Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live updates- इंग्लडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये करुन नायर याचे 7 वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले होते, पण त्याने त्या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. सध्या सुरु असलेल्या मालिकेमधून करुन नायर याला वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी करुण नायरची निवड झाली. मात्र, तो पुरेशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याची कर्नाटक क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याची आगामी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. मयंक अग्रवालकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
07 Oct 2025 07:17 PM (IST)
Gautami Patil News : पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हे सध्या जोरदार चर्चेत आली आहे. अनेकदा अश्लील नृत्यामुळे चर्चेमध्ये आलेली गौतमी पाटील (Gautami Patil) हे आता अपघाताच्या प्रकरणामध्ये अडकली आहे. याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. पुण्यातील अपघातामध्ये पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीनचीट दिली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
07 Oct 2025 06:42 PM (IST)
Kamalabai Gavai : नवी दिल्ली : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या मातोश्री कमलाबाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
07 Oct 2025 06:26 PM (IST)
आजकाल अनेक युजर्स नोकरीच्या शोधासाठी Linkedln चा वापर जास्त प्रमाणात केला जातो. नोकरी शोधणे कधीही सोपे नव्हते, परंतु सर्वोत्तम उमेदवार नेहमीच सर्वोत्तम नोकऱ्यांची अपेक्षा करतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, लिंक्डइनने त्याचे एआय फीचर लाँच केले आहे. या फीचरसह, नोकरी शोध निकाल पूर्वीपेक्षा अधिक अचूक आणि विश्वासार्ह असू शकतात.
07 Oct 2025 06:09 PM (IST)
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडणार आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली असून, या बैठकीतून त्यांच्या राजकीय भूमिकेवरचा पडदा अखेर उघडला जाणार आहे. बुधवारी दुपारी २ वाजता तासगाव येथील जनाई मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे.
07 Oct 2025 05:50 PM (IST)
जर तुम्हाला नवनवीन ठिकाणी प्रवास करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पर्यटनाचे जग बदलत आहे. पर्यटनाचे स्वरूप आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. आजचे पर्यटन स्मारकांना भेट देण्यापलीकडे गेले आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटन आता लोकप्रिय होत आहे. आजचे पर्यटक अशा टूर आयडियाजमध्ये वाढत्या प्रमाणात रस घेत आहेत जे अद्वितीय अनुभव आणि समाधान देतात, जसे की पुनर्जन्म पर्यटन, उपचारात्मक पर्यटन, होमस्टे आणि स्थानिक स्वयंपाक वर्ग, जिथे पर्यटकांना रेसिपीबद्दल सूचना दिल्या जातात आणि नंतर तयार केले जातात.
07 Oct 2025 05:45 PM (IST)
Abhishek Sharma Vs Kuldeep Yadav: नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे. या स्पर्धेत भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे आयसीसीने या दोन्ही खेळाडूंची नावे ‘आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ साठी जाहीर केली आहेत.
07 Oct 2025 05:45 PM (IST)
केंद्र सरकारने देशातील रेल्वेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने आज चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. या उपक्रमांतर्गत, अनेक विद्यमान रेल्वे नेटवर्क चार ते सहा पदरी केले जातील. या प्रकल्पांची एकूण लांबी ८९४ किमी आहे आणि त्यासाठी एकूण २४,६३४ कोटी रुपये खर्च येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. २०३०-३१ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
07 Oct 2025 05:35 PM (IST)
हरयाणामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजचता दिवस पोलीस विभागासाठी खूप दुःखद दिवस ठरला. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) वाय.एस. पुरण यांनी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
07 Oct 2025 05:30 PM (IST)
सध्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांवर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होताना दिसत आहेत. गुलकंद, आता थांबायचं नाय, दशावतार यांसारख्या चित्रपटांनी चित्रपटगृहात हवा केल्यानंतर आता बिन लग्नाची गोष्ट, आरपार या चित्रपटामधून नातेसंबंधांवर आधारित प्रश्नांवर अलगद स्पष्टीकरण दिले आहे. यादरम्यान आता लवकरच मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातूनही प्रेम, लग्न, भावना या गोष्टी नव्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. मात्र, सिनेमाचं प्रमोशन सुरू असतानाच एक नवा वाद सुरू झाला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
07 Oct 2025 05:25 PM (IST)
विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडिलांनी केला आहे.
07 Oct 2025 05:15 PM (IST)
दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम उमराहसाठी सौदी अरेबियाला (Saudi Arabia) जात असतात. त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने उमराह व्हिसामध्ये काही बदल केला असून आता हा व्हिसा मिळणे खूप सोपे झाले आहे.
