Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 05.10.2026
Maharashtra to World Breaking News :
येत्या २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित बँक संप लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने रविवारी (२७ सप्टेंबर) सार्वजनिक बँका सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मार्शल आर्ट्स आणि रोईंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली. सर्वोच्च न्यायालयात राजकीय पक्षांच्या चिन्हाशी संबंधित महत्त्वाच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार.
जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या (UNGA) महासभेत विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची चर्चा सुरू. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट घोटाळा प्रकरणात प्रशासनाकडून मोठी कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली.
24 Sep 2026 06:09 PM (IST)
IND Vs WI/ Virat kohli: 27 सप्टेंबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सिरिज सुरू होणार आहे. या साठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित आणि विराट देखील या सिरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत. विराट कोहलीकडे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
24 Sep 2026 05:59 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा करत, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य (Maharashtra Drought) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.
24 Sep 2026 05:50 PM (IST)
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मुंबईतील बहुचर्चित कलिना ग्रंथालय प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कंत्राट आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात विशेष न्यायालयाने गुरुवारी, 24 सप्टेंबर 2026 रोजी भुजबळांना दोषमुक्त केलं. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयाने दोषमुक्त केल्याचं समोर आलं आहे.
24 Sep 2026 05:43 PM (IST)
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस त्रिशुल (INS Trishul) फ्रान्सच्या टूलॉन नौदल बंदरावर दाखल झाली आहे. ही युद्धनौका आयएनएस त्रिशूल भारत व फ्रान्स यांच्यात होणाऱ्या द्विपक्षीय समुद्री युद्धसराव ‘वरुण’च्या 24 व्या उपक्रमात भाग घेईल.
दोन्ही देशांतील नौसैनिक येथील समुद्रात युद्धसराव करतील. या दरम्यान ते आपला अनुभव एकमेकांना सांगण्यासह समुद्र परिस्थितींमध्ये एकमेकांसह सवोत्तम ताळमेळ कसा राखता यावा याचाबाबतही प्रयत्न यावेळी केले जातील. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, या युद्धसरावाचा उद्देश दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य, परस्पर समन्वय आणि कार्यक्षमतेला अधिक बळकटी देणे हा आहे.
24 Sep 2026 05:25 PM (IST)
दक्षिण आशियातील राजकीय आणि लष्करी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक स्फोटक बनत चालली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan airstrikes) लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत कंदाहार, खोस्त आणि पक्तिया या तीन प्रमुख प्रांतांमधील विविध ठिकाणांवर अचानक भीषण हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईमुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव पराकोटीला पोहोचला असून सीमेवर युद्धाची भीषण छाया पसरली आहे.
24 Sep 2026 05:15 PM (IST)
खामगाव: तालुक्यातील कोलोरी परिसरात दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कोलोरी परिसरातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची स्थिती आणि अपेक्षित मदतीबाबत माहिती जाणून घेतली.
24 Sep 2026 04:57 PM (IST)
भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच २४ सप्टेंबरला मोठी घसरण दिसून आली. बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्रातील शेअर्सना मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीचा विशेषतः मोठा फटका बसला. वाढत्या यूएस बॉण्ड यील्ड्स आणि कच्च्या तेलाच्या किमतींमुळे बाजारावर दबाव होता, तसेच विमा क्षेत्राच्या नियमांमध्ये प्रस्तावित बदलांविषयी चिंताही वाढली होती. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान, १२ वित्तीय कंपन्यांच्या शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवल ₹१.१२ लाख कोटींहून अधिक घसरले. तर बजाज फायनान्सला सर्वात मोठा फटका बसला, कंपनीचे जवळपास ₹२९,००० कोटींचे नुकसान झाले. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:47 PM (IST)
बीडमध्ये आयोजित मोर्चादरम्यान आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला. शेतकऱ्यांच्या बाजूने पुढील 10 ते 12 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘तुम्ही पुढच्या दहा-बारा दिवसांत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतले नाही, तर सरकारला हे महागात कसं पडेल, आम्ही घोषणा करणार आहोत,’ असं रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. कर्जमाफीपासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहिल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय शेतकऱ्यांना मदत, रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:37 PM (IST)
जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने विजयी घौडदौड कायम राखली आहे. बांग्लादेशचा पराभव करत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने चीनी तैपेईचा ३७-२१ असा पराभव केला आहे. हा सामना टोकाई सिटिजन्स जिम्नेजियम येथे पार पडला आहे. . या शानदार विजयासह भारतीय संघाने ‘ग्रुप ए’मध्ये आपले पहिले स्थान कायम राखले आहे. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:27 PM (IST)
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड स्थित गुरुवारी एका रबर कंपनीच्या स्टोअर रुमची भिंत कोसळून झालेल्या अपघातात (Palghar Accident) त्यात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाडा पोलीस क्षेत्रातील विक्रमगड रोड स्थित टीना रबर कंपनीत ही घटना घडली. सध्या पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 वाजता हे कामगार नाश्ता करत होते. तेव्हा त्यांच्या बाजूला असलेली भिंत अचानक कोसळली. ज्यामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. जवळ उपस्थित इतर लोकांनी तातडीने ढिगारा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:17 PM (IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सर्वात मोठे देशद्रोही आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ज्ञानेश कुमार भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहेत.” अशी शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार समोर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:05 PM (IST)
साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून IIT मुंबईबाहेर आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे. गुरुवारी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. साहिल वाकोडे प्रकरण हे ‘संस्थात्मक मृत्यू’ असल्याचा आरोप त्यांनी केला. वाचा सविस्तर...
