Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
24 Jan 2026 10:43 AM (IST)
बांग्लादेशने माघार घेतल्यानंतर, आयसीसी शनिवारी स्कॉटलंडला नवीन संघ म्हणून मान्यता देण्याची अपेक्षा आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह सध्या दुबईमध्ये आहेत आणि बांग्लादेशच्या विश्वचषकातून माघार घेण्याची अधिकृत घोषणा देखील शक्य आहे. बांग्लादेशला या स्पर्धेसाठी ग्रुप सी मध्ये ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली यांचा समावेश आहे.
24 Jan 2026 10:36 AM (IST)
टेक कंपनी सॅमसंग यूजर्ससाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे. कंपनी त्यांच्या यूजर्सना 10,000 रुपयांचे अॅमेझॉन गिफ्ट कार्ड मोफत मिळणार आहे. पण यासाठी यूजर्सना एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. दक्षिण कोरियाई कंपनीने फिट इंडिया वॉकेथन (Fit India Walk-a-thon) 2026 ची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत सॅमसंगच्या हेल्थ अॅपवर एक स्टेप-काउंट चॅलेंज समाविष्ट आहे. हे चॅलेंज लोकांना स्वस्थ आणि हेल्थी राहण्यासाठी प्रेरणा देते. लोकांमध्ये आरोग्याविषयक जागरुकता पसरविण्यासाठी हे कँपेन सुरु करण्यात आले आहे.
24 Jan 2026 10:28 AM (IST)
मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेसोबत सत्तेच्या समीकरणावर एकमत न झाल्यामुळे मुंबई महापौर पदाची निवडणूक लाबंणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी लागणारा ११४ चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तावाटपाचे समीकरण न जुळल्यामुळे महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडू शकते.
24 Jan 2026 10:20 AM (IST)
अल्पावधीत दणदणीत नफ्याचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने ओळखीचा गैरफायदा घेत इन्फिनिटी कॅपीटल नावाच्या कंपनीत १ लाख ७२ हजार रुपये गुंतवण्यास सांगून फसवणूक केली. हा प्रकार ६ डिसेंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान सातारा परिसरातील विद्यानगरात घडला.
24 Jan 2026 10:12 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज अंडर 19 चा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना शनिवार, २४ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या सामन्यांची सुरूवात भारतीय वेळेनुसार दुपारी १:०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १२:३० वाजता होईल. तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर भारतीय अंडर-१९ संघ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघ यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक सामना पाहू शकता. तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप वापरून तुमच्या मोबाईल फोनवर भारतीय अंडर-१९ संघ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघ यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक सामना पाहू शकता.
24 Jan 2026 10:04 AM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतून एक मोठी घटना समोर आली आहे. कराची येथे पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये मोठी चकमक झाली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी २०२६) झालेल्या या चकमकीत ६ दरोडेखोर ठार झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी देखील जप्त करण्यात आला आहे. याच वेळी पंजाबच्या सिंध प्रांतात एक भीषण अपघात घडला आहे.
24 Jan 2026 09:50 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आधीच दोषमुक्त केल्यानंतर, आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. मात्र, पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने तपास यंत्रणांनी त्यांना क्लिन चिट दिली आहे. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर न्याय मिळाल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
24 Jan 2026 09:40 AM (IST)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून, अहिल्यानगरमध्ये १२.५ अंश सेल्सिअस या राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर देशात लुधियाना येथे ४.४ अंश सेल्सिअससह सर्वांत कमी तापमान नोंदवले गेले.
पुढील काही तास मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. दुसरीकडे, देशातील आठ राज्यांमध्ये पुढील १२ तासांत मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस पुढील ४८ तास सुरू राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
24 Jan 2026 09:30 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या आणि शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य सरकारने १८१ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट शेअर करून यासंदर्भात माहिती दिली.
योजनेची e-KYC प्रक्रिया करताना तांत्रिक चुकांमुळे किंवा चुकीचा पर्याय निवडल्याने काही महिलांचे लाभ स्थगित झाले आहेत. अशा तक्रारींची दखल घेत सरकारने १८१ या महिला हेल्पलाईनवर मदत उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, लाभार्थी महिलांना आता फोन कॉलवरच आपल्या शंकांचे समाधान करून घेता येणार आहे. तांत्रिक अडचणी असल्यास बहिणींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.
24 Jan 2026 09:20 AM (IST)
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या कथित नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनंतर, आता या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
आरजे महवशने अलीकडेच एक पोस्ट शेअर करत, "लोक मला सोडून गेले ते बरेच झाले, मी आता माझ्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहे," असे सूचक विधान केले आहे. महवशच्या या आरोपवजा पोस्टनंतर युजवेंद्र चहलनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या सर्व घडामोडींमुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे जवळपास स्पष्ट मानले जात असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये याची मोठी चर्चा आहे.
24 Jan 2026 09:10 AM (IST)
देशातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई केली आहे. आरबीआयने २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या सहकारी बँकांसह एकूण चार वित्तीय संस्थांना आर्थिक दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने तीन सहकारी बँका आणि एका गुंतवणूक कंपनीने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित (पुणे): नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकेवर आर्थिक दंड लादण्यात आला आहे.
श्री कन्याका नागरी सहकारी बँक लिमिटेड (चंद्रपूर): बँकिंग नियमावलीतील त्रुटींमुळे या बँकेलाही दंड भरावा लागणार आहे.
श्री सत्य साई नागरिक सहकारी बँक मर्यादित (भोपाळ, मध्य प्रदेश): या बँकेवरही आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.
24 Jan 2026 09:00 AM (IST)
चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात शुक्रवारी मोठा भूकंप झाला. गटनेता पदावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादातून काँग्रेस पक्षात उघडपणे दोन गट पडले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या समर्थक १३ नगरसेवकांसह स्वतंत्र गटाची नोंदणी केल्यामुळे काँग्रेसमधील गृहकलह आता चव्हाट्यावर आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात नाट्यमय घडामोडी शुक्रवारी संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या निवडून आलेल्या २७ पैकी १३ नगरसेवकांना सोबत घेऊन नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली. तिथे त्यांनी अधिकृतरीत्या आपल्या गटाची नोंदणी केली.
24 Jan 2026 08:55 AM (IST)
Pune News: पुणे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा निवासस्थान असलेला ऐतिहासिक 'महापौर बंगला' पुन्हा एकदा गजबजण्यासाठी सज्ज होत आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला नवा महापौर मिळणार असल्याने, या बंगल्यात सध्या रंगकाम आणि नवीन फर्निचर तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अद्याप सत्तेचे समीकरण जुळलेले नाही. परिणामी, ३१ जानेवारी रोजी होणारी महापौरपदाची निवडणूक आता लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपकडे ८९ तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे मिळून बहुमत होत असले तरी, अद्याप गटनोंदणी प्रक्रिया (Group Registration) पूर्ण झालेली नाही. या तांत्रिक बाबीमुळे आणि दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे निवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.