07 Oct 2025 05:00 PM (IST)
शरीरात २०६ हाडे असतात, मोठी आणि लहान दोन्ही. त्यांच्यावर कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे ताकद वाढते. तथापि, हे पोषक तत्व शरीरात इतर कार्ये देखील करतात आणि जर शरीराला ते आहारातून मिळाले नाहीत तर ते हाडांमधून ते घेण्यास सुरुवात करते. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही शरीराचे एक कार्य सुधारले नाही तर कॅल्शियम आणि Vitamin D घेणे देखील काही उपयोगाचे नाही? डॉक्टरांनी हाडांच्या कमकुवतपणाचे हे कारण सविस्तरपणे सांगितले.
07 Oct 2025 04:57 PM (IST)
Bihar Assembly Election: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच बिहारच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करत एनडीएला डिवचले. तर एनडीएच्या नेत्यांनी देखील लालू यादव यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
07 Oct 2025 04:50 PM (IST)
अंबरनाथ तालुक्यातील वकील संघटनेने सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर वकीलांनी लाल फित बांधून काम बंद आंदोलन छेडले. न्यायव्यवस्थेवरील हा थेट हल्ला असल्याचे मत अंबरनाथ तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. संजय सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच, अशा प्रकारच्या घटनांनी न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली.
07 Oct 2025 04:45 PM (IST)
अमरावतीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेवर कमलताई गवई आणि कीर्ती अर्जुन गवई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कमलताई गवई यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वसमावेशक संविधान दिले असून, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्या समस्या संविधानिक मार्गाने सोडवाव्यात आणि देशात अराजकता माजवण्याचा हक्क कुणालाही नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कीर्ती अर्जुन गवई यांनीही ही घटना देशाच्या संविधानावर काळिमा फासणारी असल्याचे म्हटले असून, हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून ही समाजातील विखारी प्रवृत्ती असल्याचे मत व्यक्त केले आहे.
07 Oct 2025 04:40 PM (IST)
नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या विविध विभागांची पाहणी करत स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्त्यांची स्थिती आणि वस्तीभागातील मूलभूत सुविधांची तपासणी केली. या दरम्यान त्यांनी नागरी सुविधांमधील त्रुटींबद्दल नाराजी दर्शवित संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. तसेच अनुसूचित जाती-जमाती घटकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. नंदुरबार नगरपालिकेच्या सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेताना त्यांनी कामाच्या गती आणि गुणवत्तेत सुधारणा करण्याचा सल्ला दिला.
07 Oct 2025 04:35 PM (IST)
अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलावरून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकावण्यात आली. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून शहरात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप समस्त आंबेडकरी समाजाने केला आहे. तसेच भिरकाविण्यात आलेल्या पत्रकात शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. या संदर्भात आज समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
07 Oct 2025 04:30 PM (IST)
अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. यावेळी शिवमंदिर परिसरात उभारण्यात येणारे भव्य भक्त निवास, पार्किंग प्लाझा, वालधुनी नदीच्या तीरावर घाट, तसेच शहराच्या पश्चिम भागात, नाट्यगृह, इनडोअर आऊटडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा विविध विकासकामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. पश्चिमेला सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले असून लवकरच नाट्यगृहात पहिली घंटा वाजेल असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. तर प्राचीन शिवमंदिर परिसर विकासकामाने देखील वेग घेतला असून जवळपास २०० कोटी खर्च करण्यात येत आहेत, यापेक्षा देखील अधिक खर्च यासाठी होऊ शकतो, सध्या हा प्रकल्प ६ ते ७ एकर मध्ये आहे मात्र येत्या काळात १० ते १५ एकर होईल. यासाठी शेजारी असलेल्या प्रकाशनगर झोपडपट्टीचे रमाबाईनगर, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर तिथेच पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी प्रतिक्रिया खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली.
