
Maharashtra Breaking News Updates Today:
इस्लामाबाद : सध्या इराण-इस्त्रायल युद्ध सुरु आहे. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका हे दोन्ही देश हल्ले करत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही युद्ध सुरु आहे. पाकिस्तान हा देश अफगाणिस्तानमधील निवासी भागांना लक्ष्य करत आहे. यामध्ये रुग्णालयात केलेल्या हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या सैन्याने रुग्णालयासह कोणत्याही नागरी ठिकाणांना लक्ष्य न केल्याचे सांगितले.
17 Mar 2026 06:41 PM (IST)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत करत सरकारला धारेवर धरले आणि हल्लाबोल केला. संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी तसेच प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
17 Mar 2026 06:36 PM (IST)
पुणे: जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ साठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प १७ मार्च रोजी मंजूर करण्यात आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मर्यादित वाढ असूनही विविध नवीन योजनांवर भर देण्यात आला आहे.
17 Mar 2026 06:28 PM (IST)
मुंबई: ओबेन इलेक्ट्रिक, जी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी आर एंड डी -आधारित इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे, त्यांनी आज जाहीर केले की ओबेन मोटारसायकलस्वारांनी कंपनीच्या देशव्यापी लाँचिंगनंतर केवळ दोन वर्षांत भारतीय रस्त्यांवर सामूहिकपणे ३.२ कोटींहून अधिक किलोमीटर अंतर पार केले आहे. ग्राहक आपल्या दैनंदिन प्रवासासाठी (Automobile News) प्राथमिक साधन म्हणून ओबेन मोटारसायकलींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, हेच यावरून स्पष्ट होते.
17 Mar 2026 06:15 PM (IST)
नोकरी करणाऱ्या महिलांच्या हक्कांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. मूल दत्तक घेणाऱ्या मातांनाही आता जैविक मातांप्रमाणेच पूर्ण मातृत्व रजेचा (Maternity Leave) अधिकार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दत्तक घेतलेल्या मुलाचे वय ३ महिन्यांपेक्षा जास्त असले तरीही मातांना १२ आठवड्यांची रजा नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल न्यायालयाने केला आहे.
17 Mar 2026 06:07 PM (IST)
मुंबई: राज्यातील मोठ्या शहरांमध्ये फोफावणाऱ्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना शोधून काढण्यासाठी आता 'डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम' कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमदार स्नेहा दुबे यांनी राज्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
17 Mar 2026 05:59 PM (IST)
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग प्रकार केल्यानंतर, भाजपला एका जागेऐवजी दोन जागा जिंकता आल्या. ओडिशामध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगच्या प्रकरणात काँग्रेसने तीन आमदारासह एका नेत्यावर कारवाई केली आहे. तीन आमदारांना निलंबित करण्यात आले असून, एका नेत्याची हकालपट्टी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या प्रकरणात आमदार सोफिया फिरदौस, आमदार रमेश जेना आणि आमदार दाशरथी गमांग यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कटक शहराध्यक्ष अध्यक्ष गिरिबाला बेहरा यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे.
17 Mar 2026 05:52 PM (IST)
लोकसभेत अध्यक्षांच्या आसनावर कागद फाडून फेकल्याच्या घटनेवर निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षातील आठ खासदारांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर ‘सीजफायर’ झाल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, जो ध्वनिमताने मंजूर झाला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी तत्काळ प्रभावाने निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली.
17 Mar 2026 05:43 PM (IST)
नाशिक शहरात गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात विनापरवाना सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त केला. पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. कारवाईदरम्यान एचपी गॅसचे 500 हून अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळून आले. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी सातपूर पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
17 Mar 2026 05:32 PM (IST)
नांदेड वाघाळा महानगरपालिकेची पहिली सभा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी केलेल्या ‘गोंधळयुक्त बोलंदाजी’ मुळे गाजली टिपू सुलतान यांचा पुतळा शहरात उभारण्याची मागणी केल्यामुळे सभागृहात भाजप शिवसेना युती व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आमने सामने आले होते.
