Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज लक्ष राहणार आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाचा मुद्दाही चर्चेत असून मोठ्या संख्येने नावे वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे भारताकडून प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांशी व्यापारविषयक संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेअर बाजारात जागतिक बाजारपेठेतील संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि मध्यपूर्वेतील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रात महिला हॉकी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीनंतर भारताचे आव्हान संपले आहे.
24 Aug 2026 06:14 PM (IST)
India Vs Sri Lanka 2nd Test Match Live Updates: कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 503 रन्सवर आपला डाव घोषित केला. देवदत्त पडीकलने शानदार 117 रन्सची खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने देखील 115 रन्सची शानदार शतकी खेळी केली. परदेशात ध्रुव जुरेलने ठोकलेले हे पहिलेच शतक आहे. यानंतर ध्रुव जुरेलने केलेले सेलिब्रेशन सध्या जोरदार व्हायरल झाले आहे.
24 Aug 2026 05:57 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आज (सोमवार, 24 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुख्य उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि आगामी काळातील राजकीय रणनीती आखण्याचा पार्श्वभूमीवर हि मिटिंग आयोजित करण्यात आले असल्याचे समजण्यात येत आहे. असे असले तरीही सूत्रांच्या मते, आज मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून दोनी राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर...
24 Aug 2026 05:47 PM (IST)
दहिसर टोल नाक्याजवळ गोदावरी लॉजसमोर सोमवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव असून, तो आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत सौरभच्या वडिलांनाही दुखापत झाली आहे. वाचा सविस्तर...
24 Aug 2026 05:37 PM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan News) राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत असतात, परंतु नुकत्याच घडलेल्या एका कायदेशीर आणि राजकीय घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अदियाला तुरुंगात बंदिस्त असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, कायदा मंत्री आणि माहिती मंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका (Contempt Petition) दाखल केली आहे. इम्रान खान यांच्या वैद्यकीय उपचारांसंदर्भात आणि त्यांना शिपा रुग्णालयात हलवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशांचे पालन न केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
24 Aug 2026 05:27 PM (IST)
सध्या कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने सुरुवात केली. दोघांनी प्रत्येकी 45 आणि 18 रन्सची खेळी केली. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना पावसाने काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. अखेर भारताने आपला डाव 503 रन्सवर घोषित केला आहे. ध्रुव जुरेलने शानदार शतक केले. 115 रन्सवर तो नॉट आउट राहिला. आता श्रीलंकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. वाचा सविस्तर...
24 Aug 2026 05:20 PM (IST)
मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, प्राध्यापिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे आज (सोमवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, व्याकरण आणि शिक्षण वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
24 Aug 2026 05:10 PM (IST)
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील महापालिकेच्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फुटपाथवर अनधिकृतपणे भंगाराच्या वस्तू ठेवण्यात आल्या असून काही हॉटेल व्यावसायिकांनी चक्क शेगड्या आणि इतर साहित्यही मांडले आहे. त्यामुळे नागरिक आणि रेल्वे प्रवाशांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. या परिस्थितीमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन नेमके करते तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
24 Aug 2026 05:00 PM (IST)
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी चार हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
24 Aug 2026 04:50 PM (IST)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे, उत्कृष्ट कामांमुळे आणि राजकीय भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि कामाच्या शैलीमुळे ते अनेकदा माध्यमांमध्ये केंद्रस्थानी असतात. अशातच नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. जुन्या पिढीतील लोकांनी हळूहळू बाजूला होऊन नव्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि स्वतः मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.
24 Aug 2026 04:40 PM (IST)
देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे प्रयत्नांना गती मिळाली आहेत. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ वर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, सरकार ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ योजनेची अंतिम मुदत २०३४ वरून २०२९ पर्यंत कमी करू इच्छित आहे.
24 Aug 2026 04:23 PM (IST)
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारताने 8 विकेट्स गमावून 475 रन्स केल्या आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद झाला होता, आता या प्रकरणात आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.
24 Aug 2026 04:00 PM (IST)
Tarini Serial: ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ दमदार कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या देशाची सुरक्षा, गुप्त मोहिम आणि कर्तव्याला सर्वाधिक प्राधान्य देणारी ‘तारिणी’ मालिका सध्या एका महत्त्वाच्या मिशनवर पोहोचली आहे. आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करून सत्य समोर आणणाऱ्या तारिणीसमोर आता देशाच्या सुरक्षेशी संबंधित मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ‘ऑपरेशन तिरंगा’ या विशेष मोहिमेसाठी तारिणी अमृतसरला पोहोचली असून, या कथानकाच्या निमित्ताने मालिकेने भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करत एक विशेष टप्पा गाठला आहे.