07 Oct 2025 04:25 PM (IST)
दांड रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा हे मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे.येथे रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी येत असतात.याच रस्त्यावर महानगर गॅस पाई़पलाईंन टाकण्यात आली आहे.या रस्त्यावर गॅस पाईपलाईंनचे वर्षभरात दोन ते तीन महिनाआड खोदकाम होत असल्याने रस्त्याला खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनचालक नागरीकांना नाहक त्रास होत आहे. या कामामुळे अपघातांना ही आमंत्रण मिळत आहे.महानगर गॅस पाईपलाईंनचे काम होत असताना मोहोपाडा प्रवेशव्दारासमोर पिण्याच्या पाण्याची पाइईपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.हि पाइपलाइन फुटून पाच दिवस झाले असून एमआयडी जिवन प्राधीकरणाकडून दुर्लंक्ष होत आहे.परिसरातील काही गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.अशी परिस्थिती असताना गेल्या पाच ते सहा दिवस रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने मोहोपाडा प्रवेशद्वारासमोरासमोरील फुटलेल्या पाण्याची लाईन एम आयडीसी जिवन प्राधिकरणाने दोन दिवसांत न केल्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शंनाखाली पत्रकार आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.यासाठी पत्रकारांसोबत जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनीही पाठींबा दर्शविला आहे.
07 Oct 2025 04:20 PM (IST)
अंबरनाथ तालुक्यातील वकील संघटनेने सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर वकीलांनी लाल फित बांधून काम बंद आंदोलन छेडले. न्यायव्यवस्थेवरील हा थेट हल्ला असल्याचे मत अंबरनाथ तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. संजय सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच, अशा प्रकारच्या घटनांनी न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली.
07 Oct 2025 04:20 PM (IST)
अहिल्यानगरमध्ये सीना नदीच्या पूरामुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीचे पाणी शहरात प्रवेश करून पर्यायी पुलावरून वाहत आहे. या पर्यायी पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून, नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी पुलाची दुरुस्ती आणि संरक्षक कठड्यांची व्यवस्था तत्काळ करण्याची मागणी केली आहे, कारण दररोज हजारो रहिवाशांना या धोकादायक मार्गावरून प्रवास करावा लागतो.
07 Oct 2025 04:15 PM (IST)
उल्हासनगर कॅम्प ४ मधील मराठा सेक्शनमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. रस्त्याने पायी घरी जात असलेल्या उपेश नंदगेम या तरुणाला एका भरधाव मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना ४ ऑक्टोबरच्या रात्रीची आहे. उपेश कामावरून घरी परतत असताना जिजामाता उद्यान ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकलने त्याला जोराची धडक दिली, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी मोटरसायकलचा क्रमांक MH 05 GB 7618 शोधून काढला आणि ही माहिती पोलिसांना दिली. मात्र, विठ्ठलवाडी पोलिसांनी अद्यापही तपासात गती दाखवली नसल्याचा आरोप जखमी उपेश नंदगेम याने केला आहे. सध्या उपेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. नागरिकांनी या प्रकरणात संबंधित मोटरसायकलस्वारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
07 Oct 2025 04:10 PM (IST)
विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडिलांनी केला आहे.
07 Oct 2025 04:04 PM (IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी सार्वजनिक वाहतुकीत नवे पर्व सुरू करणाऱ्या पुणे मेट्रोने अवघ्या साडेतीन वर्षांत १० कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय ठरलेल्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मेट्रोच्या या यशस्वी प्रवासाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना नवी ओळख मिळवून दिली आहे.
07 Oct 2025 03:53 PM (IST)
Hyundai Venue 2025: भारतातील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणारी ह्युंदाई (Hyundai) लवकरच आपली लोकप्रिय व्हेन्यू (Venue) SUV नवीन जनरेशन मॉडेलमध्ये (कोडनेम QU2i) लाँच करणार आहे.
07 Oct 2025 03:45 PM (IST)
स्पष्टवक्तेपणाच्या शैली आणि भावनिक खोलीसाठी ओळखले जाणारे, चित्रपट निर्माते महेश भट्ट अनेकदा जुन्या कथांच्या आठवणी करून चाहत्यांना काळाच्या ओघात घेऊन जातात. इंडस्ट्रीमध्ये खूप मेहनत केल्यानंतर, त्यांनी स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले, अनेक बॉक्स ऑफिस हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, तसेच नवीन स्टार्सनाही जन्म दिला.
07 Oct 2025 03:36 PM (IST)
अमेरिकेत (America) सरकारी कामकाज ठप्प होण्याचा सहावा दिवस सुरु आहे. परिस्थिती तणापूर्ण असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गोंधळात आहेत. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहेत.
07 Oct 2025 03:17 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2025 Date) तारखा जाहीर झाल्या आहेत. आता सर्व पक्ष निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुका बिहार काँग्रेससाठी महत्त्वाच्या असतील.
07 Oct 2025 02:56 PM (IST)
Devendra Fadnavis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतला. हजारो हेक्टर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने २२०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही मदत जाहीर केली.