17 Mar 2026 05:22 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या पैशांच्या मागणी, मारहाण व जातिवाचक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
17 Mar 2026 05:12 PM (IST)
पाकिस्तानने काबुलमधील एका रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ४०० निरापराध नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यांने संपूर्ण जग हादरले आहे. दरम्यान पाकिस्तान (Pakistan) च्या या अमानवीय कृत्यावर भारताने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
17 Mar 2026 05:02 PM (IST)
रस्त्यावर नमाज पठन करण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांना थेट चॅलेंज देण्यात आले आहे. हैदराबादस्थित एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सय्यद अयुब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो देशभरात रस्त्यावर नमाज अदा करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
17 Mar 2026 04:50 PM (IST)
मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील स्माईलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महाराष्ट्राचे कला बुडवली, कला शिक्षक मारले अशा आशयाची तयार केलेली कागदी होडी विद्यार्थ्यांनी पाण्यात बुडवून सरकारच्या धोरणांचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला... गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली कला शिक्षक भरती आणि संचमान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. ५०० विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक ही अन्यायकारक अट रद्द करून, क्रीडा शिक्षकांप्रमाणेच २५० विद्यार्थ्यांमागे एक पद मंजूर करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
17 Mar 2026 04:45 PM (IST)
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लॉट क्रमांक ‘जे’ मधील या कारखान्यातून आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ उठताना दिसले. आग लागल्यानंतर काही स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कारखान्यात कोणतेही कामगार अडकले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
17 Mar 2026 04:40 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाटात इथेनॉलने भरलेला टँकर पलटी होऊन अपघात घडला. वारणा येथून गोव्याकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर गटारात उलटला. या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला होता. गगनबावडा आणि वैभववाडी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने त्याची सुटका करून तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. टँकरमधील ज्वालाग्राही इथेनॉल रस्त्यावर सांडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ उपाययोजना केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
17 Mar 2026 04:35 PM (IST)
रत्नागिरी शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावरून वाद निर्माण झाला असून प्रकरण थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. रत्नागिरी गॅस एजन्सीच्या १४ कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. कंपनी व्यवस्थापनाने पाच व्यावसायिक गॅस सिलेंडरचे चुकीच्या पद्धतीने वितरण झाल्याचा आरोप करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
17 Mar 2026 04:30 PM (IST)
लग्नानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा आपल्या कामावर परतली असून, 2026 मधील चर्चेत असलेल्या ‘Mysaa’ या चित्रपटाच्या शूटिंगला तिने नव्याने सुरुवात केली आहे. ‘अनफॉर्म्युला फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.2026 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘Mysaa’ची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना एका अत्यंत दमदार, उग्र आणि प्रभावी भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आतापर्यंतच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा अवतार या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
17 Mar 2026 04:25 PM (IST)
यावर्षी 28 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल लीग सुरू होणार आहे. नुकतीच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला. भारताकडून संजू सॅमसनने उत्तम कामगिरी केली. संजू सॅमसन वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. यंदा संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स ऐवजी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. यावर त्याने आता स्पष्टीकरण दिले आहे.मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून खरेदी केले आहे. आता याबाबर संजू सॅमसनने स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने राजस्थान रॉयल्सला सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत भाष्य केले आहे.
17 Mar 2026 04:20 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला.
17 Mar 2026 04:15 PM (IST)
वसई पूर्वेतील भोयदापाडा डंपिंग ग्राउंडमध्ये कचरा व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. कचऱ्याच्या ढिगांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीमुळे विषारी धूर परिसरात पसरत असून नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.स्थानिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास, दमा, सर्दी-खोकला आणि तीव्र डोकेदुखी अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे.कचऱ्यात अन्न शोधण्यासाठी जाणाऱ्या गायी, कुत्रे यांसारख्या मुक्या प्राण्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सुलगत्या कचऱ्यात ते जळून जखमी होत आहेत किंवा विषारी कचरा खाऊन मृत्युमुखी पडत आहेत.
