मुंबईत मनसेला युतीच्या घोषणेनंतर पहिला धक्का
25 Dec 2025 12:55 PM (IST)
प्राप्तिकर विभागाच्या कडकपणा आणि डेटा विश्लेषण देखरेखीचा महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) संशयास्पद कपातीचा दावा करणाऱ्यांना पाठवलेल्या सूचना आणि मोहिमांनंतर, १५ लाखांहून अधिक करदात्यांनी चालू कर निर्धारण वर्षासाठी (२०२५-२६) सुधारित रिटर्न दाखल केले आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या. विभागाने स्पष्टपणे इशारा दिला आहे की, रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. यानंतर, चूक दुरुस्त करण्याची संधी असेल, परंतु ती महागात पडू शकते.
25 Dec 2025 12:45 PM (IST)
भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून मजबूत व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक आवश्यक दैनंदिन वस्तूंची देवाणघेवाण करतात. परंतु देशाच्या संबंधांमधील अलिकडच्या तणावाचा आणि बांगलादेशातील अंतर्गत राजकीय परिस्थितीचा या व्यापारावर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः बांगलादेशच्या दैनंदिन जीवनाचा आधार असलेल्या भारतीय वस्तूंवर. जर पुरवठा विस्कळीत झाला तर कपड्यांपासून अन्नापर्यंतचे संकट निर्माण होऊ शकते. मग प्रश्न असा आहे की, बांगलादेश भारताकडून कोणत्या आवश्यक वस्तूंवर अवलंबून आहे? बांगलादेश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशचा ९४% भाग भारताशी सीमा सामायिक करतो, ज्याची एकूण लांबी ४,३६७ किमी आहे. म्हणूनच, व्यापार, वाहतूक आणि सुरक्षेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
25 Dec 2025 12:30 PM (IST)
भारतीय राजकारणातील ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्व, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ एका ऐतिहासिक सुवर्णक्षराची साक्षीदार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौमधील वसंत कुंज येथे ६५ एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर उभारलेल्या भव्य ‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ चे उद्घाटन करणार आहेत.
देश की महान विभूतियों की विरासत के सम्मान और संरक्षण के लिए हमारी सरकार कृतसंकल्प है। इसी कड़ी में कल दोपहर बाद करीब 2:30 बजे लखनऊ में पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की 101वीं जयंती के अवसर पर ‘राष्ट्र प्रेरणा स्थल’ के उद्घाटन का सौभाग्य मिलेगा। यहां… pic.twitter.com/ssmmeQORxF
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2025
credit : social media and Twitter
25 Dec 2025 12:15 PM (IST)
जागतिक स्तरावर वादविवादासाठी अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘ऑक्सफर्ड युनियन’मध्ये पुन्हा एकदा एका भारतीय तरुणाने तिरंग्याची शान उंचावली आहे. मुंबईत जन्मलेला कायद्याचा विद्यार्थी वीरांश भानुशाली याने भारत-पाकिस्तान संबंधांवर केलेल्या रोखठोक भाषणाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर वीरांशने डागलेले तोफगोळे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.
“This House Believes That India's Policy Towards Pakistan Is a Populist Disguise for Security Policy.”
Viraansh Bhanushali, a law student from Mumbai at the University of Oxford, delivered a compelling opposition speech in the Oxford Union debate on the motion “This House… pic.twitter.com/RWbAw5MfOv
— Augadh (@AugadhBhudeva) December 22, 2025
credit : social media and Twitter
25 Dec 2025 12:15 PM (IST)
नायजेरियात एक मोठी घटना घडली आहे. नायजेरियाच्या उत्तर-पूर्व बोर्नो राज्यात मैदुगुरी येथे ख्रिसमसच्या पहाटे एका मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे, आणि ३५ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नायजेरियात भीतीचे वातावरण पसरले आहे.