07 Oct 2025 02:55 PM (IST)
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी Vivo ने भारतीय बाजारात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन त्यांच्या V60 सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. कंपनीने हे नवीन डिव्हाईस Vivo V60e या नावाने लाँच केलं आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. एवढंच नाही तर कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये खास AI इमेजिंग वाला 200MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
07 Oct 2025 02:50 PM (IST)
पिंपरी/विजया गिरमे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, लवकरच महापौर आणि प्रभाग आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. या अंतिम प्रभाग रचनेत ३१८ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ दोन हरकती पूर्णतः मान्य, तर तीन हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. इतर सर्व ३१३ हरकती अमान्य ठरल्या आहेत. म्हणजेच, बहुतांश प्रभाग रचना प्रशासनाने सादर केल्याप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे.
07 Oct 2025 02:45 PM (IST)
“बिग बॉस १९” सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवत आहे. याचे कारण म्हणजे क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर, जी घरात वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून आली आणि तिने प्रवेश करताच मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर तान्या मित्तलला उघड केले. मालतीने तिच्या संघर्षाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर तिच्या जीवनशैलीचा आणि जुन्या व्हिडिओंचाही उल्लेख केला. परिणामी, तान्याचा चेहरा फिका पडला, ज्यामुळे नीलम गिरीही स्तब्ध झाली. बिग बाॅसने त्याच्या सोशल मिडियावर एक नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये आता घरातील वातावरण तणावाचे होताना दिसणार आहे.
07 Oct 2025 02:40 PM (IST)
२७ सप्टेंबर २०२५ रोजी, तामिळनाडूतील करूर येथे, अभिनेता-राजकारणी तामिळनाडू वेट्टीरी कझगम (टीव्हीके) प्रमुख विजय रामचंद्रन यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ६० हून अधिक लोक जखमी झाले. या दुःखद घटनेच्या एका आठवड्यानंतर, विजय यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉलद्वारे पीडितांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याने त्यांचे सांत्वन केले आणि लवकरच करूरला भेट देण्याचे आश्वासन दिले.
07 Oct 2025 02:35 PM (IST)
Akshay Kumar with CM Fadnavis : मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश बदल करण्यात यावा अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अक्षयने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर राजकारण, समाजकारण यासह विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलते केले. या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही, तर पोलिस दलाशी संबंधित महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांना देखील हात घातला.
07 Oct 2025 02:30 PM (IST)
Manoj Jarange Patil: राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. त्या जीआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान आज मुंबई हायकोर्टात त्याबाबत सुनावणी पर पडली. राज्य सरकारने काढलेल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
07 Oct 2025 02:25 PM (IST)
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत पाळले जाते. पत्नी आपल्या पतींना दीर्घायुष्य आणि वैवाहिक आनंद मिळावा म्हणून हा व्रत पाळतात. करवा चौथ व्रत अत्यंत कठीण मानले जाते कारण त्यात पाण्याशिवाय उपवास करावा लागतो. सकाळी सरगी (ज्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश असतो) खाल्ल्यानंतर रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच उपवास सोडला जातो. विवाहित महिला दिवसभर पाण्यापासून दूर राहतात. या दिवशी त्या स्वतःला वधूसारखे सजवतात, मेहंदी लावतात आणि नंतर पूजा केल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य अर्थात जल अर्पण करून उपवास सोडतात.
07 Oct 2025 02:20 PM (IST)
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे, कारण ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनंतर ती लवकरच ‘शुभविवाह’ या नव्या मालिकेत एसीपी अपूर्वा पुरोहित ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका तिच्यासाठी खास आहे, कारण ती पहिल्यांदाच पोलीस अधिकारी साकारते आहे. अपूर्वा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट करत असते. आज तिने तिच्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी भावाने जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत.
07 Oct 2025 02:15 PM (IST)
Couple Romance Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कपल्सचे रोमान्स करतानाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कधी कोणते जोडपे बस स्टॉपवर, तक कधी बाईकवर, कधी मेट्रोत खुलेआम रोमान्स करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल कारच्या रुफवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
07 Oct 2025 02:14 PM (IST)
Manoj Jarange Patil: राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. त्या जीआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान आज मुंबई हायकोर्टात त्याबाबत सुनावणी पर पडली. राज्य सरकारने काढलेल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
07 Oct 2025 02:14 PM (IST)
अलिबाग : राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग असो रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कायमच तक्रारी केल्या जातात. गणपची गेले नवरात्र झाली तरीही रस्त्यांची बोंब कायमच असून चाकरमान्यांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पेझारी तपासणी नाका येथे मंगळवारी (दि. 7) सकाळी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. शेकापचे राज्य प्रवक्ते चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.या आंदोलनात शेकाप राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, आदींसह विविध आघाडींचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
07 Oct 2025 02:09 PM (IST)
मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G06 Power या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Moto G सीरीज अंतर्गत लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो G81 एक्सट्रीम प्रोसेसरने सुसज्ज आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी IP64 रेटिंग दिली आहे.
