Top Marathi News Today: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आहे
Maharashtra to World Breaking News: भारतामध्ये सध्या इंडिया ओपन बॅडमिंटन २०२६ सामने सुरू आहेत. गुरुवारी, १५ जानेवारी रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन २०२६ मध्ये भारतीय अधिकाऱ्यांना राग आला जेव्हा भारतीय शटलर एचएस प्रणॉय आणि सिंगापूरचा लोह कीन यू यांच्यातील पुरुष एकेरीचा सामना दोनदा थांबवावा लागला कारण अधिकाऱ्यांना खेळाच्या क्षेत्रात पडलेल्या पक्ष्यांची विष्ठा साफ करावी लागली.
16 Jan 2026 05:12 PM (IST)
राज्यामध्ये 29 पालिकांच्या निवडणूका झाल्या असून निकाल (Municipal Election Result 2026) स्पष्ट होत आहेत. 9 वर्षानंतर झालेल्या या पालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळताना दिसत आहे. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या पालिकांध्ये भाजपचा झेंडा फडकला आहे. दरम्यान, जालन्यामध्ये (Jalna News) मात्र भाजपला धक्का बसला आहे. २०१७ मध्ये झालेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा विजय झाला आहे.
16 Jan 2026 04:50 PM (IST)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायबरट्रकचा लूक आणि त्याची नंबर प्लेट. हा टेस्ला सायबरट्रक अधिकृतपणे भारतात खरेदी केलेला नाही, तर तो एक आयात केलेला युनिट आहे. असाही दावा केला जात आहे की नंबर प्लेटवरून हे वाहन दुबईहून आयात केले गेले आहे. म्हणूनच, असा अंदाज आहे की ते कार्नेट परमिट वापरून भारतात आणले गेले असावे.भारतीय बाजारात सध्या टेस्लाची केवळ Model Y ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. Cybertruck ने अद्याप भारतात अधिकृत प्रवेश केलेला नाही. मात्र, ही इलेक्ट्रिक पिकअप भारतात आयात करण्यात आली, तर ड्युअल मोटर AWD व्हेरिएंटची अंदाजे किंमत 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये दरम्यान असू शकते. तर ट्रिपल मोटर सेटअप असलेल्या Cyberbeast मॉडेलची किंमत 2.10 कोटी ते 2.50 कोटी रुपये इतकी जाण्याची शक्यता आहे.
16 Jan 2026 04:40 PM (IST)
लिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली असून, देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाली आहे. या सुधारणा व्यवसायासाठी सुलभता वाढवतात आणि भारताच्या जागतिक व्यापारात स्थान मजबूत करतात. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. जो रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळांना एका एकसंध चौकटीत एकत्र करतो. या योजनेचे उद्दिष्ट बहु-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे, व्यवसाय सुलभता सुधारणा, मेक इन इंडिया (Make in India) सारख्या उपक्रमांना समर्थन देणे आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करणे आहे.
16 Jan 2026 04:30 PM (IST)
यंदाच्या वर्षी थंडीचा जोरदार धडाका जाणवत आहे. प्रत्येक राज्याचा पारा हा एक अंकी झाला आहे. राजधानी दिल्ली (Delhi Weather) तर अक्षरशः गारठली आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आहे. IMDने १३ जानेवारी रोजी पंजाब, जम्मू आणि उत्तर हरियाणा, वायव्य उत्तर प्रदेश आणि दक्षिण उत्तराखंडमध्ये दाट ते खूप दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. अमृतसर विमानतळ आणि जम्मू विमानतळ दाट धुक्यात (Weather Today) हरवून जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि उत्तराखंड सध्या थंडीच्या लाटेत आहेत. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. फतेहपूरमध्ये किमान तापमान उणे ०.४ अंश नोंदवले गेले, तर चुरूमध्ये १.३ अंश नोंदवले गेले. सध्या हवामान खात्याने थंडीची लाट सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक राज्यांना थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे वाहन चालवता सुरक्षित अंतर ठेवण्याचे देखील सूचित करण्यात आले आहे.
16 Jan 2026 04:20 PM (IST)
प्रजासत्ताक दिन २०२६ च्या परेडच्या फुल ड्रेस रिहर्सलसाठी संरक्षण मंत्रालयाने मोफत पास जाहीर केले आहेत. ही रिहर्सल पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या रिहर्सलसाठी मोफत पास १५ आणि १६ तारखेला उपलब्ध असतील आणि ते मोफत बुक करता येतील. हे पास www.aamantran.mod.gov.in वेबसाइट किंवा Aamantran मोबाईल अॅपद्वारे बुक करता येतील.