25 Dec 2025 12:05 PM (IST)
ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. ख्रिसमसच्या आनंदी वातावरणात पुन्हा एकदा हिंसेने डोकं वर काढले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे सेंट किलडा ईस्ट भागात एका यहुदीच्या कारवार फायरिंग करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून यहुंदीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. वाचा सविस्तर
25 Dec 2025 11:55 AM (IST)
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "...त्यांनी देशाच्या संसदेत अनेकदा राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी विकासाच्या नव्या दृष्टिकोनातून देशाला पुढे नेण्याचे काम केले. हे वर्ष विशेष आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, ज्यामध्ये अटलजींच्या कवितांचे पठण, त्यांच्या लेखनावर चर्चा आणि संसद व आंतरराष्ट्रीय मंचांवरील त्यांची महत्त्वाची भाषणे यांचा समावेश आहे... त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, अटलजींच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा सातत्य राखण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारने लखनौमध्ये एक राष्ट्रीय प्रेरणा स्थळ उभारले आहे. आज हे स्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केले जाईल..." असे योगी म्हणाले आहेत.
25 Dec 2025 11:45 AM (IST)
भाजपचे शासन असलेल्या छत्तीसगडमधील रायपूरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दल आणि इतर उजव्या विचारसरणीच्या गटांनी लाखो रुपयांच्या ख्रिसमसच्या सजावटीची तोडफोड केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
Bajrang Dal and other right-wing groups vandalized Christmas decorations worth lakhs at Raipur Magneto Mall in BJP-ruled Chhattisgarh. pic.twitter.com/HR9tFwUHNb
— Mohit Chauhan (@mohitlaws) December 24, 2025
25 Dec 2025 11:35 AM (IST)
कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशवासियांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर लिहिले आहे की, सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा! हा सण तुमच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो, आणि तुमचे जीवन प्रेम व करुणेने भरून जावो"
Merry Christmas everyone!
May this season bring joy, happiness, and prosperity, and fill your lives with love and compassion. pic.twitter.com/WUDh7AA3Ai
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 25, 2025
25 Dec 2025 11:25 AM (IST)
खासदार संजय राऊत म्हणाले की,"शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस आहेत. स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे. बापच अनौरस आहे.अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे. कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं, कोण पळवतंय ते, असा जबरी टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
25 Dec 2025 11:15 AM (IST)
र्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील गोरलाथू गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज (दि.25) गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एका खाजगी बसला ट्रकने धडक दिली. ट्रॅव्हल बसच्या झालेल्या अपघातानंतर बसला आग लागल्याने १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर
25 Dec 2025 11:08 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाताळ सणामध्ये सामील झाले आहेत. दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला. यंदाच्या वर्षी पंतप्रधान मोदी हे देखील चर्चमध्ये सामील झालेले दिसून आले. यावेळी पंतप्रधान मोदी हे खास पोषाखामध्ये चर्चमध्ये गेलेले दिसून आले.यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याचबरोबर मोदींनी चर्चमध्ये प्रार्थना देखील केली.
Here are some more glimpses from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/ta5vTyYEJU
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
25 Dec 2025 10:59 AM (IST)
भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून मजबूत व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक आवश्यक दैनंदिन वस्तूंची देवाणघेवाण करतात. परंतु देशाच्या संबंधांमधील अलिकडच्या तणावाचा आणि बांगलादेशातील अंतर्गत राजकीय परिस्थितीचा या व्यापारावर थेट परिणाम होऊ शकतो. विशेषतः बांगलादेशच्या दैनंदिन जीवनाचा आधार असलेल्या भारतीय वस्तूंवर. जर पुरवठा विस्कळीत झाला तर कपड्यांपासून अन्नापर्यंतचे संकट निर्माण होऊ शकते. मग प्रश्न असा आहे की, बांगलादेश भारताकडून कोणत्या आवश्यक वस्तूंवर अवलंबून आहे? बांगलादेश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशचा ९४% भाग भारताशी सीमा सामायिक करतो, ज्याची एकूण लांबी ४,३६७ किमी आहे. म्हणूनच, व्यापार, वाहतूक आणि सुरक्षेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
25 Dec 2025 10:51 AM (IST)
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल पळवल्याच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण ताज असतानाच आता नाशिक मध्ये पण तीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने नाशिक जिल्हा आणि शहरात मात्र खळबळ माजली आहे. नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.
25 Dec 2025 10:46 AM (IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका झाली होती, या मालिकेमध्ये भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांनी ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ‘बौना’ कमेंटबद्दल त्यांची माफी मागितली होती.
25 Dec 2025 10:39 AM (IST)
एक मोठे वृत्त समोर आले आहे. कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदूकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारताने देखील या प्रकरणावर कडाडून विरोध केला आहे. भारताने ही घटना अपमानजनक असल्याचे म्हटले आहे.
