Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यात पावसाचा धुमाकूळ; पुणे, नाशिकच्या घाटमाथ्याला ‘रेड अलर्ट

Maharashtra Breaking: जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून, या संततधारेमुळे बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 31, 2026 | 10:10 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 31 Jul 2026 10:10 AM (IST)

    31 Jul 2026 10:10 AM (IST)

    शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

    राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकरी कर्जखात्यांना लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी 7 हजार कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सहकार विभागाने काढला आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांची रक्कम थेट कर्जखात्यांत जमा करण्यात येणार आहे.

  • 31 Jul 2026 10:00 AM (IST)

    31 Jul 2026 10:00 AM (IST)

    पुढील 24 तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

    गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अशातच आता हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

  • 31 Jul 2026 09:20 AM (IST)

    31 Jul 2026 09:20 AM (IST)

    PUNE RAIN ALERT: पुण्यासाठी पुढील ४-५ दिवस 'रेड अलर्ट'; घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पावसाचा इशारा 

    PUNE RAIN ALERT:   गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील दोन ते चार दिवस पुणे शहर आणि जिल्हाभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर पुढील ४८ तासांत अतिमुसळधार म्हणजेच ढगफुटीसदृश पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

    धरणांतून विसर्ग: मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ५,७०० क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

    नदीकाठच्या भागांना इशारा: पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी राहण्याचे व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • 31 Jul 2026 09:15 AM (IST)

    31 Jul 2026 09:15 AM (IST)

    ZILLA PARISHAD ELECTION: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा 

    ZILLA PARISHAD ELECTION:   राज्यात दीर्घकाळापासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत घेतल्या गेल्यास अनेक जिल्ह्यांतील आरक्षणाची राजकीय गणिते आणि समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

    नागपूर जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल संभव

    आरक्षणाच्या या ५० टक्के मर्यादेचा सर्वाधिक फटका आणि परिणाम नागपूर जिल्हा परिषदेवर दिसून येण्याची शक्यता आहे.

    • एकूण गट (जागा): ५७

    • आरक्षित जागा: ३३

    राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सध्याच्या निकषांनुसार ३३ आरक्षित जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) १५ जागा, अनुसूचित जातीसाठी (SC) १० जागा आणि अनुसूचित जमातीसाठी (ST) ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार या आरक्षण रचनेत फेरबदल झाल्यास राजकीय पक्षांची रणनीती पूर्णपणे बदलणार आहे.

  • 31 Jul 2026 09:05 AM (IST)

    31 Jul 2026 09:05 AM (IST)

    COMMONWEALTH GAMES: राष्ट्रकुल स्पर्धेत नवव्या दिवशी भारताच्या पदकांच्या आशा; नीरज चोप्रा सुवर्णपदकासाठी मैदानात

    COMMONWEALTH GAMES:  ग्लास्गो येथे सुरू असलेल्या २३ व्या राष्ट्रकुल स्पर्धांचे (Commonwealth Games 2026) आव्हान आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. २३ जुलैपासून सुरू झालेल्या या क्रीडामहोत्सवाचा आज ९ वा दिवस असून भारतीय खेळाडू अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युदो, लॉन बॉल्स आणि ट्रॅक सायकलिंग या प्रमुख खेळांमध्ये आपले आव्हान सादर करणार आहेत. आजच्या दिवशी भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष प्रामुख्याने भालाफेक (Javelin Throw) स्टार नीरज चोप्राच्या अंतिम सामन्यावर असणार आहे. त्याच्याकडून भारताला सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा आहे.

  • 31 Jul 2026 09:00 AM (IST)

    31 Jul 2026 09:00 AM (IST)

    SUPREME COURT: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला तिखट प्रश्न; ‘निवड समितीतून CJIंना का वगळले?’

    SUPREME COURT: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्ती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असायला हवी, असे स्पष्ट करत न्यायालयाने आयोगाच्या स्वायत्ततेवर विशेष भर दिला आहे.सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, निवडणूक आयोगाने केवळ स्वतंत्रपणे काम करणे पुरेसे नाही, तर त्याची स्वायत्तता सामान्य जनतेलाही स्पष्टपणे दिसली पाहिजे. याच वेळी न्यायालयाने केंद्र सरकारला  "संसदेने कायदा करताना निवडणूक आयुक्त निवड समितीतून भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना (CJI) का वगळले?" थेट सवाल केला आहे.

  • 31 Jul 2026 08:55 AM (IST)

    31 Jul 2026 08:55 AM (IST)

    BHIWANDI ACCIDENT: भिवंडीत दुरुस्तीदरम्यान ४ मजली इमारतीचा भाग कोसळला 

    BHIWANDI ACCIDENT: भिवंडी येथे गुरुवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. एका जीर्ण अवस्थेत असलेल्या चार मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

    महिला जखमी, बचावकार्य सुरू

    एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षित बाहेर काढले आहे. ही महिला जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही ५ ते ६ नागरिक अडकल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेला काही तास उलटूनही बचावकार्य व ढिगारा हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

WEATHER UPDATE: राज्यात पावसाचा धुमाकूळ; पुणे, नाशिकच्या घाटमाथ्याला ‘रेड अलर्ट’, यवतमाळमध्ये शाळांना सुट्टी

 WEATHER UPDATE: राज्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामानाच्या या गंभीर परिस्थितीमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून यवतमाळ जिल्ह्यासह काही भागांतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

जैसलमेरपासून रायसेनपर्यंत वादळी वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने जारी केलेले महत्त्वाचे इशारे खालीलप्रमाणे:

  • रेड अलर्ट: पुणे आणि नाशिकचा घाटमाथा.
  • ऑरेंज अलर्ट: ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा आणि जळगाव.
  • येलो अलर्ट: अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर.

 

 

 

Web Title: 31 july 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime share market education national gold silver price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Marathi News Live Updates
  • national news

संबंधित बातम्या

E-Pik Pahani National Level: महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ मॉडेलची देशात अंमलबजावणी! १ ऑगस्टपासून ‘ॲग्री स्टॅग’शी जोडणी
1

E-Pik Pahani National Level: महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ मॉडेलची देशात अंमलबजावणी! १ ऑगस्टपासून ‘ॲग्री स्टॅग’शी जोडणी

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात
2

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

Maharashtra Breaking News Live Updates Today:  शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा
4

Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.