24 Sep 2026 04:00 PM (IST)
Sameer Hiremath: लाइफ सायन्सेस क्षेत्रातील हायकल लिमिटेडच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या 38व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांनी समीर हिरेमठ यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (Chairman & Managing Director) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असून 1 ऑक्टोबर 2026 ते 30 सप्टेंबर 2031 या कालावधीसाठी ती लागू राहणार आहे. समीर हिरेमठ हे मे 1999 पासून हायकलच्या संचालक मंडळाशी संबंधित आहेत. 2021 मध्ये झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीसोबतच्या त्यांच्या दीर्घ कार्यकाळात हायकलने औषधनिर्मिती, पीक संरक्षण आणि इतर लाइफ सायन्सेस व्यवसायांमधील क्षमता विस्तारावर भर दिला आहे.
24 Sep 2026 03:55 PM (IST)
भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवी नोरमने (Roshibina Devi) आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत ( Asian Games 2026 महिलांच्या ६० किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. गुरुवारी (दि. २४) झालेल्या अंतिम सामन्यात ती चीनच्या झांग शियाओयूकडून २-० ने पराभूत झाली. झांगने दोन्ही फेऱ्या ५-० ने जिंकून १०-० अशा फरकाने सुवर्णपदक पटकावले. पराभव होऊनही, रोशिबिनाने सलग तिसरे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वुशूमध्ये सलग तीन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
24 Sep 2026 03:50 PM (IST)
Ishwar Thakur: टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता ईश्वर ठाकूर सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ‘FIR’ आणि ‘भाभी जी घर पर हैं!’ यांसारख्या लोकप्रिय विनोदी मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते ठाण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या पुढील उपचारांसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, ५४ वर्षीय ईश्वर ठाकूर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक खालावली. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या बहिणीने सांगितले आहे. किडनीशी संबंधित गंभीर समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
24 Sep 2026 03:45 PM (IST)
Uddhav Thackeray On Maharashtra Drought: मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची अधिसूचना काढणार असल्याचे जाहीर केलं असलं तरी पंचनाम्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात पुरेशा पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. Uddhav Thackeray Slams Maharashtra Govt Drought Declaration Crop Damage Panchnama Delays
24 Sep 2026 03:40 PM (IST)
Major Rishab Singh Sambyal Instagram Subscription: सोशल मीडियाच्या जगात कधी कोण चर्चेचा विषय बनेल, हे सांगता येत नाही. सध्या भारतीय लष्कराचे माजी अधिकारी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल खूप चर्चेत आहेत. याचे कारण अतिशय रंजक आहे मेजर ऋषभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘पेड सबस्क्रिप्शन मॉडेल’ सुरू केले आहे. याद्वारे ते त्यांच्या फॉलोअर्सकडून दरमहा एक निश्चित फी आकारत आहेत. अंदाजे २३ लाख युजर्स ऋषभ सिंह संब्याल यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्यापैकी ३,०९६ जणांनी त्यांचे पेड सबस्क्रिप्शन घेतले आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी सबस्क्रिप्शन फी दरमहा १८० रुपये आणि आयफोन युजर्ससाठी दरमहा १९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यावरून त्यांची मासिक कमाई लाखांमध्ये असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. अनेक लोक याला सैन्याच्या नोकरीनंतरचा नवीन करिअर पर्याय म्हणून पाहत आहेत, तर काही लोक लष्करी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे पैसे चार्ज करण्यावर प्रश्नही उपस्थित करत आहेत.
