुळे जगावर आतापर्यंतचे सर्वात मोठे ऊर्जेचे संकट ओढवले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीची महागाई वाढत आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 29 May 2026 06:05 PM (IST)

    29 May 2026 06:05 PM (IST)

    पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!

    मुंबई: महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते जिथे जातात तिथे कायद्याचे राज्य आपोआप लागू होते. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी आपली कठोर आणि स्पष्टवक्ता शैली दाखवली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्यातील भेसळ करणारे आणि विक्रेत्यांविरुद्ध एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे अवैध व्यापारात गुंतलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 29 May 2026 05:55 PM (IST)

    29 May 2026 05:55 PM (IST)

    Shahana Goswami : धक्कादायक! अभिनेत्रीने स्वतःबद्दल केला खुलासा

    प्रत्येकाचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणाला एका व्यक्तीवर प्रेम असते आणि तीच व्यक्ती त्यासाठी सर्वकाही होऊन जाते. काही व्यक्तींना एकाच वेळी एकापेक्षा अधिक जणांवर प्रेम होतं आणि याच गोंधळात सगळीच नाती बिनसतात. पण बी टाऊनमध्ये प्रेमाची व्याख्या जरा ओर आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामीने तिच्या नात्यासंबंधित काही खाजगी पैलू माध्यमांसमोर आणले आहेत. तर नात्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही शेअर केला आहे.

  • 29 May 2026 05:44 PM (IST)

    29 May 2026 05:44 PM (IST)

    Petrol Diesel Price Hike : ११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग!

    Petrol Diesel Price Hike News Marathi : मागील काही दिवसांत झालेल्या प्रचंड पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘नफेखोरी’ धोरणामुळे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळत असल्याचा थेट आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले असून, आंदोलकांनी तात्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.

  • 29 May 2026 05:35 PM (IST)

    29 May 2026 05:35 PM (IST)

    Mulshi Pattern 2 : पुन्हा ती क्रूरता रंगणार!

    दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे सध्या त्याच्या नव्या सिनेमा ‘देऊळबंद 2’ साठी चर्चेत आहे. सिनेमाने एका आठवड्यात जवळजवळ 28 कोटींची कमाई केली आहे, जी अतिशय उत्कृष्ट आहे. अशामध्ये चर्चेदरम्यान ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाच्या संवादाने रंगत आणली होती. मराठी सिनेरसिक ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, एका चर्चेत प्रवीण तरडेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणाही करून टाकली आहे.

  • 29 May 2026 05:20 PM (IST)

    29 May 2026 05:20 PM (IST)

    Vinesh Phogat ला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

    भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला २०२६ च्या आशियाई खेळांच्या चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास विनेशला परवानगी दिली आहे. यापूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) विनेश फोगाटला चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटच्या देशासाठीच्या योगदानाची दखल घेतली, परंतु क्रीडा प्रकरणांमध्ये न्यायालयांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंताही व्यक्त केली.

  • 29 May 2026 05:09 PM (IST)

    29 May 2026 05:09 PM (IST)

    “प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमी समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खात्याला लक्ष्य केले आहे. “पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे,पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही,” अश्या शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे.

  • 29 May 2026 04:59 PM (IST)

    29 May 2026 04:59 PM (IST)

    डिझेल टंचाईचा संताप! शेतकऱ्याने बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून गाठला पेट्रोल पंप...

    डिझेल टंचाईविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी अनोखा निषेध नोंदवला. आरेगाव इथले शेतकरी विनायकराव टाले यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटर अंतरावरील डोणगाव इथं पेट्रोल पंपावर नेला. "शेतीची मशागत सुरू आहे, पण डिझेलच मिळत नाही. ट्रॅक्टर उभे आहेत आणि शेतकरी हवालदिल झाला आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 29 May 2026 04:52 PM (IST)

    29 May 2026 04:52 PM (IST)

    अंबरनाथ पालिकेत सेना-भाजप आमने-सामने; मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून भाजपचे आंदोलन, तर शिवसेनेकडून सुपारी राजकारणाचा आरोप!