24 Aug 2026 03:45 PM (IST)
Sanjay Raut Slams Narendra Modi: “ज्या काळात नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हते. प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता. मग मोदींनी चहा कुठे विकला?” असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशामा साधला आहे. इतकेच नव्हे तर, नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन,” असे खुले आव्हान राऊत यांनी दिले आहे.
24 Aug 2026 03:35 PM (IST)
वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १.१९ लाख हेक्टरवर सोयाबीन तर २.३१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पण वाढीच्या अवस्थेत असलेल्या या दोन्ही पिकांवर सध्या किड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वीच जिल्ह्यात पावसाचा खंड कायम असून आता कपाशी व सोयाबीन पिकावर किड-रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
24 Aug 2026 03:25 PM (IST)
Amravati Fire News: अमरावतीच्या स्त्री जिल्हा रुग्णालयात पहाटे घडलेल्या दुर्घटनेत तीन अर्भकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समिती सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिली.
24 Aug 2026 03:15 PM (IST)
Chess: भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा पराभव करून ९-३ अशी आघाडी घेतली आहे आणि ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील स्थानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रज्ञानंद आणि केमर यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक ठरला. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना, सुरुवातीला भारतीय खेळाडू प्रतिकूल स्थितीत दिसत होता, तर केमरचे सामन्यावर नियंत्रण होते.
24 Aug 2026 03:00 PM (IST)
Sugar Stocks Price : सणासुदीच्या काळात महागाईने डोकं वर केलं आहे. या महागाईच्या झळा सामान्यांना बसत आहेत. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर सध्या मार्केटमध्ये बरीच भाव खात आहे. त्यामुळे सामान्यांच्या घरातील गोडवा महागला आहे. अशी परिस्थिती असली तरीही साखरेने शेअर मार्केटमध्ये देखील चांगलीच धुमाकुळ घातली आहे.
24 Aug 2026 02:59 PM (IST)
अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली. आगीचे नेमके कारण काय, तसेच रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
24 Aug 2026 02:50 PM (IST)
पहिल्यांदा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि करणावर चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली असून या दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणावर चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यानंतर आज महायुती समन्वय समितीची बैठक होणार असून या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
24 Aug 2026 02:40 PM (IST)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात जुन्या पिढीतील नेत्यांनी हळूहळू निवृत्त होऊन नवीन पिढीकडे जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी जुन्या लोकांनी मार्गदर्शकाच्या भूमिका स्वीकाराव्यात आणि नवीन पिढीला कारभार चालवण्याची द्यावी असेही म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून गडकरी यांनी निवृत्तीचे संकेत दिले तर नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
24 Aug 2026 02:31 PM (IST)
परभणीत एका 7 वर्षीय मुलाला शिक्षकांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, शिक्षकाने विद्यार्थाला उलटे लटकवून मारहाण करत चटके दिल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. नांदेड येथील हा 7 वर्षीय विद्यार्थी परभणी शहरातील एका गुरुकुल संस्थेत शिकत होता. त्याच ठिकाणी त्याला मारहाणा झाल्याच पालकांनी आरोप केला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अभिप्राय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
24 Aug 2026 02:00 PM (IST)
Mumbai Local Viral Video: मुंबईची लाईफलाईन म्हटलं की, डोळ्यांसमोर येते की म्हणजे लोकल रेल्वे. दररोज लाखो नागरिकांना आपल्या आवडत्या स्थळी नेऊन सोडते. गर्दी, धावपळ आणि सततची लगबग यामध्ये मुंबईकरांचा दिवस लोकल प्रवासाशिवाय पूर्ण होत नाही. मात्र आता याच लोकमधील एका व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. बोरिवली ते विरार या मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेकडून बोम्बील माशांवर रंग लावला जात असल्याचे दिसत आहे. Video Viral
A viral video allegedly shows a woman colouring Bombil fish to make it appear fresh while selling it on a Borivali-Virar local train. The incident date is unknown.