17 Mar 2026 04:10 PM (IST)
राज्य सरकारने कर्जत तालुक्यात पोशीर आणि शिलार येथे धरण बांधण्याचे जाहीर केले आहे.या दोन्ही धरणासाठी एकाही शेतकऱ्याने आपली जमीन देण्याची परवानगी दिली नाही आणि तरीदेखील शासनाने धरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या विरुद्ध शिलार धरण परिसरातील शेतकरी आणि पोशीर धरण परिसरातील शेतकरी यांनी धरणाच्या विरोधात प्रचंड मोर्चा काढला. या दोन्ही धरणाच्या विरोधात शेतकरी कर्जत शहरात धडकले आणि कर्जत तहसील कार्यालयावर पोहचले.दरम्यान प्रांत अधिकारी यांनी सध्या धरण परिसरात सुरु असलेले काम थांबवण्यास असमर्थता दर्शवली असून शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेकबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे आता थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर उपोषण करणाऱ्यांचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
17 Mar 2026 04:05 PM (IST)
जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धीरज गावड, भावेश चुरी आणि जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून निधीअभावी २४ योजना बंद असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन छेडले आहे.दरम्यान, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पालघर विभाग) यांनी मनसेला पत्राद्वारे स्पष्टीकरण देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. संबंधित पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जल जीवन मिशन अंतर्गत एकूण २६ योजनांची कामे सुरू असून त्यासाठी ११७८.२५ लाखांचा अंदाजपत्रकीय निधी आहे. यापैकी आतापर्यंत ७१६.४६ लाखांचा खर्च करण्यात आला असून कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
17 Mar 2026 03:55 PM (IST)
विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. फिजिओ-केमिकल घटक, धातू, कीटकनाशके तसेच पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण यासारख्या मापदंडांच्या आधारे नद्यांच्या पाण्याचा दर्जा निश्चित केला जातो. विशेषतः बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) या निकषांच्या आधारे नदीतील प्रदूषणाचा स्तर ठरवला जातो.निकषांनुसार पाण्यातील बीओडीचे प्रमाण ३ मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असल्यास पाणी स्वच्छ, ३ ते १० मिलीग्रॅम दरम्यान असल्यास मध्यम प्रदूषित, तर १० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास अतिप्रदूषित मानले जाते. तसेच चे प्रमाण १० ते २० मिलीग्रॅम प्रति लिटर दरम्यान असल्यास पाणी स्वच्छ समजले जाते; त्यापेक्षा जास्त असल्यास ते प्रदूषित असल्याचे मानले जाते.२०२५ च्या अहवालानुसार देशभरातील ६२३ प्रमुख व मोठ्या नद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये २७१ नद्यांमध्ये २१६ प्रदूषित पट्टे आढळून आले असून त्या यादीत वाशिष्ठी नदीचाही समावेश आहे.
17 Mar 2026 03:55 PM (IST)
चहा आणि नाश्ता बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना दापोली येथील नॅशनल हायस्कूल जवळ असलेल्या असिया प्लाझा येथे घडली. चहा आणि पाव फ्राय उशिरा का दिला, या रागातून पतीने आपल्या पत्नीला हाताने व कुकरने पाठीवर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पीडित पत्नी असमा मुनिफ खलपे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुनिफ अब्दुलगनी खलपे याच्याविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 Mar 2026 03:50 PM (IST)
बॉलिवूड स्टार सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सलीम खान १७ फेब्रुवारीपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल एकापाठोपाठ एक घडामोडी समोर येत आहेत. अलीकडेच अरबाज खानने त्याचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. अभिनेत्याने सांगितले की, सलीम खान यांची प्रकृती आता सुधारत आहे. आता या सगळ्यात, सलीम खान यांच्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे.
17 Mar 2026 03:40 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षातून विस्तवही जात नाही. भाजपच्या निर्यणांना ठाकरे गटाचा कायम विरोध असतो. शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संबंध खूपच ताणले गेले आहेत. पण राजकारणात कधी कोणाचा फार काळ मित्रही नसतो आणि फार काळ शत्रूही राहू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक दुर्मिळ प्रसंग समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या एका निर्णयाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. हा मुद्दा सक्तीच्या धर्मांतराविरोधातील प्रस्तावित कायद्यालाशिवसेनेने (यूबीटी) सरकारला पाठिंबा दिला आहे.