    अंबरनाथ नगरपालिकेत लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन आणि एकनाथ शिंदे शिवसेनाविरुद्ध भाजप, असा नवा वाद उफाळून आला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी थेट त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत अनोखे आंदोलन केले. शहराला पूर्णवेळ सक्षम अधिकारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • 29 May 2026 04:41 PM (IST)

    29 May 2026 04:41 PM (IST)

    संजय राऊतांच्या आरोपांवर भाजपचे सोमय्या यांचा घणाघात

    नीट पेपरफुटीमागे भाजपचं नेटवर्क काम करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. भाजपने निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा आणि स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर नियंत्रण मिळवल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत असतात. बकरी ईद आणि कामाख्या देवी संदर्भातील वक्तव्यांचा दाखला देत, महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच कुर्बाण केलं आहे, असा घणाघात सोमय्या यांनी केला.

  • 29 May 2026 04:30 PM (IST)

    29 May 2026 04:30 PM (IST)

    बीडच्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी काखान्यासमोर मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे आंदोलन

    बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील तेलगाव इथल्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखानासमोर लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूक संघटनावतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. कारखान्यात सुमारे महिनाभरापूर्वी बॅगजला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत कारखान्यातील कामगार भीमराव उर्फ बाबासाहेब बारीकराव चोपडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना गुडघ्याखालून सुमारे 50 टक्के भाजल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित कामगार सध्या कोणतेही काम करू शकत नसल्याचेही आंदोलकांनी सांगितली.

  • 29 May 2026 04:21 PM (IST)

    29 May 2026 04:21 PM (IST)

    मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ! काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा, ठाकरे गट, शरद पवार गटाला फक्त ‘इतक्याच’ जागा…

    राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा दिसत असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक पार सापडली असून त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते आहे. विधानपरिषदेच्या एकूण सतरा जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे.

  • 29 May 2026 04:12 PM (IST)

    29 May 2026 04:12 PM (IST)

    “200 अफेअर्स…”, पूजा भट्टने वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा

    चित्रपट निर्माते महेश भट्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी दोनदा लग्न केले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पहिले लग्न किरण भट्ट यांच्याशी केले, ज्यांच्यापासून त्यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट या दोन मुली आहेत. त्यानंतर या दिग्दर्शकाने सोनी राझदान यांच्याशी लग्न केले. सोनी राझदान यांच्यापासून त्यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत. अलीकडेच, पूजाने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल उघडपणे भाष्य केले.

  • 29 May 2026 04:04 PM (IST)

    29 May 2026 04:04 PM (IST)

    पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मोठी अपडेट; बळींची संख्या 16 वर, पोलिसांवर गंभीर आरोप

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या तयार होणारी गावठी विषारी दारू थेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुरवली जात असल्याचा आरोप शिवबा संघटनेने केला आहे. या प्रकरणी गावठी दारूच्या भट्टया, वाहतूक आणि संबंधित रॅकेटबाबत पोलिसांकडे वेळोवेळी पुराव्यांसह तक्रारी करण्यात आल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. शिवबा संघटनेचे माऊली घोडे यांनी, "विषारी दारूने भरलेल्या गाड्या पकडून देऊनही मुख्य आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत." दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी ठोस कारवाई केली असती तर आज 16 जणांचे जीव वाचले असते, असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • 29 May 2026 03:55 PM (IST)

    29 May 2026 03:55 PM (IST)

    IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी

    आयपीएल २०२६ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील सुरक्षा आणि सामन्यांची निष्पक्षता कायम राखण्यासाठी BCCI ने आता स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या परिसरात म्हणजेच पीएमओए (Players and Match Officials Area) मध्ये स्मार्ट सनग्लासेस वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. वृत्तानुसार, मंडळाने १८ मे रोजी सर्व संघांना याबाबत एक सूचना जारी केली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACU) स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आयपीएलमध्ये सुरक्षेचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 03:45 PM (IST)