Netizens have raised food safety concerns and demanded an investigation by railway authorities and the FDA. pic.twitter.com/5Dza7wtLnJ
— Mid Day (@mid_day) August 24, 2026
credit - social media and Twitter
24 Aug 2026 01:55 PM (IST)
Sharad Ratna Awards 2026 Details : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथे जिल्हा कार्यकारणी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळ्याच्या पूर्वतयारीची रूपरेषा निश्चित करण्यात आली. कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी आणि संघर्षावर मात करून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी केले. मनोगत व्यक्त करताना राजाराम बुवा शेलार म्हणाले,”प्रत्येकाच्या वाट्याला संकटे येतात; मात्र संकटांवर मात करून धडपडणाऱ्या कलाकारांना मोठे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” कलाकारांना अधिकाधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच वारकरी मंडळींचाही सांस्कृतिक उपक्रम व दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
24 Aug 2026 01:50 PM (IST)
Amravati Hospital Fire: अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (Amravati Hospital Fire) अर्थात डफरीन रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
24 Aug 2026 01:45 PM (IST)
Rahul Gandhi Unexpected Moment News: कॉंग्रेस नेते आणि केद्रींय विरोधीपक्ष नेते राहूल गांधींनी ‘छात्रों की गूंज’ पुण्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यासोबत मनमोकळ्या गप्प मारल्या. याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमातील चर्चा संपल्यानंतर घडलेल्या ‘या’ एका छोट्याशा प्रसंगाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Rahul Gandhi Pune Viral Video:
How comfortably she kissed Rahul Gandhi…! 😂 pic.twitter.com/oMKSgyduaE
— Shiva (@suktabombil) August 23, 2026
credit - social media and Twitter
24 Aug 2026 01:40 PM (IST)
इंस्टाग्राम हे सर्वाधित चर्चेत असणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंस्टाग्रामचा वापर करतात. इंस्टाग्रामवरील छोटे अपडेट किंवा एक छोटा बदल देखील लोकांचे लक्ष वेधून घेतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका अपडेटबद्दल सांगणार आहोत, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
इंस्टाग्रामवर अनेक यूजर्सना त्यांच्या अकाऊंटवर एक ग्रे टिक दिसत आहे. या ग्रे टिकबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक यूजर्सनी असा दावा देखील केला आहे की, ग्रे टिकमुळे त्यांच्या अकाऊंटला पूर्वीसारखी रीच मिळत नाही आणि त्यांनी शेअर केलेल्या रिल्सला पूर्वीच्या तुलनेत खूप कमी व्ह्युज मिळत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
24 Aug 2026 01:30 PM (IST)
Foreign Direct Investment : भारतीय अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सरकार वेळोवेळी बदल आणि उपाययोजना करत असतात. आताही केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये आणि धोरणांमध्ये बदल केले आहेत. त्याच्या परिणाम आता प्रार्थमिक स्तरावर दिसू लागला आहे. नियमांमध्ये केलेली ऐतिहासिक सुधारणा आणि सुटसुटीतपणा यामुळे धोरणांचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. या नव्या नियमांमुळे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे भारतातमध्ये गुंतवणूकीचा ओघ देखील वाढला आहे. यामुळे नेमका कोणत्या क्षेत्राला फायदा झालाय? आणि कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत? ( Foreign Direct Investment )
24 Aug 2026 01:25 PM (IST)
EV Car Battery Repair Viral Video : सध्या वाढत्या पेट्रोलच्या किंमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडतात. इलेक्ट्रिक गाडीमुळे प्रदूषण कमी होते तसेच कमी खर्चात जास्तीत प्रवास मिळतो . त्यामुळे इलेक्ट्रिक कार नागरिकांची पाहिली पसंती असते. दरम्यान या गाड्यांमध्ये काही तांत्रिक अडचण आली की, खर्च मात्र वाढतो. मुख्य म्हणजे, बॅटरी खराब झाल्यावर मालकांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. अशाच एका प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. Electric Car Servicing
24 Aug 2026 01:20 PM (IST)
Rohit Pawar Press Conference: “पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील झेन-झी सोबत संवाद साधला. स्वतःहून आलेले लोक आणि आणलेले लोक हे जर तुम्हाला पाहायचे असतील, तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.” अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
24 Aug 2026 01:15 PM (IST)
Bhuleshwar Raja Accident : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या मुंबईला शनिवारी (22 ऑगस्ट 2026) संध्याकाळी हादरवून सोडणारी दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या २७ फूट उंच भव्य गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मूर्ती क्रेनवरून अचानक खाली कोसळली. या दुर्घटनेत भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला. दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले. आता या दुर्घटनेमागील कारणांबाबत नवी माहिती समोर येत असून, मूर्तिकाराने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
24 Aug 2026 01:10 PM (IST)
अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील दीर्घकाळ चाललेला लष्करी व राजनैतिक संघर्ष आता एका अत्यंत संवेदनशील, धोकादायक आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे जारी केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड खळबळ उडाली आहे. अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानुसार इराणला पूर्णपणे एकाकी पाडण्यासाठी आणि तेहरान सरकारची उरलेली सर्व आर्थिक ताकद नष्ट करण्यासाठी ‘आर्थिक डी-डे’ (Economic D-Day) मोहिमेची सुरुवात झाली आहे
24 Aug 2026 01:02 PM (IST)
चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित गंभीर समस्यांची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. सुमारे दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसीच्या विविध समस्यांबाबत ऑनलाइन बैठक झाली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष दौरा करून समस्यांची तीव्रता जाणून घेण्यात आली. यावेळी उद्योजक, अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रलंबित समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
24 Aug 2026 12:48 PM (IST)
शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणी (वय २२ वर्ष) हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Aug 2026 12:36 PM (IST)
मोखाडा पोलिस ठाणे हद्दीतील चास पैकी चिकनपाडा येथे मध्यरात्री ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून दाम्पत्याला धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री १२.५० वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने फिर्यादी यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यांनी हातात पांढऱ्या रंगाचे हातमोजे घातले होते. त्यापैकी काही जणांनी फिर्यादी यांना पलंगावर पकडून ठेवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही जबरदस्तीने ओढून घेतले. इतर आरोपींनी घरातील पत्र्याच्या पेट्या उघडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या दरोड्यात सुमारे २ तोळे वजनाची सोन्याची चैन (किंमत १ लाख रुपये), १.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ७५ हजार रुपये) आणि २ लाख रुपये रोख, असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Aug 2026 12:24 PM (IST)
महाराष्ट्रात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या अनेक वस्तूंवर बंदी लागू असतानाही चाकण शहरात प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापराच्या प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारपेठा, भाजी मंडई, खाद्यपदार्थांची दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जात असल्याने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी नेमकी कुठे आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
24 Aug 2026 12:20 PM (IST)
पुणे महापालिकेत भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद विकोपाला गेलाय. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकरांनी सुनेत्रा पवारांकडे तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतलीय. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी शून्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सुनील टिंगरेंनी केलीय.
24 Aug 2026 12:12 PM (IST)
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २३) उघडकीस आली आहे. रुई हद्दीतील स्वामी समर्थ रेसिडेन्सी इमारतीच्या परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवनी अजित दशावतारे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांची ती कन्या आहे.
24 Aug 2026 12:10 PM (IST)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी राज्यातील महिलांना दिलासा देणारी घोषणा केली असून आता वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत ही मोठी घोषणा केली.
24 Aug 2026 11:50 AM (IST)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट कधी चित्रपटगृहात दाखल होणार, याची माहिती दिली आहे.
24 Aug 2026 11:45 AM (IST)
स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. आजच्या काळात सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून अनेकजण त्यांच्या कामासाठी आणि बिझिनेससाठी देखील याचा वापर करतात. इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण असे अनेकजण असतात ज्यांनी शेअर केलेल्या रिल्सला चांगले व्ह्युज मिळत नाहीत. त्यामुळे महागड्या प्रमोशनची गरज पडते. पण तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात ठेऊन सोशल मीडियावर कंटेट शेअर केला तर तुम्ही महागड्या प्रमोशनशिवाय लाखो लोकांपर्यंत तुमचा कंटेट पोहोचवू शकता.
24 Aug 2026 11:35 AM (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने आपल्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. याअंतर्गत, इस्त्रो संशोधन, विकास आणि मोठ्या अंतराळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच प्रक्षेपण याने आणि नियमित उपग्रहांच्या निर्मितीची जबाबदारी खाजगी क्षेत्रातील कंपन्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर (PSUs) सोपवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारत पुढील वर्षी मानवी कक्षीय अंतराळयान प्रक्षेपित करण्याची तयारी करत असून २०३५ पर्यंत ‘भारतीय अंतराळ स्थानक’ पूर्ण करण्याची योजना आहे. २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय नागरिकाला उतरवण्याचेही भारताचे स्वप्न आहे, आणि या बदलामुळे हे ध्येय अधिक बळकट होईल.
24 Aug 2026 11:25 AM (IST)
अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत आपल्या निष्पाप बालकांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो. जखमी बालकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावतीच्या दुर्घटनेनंतर ट्विट करत म्हटले आहे.