17 Mar 2026 03:35 PM (IST)
मीन राशीतील शुक्र आणि शनीची युती तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशींना त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ते जे काही काम हाती घेतील त्यात त्यांना यश मिळेल. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात नफ्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये आवड वाढेल. चला जाणून घेऊया की कोणत्या तीन राशींसाठी शुक्र-शनी युती वरदान ठरेल.
17 Mar 2026 03:30 PM (IST)
राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने जीप रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.
17 Mar 2026 03:25 PM (IST)
ज्योतिबाच्या नावानं चांगलभलं ! असं म्हणतं कित्येक घराणी ज्या पायाशी डोकं टेकवतात असा हा दख्खनचा राजा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं की आवठतं ते जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठ्ठल, तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि याचबरोबर येतो तो ज्योतिबा. पण असं काय घडलं की ज्योतिबा दख्खन राजा म्हणून ओळखू लागला, काय आहे यामागची रंजक कथा, चला तर मग जाणून घेऊयात.
17 Mar 2026 03:20 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धात आता एक नवे वळण आले आहे. इराणने अलीकडे केलेल्या आखाती देशांवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इराणच्या या धाडसावर आखाती देशांनी तीव्र नारीज व्यक्त केली असून त्याच्या विनाशासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला आहे.
17 Mar 2026 03:10 PM (IST)
घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणातील गोंधळ आणि एजन्सीसमोरील गर्दीवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आता गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार आहे. तसेच गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
17 Mar 2026 03:05 PM (IST)
आखाती देशांमध्ये युद्ध पेटले असून आठ दिवसापासून हा संघर्ष सुरु आहे. यामुळे इराणने तेल आणि इंधनाचा व्यापार बंद केला. याचा परिणाम भारतावर झाला असून मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा भासत आहे. सामान्य लोकांच्या गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. तर व्यावसायिक गॅस (LPG Gas) मिळणे बंद झाले आहे. याचा परिणाम हॉटेल आणि खानावळींवर झाला आहे. यामुळे गॅसच्या काळाबाजार डोके वर काढत आहे. दिल्लीमध्ये (Delhi News) सुरक्षा यंत्रणेने गॅसचा काळाबाजार उघडकीस आणला असून एकाला अटक केली आहे.
17 Mar 2026 02:50 PM (IST)
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय विश्वचषकाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. आयसीसीने देखील टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय मालिका संघ खेळत आहे. पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. २०२६ च्या टी२० विश्वचषकानंतर, पाकिस्तान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करत आहे.
17 Mar 2026 02:45 PM (IST)
खेड: खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण घराला वेढा घातला. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
17 Mar 2026 02:40 PM (IST)
इंदापूर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने जीप रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.
17 Mar 2026 02:35 PM (IST)
टेक कंपन्या सध्या खास टेक्नॉलॉजी आणि अपडेट फीचर्ससह नवीन स्मार्टफोन लाँच करण्यावर अधिक भर देत आहेत. स्मार्टफोनमधील फीचर्स आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स जेवढे खास असतात तेवढी स्मार्टफोनची डिझाईन देखील खास असते. स्मार्टफोनच्या डिझाईनमागे प्रत्येक कंपनीचा एक वेगळा विचार असतो.
17 Mar 2026 02:30 PM (IST)
मीन राशीतील शुक्र आणि शनीची युती तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशींना त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ते जे काही काम हाती घेतील त्यात त्यांना यश मिळेल. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात नफ्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये आवड वाढेल. चला जाणून घेऊया की कोणत्या तीन राशींसाठी शुक्र-शनी युती वरदान ठरेल.
17 Mar 2026 02:25 PM (IST)
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून एका २३ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आधी दारू पाजले त्यांनतर दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून ट्रेन गेली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे या खुनाचा छडा लावला आहे.
17 Mar 2026 02:20 PM (IST)
बॉलीवूडचा हँडसम हंक, सिद्धार्थ मल्होत्रा, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नाही. सध्या तो त्याच्या आगामी ‘व्वान’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे, ज्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. यानंतर, हा अभिनेता एका नवीन प्रोजेक्टची तयारी करत आहे. असे वृत्त आहे की तो लवकरच करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. दोन वर्षांनंतर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील आणखी एक मोठे सहकार्य लवकरच पाहायला मिळणार आहे.