    29 May 2026 03:45 PM (IST)

    चार्जिंग स्टेशनअभावी ई-बस रखडल्या

    छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): स्मार्ट सिटी योजनेंतर्गत जाधववाडी भाजीमंडई परिसरात उभारण्यात आलेला अत्याधुनिक शहर बस डेपो पूर्णत्वास गेला असला, तरी ई बससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे काम रखडल्याने संपूर्ण प्रकल्प अडचणीत सापडला आहे. मनपा व स्मार्ट सिटी प्रशासनाने ऑलेक्ट्रा कंपनीकडून ३५ ई-बस घेण्यासाठी केलेला करार अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. चार वर्षांपासून मुदतवाढीवर मुदतवाढ दिली जात असताना कंपनीकडून केवळ दोन बसेस पाठविण्यात आल्या असून उर्वरित बसेस जून २०२६ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 03:35 PM (IST)

    29 May 2026 03:35 PM (IST)

    निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह

    पंजाबच्या पटियाला येथून एक धक्कादायक आणि भयानक बातमी समोर आली आहे. मागील निळ्या ड्रमची दहशत कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा असेच प्रकरण समोर आले आहे. अर्बन इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डीसीडब्ल्यू पुलाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हा निळा ड्रम सापडला. या ड्रमात पोलिसांना एका १५ ते २० वर्षांच्या तरुणीची मृतदेह सापडला आहे. मुलीचा दिसण्यावरुन ती दुसऱ्या राज्याची (प्रवासी) असल्याचा अंदाज आहे पण तिची नेमकी ओळख अजूनही पटलेली नाही. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 29 May 2026 03:25 PM (IST)

    29 May 2026 03:25 PM (IST)

    नेपाळमध्ये थेट अर्जाद्वारे होणार भारतासह 17 देशांतील राजदूतांची भरती

    Nepal Ambassador Vacancy Application 2026 : भारताचा शेजारी देश नेपाळमधून आंतरराष्ट्रीय राजकारणाला थक्क करणारी एक अतिशय मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) एका अधिकृत अधिसूचनेद्वारे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जाहीर अर्ज मागवून राजदूतांची (Ambassador) भरती करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने उचललेले हे पाऊल नेपाळमधील राजकीय आणि राजनैतिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. या निर्णयामुळे आता केवळ राजकीय ओळखीवर किंवा मर्जीतल्या लोकांना राजदूत बनवण्याची जुनी परंपरा मोडीत निघणार असून, खुल्या स्पर्धेतून गुणवान व्यक्तींना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 03:15 PM (IST)

    29 May 2026 03:15 PM (IST)

    बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई; केंद्र सरकारची नवी नियमावली लागू

    RTO Vehicle Sale Rules : जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या बाजारात चालणारा अनधिकृत दलालांचा सुळसुळाट, ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवाने घेणे सक्तीचा केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री किंवा एक्सचेंजचा व्यवसाय करणाऱ्यांनी रीतसर मान्यता घेणे कायदेशीररित्या बंधनकारक असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 03:05 PM (IST)

    29 May 2026 03:05 PM (IST)

    कागदी नोटा बंद होणार? बाजारात येणार प्लास्टिकच्या नोटा… RBI चा नेमका प्लॅन काय?

    Plastic Banknotes: भारतात सध्या अस्तित्वात असलेलं चलन हे कागदी नोटा आणि सिक्क्यांच्या समावेश होता. मात्र आता या चलनात बदल होणार आहे. भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याबाबतच्या चर्चांना आता वेग आला आहे. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्लास्टिकची चलन-नोटा लवकरच भारताच्या चलनात येऊ शकतात. ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या एका अहवालानुसार, देशात पॉलिमर नोटांची मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने या उपक्रमावर काम सुरूही केले आहे. नेमका काय आहे प्रोजेक्ट समजून घेऊयात. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 02:55 PM (IST)