16 Jan 2026 04:12 PM (IST)
सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती तब्बल 142 वर्षे जगला. समोर आलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील या व्यक्तीचे नाव नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असे होते. त्यांचे वय बघता ते देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते. व्यक्तीचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण सौदी अरेबियातील दहरान अल जानौब येथे अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावर वडिलोपार्जित गावी अल रशीद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अहवालानुसार, ७,००० हून अधिक लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.त्यांना एकूण १३४ मुले आणि नातवंडे आहेत. त्यांनी एकूण लग्ने केली आणि त्यांची तिसरी पत्नी ३० वर्षे त्यांच्यासोबत राहिली. तिच्या मृत्यूच्या वेळी तीही ११० वर्षांची होती असे म्हटले जाते. जेव्हा ते मरण पावले तेव्हा हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सौदी अरेबियातील अनेक बदलांना जवळून पाहिले. आता जेव्हा 142 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा या बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आताच्या काळातही एक व्यक्ती इतके वर्षे जिवंत राहिला ही गोष्टी अनेकांना थक्क करून जात आहे.
16 Jan 2026 04:06 PM (IST)
मुंबईतील डबेवाल्यांच्या सहभागामुळे टाटा मुंबई मॅरेथॉनच्या उत्साहात भर पडली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या २१व्या आवृत्तीत हे प्रतिष्ठित डबेवाले एका नवीन भूमिकेत उतरताना अंतिम रेषेवर (फिनिश लाईन) धावपटूंना पाठिंबा देतील आणि मॅरेथॉनमध्ये नवे रंग भरतील.रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील २५० डबेवाले अंतिम रेषांवर उभे राहतील आणि धावपटू त्यांच्या रेस पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांना अल्पोपहार वाटणार आहेत. वाटतील. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्व सहभागींसाठी समाप्तीनंतरची व्यवस्था सुरळीत आणि वेळेवर पार पडेल याची खात्री करण्यास मदत होईल.
16 Jan 2026 03:55 PM (IST)
Municipal Election Result 2026: आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान मुख्य लढत ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेत असल्याचे म्हटले जात होते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्रित लढले. तर भाजप व शिवसेना एकत्रित लढले. मात्र या दोन्ही ठिकाणी काका-पुतण्याला मोठा पराभव सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका देखील अजित पवारांच्या हातून निसटल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
16 Jan 2026 03:50 PM (IST)
T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, इंग्लंड संघाच्या तयारीत मात्र अडथळे निर्माण झाले आहेत. भारत सरकारकडून इंग्लंडचे फिरकीपटू आदिल रशीद आणि रेहान अहमद यांना अद्याप व्हिसा जारी केलेला नाही. असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. द गार्डियनच्या मते, या विलंबाचा अर्थ असा आहे की पाकिस्तानी वंशाचे हे दोन खेळाडू या आठवड्याच्या शेवटी सहा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी (तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय) उर्वरित संघासह श्रीलंकेला जाऊ शकणार नाहीत. ते त्यांच्या संघात कधी सामील होतील हे देखील स्पष्ट नाही.
16 Jan 2026 03:35 PM (IST)
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महातेजस्वी महापराक्रमी रणनितीधुरंधर, शस्त्रशास्त्र पारंगत, ज्ञानगोविंद, मुघल साम्राज्य संहारक, स्वराज्यरक्षक, धर्मरक्षक महावीर शिवपुत्र श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय… अशी गारद कानी पडली की रक्त सळसळतं आणि डोळ्यांसमोर प्रतीमा उभी राहते ती सिंहासनावर बसलेल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याची म्हणजेच शंभूराजांनी.
16 Jan 2026 03:32 PM (IST)
१५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक झाली. अक्षय कुमारपासून ते हेमा मालिनी, गुलजार आणि सौम्या टंडनपर्यंत अनेक चित्रपट कलाकार मतदान केंद्रावर आपले मौल्यवान मतदान करण्यासाठी पोहोचले. त्यात आमिर खान देखील सामील झालेले दिसले आहे. मतदान केल्यानंतर अभिनेता बाहेर आला तेव्हा मीडिया कर्मचाऱ्यांनी त्याला घेरले. तो मराठीत बोलू लागला. पत्रकाराने त्याला हिंदीत बोलण्यास सांगितले तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला आणि म्हणाला, “हिंदीत? हा महाराष्ट्र आहे भाऊ!” या विधानामुळे आता आमिर एका नवीन वादात अडकला आहे.