24 Aug 2026 11:15 AM (IST)
अमरावतील रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, 'इन्फ्रामॅन' वगैरे ऐकायला तुम्हाला ठीक वाटत असेल; पण अमरावतीत व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालके होरपळून दगावली आहेत, साहेब! यात तातडीने कडक कारवाई अपेक्षित आहे, तीही बड्या माशांवर. तुमच्या आरोग्यमंत्र्यांनाही तिकडे पाठवा; महाराष्ट्राला कळू द्या की राज्यात या खात्याला कोणी मंत्री आहेत!
24 Aug 2026 11:10 AM (IST)
बँकिंग क्षेत्रातील नोकरीबाबत तरुणांमध्ये नेहमीच मोठी चर्चा असते. याचे मुख्य कारण हे उत्तम पगार, नोकरीची सुरक्षितता आणि वेळेसोबत मिळणारी करिअर ग्रोथ आहे. यामुळेच बँक क्लर्कची नोकरी देखील अत्यंत लोकप्रिय आहे. क्लर्कला मूळ पगारासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ट्रान्सपोर्ट अलाउंस आणि इतर सुविधा मिळतात.
24 Aug 2026 11:05 AM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे कोणतीही अडचण आली नाही. पहिल्या दिवशी टीम इंडियाने ३०० चा टप्पा गाठला. दरम्यान दिवसभरात ५ विकेट्सही गमावल्या. हा सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळला जात आहे. गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी कोलंबोमधील हवामान पूर्णपणे निरभ्र होते, परंतु दुसऱ्या दिवशी तशी अपेक्षा नाही.
24 Aug 2026 10:52 AM (IST)
‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ या सौंदर्य स्पर्धेचा भव्य अंतिम सोहळा २३ ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये पार पडला. देशभरातून आलेल्या ५३ सौंदर्यवतींमध्ये यंदा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर केरळची काझिया लिझ मेजो हिने आपल्या नावावर विजेतेपदाची मोहोर उमटवली. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
24 Aug 2026 10:42 AM (IST)
सध्याच्या डिजीटल काळात ऑनलाईन पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भाजी खरेदी करण्यापासून अगदी स्मार्टफोन खरेदी करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंटसाठी विविध ॲप्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट केवळ एका यूपीआय ॲपपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. काहीवेळेस आपण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पेटिएम वापरतो तर कधी गूगल पे तर अनेकदा फोन पे चा वापर देखील केला जातो. वेगवेगळ्या यूपीआय ॲप्समुळे महिना अखेरीस खर्चाचा हिशोब कठिण होतं. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या यूपीआय ॲपमध्ये जाऊन पेमेंट हिस्ट्री तपासावी लागते.
24 Aug 2026 10:32 AM (IST)
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे 3.30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली, ज्यात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालयात घबराट पसरली आणि आत असलेल्या रुग्णांना व मुलांना वाचवण्यासाठी सर्वजण धावपळ करू लागले. दरम्यान अनेक बालकांचा जीव वाचवण्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे असं सांगण्यात आलं आहे.
24 Aug 2026 10:22 AM (IST)
बहिणाबाई चौधरी या खानदेशी अहिराणी बोलीभाषेतील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रतिभावान कवयित्री होत्या, ज्यांनी औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी आपल्या ओवीबद्ध काव्यातून मानवी जीवन, निसर्ग आणि शेतीचे मर्म अत्यंत सहजतेने मांडले. त्यांचा जन्म आजच्या दिवशी १८८० मध्ये जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे झाला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य खानदेशात शेतकरी कुटुंबात गेले. त्यांचे बहुतांश काव्य त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी १९५२ मध्ये ‘बहिणाबाईची गाणी’ या संग्रहातून लोकांसमोर आणले, ज्याला आचार्य अत्रे यांनी प्रस्तावना लिहून प्रसिद्धीस मदत केली. त्यांच्या काव्यात खानदेशी अहिराणी भाषेचे गोडवा, मातीचा सुगंध, घरगुती अनुभव, शेतीची कामे आणि संसाराचे तत्त्वज्ञान अगदी साध्या व प्रभावी शब्दांत दिसून येते. ३ डिसेंबर १९५१ रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या साहित्याने मराठी मनावर आणि संस्कृतीवर कायमची अमीट छाप सोडली आहे.
24 Aug 2026 10:12 AM (IST)
५ सप्टेंबर रोजी दहीहंडीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाण्यामध्ये माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकाराने शनिवारी ठाण्यात सराव दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने नऊ थर लावत सलामी दिली.