    29 May 2026 02:55 PM (IST)

    मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये ई-चार्जिंग स्टेशन

    मुंबईतील पालिकेच्या सर्व वॉर्ड प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासोबतच आगामी काळात पालिका अधिकाऱ्यांच्या वापरासाठी असलेले पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहने टप्प्याटप्याने बदलून त्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याची तयारीही पालिकेने चालवली आहे. नुकत्याच स्थायी समितीत झालेल्या विरोध आणि सूचनांनंतर प्रशासनाने या हालचाली केल्या आहेत. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 02:45 PM (IST)

    29 May 2026 02:45 PM (IST)

    माधव भंडारींचा खळबळजनक दावा

    Madhav Bhandari on Muhammad Ali Jinnah News: पाकिस्तानचे निर्माते शेवटच्या काही तासांत मोहम्मद अली जिन्ना तीन-चार तास अॅम्युलन्समध्ये तडफडत होते, पण त्यांना शेवटच्या काही तासांत वैद्यकीय मदत मिळाली नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी शेवटच्या दिवसांत मोहम्मद अली जिन्ना यांचे खूप हाल केले, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी केला आहे. नवराष्ट्र’ला दिलेल्या विषेश मुलाखतीत ते बोलत होते. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 02:35 PM (IST)

    29 May 2026 02:35 PM (IST)

    Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच

    Xiaomi Smartphone Launched: टेक कंपनी शाओमीने यूरोपमध्ये त्यांच्या 17 सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Xiaomi 17T आणि Xiaomi 17T Pro यांचा समावेश आहे. Xiaomi 17T भारतात 4 जून रोजी लाँच केला जाणार आहे. तर 17T Pro भारतात कधी लाँच केला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. कंपनीने त्यांचे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. वाचा संविस्तर

  • 29 May 2026 02:25 PM (IST)

    29 May 2026 02:25 PM (IST)

    पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा! IMDचे अलर्ट जारी

    Weather Update News Marathi : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस देशातील सुमारे 15 राज्यांसाठी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागांत गारपिटीचा इशारा जारी केला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण अपडेट

  • 29 May 2026 02:15 PM (IST)

    29 May 2026 02:15 PM (IST)

    नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

    कर्जत : नेरळ गावच्या हद्दीवर असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत मधील खांडा भागातील अचानक नगर मधील रहिवाशी पावसाळा सुरू होण्याआधीच घाबरले आहे.तेथे जमीन विकासक बिल्डरने आजुबाजूच्या लोकांचा कोणताही विचार न करता मातीचा भराव आपल्या जमिनीमध्ये केला आहे.त्याचा परिणाम तेथून पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बंद होणार आहे.त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडकून पडणार असून पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरणार आहे. दरम्यान,अलायन्स ग्रुप या बांधकाम व्यावसायिक विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 02:05 PM (IST)

    29 May 2026 02:05 PM (IST)

    शास्त्रज्ञांचा 'सुपर एल निनो'बाबत जगाला सर्वात मोठा इशारा

    Super El Nino Wave Pacific Ocean 1000 km : आपल्या पृथ्वीवरील हवामान चक्र अत्यंत वेगाने बदलत असून निसर्ग आता मानवाला नवनवीन आव्हाने देऊ लागला आहे. अंतराळात फिरणाऱ्या एका आधुनिक युरोपीय उपग्रहाने पॅसिफिक महासागराच्या पोटात एक अशी रहस्यमय आणि प्रचंड मोठी गडबड टिपली आहे, ज्याने जगभरातील हवामानशास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. वाचा सविस्तर

  • 29 May 2026 01:50 PM (IST)

    29 May 2026 01:50 PM (IST)

    पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा!

    भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस देशातील सुमारे 15 राज्यांसाठी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागांत गारपिटीचा इशारा जारी केला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 29 May 2026 01:40 PM (IST)

    29 May 2026 01:40 PM (IST)

    एकाच वेळी Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच

    टेक कंपनी शाओमीने यूरोपमध्ये त्यांच्या 17 सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Xiaomi 17T आणि Xiaomi 17T Pro यांचा समावेश आहे. Xiaomi 17T भारतात 4 जून रोजी लाँच केला जाणार आहे. तर 17T Pro भारतात कधी लाँच केला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. कंपनीने त्यांचे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत.