16 Jan 2026 03:30 PM (IST)
मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी लढणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा २०२६ या वर्षातील पहिला ‘सुपरहिट’ मराठी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट २०२६ च्या नवीन वर्षात १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता १५ दिवसांत १५ कोटींचा टप्पा ओलांडताना दिसणार आहे. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आता १५ दिवसांत १४ कोटी ९० लाखांहून अधिक कमाई केली असल्याचे समजले आहे. अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक देखील केले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या १५ दिवसांतच भारतात १५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेक कलाकारांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
16 Jan 2026 03:15 PM (IST)
जेवणाच्या ताटात डाळभात पाहिल्यानंतर लहान मुलं जेवण्यास नकार देतात. मुलांना कायमच जेवणात चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. बिर्याणी, पिझ्झा, बर्गर इत्यादी अनेक पदार्थ लहान मुलं खूप आवडीने खातात. पण घरातील भाजी चपाती, डाळभात खाण्यास कायमच नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी झणझणीत अंड्याचे मसालेदार काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अंड्याचे काप चवीला अतिशय सुंदर लागतात. गरमागरम भाकरी, चपाती किंवा डाळभातासोबत अंड्याचे काप चविष्ट लागतात. नेहमीच साधं अंड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही अंड्याचे काप बनवू शकता. हे काप तुम्ही नुसतेच सुद्धा खाऊ शकता. अंड खाणे शरीरासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. अंड्यात असलेले गुणकारी घटक शरीराला ऊर्जा देतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन अंडी खाल्ल्यास महिनाभरात वजन वाढेल आणि तुम्ही कायमच फिट दिसाल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
16 Jan 2026 02:55 PM (IST)
PMC Municipal Election Result 2026 Live: भाजपची लाट असतानाही काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले गड राखले आहेत:
काँग्रेस: प्रभाग १८ मधून माजी महापौर प्रशांत जगताप आणि साहिल केदारी यांनी विजय मिळवला आहे. तसेच प्रभाग २२ मधून रफिक शेख विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस: प्रभाग १ मधून रेखा टिंगरे यांनी विजय मिळवला आहे, तर प्रभाग २० मधून गौरव घुले यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.
16 Jan 2026 02:55 PM (IST)
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यानंतर आज (16 जानेवारीला) सकाळी १० वाजता बीएमसी निवडणुकीची मतमोजणी सुरू होईल. या निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजपची मोठी लाट दिसून येत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, जिथे पूर्वी शिवसेनेचा प्रभाव होता.
16 Jan 2026 02:50 PM (IST)
सोलापूर: सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत मंडळाकडे तक्रार केल्याच्या रागातून दोघांवर कोयता, दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या रागातून दोघेजण जखमी झाले. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली. पोलिसांनी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज खारे व युवराज खारे अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
16 Jan 2026 02:45 PM (IST)
जगाच्या पाठीवर सध्या युद्धाचे ढग दाटून आले आहेत. मध्य-पूर्वेतील तणाव शांत होत नाही तोच आता आशियात ‘ड्रॅगन’ने आपले पंख पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन (China) आणि तैवानमधील (Taiwan) संबंध पुन्हा एकदा टोकाला पोहोचले असून, चिनी लष्कराने (PLA) तैवानला चारही बाजूंनी घेरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार, अलिकडच्या काही तासांत चीनची ३४ लढाऊ विमाने आणि ११ युद्धनौका तैवानच्या अत्यंत जवळ आढळल्या आहेत.
16 Jan 2026 02:40 PM (IST)
राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप मोठा पक्ष ठरताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधू यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळताना दिसून येत आहे. आता यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे.
16 Jan 2026 02:36 PM (IST)
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात ‘कमळ’ जोमाने फुलल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यात ऐतिहासिक मुसंडी मारली असून ९०५ जागांवर आघाडी घेत आपला क्रमांक एकचा दर्जा राखला आहे. दुसरीकडे, शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने शिवसेनेच्या दोन्ही गटांना धूळ चारत भगव्या गडावर ‘निळा’ आणि ‘केसरी’ झेंडा फडकवला आहे.