07 Oct 2025 02:03 PM (IST)
PM Kisan Yojana 21st Installment News in Marathi : देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेती किंवा इतर संबंधित कामांवर अवलंबून आहे. दरम्यान, अनेक शेतकरी अजूनही शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळवू शकत नाहीत जेणेकरून त्यांचे घरखर्च आरामात चालेल. ही गरज लक्षात घेऊन, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.
07 Oct 2025 01:55 PM (IST)
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) भविष्य आणखी उज्वल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (६ ऑक्टोबर, २०२५) सांगितले की, पुढील चार ते सहा महिन्यांत इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कारच्या किमतींइतक्या होतील. २० व्या FICCI हायर एजुकेशन समिट 2025 परिषदेत त्यांनी हे विधान केले. त्यांच्या मते, येत्या काही महिन्यांत भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल, ज्यामुळे देशाचा इंधन आयात खर्च कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल.
07 Oct 2025 01:45 PM (IST)
भारत पाकिस्तान म्हटलं कि खुन्नस असतेच मग ते जंग असो कि मॅच, लफडा झालाच पाहिजे, या आधी पुरुष क्रिकेट संघाने ज्या प्रकारे पाकिस्तान ला ३-० ने शिकस्त दिली होती तशीच महिला संघाने सुद्धा पाकिस्तान महिला संघाला हरवून बदला घेतलाच. पण एक गोष्ट सारखी घडली ती म्हणजे हारिस रौफला आणि फातिमा सना एकाच माळेचे मणी ठरले हरले तरी टांग उपर !
07 Oct 2025 01:40 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार विधानसभांची घोषणा केली. यात पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान होणार आहे. १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.
07 Oct 2025 01:35 PM (IST)
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येला आता जवळपास एक वर्ष होत आले असून अजूनही देशमुख कुटुंबाला न्यायाची प्रतिक्षा आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या जेलची हवा खात आहे. वाल्मिक कराड हा या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो जेलमध्ये असताना देखील त्याचे कार्यकर्ते बाहेर त्याच्या समर्थनार्थ बाहेर प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे. सोशल मीडियावर वाल्मिक कराडसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
07 Oct 2025 01:25 PM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan) जाफर एक्सप्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. क्वेटा शहराजवळ जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला झाला असून यामध्ये ७ जण जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जाफरवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामुळे रेल्वे पटरीवरुन खाली घसरली. २०२५ मध्ये जाफर एक्सप्रेसवरील हात सातवा हल्ला आहे, यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
07 Oct 2025 01:15 PM (IST)
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं पॉवर कपल नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले. तेव्हापासून हे कपल सतत “कपल गोल्स” सेट करताना दिसत आहे. समंथाशी घटस्फोटानंतर काही वर्षातच नागा चैतन्यनं शोभिताशी लग्न केलं. तेव्हा समंथाच्या चाहत्यांनी या दोघांवर प्रचंड टीका केली होती. मात्र नागा आणि शोभिताने त्याकडे दुर्लक्ष केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्यने सांगितलं की, शोभिता सोबत त्याची पहिली भेट कुठे आणि कशी झाली होती.
07 Oct 2025 01:05 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून नवीन स्मार्टफोनसह बॉक्समध्ये चार्जर मिळणं बंद झालं आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जर मिळणं बंद झाल्यानंतर युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. चार्जरनंतर आता USB केबलची वेळ आली आहे. मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आता नव्या स्मार्टफोनसोबत USB केबल देणं बंद केलं आहे. वाढता ई-कचरा आणि खर्च कमी ठेवणे, ही कंपन्यांच्या निर्णयांची प्रमुख कारणं आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना बॉक्समध्ये USB केबल दिली जाणार नाही.
07 Oct 2025 01:05 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर अमानुषपणे अटायचार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तिच्यावर विनयभंग करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्या पती आणि नातेवाईकांनाही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