  • 29 May 2026 01:30 PM (IST)

    29 May 2026 01:30 PM (IST)

    पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती

    पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यातच पुण्यात बाह्य रिंगरोडच्या कामांना गती मिळताना दिसत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. यामुळे आता पुण्यात येणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे.

  • 29 May 2026 01:20 PM (IST)

    29 May 2026 01:20 PM (IST)

    एव्हरेस्टवर मृत्यू पावलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह परत का आणले जात नाहीत?

    अतिउच्च उंचीवरून मृतदेह खाली आणण्याच्या मोहिमा अत्यंत खर्चिक असतात. अरुण कुमार तिवारी यांच्या निधनानंतर, त्यांचा मृतदेह बेस कॅम्पपर्यंत सुरक्षित खाली आणण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी सुरुवातीला १ कोटी रुपयांची मागणी केली होती, जी नंतर वाटाघाटी करून ९४ लाख रुपयांवर आली. हा आकडा कोणत्याही सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाचे कंबरडे मोडण्यासाठी पुरेसा आहे. एवढी मोठी रक्कम उभी करणे तात्काळ शक्य नसल्याने, अनेक कुटुंबे अत्यंत जड अंतःकरणाने मृतदेह हिमालयाच्या कुशीतच सोडून देण्याचा निर्णय घेतात. काही प्रकरणांमध्ये, गिर्यारोहक स्वतः शिवभक्त असल्याने त्यांचे कुटुंब तो मृतदेह पवित्र हिमालयाचाच एक भाग मानून तिथेच राहू देते.

  • 29 May 2026 01:10 PM (IST)

    29 May 2026 01:10 PM (IST)

    UN Blacklist : UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं

    संयुक्त राष्ट्रांनी एक खळबळजनक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. रशिया (Russia) आणि इस्रायलला ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. युद्धकाळात सामान्य नागरिकांवर लैंगिक हिंसाचाराच्या घटनांचा आरोप या दोन्ही देशांवर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुरक्षा परिषदेच्या सुत्रांकडून माहिती मिळाल्याचा हवाला दिला आहे. मात्र, या निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • 29 May 2026 01:00 PM (IST)

    29 May 2026 01:00 PM (IST)

    BSF India : 10 मिनिटांचा ‘खेळ’ अन् भारतात एंट्री; बांगलादेशी घुसखोरांनी स्वतःच उघड केले सीमेवरील दलालांचे धक्कादायक रॅकेट

    Bangladeshi illegal immigrants India 2026 : भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या भारत-बांगलादेश सीमेवरून होणाऱ्या अवैध घुसखोरीबाबत एक अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणारा खुलासा समोर आला आहे. ४,१०० किलोमीटर लांबीची ही महाकाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बांगलादेशी (Bangladesh) नागरिक भारतात कसे प्रवेश करतात, याचे धक्कादायक गुपित खुद्द अवैध स्थलांतरितांनीच एका वृत्तवाहिनी आणि स्थानिक माध्यमांसमोर उघड केले आहे. हा केवळ सीमेवरील सुरक्षेतील त्रुटींचा भाग नसून, यामागे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये पसरलेले दलाल, एजंट आणि काही स्थानिक राजकीय घटकांचे एक सुनियोजित आणि संघटित जाळे (सिंडिकेट) कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

  • 29 May 2026 12:45 PM (IST)

    29 May 2026 12:45 PM (IST)

    Maharashtra Politics : कोकण विधान परिषदेत शेकापची मोठी एन्ट्री! अरविंद म्हात्रे मैदानात, महायुतीचे टेन्शन वाढले

     कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) अचानक एन्ट्री घेतल्याने निवडणुकीचे समीकरण अधिकच रंजक बनले आहे. माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच पनवेल महापालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांची उमेदवारी निश्चित करत शेकापने थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

    रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील तब्बल १०२१ मतदार असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारीवर एकमत होत नसतानाच शेकापने आपली चाल खेळली आहे. त्यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • 29 May 2026 12:35 PM (IST)

    29 May 2026 12:35 PM (IST)

    ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात भाजपच्याही काही लोकांचा संबंध: संजय राऊतांचा आरोप

    लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट परीक्षा (NEET Examination) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार टाळण्यासाठी नीटच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत असेल, तर ते सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.