24 Sep 2026 03:35 PM (IST)
नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच झाले आहेत. त्यात रोजच्या वापरासाठी नवीन हेडफोन्स निवडताना केवळ साउंडच महत्त्वाचा नसतो. बॅटरी लाईफ, नॉईज रिडक्शन, कनेक्टिव्हिटीचे पर्याय आणि किंमत या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत. यामध्ये प्रसिद्ध कंपनी boAt ने नवे हेडफोन लाँच केले आहेत. boAt च्या लाईनअपमधील दोन हेडफोन्स सध्या चर्चेत आहेत. Nirvana Eutopia 2 ANC आणि Rockerz 650 Pro हे दोन हेडफोन आहेत. या दोन्हीमध्ये 80 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. मात्र, फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि बजेटच्या बाबतीत त्यांच्यात लक्षणीय फरक आहे. boAt Nirvana Eutopia 2 ANC या इअरफोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. हे हेडफोन्स तुम्ही boAt च्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा Amazon आणि Flipkart वरून खरेदी करून शकतो.
24 Sep 2026 03:30 PM (IST)
Hruta Durgule: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या आगामी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील ‘फुलपाखरू’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अभिनेत्री हृता दुर्गुळेचा स्वच्छंदी अंदाज या गाण्यात पाहायला मिळत आहे. गोव्याच्या सुंदर वातावरणात चित्रित झालेल्या या गाण्यात बाइक राईड, समुद्र आणि मोकळं आकाश यांची सुंदर झलक पाहायला मिळते. ‘फुलपाखरू’ या गाण्यात हृता दुर्गुळे अगदी मनमोकळ्या अंदाजात दिसते. कधी बाइकवरून गोव्याच्या रस्त्यांवर फिरताना, तर कधी समुद्राच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवताना ती पाहायला मिळते. हिरवागार निसर्ग, सुंदर गल्ल्या आणि अथांग समुद्र यामुळे गाण्याचं लोकेशनही खास ठरतं.
24 Sep 2026 03:25 PM (IST)
अहिल्यानगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा आरोप मंडळाचे कार्यकर्ते आणि आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. या लाठीचार्जमध्ये वाघस्कर यांना दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका लाठीचार्जमुळे झाला की अन्य वैद्यकीय कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेमुळे भिंगार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
24 Sep 2026 03:20 PM (IST)
भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स 2026 (Asian-games) मध्ये आपली शानदार कामगिरी कायम राखली. भारतीय संघाने गुरुवारी एकतर्फी सामन्यात साउथ कोरियाचा 8-2 असा दणदणीत पराभव केला. हा भारताचा सलग तिसरा विजय आहे. भारताने स्पर्धेच्या सुरुवातीला इंडोनेशियाविरुद्ध 13-1 अशी धमाकेदार विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेचा काटा 16-1 असा काढला. आता भारतीय संघाने साउथ कोरियाला घरचा रस्ता दाखवला आहे. साउथ कोरियाविरुद्ध भारतीय संघाने आपला पहिला गोल चौथ्या मिनिटाला केला. शिलानंद लाकराने भारतासाठी हा पहिला गोल केला.
24 Sep 2026 03:15 PM (IST)
IIT Bombay Mental Health Measures: आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधून अलीकडेच आलेली एक अतिशय दुःखद घटना संपूर्ण देशाच्या शैक्षणिक जगताला हादरवून सोडणारी ठरली आहे. २० वर्षांचा बी.टेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणानंतर संस्थेमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर आयआयटी बॉम्बे प्रशासन खडबडून जागे झाले असून, विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्यासाठी अनेक मोठे व दूरगामी पावले उचलण्याची तयारी सुरू आहे.