16 Jan 2026 02:15 PM (IST)
जगभरात माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळी आहे. पण काही आगळ्या-वेगळ्या परंपरा अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतात. इंडोनेशियामध्ये एक असा भाग आहे, तिथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर हे जमिनीत नाही तर चक्क झाडात पुरतात. ऐकताना हे खूप भयानक वाटतंय.
16 Jan 2026 02:10 PM (IST)
“दलदल” या क्राइम थ्रिलर वेब सिरीजच्या पहिल्या लूक पोस्टरनंतर, निर्मात्यांनी आज त्याचा दमदार टीझर रिलीज केला आहे. हा टीझर पाहून नक्कीच कोणाच्याही मनाचा थरकाप होईल. तसेच, या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे, अभिनेत्रीची नवी भूमिका ही चाहत्यांना भावणारी आहे.
16 Jan 2026 02:05 PM (IST)
हंगामातील पहिल्या विजयाने उत्साहित झालेले यूपी वॉरियर्स शनिवारी नवी मुंबईत होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (WPL 2026) सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना करताना त्यांचा विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या तीन सामन्यात विजय न मिळालेल्या वॉरियर्सने गुरुवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सने विजय मिळवत आपले खाते उघडले. तीन दिवसांत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत. तथापि, वॉरियर्सना अजूनही त्यांच्या फलंदाजीच्या क्रमाच्या समस्येवर तोडगा काढावा लागेल कारण सलामीवीर किरण नवगिरे सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला.
16 Jan 2026 02:03 PM (IST)
मराठी मनोरंजनविश्व भय आणि रहस्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर 'खोताची वाडी – एक शापित वास्तु' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. ही वेब सीरिज अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी भाषेत आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदी भाषेत २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
16 Jan 2026 01:56 PM (IST)
तिसऱ्या मुंबईसाठी झालेल्या भूसंपादनाविरोधातील १९८४ च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना उरण–जासई येथे आज मानवंदना देण्यात आली. दुपारी ठीक १२ वाजता एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या संचालनातून ही मानवंदना अर्पण करण्यात आली. सिडकोमार्फत कवडीमोल दराने जमीन संपादन केल्याच्या विरोधात दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले होते. या लढ्यात पाच शेतकरी हुतात्मा झाले. त्यांच्या त्यागामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आज त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
16 Jan 2026 01:55 PM (IST)
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) तणावामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका अशा शस्त्राची चाचणी केली आहे, ज्याने पाश्चात्य देशांच्या झोपा उडवल्या आहेत. या शस्त्राचे नाव आहे ‘पोसायडॉन’ (Poseidon). याला संरक्षण तज्ज्ञ “डूम्सडे वेपन” (प्रलय घडवणारे शस्त्र) किंवा “ओशन मॉन्स्टर” म्हणत आहेत. हे केवळ एक ड्रोन नसून, समुद्राच्या अथांग खोलीत लपलेला एक असा राक्षस आहे जो संपूर्ण खंड उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतो.
16 Jan 2026 01:45 PM (IST)
जगभरात माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळी आहे. पण काही आगळ्या-वेगळ्या परंपरा अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतात. इंडोनेशियामध्ये एक असा भाग आहे, तिथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर हे जमिनीत नाही तर चक्क झाडात पुरतात. ऐकताना हे खूप भयानक वाटतंय.
16 Jan 2026 01:40 PM (IST)
अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) ने पीएनबी मनी लाँड्रिंग प्रकरणासंबधित धक्कादायक दावा केला आहे. फरार उद्योगपती मेहुल चोक्सीविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याचा मुलगा रोहन चोक्सी देखील या गुन्ह्यात सक्रियपणे सहभागी होता असे विधान ईडीने केले आहे. दिल्ली स्थित अपीलीय आर्थिक आचारसंहिता समोर हा दावा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, रोहन चोक्सीने २०१८ मध्ये ईडीने जप्त केलेल्या मुंबईतील मालमत्तेच्या जप्तीविरुद्ध अपील दाखल केले. रोहनने असा युक्तिवाद केला की ही मालमत्ता त्याच्या कुटुंबाच्या ट्रस्टची होती आणि १९९४ मध्ये ती खरेदी करण्यात आली होती.
16 Jan 2026 01:35 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्यावरून कौटुंबिक वादाचा शेवट अखेर जीवघेणा ठरल्याचे समोर आले आहे. लहान भाऊ, वहिनी आणि त्यांच्या दोन मुलांनी मोठ्या भावाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या अपमान व त्रासाला कंटाळून ५१ वर्षीय ज्येष्ठ भावाने गळफास घेत आत्महत्या केली. संजय तान्हाजी दुधे (वय 51, रा. यशवंतनगर, सिल्लोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील यशवंतनगर येथे घडली.