  • 29 May 2026 12:30 PM (IST)

    29 May 2026 12:30 PM (IST)

    करोडोंचे मालक असूनही कोट्यवधींचे कर्ज! तरीही देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री Siddaramaiah !

    Karnataka Former CM Siddaramaiah Net Worth: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. पण या सगळ्यात सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीसोबतच चर्चा रंगली ती त्यांच्या मालमत्ता आणि दायित्वांविषयीची. एकीकडे कर्जाचं ओझं तर दुसरीकडे करोडोंची संपत्ती असलेल्या या मुख्यमंत्र्यांची नेमकी संपत्ती किती याबाबत चर्चा रंगल्या आहेत. ADR आणि ‘MyNeta’ च्या अहवालांनुसार, ७७ वर्षीय सिद्धरामय्या हे देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री मानले जातात. नेमके काय आहेत आकडे? तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

  • 29 May 2026 12:20 PM (IST)

    29 May 2026 12:20 PM (IST)

    Russia Taliban Deal : पाकिस्तानचे दाबे दणाणले! रशिया-तालिबानमध्ये सर्वात मोठा संरक्षण करार, जगभरात खळबळ

    काबूल/मॉस्को : पाकिस्तानसाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. रशिया आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. या करारानुसार, रशिया तालिबानला अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा पुरवणार आहे. या करारामुळे दक्षिण आशियातील समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे. हा करार पाकिस्तानसाठी धक्कादायक मानला जात आहे. नुकतेच रशियामध्ये उच्चस्तरीय संरक्षण बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रशियन सुरक्षा परिषद आणि तालिबानचे संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आला. यामुळे दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला बळकटी मिळाली आहे. या कराराअंतर्गत शस्त्रास्त्रच नाही, तर रशिया तालिबान सैन्याला विशेष लष्करी प्रशिक्षणही देणार आहे. हवाई संरक्षण प्रणालीसोबतच जमिनीवरील कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध शस्त्रांचा पुरवठा देखील तालिबानला केला जाणार आहे.

  • 29 May 2026 12:07 PM (IST)

    29 May 2026 12:07 PM (IST)

    48 तासांत 15 जणांचा मृत्यू; पुण्यात संशयास्पद मृत्यूंची मालिका, विषारी दारू कांडातील मुख्य आरोपी जेरबंद

    हाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 15 जणांच्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या अनेक मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. त्याने रसायने आणि इंडस्ट्रियल स्पिरिट मिसळलेली विषारी दारू पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे, ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. पोलीस सध्या त्याची चौकशी करत असून संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.

  • 29 May 2026 12:00 PM (IST)

    29 May 2026 12:00 PM (IST)

    हप्ता थकविल्याने फायनान्स कर्मचाऱ्यांकडून कानशिलात लगावली

    मोबाईलचा हप्ता थकल्यावल्यावरून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला मारहाण केली. तर त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. दरवाजावर जोरात लाथ मारल्याने संबंधित व्यक्तीच्या डोळ्याला जखम झाली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इद्रीस सैफुद्दीन सायकलवाला (वय ५९,रा.भाग्योदयनगर कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कोंढवा परिसरात घडला आहे.