24 Sep 2026 03:00 PM (IST)
आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, व्यवसाय, आयटी आणि संशोधनामध्ये अत्यंत वेगाने वाढला आहे. मानवी जीवन अधिक सुलभ करण्यासाठी निर्माण झालेले हे तंत्रज्ञान आता मात्र रणांगणावर थेट माणसाच्या ‘जीवन-मरणाचे’ निर्णय घेऊ लागले आहे. रणांगणावर केवळ बंदुका, क्षेपणास्त्रे, विमाने आणि सैनिकच युद्ध लढत नसून संगणकाचे अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सैन्याला कोणाला मारायचे आणि कोणाला सोडायचे याचे आदेश देत आहेत.(Israel) नुकत्याच पार पडलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नाझा’ (NAZA Documentary) या इस्रायल-गाझा युद्धावर आधारित माहितीपटाचा प्रीमियर झाला. या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर जगभरात आणि विशेषतः जागतिक स्तरावर संतापाची मोठी लाट उसळली आहे. तंत्रज्ञान माणसाच्या जगण्या-मरण्याचा निर्णय इतक्या निष्ठुरपणे कसे घेऊ शकते, असा गंभीर नैतिक आणि मानवाधिकारविषयक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. इस्रायली सैन्याने युद्धादरम्यान लोकां शोधून काढण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करून ठार मारण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा वापर केला, याचे विदारक चित्रण या माहितीपटात मांडण्यात आले आहे.
24 Sep 2026 02:55 PM (IST)
दोन वेळचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स (एमआय)ने 2027 व्युमन्स प्रीमियर लीग (WPL 2027) च्या आगामी हंगामाआधी ल्यूक विलियम्स यांना आपल्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्त केले. विलियम्स हेड कोचच्या रुपात लिसा केटली यांची जागा घेतील. विलियम्स यांनी 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ला डब्ल्यूपीएलचे पहिले जेतेपद पटकावून दिले होते.
24 Sep 2026 02:45 PM (IST)
लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र नरपतमल लोढा यांच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यानंतर या प्रकरणातील ईडीच्या तपासाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने 21 सप्टेंबर 2026 रोजी लोढा यांच्यावरील PMLA अंतर्गत अटकेच्या प्रक्रियेत कायदेशीर त्रुटी असल्याचे नमूद केले. न्यायालयाने त्यांची कोठडी रद्द करून 5 लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.
24 Sep 2026 02:37 PM (IST)
राज्यातील सण उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सभा यांसारख्या कार्यक्रमांध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा उत्सवांसाठी लाऊडस्पीकर वापण्याची परवानगी देताना संबंधित मंडळाकडून एक लाख रुपयांची ठेव जमा करून घ्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, यात फक्त सार्वजनिक मंडळांचाच नव्हे तर, वैयक्तिक पातळीवर जर एखादी व्यक्ती लाऊडस्पीकर अथवा डिजे वापरण्याची परवानगी मागत असेल, तर संबंधित व्यक्तीकडूनही ५० हजार रुपयांचे डिपॉझिट (Security Deposit) म्हणून जमा करावे, असेही सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विनाकारण किंवा नियमांचे उल्लंघन करून लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांना चांगलाच दणका मिळाला आहे.
24 Sep 2026 02:25 PM (IST)
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन आघाडीचे कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. आता या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. निर्मात्यांनी रणबीर कपूरचा फर्स्ट लुक पोस्टर प्रेक्षकांसमोर आणला आहे.
24 Sep 2026 02:15 PM (IST)
जेएसडब्ल्यू समूहाची व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने आज AMPSTAR हा ब्रँड सादर केला. कंपनी या ब्रँडअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची रचना, निर्मिती आणि विक्री करणार आहे. या उपक्रमाद्वारे समूहाने कमर्शिअल मोबिलिटी क्षेत्रात पदार्पण केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीनफील्ड प्रकल्पात उत्पादित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सचा समावेश असलेले, फुल-स्टॅक व्यावसायिक मोबिलिटी समाधान (commercial mobility solution) AMPSTAR उपलब्ध करून देईल.
24 Sep 2026 02:06 PM (IST)
वाळूज एमआयडीसी परिसरातील जोगेश्वरी भागात अल्पवयीन मुलीवर तिच्याच २० वर्षीय मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचाराच्या काळात मुलगी १७ वर्षे चार महिन्यांची होती. या घटनेनंतर ती गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. उपचारादरम्यान गर्भपात झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी संशयिताविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
24 Sep 2026 02:00 PM (IST)
आयपीएलच्या (IPL 2027) लिलावाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी बुधवारी आयपीएल लिलाव आणि आगामी क्रिकेट सामन्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आयपीएल लिलाव डिसेंबरमध्ये गोव्यात होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिलाव भारताबाहेर आयोजित केला जात होता, पण यावेळी बीसीसीआयने लिलाव भारतातच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
24 Sep 2026 01:55 PM (IST)
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडेय सिंह यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. सोनारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरीन ड्राइव्ह, दोमुहानी परिसरात हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
24 Sep 2026 01:50 PM (IST)
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या आगामी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील ‘फुलपाखरू’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अभिनेत्री हृता दुर्गुळेचा स्वच्छंदी अंदाज या गाण्यात पाहायला मिळत आहे. गोव्याच्या सुंदर वातावरणात चित्रित झालेल्या या गाण्यात बाइक राईड, समुद्र आणि मोकळं आकाश यांची सुंदर झलक पाहायला मिळते.
