Maharashtra Breaking News Updates Today
06 Jun 2026 09:30 AM (IST)
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. हा २० वर्षीय खेळाडू ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंटला पराभूत केल्याचे पाहिला मिळाले. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लसेनला दोनदा हरवले. आता प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ चे विजेतेपद जिंकले आहे.
06 Jun 2026 09:23 AM (IST)
"सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहणे म्हणजे अभिजीत दीपके यांना विमानतळावर अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयार राहणे. जर तसे झाले, तर आपण उपोषणासाठीही तयार असले पाहिजे." असे सूचक विधान शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केलं आहे
06 Jun 2026 09:19 AM (IST)
दोन्ही भावांनी हा विला तयार करण्यासाठी ऋषिकेश या ठिकाणाची निवड केली. ऋषिकेशला विमान, रेल्वे तसेच रस्ते मार्गावरुन जाता येते. नवी मुंबईपासून याचे अंतर १,३५० किमी आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर ऐतिहासिकरित्या फार लोकप्रिय आहे. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. मागील काही काळापासून हे ठिकाण कॅफे, कार्पोरेट आणि वेलनेस स्ट्रीटचे हब बनले आहे, बहुधा हेच कारण आहे की दोन्ही भावांनी आपल्या विलासाठी या ठिकाणाची निवड केली.
06 Jun 2026 09:01 AM (IST)
पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. नवी दिल्ली परिसरात सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी या भागात येणारे प्रमुख रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले असून, वाहनांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले जात आहे. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर रस्त्याच्या पलीकडे लोकांचा एक गट जमला असून, ते घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा निषेध करत आहेत.
06 Jun 2026 08:57 AM (IST)
जंतरमंतर येथे होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) डिजिटल आघाडीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. "आजचा दिवस भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस ठरेल," अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
जंतरमंतरवरील या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, या माध्यमातून पक्ष देशाच्या राजकीय पटलावर मोठी छाप पाडण्यास उत्सुक असल्याचे प्रवक्त्यांच्या या विधानावरून दिसून येत आहे.
06 Jun 2026 08:53 AM (IST)
Monsoon Alert : राज्यात पुढील काही तासांत हवामानात बदल होण्याची शक्यता असून विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आज उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
06 Jun 2026 08:50 AM (IST)
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर ट्विट केले. "जंतर मंतरवर तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे. पुस्तक आणि आपला तिरंगा आणायला विसरू नका! दया आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पोलिसांना फुले द्या. आपण हे आंदोलन प्रेम आणि शांततेने पुढे चालू ठेवले पाहिजे!"
06 Jun 2026 08:37 AM (IST)
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. आज दिल्लीतील जंतर मंतर येथील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या ऑनलाइन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतर येथे आंदोलनाचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
06 Jun 2026 08:28 AM (IST)
गेल्या काही वर्षांमध्ये एआयचा वापर आणि त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे. याचा फायदा नक्कीच होत आहे. पण एआयच्या वाढत्या वापराबाबत आता चिंता देखील व्यक्त केली जात आहे. कारण एआयच्या वाढत्या वापरासोबतच पर्यावरणावर होणारे परिणाम देखील वाढले आहेत. यामुळे २०३० पर्यंत विजेची मागणी दुप्पट होऊ शकते, तसेच २०३० पर्यंत एआय-सक्षम प्रणाली जगाच्या एकूण वीज वापराच्या अंदाजे ३ टक्के वापरू शकतात असा अहवाल आता सादर करण्यात आला आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. सूत्रांनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक अभिजीत यांना विमानतळावर थांबवणार नाही. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही जाण्याची परवानगी दिली जाईल.






