रोजच्या बातम्या एका क्लिकवर
02 Dec 2025 12:25 PM (IST)
तामिळनाडूमध्ये विभक्त पत्नीची विळ्याने हत्या करून पतीने मृतदेहासोबत सेल्फी काढून व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकला. ‘विश्वासघात’ असा दावा करत केलेल्या या कृत्यामुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
02 Dec 2025 12:20 PM (IST)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैसे आणल्याचा गंभीर आरोप केला. अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, ही निवडणूक आहे की पैशाची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय. आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का? सगळे कायदे धाब्यावर. शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात ? शिंदेंनीं मालवण ला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते ? भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटत आहेत असे रिपोर्ट येत आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
ही निवडणूक आहे की पैशाची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय.
आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का?
सगळे कायदे धाब्यावर. शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात ?
शिंदेंनीं मालवण ला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते ? भाजप तर असंख्य…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2025
02 Dec 2025 12:15 PM (IST)
कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाची मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले.
02 Dec 2025 12:10 PM (IST)
मतमोजणीबाबत निवडणूक आयोगच निर्णय घेणार, मी नाराज नाही. नाराज असून कसं चालणार? एकाच बाबतीत नाराजी होती, माझीही इच्छा होती फॉर्म भरायची. पण राहून गेलं अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
02 Dec 2025 12:07 PM (IST)
मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची मोठी कारवाई; दादरसह 30+ ठिकाणी छापेमारी. करचोरीच्या संशयावरून तपास सुरू. संस्थापक राज शेट्टींच्या ठिकाणीही सर्च. पूर्वीही हॉटेलवर अनेकवेळा छापे पडले आहेत.
02 Dec 2025 12:00 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. सीरिया आणि इस्रायलमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. गेल्या काही काळात इस्रायल सतत सीरियावर हल्ले करत असून ट्रम्प यांनी इस्रायलला सीरियावरील हल्ले थांबवण्याचा आणि दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
02 Dec 2025 11:55 AM (IST)
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील ७ डिसेंबरचा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. कथानकात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका अनपेक्षित अध्यात्मिक वळणामुळे संपूर्ण मालिकेमधील घटना बदलणार आहेत. इंद्रायणी आणि श्रीकला यांच्या संघर्षाला या प्रसंगामुळे नवी धार मिळणार असून घराघरात उत्सुकता निर्माण करणारा नाट्यमय क्षण उलगडणार आहे. श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागणार आहे.
02 Dec 2025 11:50 AM (IST)
बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेला सॅमसंगचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन अखेर आता अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. कंपनीने Samsung First TriFold Phone दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका ईव्हेंटमध्ये सादर केला आहे. हा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी अधिकृतपणे सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये लाँच केला जाणार आहे. यानंतर हा स्मार्टफोन अमेरिका, चीन, तैवान, सिंगापुर आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. वाचा सविस्तर
02 Dec 2025 11:45 AM (IST)
कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाली आहे. यामुळे फ्लाइटते मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले. वाचा सविस्तर
02 Dec 2025 11:40 AM (IST)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया सध्या दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने याची पुष्टी केली आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिदा जिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
02 Dec 2025 11:35 AM (IST)
Sanchar Saathi App: दूरसंचार मंत्रालयाने Apple, Samsung, Vivo आणि Oppo सारख्या सर्व प्रमुख स्मार्टफोन कंपन्यांना नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारी मालकीचे सायबर सुरक्षा अॅप Sanchar Saathi प्री-इंस्टॉल करण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर
02 Dec 2025 11:30 AM (IST)
नांदेड मध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून एका १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात होती. सक्षण ताटे नावाच्या तरुणाची हत्या झाली होती.त्याची हत्या प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि दोन भावांनी मिळून केली होती.दरम्यान आंचलने या प्रकरणा आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आंचलने सांगितले की, ते सक्षमच्या वाढदिवसानंतर पळून जाऊ लग्न करणार होते. पण यापूर्वीची त्याची हत्या करण्यात आली.
02 Dec 2025 11:25 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. दुसरा वनड सामना हा दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. १ वाजता नानेफेक होईल. या मालिकेचा पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. वाचा सविस्तर
02 Dec 2025 11:20 AM (IST)
पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतात आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले असून तीन पोलिस ठार झाल्याची आणि तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये सतत हल्ले होत असतात. दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केला होता. यातील एकजण जखमी झाल आहे, तर दुसऱ्याने तिथून पळ काढला आहे. सध्या हल्ल्यामागच्या कारणाचा तपास घेतला जात आहे.
02 Dec 2025 11:15 AM (IST)
वाठार (ता. कराड) परिसरात मंगळवारी पहाटे नाशिकहून सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ ते दहा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
02 Dec 2025 11:10 AM (IST)
नोव्हेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या नीचांकी ५६.६ वर पोहोचला. ही घसरण प्रामुख्याने विक्री आणि उत्पादनातील मंद वाढीमुळे झाली, जी वाढत्या बाजारपेठेतील आव्हानांना प्रतिबिंबित करते, मवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
02 Dec 2025 11:05 AM (IST)
अरबिंदो आश्रम हा पुदुच्चेरी येथे असणारा एक आध्यात्मिक समुदाय आहे. १९१० मध्ये आजच्या दिवशी या आश्रमाची स्थापना झाली होती. याची स्थापना श्री अरबिंदो यांनी केली होती. १९२६ मध्ये त्यांनी आश्रमाचे नियंत्रण त्यांची सहकारी मिरा अल्फासा (ज्यांना ‘आई’ म्हणूनही ओळखले जाते) यांच्याकडे दिले. हा आश्रम योग आणि आध्यात्मिक साधनेवर केंद्रित आहे, जिथे कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय भेट दिली जाऊ शकते. आजही आध्यात्मिक ध्यानसाधनेचे अनोखे केंद्र म्हणून अरबिंदो आश्रम ओळखला जातो.
02 Dec 2025 11:00 AM (IST)
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukriane War) जवळपास गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक राजकीय प्रयत्न करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर
बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.