25 Dec 2025 10:32 AM (IST)
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर नेहमीच भारतात चर्चेत राहिली आहे. तिचा नवीन पाकिस्तानी मालिका “मेरी जिंदगी है तू” खूप हिट होत आहे. आणि त्यामधील गाणेही व्हायरल होत आहे. पाकिस्तानी ड्रामा भारतात खूप लोकप्रिय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, विशेषतः हानियाची लोकप्रियता भारतात देखील आहे. आता, “बिग बॉस १३” ची एक्स स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री-गायिका शहनाज गिल या अभिनेत्रीच्या नवीन ड्रामाच्या शीर्षकगीतावर नाचताना दिसली आहे. यामुळे वापरकर्त्यांनी तिच्यावर टीका केली आहे आणि त्यांना पहलगाम हल्ल्याची आठवण करून दिली आहे.
25 Dec 2025 10:31 AM (IST)
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीत आढळलेल्या २७ हजारांहून अधिक अवैध जन्म-मृत्यू नोंदींच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य गृह विभागाने विशेष चौकशी समिती नेमली आहे. सायबर अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, आरोग्य उपसंचालक बबिता कमलापूरकर आणि यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले हे सदस्य राहणार आहे. हे प्रकरण सायबर फ्रॉड असल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील तपासणीसाठी राष्ट्रीय स्तरावरही बाब पाठवण्यात आली आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
25 Dec 2025 10:30 AM (IST)
ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ (ख्रिसमस) सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त रात्री ठीक बारा वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली. या प्रसंगी संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक असलेला गोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना करत “हॅपी ख्रिसमस” म्हणत शुभेच्छा दिल्या.
विशेष प्रार्थनेदरम्यान येशू ख्रिस्ताच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देण्यात आला. शांतता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या प्रार्थनेमुळे संपूर्ण चर्च परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव, महिला, युवक आणि बालकांची उपस्थिती होती. प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वत्र आनंद, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
25 Dec 2025 10:28 AM (IST)
ओडिशाचा फलंदाज स्वस्तिक सामलने विक्रमी विक्रमात आपले नाव कोरले आहे. बुधवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध स्वस्तिक सामलने द्विशतक झळकावले. त्याने १६९ चेंडूत २१२ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा सामल ओडिशाचा पहिला फलंदाज ठरला.
25 Dec 2025 10:28 AM (IST)
21 जानेवारी 2026 रोजी आझाद मैदानावर धनगर एसटी आरक्षण मुक्तीसंग्राम आंदोलन होणार असून, या संदर्भात आज नांदेड शहरात जिल्ह्यातील धनगर नेत्यांची बैठक दिपक बोराटे यांच्या उपस्थितीत पार पडली. यात त्यांनी असे सांगितले आहे की, जालान येथुन हजारो समाज बांधव एकत्र येऊन मुंबई च्या दिशेने जातील व तिथे राज्यातील लाखो धनगर बांधवांची उपस्थिती राहील व सरकारला एसटी आरक्षण धनगर समाजाला दिल्याशिवाय या आदोलना पुढे पर्याय राहणार नाही.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन युती जाहीर झाली आहे आणि सध्या शिवसेना आणि मनसेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईतील एक बडे नेते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची बातमी होती. मनसेतील मुंबईतील पश्चिम उपनगरातील एक मोठे नाव आणि विद्यार्थी चळवळीतील एक खंबीर नेतृत्त्व मानले जाणाऱ्या मनसेचा हा नेता सुधाकर तांबोळी यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात या नेत्याला स्थान देण्यात आले. याशिवाय पक्षाचे सचिव पदापासून विभागअध्यक्षांपर्यंत अनके पदे या नेतृत्त्वाने बजावली असून सोमवारी रात्री सुधाकर तांबोळी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटीबाबत कमालाची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना पक्षातील मोठे नेतृत्त्व पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने पक्षाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.पक्षात प्रवेश करतेवेळी पक्षाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे, पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आदी उपस्थित होते. सुधाकर तांबोळी गेले अनेक वर्ष मनसेमध्ये कार्यरत होते.

सुधाकर तांबोळीचा शिवेसना शिंदे पक्षात प्रवेश






