Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू

सुप्रीम कोर्टने अटकेबाबत ‘अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य’ प्रकरणातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशीशिवाय बेट अटक केली जाऊ नये, कोर्टाने आरोपीचे अपील फेटाळून लावत म्हटले की, या प्रकरणातील गुन्हेगारी कारवाई रद्द करण्यासाठी कोणताही आधार नाही

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 10:10 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today

Maharashtra Breaking News Updates Today

Follow Us
Follow Us:
  • 04 Aug 2026 10:10 AM (IST)

    04 Aug 2026 10:10 AM (IST)

    रबर बुलेट लागून गौरव खन्ना जखमी; नेटकऱ्यांचा संताप

    लिव्हिजनवरील लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15′ सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका धोकादायक टास्कमुळे शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्पर्धक गौरव खन्ना याने टास्कनंतर आपल्या पाठीवरील जखमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी शोच्या निर्मात्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

  • 04 Aug 2026 10:00 AM (IST)

    04 Aug 2026 10:00 AM (IST)

    Gen-Z नंतर आता पुन्हा दुसरे आंदोलन पेटले; मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज

    जयपूरमध्ये रॅली काढणाऱ्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यापूर्वी, आंदोलक आणि पश्चिम डीसीपी प्रशांत किरण यांच्यात झटापट झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे वापरले. यादरम्यान, काही लोकांनी पाण्याचे फवारे मारणाऱ्या व्हॅनमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. रॅलीजवळून जाणारी एक रुग्णवाहिकाही अडकली. मात्र, आंदोलकांनी रस्ता मोकळा करून तिला बाहेर काढले.

  • 04 Aug 2026 09:36 AM (IST)

    04 Aug 2026 09:36 AM (IST)

    BIHAR POLITICS: प्रशांत किशोरांचा नितीन नवीनांच्या बांकीपूरच्या गडाला सुरुंग

    BIHAR POLITICS: बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज्य पक्षाचे प्रमुख आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी धक्कातंत्राचा वापर करत मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे नेते नितीन नबीन यांच्या या पारंपरिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बांकीपूरच्या गडाला किशोर यांनी लावलेल्या सुरुंगामुळे देशभरात भाजपचा मतदारसंघ सुरक्षित नसल्याचा संदेश गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. बांकीपूर मतदारसंघात अवघे ३४.३ टक्के मतदान झाले होते. या कमी मतदानानंतरही प्रशांत किशोर यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांनी यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 04 Aug 2026 09:30 AM (IST)

    04 Aug 2026 09:30 AM (IST)

    FUEL PRICE UPDATE:   कच्च्या तेलाचे दर घसरले 

    FUEL PRICE UPDATE:    केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील 'विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क' म्हणजेच 'विंडफॉल टॅक्स'मध्ये (Windfall Tax) वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून सकाळी ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल $84.14 वर पोहोचला होता.

    पेट्रोल निर्यात शुल्क: प्रति लिटर ₹२.५ वरून वाढवून ₹३.५ करण्यात आले आहे.

    डिझेल निर्यात शुल्क: दोन्ही करांसह प्रति लिटर ₹१५.५ वरून थेट ₹२५.५ प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे.

  • 04 Aug 2026 09:25 AM (IST)

    04 Aug 2026 09:25 AM (IST)

    MUMBAI CRIME: बीएमसीसमोरच दोन कंत्राटदारांचा  एकमेकांवर चाकूने प्राणघातक हल्ला 

    MUMBAI CRIME  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'एफ नॉर्थ' प्रभाग कार्यालयासमोर (वॉर्ड ऑफिस) दोन कंत्राटदारांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेंडरच्या वादातून ही हाणामारी झाली असून दोन्ही कंत्राटदारांनी एकमेकांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हिंसक घटनेत दोन्ही कंत्राटदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही कंत्राटदारांकडे धारदार चाकू होते. या हल्ल्यात एकाच्या पोटावर तर दुसऱ्याच्या पायावर चाकूचे गंभीर वार झाले आहेत.