24 Sep 2026 01:45 PM (IST)
मध्य पूर्वेतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या इस्रायलच्या (Israel Elections 2026) राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठे वादळ उठले आहे. आगामी २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने दोन प्रमुख अरब पक्षांना आणि त्यांच्या आघाडीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्याचा अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इस्रायलमधील मुस्लिम आणि अरब समुदायाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात हा निर्णय पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा निवडणूक जिंकण्याचा एक मोठा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.
24 Sep 2026 01:40 PM (IST)
जेएसडब्ल्यू समूहाची व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने आज AMPSTAR हा ब्रँड सादर केला. कंपनी या ब्रँडअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची रचना, निर्मिती आणि विक्री करणार आहे. या उपक्रमाद्वारे समूहाने कमर्शिअल मोबिलिटी क्षेत्रात पदार्पण केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीनफील्ड प्रकल्पात उत्पादित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सचा समावेश असलेले, फुल-स्टॅक व्यावसायिक मोबिलिटी समाधान (commercial mobility solution) AMPSTAR उपलब्ध करून देईल.
24 Sep 2026 01:35 PM (IST)
मुलांना संतुलित व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी राज्यात पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित जेवण दिले जाते. अकोला जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत पहिली ते आठवीच्या १ लाख ६१ हजार ९८५ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळण्यास मदत होत असून, शाळेतील उपस्थितीतही वाढ होत असल्याचे चित्र आहे.
24 Sep 2026 01:25 PM (IST)
भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ रुग्णवाहिकेची ढाल; चालक मनोज भोईटे व डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे भुसावळ परिसरात कौतुक भुसावळ येथील एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका केमिकल फॅक्टरीमध्ये अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीचे स्वरूप आणि केमिकलचा धोका लक्षात घेता मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून यावल येथील व जळगाव जिल्ह्यातील ‘१०८’ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
24 Sep 2026 01:15 PM (IST)
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन आघाडीचे कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. आता या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. निर्मात्यांनी रणबीर कपूरचा फर्स्ट लुक पोस्टर प्रेक्षकांसमोर आणला आहे.
24 Sep 2026 01:05 PM (IST)
राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील चौक, रस्ते आणि प्रमुख ठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्स लावले जातात. मात्र, आपल्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे फलक लावू नयेत, असे आवाहन मनसे नेते राजू रतन पाटील यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
24 Sep 2026 12:48 PM (IST)
भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची विक्री पिंपरीतील दुकानातून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात कारवाई करून १२ हजार ६५० रुपये किमतीच्या २३ क्रीम जप्त केल्या आहेत. याप्रकरणी विक्रेत्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
24 Sep 2026 12:36 PM (IST)
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ४० वर्षीय संशयिताला न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांनुसार दंडही ठोठावला. विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. यादव यांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) हा निकाल दिला. रामू कुंजल निसाद (वय ४०, रा. विनायकनगर, मोशी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात ३ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
24 Sep 2026 12:24 PM (IST)
पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराच्या विविध भागांत दुचाकी चोरणाऱ्या उच्चशिक्षित सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या अटकेमुळे वाकड, काळेवाडी, हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. महादेव शिवानी गरड (२७, रा. नवले हॉस्पिटलजवळ, पुणे; मूळ रा. अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी त्याला १८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह पुणे शहरातील विविध भागांतून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.
24 Sep 2026 12:12 PM (IST)
मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणाला बुलेट दुचाकी आणि त्यानंतर ऑटो रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी शनिवारी (दि. १९) रात्री साडेअकरापूर्वी ही घटना घडली आहे. खुनानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या चार तासांत गुन्ह्याची उकल करून चौघांना अटक केली आहे. मारुती बाळासाहेब बनसोडे (वय ३७, रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, रा. बोराडेवाडी, डी-मार्टसमोर, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित दशरथ साळुंखे (वय २६, रा. जगतापनगर, थेरगाव), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९, रा. पवारनगर, थेरगाव), भारत संजय पवार (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव) आणि किरण अंकुश उमाप (वय २८, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) यांना अटक केली आहे.