16 Jan 2026 01:25 PM (IST)
भारतामध्ये सध्या इंडिया ओपन बॅडमिंटन २०२६ सामने सुरू आहेत. गुरुवारी, १५ जानेवारी रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन २०२६ मध्ये भारतीय अधिकाऱ्यांना राग आला जेव्हा भारतीय शटलर एचएस प्रणॉय आणि सिंगापूरचा लोह कीन यू यांच्यातील पुरुष एकेरीचा सामना दोनदा थांबवावा लागला कारण अधिकाऱ्यांना खेळाच्या क्षेत्रात पडलेल्या पक्ष्यांची विष्ठा साफ करावी लागली.
16 Jan 2026 01:15 PM (IST)
भाज्या, दूध अशा गरजेच्या वस्तू काही मिनिटांतच घरपोच करण्यासाठी ब्लिंकिट एक लोकप्रिय प्लॅटफाॅर्म आहे. ब्लिंकिटवरुन आपण अनेक गोष्टी ऑर्डर केल्या असतील पण तुम्हाला माहिती आहे का? ब्लिंकिट आता तुमचं आयुष्य वाचवण्यातही तुमची मदत करु शकतं. ब्लिंकिटसोबतचा आपला अविश्वसनीय अनुभव शेअर करताना शिवम कुकरेजाने लिंकडिनवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने आपत्कालीन परिस्थितीती ब्लिंकिटने त्याच्या आजीचा जीव कसा वाचवला ते शेअर केले. शिवमने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
16 Jan 2026 01:05 PM (IST)
आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी रोमँटिक ड्रामा फिल्म ‘एक दिन’ अखेर तिच्या टीझरसह प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, साई पल्लवी आणि जुनैद खान यांची क्युट, फ्रेश आणि मनमोहक जोडीने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सॉफ्ट, क्लासिक आणि भावनिक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच चित्रपटाच्या पोस्टरने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
16 Jan 2026 01:00 PM (IST)
भाजी, दूध नाही तर आयुष्याची केली डिलिव्हरी! ब्लिंकिंटने नुकत्याच आपल्या क्विक सर्व्हिसने एका आजींचा जीव वाचवला असून नातवाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे
16 Jan 2026 12:50 PM (IST)
दाक्षिणात्य अभिनेता धनुषबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. तो दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तो व्हॅलेंटाईन डेला मृणाल ठाकूरसोबत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.
16 Jan 2026 12:40 PM (IST)
अलिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली. देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाले.
16 Jan 2026 12:30 PM (IST)
व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचे नोबेल पदक डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केले, परंतु नोबेल नियमांनुसार हा पुरस्कार इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही.
16 Jan 2026 12:19 PM (IST)
शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अतुल गित्तेला जन्मठेप सुनावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी.
16 Jan 2026 12:00 PM (IST)
ग्रेटर नोएडाच्या सूरजपूरमधील हायरेज सोसायटीत 20 वर्षीय मनीषचा बाल्कनीत मृतदेह आढळला. पार्टीनंतर मृत्यू झाला. आत्महत्या, अपघात की हत्या याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
16 Jan 2026 11:50 AM (IST)
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
16 Jan 2026 11:40 AM (IST)
केतू नक्षत्र बदलाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध जाणून घ्या
16 Jan 2026 11:32 AM (IST)
जागतिक भू-राजकारणात सध्या अशा एका संघर्षाची ठिणगी पडली आहे, ज्यामुळे दशकांपासून सुरू असलेली ‘नाटो’ युती धोक्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची धमकी दिल्यानंतर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी वॉशिंग्टनला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. “ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अविभाज्य भाग आहे आणि तो कोणत्याही किंमतीत विक्रीसाठी नाही,” अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला लगाम घातला आहे.