  • 04 Aug 2026 09:15 AM (IST)

    04 Aug 2026 09:15 AM (IST)

    SHALMALI KHOLGADE:  मुस्लिम मुलाशी लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना शाल्मली खोलगडेचे सडेतोड उत्तर

    SHALMALI KHOLGADE: बॉलिवूडमधील अनेक हिट गाण्यांना आपला आवाज देणारी लोकप्रिय मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिचा फरहान शेखसोबतचा संसार अत्यंत सुखात सुरू आहे. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि 'लव्ह जिहाद'सारख्या टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाल्मलीने तिच्या लग्नाबाबत आणि पालकांच्या पाठिंब्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

     शाल्मलीने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडले आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनी या आंतरधर्मीय नात्याला कधीच विरोध केला नाही. त्यांनी मला लग्नाआधी फक्त दोनच महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळताच त्यांनी या लग्नाला मोकळ्या मनाने थेट होकार दिला."

  • 04 Aug 2026 09:10 AM (IST)

    04 Aug 2026 09:10 AM (IST)

    SUPREME COURT: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी 

    SUPREME COURT:  शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या चिन्हाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.  पक्षाचे मूळ चिन्ह असणारे 'धनुष्यबाण' आपल्यालाच मिळेल आणि जर ते मिळाले नाही तर ते गोठवले जाईल, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि या सत्तासंघर्षाला काय वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 04 Aug 2026 09:00 AM (IST)

    04 Aug 2026 09:00 AM (IST)

    Congress Politics: काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा

    बंगळूर : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारच्या पहिल्या मोठ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगदी आधी, सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या दोन ज्येष्ठ आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. यामध्ये विजयपुरा जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंथ राय गौडा व्ही. पाटील आणि शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपालकृष्ण यांचा समावेश आहे. या दोघांनीही काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप केला आहे.

    यशवंथ राय गौडा व्ही. पाटील आणि बेलूर गोपालकृष्ण या दोन्ही आमदारांनी उपसभापतींकडे आपले राजीनामे सादर केले. शपथविधी सोहळ्याच्या अगदी आधी यशवंत राय गौडा यांनी राजीनाम्याची प्रक्रिया सुरू केली. ते विधान सौधमध्ये गेले आणि विधानसभेचे उपसभापती रुद्रप्पा लामानी यांच्याकडे आपला अधिकृत राजीनामा सादर केला. त्यानंतर लगेचच, त्यांच्या समर्थकांनी बंगळूरुमध्ये आंदोलन केले.

  • 04 Aug 2026 08:50 AM (IST)

    04 Aug 2026 08:50 AM (IST)

    Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार!

    India Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करता आज, ४ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सपाट किंवा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट ते सकारात्मक असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा २० अंकांनी अधिक, सुमारे २४,६६९ वर व्यवहार करत होता.

Maharashtra to National And International Breaking News:

Supreme Court On Live In Relationship: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court On Live In Relationship: जोडीदार किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा अत्याचार यांसारख्या प्रकरणांमध्ये, लिव्ह-इन जोडीदाराला पत्नीप्रमाणेच अधिकार असतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच एखादे लिव्ह-इन रिलेशनशिप हे लग्नाच्या स्वरूपाचे असेल आणि दोन्ही बाजूंचा लग्न करण्याचा उद्देश असेल तर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ जे पती किंवा त्याच्च्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या क्रूरतेशी संबंधित आहे ते आता लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनाही लागू होईल, अस कोर्टाने सोमवारी म्हटले. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, कलम ४९८-अ अशा लिव्ह-इन संबंधांनाही लागू होऊ शकते जे वैवाहिक नात्यासारखे प्रस्थापित झाले आहेत. वाचा सविस्तर- 

Web Title: 4 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime share national international share market gold rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Supreme Court On Live In Relationship: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
1

Supreme Court On Live In Relationship: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Pawar Health Update: प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ
2

Rohit Pawar Health Update: प्रकृती अस्वस्थ्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ

Pankaja Munde On Political Exit:  कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
3

Pankaja Munde On Political Exit: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान
4

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.