  • 29 May 2026 11:50 AM (IST)

    29 May 2026 11:50 AM (IST)

    ‘डॉन 3’ वादावर सलमान खानचा हस्तक्षेप

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘डॉन ३’ या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादात अडकला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर चित्रपटासाठी बंदी घातली. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता सलमान खानने रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील या वादात हस्तक्षेप करत, या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 29 May 2026 11:40 AM (IST)

    29 May 2026 11:40 AM (IST)

    ‘मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान’; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

    मनोज जरांगे यांना आरक्षण आणि लोकशाहीच्या संवैधानिक बाबींचे शून्य ज्ञान आहे. सरकारने आजवर त्यांचे केवळ अवाजवी लाड पुरवले आहेत आणि याच लाडामुळे आज ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होऊन संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ‘अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा’ म्हणत उपरोधिक टोलाही लगावला.

  • 29 May 2026 11:30 AM (IST)

    29 May 2026 11:30 AM (IST)

    मुलाच्या शाैचावरुन वाद; लोखंडी राॅडने मारहाण करत महिलेला केले ठार, परिसरात तणावाचे वातावरण

    बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्याने संपूर्ण राज्याला हादरवलं. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे पुढे भीषणतेत रुपांतर झालं आणि जमावाने मारहाण करत महिलेचा जीव घेतला. घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत असून मुलाच्या शाैचावरुन हा वाद सुरु झाला होता. संतप्त जमावाने महिलेला लोखंडी सळईने मारण्यास सुरुवात केली ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सांगण्यात येत आहे की, घटनेस्थळी पोलिस उशीराने पोहचल्याने स्थानिकांनी त्यांच्यांवरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला हाणले.

  • 29 May 2026 11:20 AM (IST)

    29 May 2026 11:20 AM (IST)

    पुणे-पिंपरी हादरले ! केमिकलयुक्त विषारी दारूमुळे 15 जणांचा संशयास्पद मृत्यू; प्रशासनासमोरच मृत्यूचे थैमान

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी घोट’ने अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त केले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे याचे नाव समोर आले आहे. वानखेडे याने हडपसर परिसरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी जिवाशी खेळणारा विषारी दारूचा अड्डा चालवला होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा 15 जणांचा मृत्यू झाला.

  • 29 May 2026 11:10 AM (IST)

    29 May 2026 11:10 AM (IST)

    शिवभक्तांसाठी गूड न्यूज! कैलास यात्रेवर नेपाळचा एकच हेका; भारतीय भक्तांसाठी चीनसमोर ठेवली मोठी अट

    हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि मोक्षाचे द्वार मानल्या गेलेल्या कैलास मानसरोवर यात्रेला (kailas mansarovar yatra)  जाण्याची इच्छा प्रत्येक शिवभक्ताची असते. परंतु, भौगोलिक अडचणी आणि आंतरराष्ट्रीय नियमांमुळे दरवर्षी हजारो भक्तांना या यात्रेपासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर शेजारील देश नेपाळने भारतीय यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नेपाळ पर्यटन विभाग आणि तेथील स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीजनी भारतीय भाविकांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली असून, चीन सरकारकडे भारतीयांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी एक मोठी आणि अधिकृत मागणी केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि नेपाळमधील शतकानुशतके असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध आणखी घट्ट होणार आहेत.

  • 29 May 2026 11:02 AM (IST)

    29 May 2026 11:02 AM (IST)

    ‘दहशतवादाविरोधात दुहेरी मापदंड खपवून घेणार नाही’ ; मॉस्कोतून अजित डोवाल यांची मोठी घोषणा

    मॉस्को : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) रशियाला एका आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी गेले होते. या बैठकीचे आयोजन रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख सर्गेई शोइगु यांनी केले होते. यामध्ये जगभरातील १५० हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. यावेळी सुरक्षा परिषदेला संबोधित करताना अजित डोवाल यांनी एक मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी दहशतवादावर भारताची भूमिका देखील स्पष्ट केली.