24 Sep 2026 11:50 AM (IST)
कोणतीही भाषा व्यक्त करताना जितके महत्त्व शब्दांना असते, तितकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्व त्या शब्दांमधील भावना योग्य रीतीने पोहोचवणाऱ्या ‘विरामचिन्हांना’ असते. आपण बोलताना कुठे थांबायचे, कसा सूर लावायचा किंवा भावना कशी व्यक्त करायची, हे सहज सुचते. मात्र, तेच विचार जेव्हा आपण कागदावर किंवा डिजिटल स्क्रीनवर उतरवतो, तेव्हा हे सर्व काम विरामचिन्हे करत असतात. याच विरामचिन्हांचे भाषेतील स्थान, अचूकता आणि महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय विरामचिन्ह दिन’ (National Punctuation Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
24 Sep 2026 11:45 AM (IST)
कानात इयरफोन घालून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालत असलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा धनबाद एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
24 Sep 2026 11:30 AM (IST)
आजच्या काळात वंध्यत्व ही अत्यंत गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे, आणि तरीही लोकांचे त्याकडे फारसे लक्ष गेलेले नाही. आज जगभरातील दर ६ पैकी १ व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी वंध्यत्वाचा सामना करते. दुसरीकडे, जगातील जवळपास १०० टक्के लोकांच्या शरीरात ‘अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स’ (EDCs) म्हणजेच शरीरातील हार्मोन्समध्ये अडथळा आणणारी रसायने तपासणीत आढळून येत आहेत. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणे हा निव्वळ योगायोग नाही.
24 Sep 2026 11:15 AM (IST)
जागतिक मनोरंजन विश्वात भारताचे नाव अत्यंत अभिमानाने आणि दिमाखात उंचावणारी संस्था म्हणजेच आपली मुंबईस्थित हिंदी चित्रपटसृष्टी, ज्याला जगभरात ‘बॉलीवूड’ या नावाने आदरपूर्वक ओळखले जाते. चित्रपट निर्मितीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असलेल्या या बॉलीवूडचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक प्रभाव आणि त्याचे योगदान अफाट आहे. याच अफाट योगदानाचा, भव्यतेचा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बॉलीवूड दिन’ (World Bollywood Day) अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो.
24 Sep 2026 11:15 AM (IST)
पेपर लिकचे गंभीर आरोप आणि नीट यूजी परीक्षेवरून झालेल्या वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) परीक्षा प्रणाली, सुरक्षा व्यवस्था आणि कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर, आता एनटीएने आपल्या प्रशासकीय रचनेपासून ते कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, परीक्षांचे संचालन आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत अनेक आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात एनटीएने या सुधारणांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे.
24 Sep 2026 11:10 AM (IST)
काही दशकांपूर्वी घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा झाडांच्या फांद्यांवर सहज दिसणारे अनेक पक्षी आता नव्या पिढीसाठी जवळपास अपरिचित होत आहेत. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्डस’च्या ताज्या अहवालानुसार भारतातील सुमारे ३४८ पक्षीप्रजातींच्या अभ्यासात ६० टक्के पक्ष्यांच्या संख्येत दीर्घकालीन घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्मीळ पक्ष्यांपेक्षा पूर्वी सर्वसामान्य मानल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे हळूहळू कमी होणे हा अधिक पर्यावरणीय इशारा ठरत आहे. अनेक पक्ष्यांची संख्या अचानक घटलेली नाही. ती इतक्या संथ गतीने कमी होत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
24 Sep 2026 11:00 AM (IST)
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये १३ लाख मे. टन कुसगावपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी केले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., शिवनगर येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अग्निप्रदीपन सोहळा बुधवारी (२३ सप्टेंबर) उत्साहात पार पडला. कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे व त्यांच्या पत्नी कविता शेंडे यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी शेंडे बोलत होते
24 Sep 2026 10:57 AM (IST)
पेपर लिकचे गंभीर आरोप आणि नीट यूजी परीक्षेवरून झालेल्या वादानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) परीक्षा प्रणाली, सुरक्षा व्यवस्था आणि कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर, आता एनटीएने आपल्या प्रशासकीय रचनेपासून ते कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, परीक्षांचे संचालन आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत अनेक आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात एनटीएने या सुधारणांच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे.