16 Jan 2026 11:20 AM (IST)
'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये राडा होताना दिसत आहे. अशातच आता घरात चौथ्या दिवशी कॅप्टनसी टास्क देखील रंगला आहे. तसेच आता 'बिग बॉस'च्या घरात पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
16 Jan 2026 11:10 AM (IST)
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये महिला व तिच्या तीन चिमुकल्यांचे अपहरण करून निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. गंडक नदीकाठी चौघांचे मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे
16 Jan 2026 10:59 AM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आगामी सामना हा विश्वचषकाचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 15 जानेवारी रोजी होणार आहे. या तिकिटांची विक्री काल सुरू करण्यात आली होती. पण या तिकिटांची विक्री झालीच नाही कारण तिकिटांची विक्री सुरू केल्यानंतर लगेचच वेबसाइट BookMyShow क्रॅश झाली आणि चाहत्यांना तिकीटे घेता आली नाहीत. तिकिट विक्रीचा टप्पा कधीचा पार पडला होता. काल दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. या टप्प्यामध्ये कोलंबोमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी मोठी मागणी वाढली.
16 Jan 2026 10:51 AM (IST)
स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) आजच्या दिवशी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे हे अभिषिक्त राजे झाले. धर्मवीर, महापराक्रमी, १२१ युद्धे जिंकणारे, संस्कृतचे विद्वान, ‘बुधभूषण’ ग्रंथाचे लेखक आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य कारभार (Dinvishesh) सांभाळला.
16 Jan 2026 10:44 AM (IST)
बुधवारी वित्त मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवे पॅकेज जाहीर केले आहे. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) ने केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी ‘संयुक्त वेतन खाते पॅकेज’ सादर केले आहे. या पॅकेजचा उद्देश एकाच खात्याखाली बँकिंग आणि विमा लाभांसह व्यापक सेवा उपलब्ध करणे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पॅकेजचे तीन मुख्य घटक आहेत. जसे की बँकिंग, विमा आणि कार्ड, ज्यामुळे हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित वित्तीय समाधान प्रदान करते. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
16 Jan 2026 10:39 AM (IST)
Pune Municipal Election Result 2026 Live: पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. पहिल्या कलांनुसार रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
16 Jan 2026 10:33 AM (IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणि मुलाच्या संभाषणाचा गोड व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. योगींनी मुलाला विचारले की, तुला काय हवे आहे. अशावेळी सर्वांसमोर न बोलता चिमुकल्याने गुपचूप योगींच्या कानात कुजबुज करत आपली मागणी त्यांना सांगितली. मुलाच्या मागणीवर योगींना इतके आश्चर्य वाटले की त्यांनी पुन्हा एकदा त्याला काय हवं ते विचारलं जेव्हा मुलाने तिच गोष्ट पुन्हा बोलून दाखवली तेव्हा त्यांना हसू अनावर झालं. वास्तविक, मुलाने योगी आदिनाथांकडे त्याला चिप्स आणून देण्याची मागणी केली होती. चिमुकल्याच्या या साध्या मागणीवर तिथे उपस्थित सर्वांनाच हसू फुटलं आणि लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली.
16 Jan 2026 10:27 AM (IST)
मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बडवाणी जिल्ह्यातील निवाली एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी घडली. विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
16 Jan 2026 10:26 AM (IST)
मुंबई BMC: भायखळ्यात भाजपची मुसंडी
भायखळा येथील मतमोजणी केंद्रावर टपाली (पोस्टल) मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली असून, प्रभाग क्रमांक २०७ मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे. या प्रभागात अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी आणि मनसेच्या शलाका हरियाण यांच्याशी त्यांची प्रमुख लढत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भायखळा परिसरात भाजपला मतदारांनी मोठी पसंती दिल्याचे दिसत आहे.
मनसेचे खाते उघडले
मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपले खाते उघडले आहे. जोगेश्वरी संदेश देसाई हे सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीवर असून, यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईच्या सत्तेत मनसे किंगमेकरच्या भूमिकेत राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव: महायुतीची विजयी घोडदौड
जळगाव महानगरपालिकेच्या ६३ जागांसाठी होणाऱ्या मतमोजणीत सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. यामध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) म्हणजेच महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची जादू पुन्हा एकदा चालताना दिसत आहे.
16 Jan 2026 10:17 AM (IST)
भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आरोन जॉर्जला टेनिस एल्बो दुखापत झाली आहे आणि सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये त्याचा सहभाग अनिश्चित आहे. अमेरिकेविरुद्धच्या स्पर्धेतील संघाच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही तेव्हा कर्णधार आयुष म्हात्रे यांने १९ वर्षीय खेळाडूबद्दल अपडेट दिले. जेव्हा अंतिम इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा आरोनची अनुपस्थिती आश्चर्यकारक होती.