  • 29 May 2026 10:59 AM (IST)

    29 May 2026 10:59 AM (IST)

    प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर..; अहिल्यानगर विधानपरिषदेची बदलणार समीकरणे

    राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच वाढत चालली आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाले आहे. यामुळे अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

  • 29 May 2026 10:49 AM (IST)

    29 May 2026 10:49 AM (IST)

    Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री

    गेल्यावर्षी EICMA मध्ये पहिल्यांदा बुलेट 650 सादर करण्यात आली. त्यानंतर अखेर रॉयल एनफिल्डने भारतातील त्यांच्या 650cc पोर्टफोलियोमध्ये बुलेटचे नाव जोडले. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3,64,856 रुपये ठेवण्यात आली आहे. ही ही किंमत क्लासिक 650 ट्विनच्या ब्रंटिंगथॉर्प ब्लू आणि वॅलम रेड या दोन बेस कलर मॉडेल्स इतकी आहे.

  • 29 May 2026 10:39 AM (IST)

    29 May 2026 10:39 AM (IST)

    शाहरूख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, Karan Johar ने अनेक बॉलिवूड स्टार्सना केलं अनफॉलो

    करण जोहर हा बॉलिवूडमधील अशा चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे, जो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. लोकांचा असा विश्वास आहे की तो बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देतो. त्याने अनेक स्टार किड्सना बॉलिवूडचा मार्ग दाखवला आहे, तर दुसरीकडे करण जोहर बाहेरच्या प्रतिभेला महत्त्वही देत ​​नाही. एवढे आरोप होऊनही करण जोहर शांत राहिला आहे. दरम्यान, करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रातोरात करण जोहरने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सना अनफॉलो केले. मध्यरात्री आपले इंस्टाग्राम अकाउंट क्लिअर केल्यानंतर करण जोहरने आपल्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. करण जोहरने दावा केला आहे की तो डिजिटल डिटॉक्स करत आहे, त्यामुळे या कृतीकडे जास्त लक्ष दिले जाऊ नये.

  • 29 May 2026 10:29 AM (IST)

    29 May 2026 10:29 AM (IST)

    ग्रामीण राजकारणाचा पारा चढणार! सोलापूरमधील ७०१ ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम

    जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७०१ ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमधून विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून ८ जुलैपर्यंत अंतिम आरक्षण रचना निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला आतापासूनच वेग आला आहे.

  • 29 May 2026 10:19 AM (IST)

    29 May 2026 10:19 AM (IST)

    ‘पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

    देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असताना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • 29 May 2026 10:09 AM (IST)

    29 May 2026 10:09 AM (IST)

    सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump

    अमेरिकेच्या कायद्यात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत चर्चेंच्या केंद्रस्थानी असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणखी वादग्रस्त निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यांचा चेहरा २५० डॉलर्सच्या नोटेवर छापण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत नव्या वादाची ठिणगी उडाली आहे. नेमका काय आहे प्रस्ताव आणि कोणी मांडला जाणून घेऊ?

  • 29 May 2026 09:50 AM (IST)

    29 May 2026 09:50 AM (IST)

    गाझा युद्धादरम्यान बेंजामिन नेतान्याहूंचे मोठे वक्तव्य

     मध्य पूर्वेतील (Middle East) भूराजकीय परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत असून युद्धाची ठिणगी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भडकण्याची चिन्हे आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एका विशेष जाहीर कार्यक्रमात इस्रायली संरक्षण दलाला (IDF) गाझा पट्टीच्या तब्बल ७० टक्के भागावर संपूर्ण लष्करी नियंत्रण प्रस्थापित करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. या अत्यंत संवेदनशील घोषणेसोबतच नेतान्याहू यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे स्थान अधोरेखित करताना, भारत हा इस्रायलचा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा समर्थक देश असल्याचे म्हटले आहे.

Web Title: 29th may 2026 live breaking news marathi maharashtra national international petrol diesel price hike marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime news
  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Crime News: चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल
1

Crime News: चित्रपटासारखा थरार! जुन्या वैमनस्यातून चालकाचा पाठलाग करून अपहरण; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात
3

Blue Drum Case: एका हातावर हार्ट, दुसऱ्यावर नावाचा टॅटू, निळ्या ड्रमात सापडला तरुणीचा मृतदेह; ओळख अजूनही गुलदस्त्यात

आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडने…
4

आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.