17 Mar 2026 02:15 PM (IST)
Renault Duster पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावण्यास तयार झाली आहे. Renault ने अधिकृतपणे भारतात आपले नवीन Duster लॉन्च केले आहे. मिडसाईज-SUV सेगमेंटमध्ये येणाऱ्या या कारची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे नवीन डस्टर पूर्णपणे बदलले आहे आणि आता पूर्वीपेक्षा अधिक हाय-टेक आणि मजबूत आहे. यात सुविधा आणि सुरक्षिततेसाठी अनेक उत्तम डिझाईन केलं आहे.
17 Mar 2026 02:08 PM (IST)
ODI World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय विश्वचषकाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. आयसीसीने देखील टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय मालिका संघ खेळत आहे. पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. २०२६ च्या टी२० विश्वचषकानंतर, पाकिस्तान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करत आहे.
17 Mar 2026 02:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धात आता एक नवे वळण आले आहे. इराणने अलीकडे केलेल्या आखाती देशांवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इराणच्या या धाडसावर आखाती देशांनी तीव्र नारीज व्यक्त केली असून त्याच्या विनाशासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देश आता ट्रम्प आणि अमेरिकेवर इराणिवरोधात कारवाईसाठी दबाव वाढवत आहे. आखाती देशांनी इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे मोडीत काढण्यास अमेरिकेला आवाहन केले आहे.
17 Mar 2026 01:55 PM (IST)
मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीत गोंधळ घालून पोलिस शिपायाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष विठ्ठल खंकाळ (वय ५३, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई प्रशांत तुर्डे यांनी फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.
17 Mar 2026 01:50 PM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि टीव्ही अभिनेता विवेक दहिया यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या १० वर्षांनंतर हे जोडपे आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. याचा अर्थ, ही अभिनेत्री वयाच्या ४१ व्या वर्षी आई होणार आहे. दिव्यांका आणि विवेक लवकरच एका बाळाचे स्वागत करणार असल्याची चर्चा आहे.
17 Mar 2026 01:45 PM (IST)
तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीच्या छायाताई जाधव यांची तर उपसभापती पदी संतोष वीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.खंडाळा पंचायत समितीच्या सहा जागांपैकी चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले होते तर दोन जागा भाजपाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध झाले होते. मंत्री मकरंद पाटील यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व विजयी उमेदवार यांची बैठक घेऊन सर्वानुमते सभापतीपद छायाताई जाधव यांना तर उपसभापती पद संतोष वीर यांचे नाव निश्चित करण्यात आले.त्यानुसार या निवडी करण्यात आल्या.
17 Mar 2026 01:40 PM (IST)
झी मराठीवरील तारिणी मालिकेत सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तारिणी आणि केदार यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण अखेर आला असून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नाचे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत आहेत.तरी हा सोहळा साधा-सोप्या आनंदापुरता मर्यादित राहणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. प्रत्येक विधीमध्ये नवे ट्विस्ट, थरार आणि नाट्यमय घडामोडींचा भडिमार होताना दिसत आहे.
17 Mar 2026 01:35 PM (IST)
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आखाती देशातील युद्धाचे कारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा (LPG Gas) पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अन्यायी दरवाढीचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी वाई तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने काल , सोमवार १६ मार्च २०२६ रोजी वाईत चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
17 Mar 2026 01:25 PM (IST)
सरकारी विभागात डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) बनण्याची ही एक संधी आहे. मध्य प्रदेश भूमी अभिलेख व्यवस्थापन सोसायटीने (MPLRS) विविध विभागांमधील ७७० रिक्त डेटा एंट्री ऑपरेटर पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. मध्य प्रदेश भूमी अभिलेख व्यवस्थापन सोसायटीच्या (MPLRS) या भरती मोहिमेमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील तरुणांसाठी सरकारी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
17 Mar 2026 01:15 PM (IST)
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या वलांडी गटातील उमेदवार उषा संभाजी पाटील (तळेगावकर) यांची अध्यक्षपदी तर जानवळ गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दयानंद दामोदर सुरवसे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले.
17 Mar 2026 01:11 PM (IST)
राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने जीप रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.