Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.10.2026
Maharashtra to World Breaking News :
मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार (SIR) विरोधात दिल्लीतील आकाशवाणी भवनात राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचे ९ तासांचे ठिय्या आंदोलन, पोलिसांनी प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात पावसाची पुन्हा शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उकाड्यासह अवकाळी पावसाचा इशारा.
पुण्यासह राज्यातील विविध शहरांत MPSC विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक आणि उत्तरपत्रिका पारदर्शकतेसाठी आंदोलन तीव्र केले. कोकणात कमी पावसामुळे पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून मुंबई-ठाणे भागात ऑक्टोबर हीटचा पारा चढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विज्ञानातील अतुलनीय योगदानासाठी भौतिकशास्त्राचा (Physics) २०२६ चा नोबेल पुरस्कार बेल्जियमच्या फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला.
07 Oct 2026 09:35 AM (IST)
Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तानंतर किंवा २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या कालावधीत जीआर जारी होण्यास विलंब झाल्यास ऑक्टोबरअखेरपर्यंत हप्ता मिळण्याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
07 Oct 2026 09:25 AM (IST)
CM Bhagwant Mann Office CBI Raid: पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारी घटना घडली असून मुख्यमंत्री भगवंत मान यांचे चंदीगड येथील 'कॅम्प ऑफिस' आणि त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) राजबीर घुमन यांच्या विविध ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अचानक छापेमारी केली आहे. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि पदाचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांवरून सीबीआयने ही मोठी कारवाई केली. या तपासांतर्गत सीबीआयच्या पथकांनी चंदीगड, मोहाली, गुरदासपूर, लुधियाना, पतियाळा, संगरूर आणि जालंधर येथील ठिकाणांची कसून झडती घेत लॅपटॉप, मोबाईल फोन्स, डिजिटल पुरावे आणि अनेक महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त केली आहेत.
07 Oct 2026 09:15 AM (IST)
Smriti Mandhana Indian Womens Cricket Captain: भारतीय महिला क्रिकेट संघात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून स्टार फलंदाज स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य कर्णधारपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आढावा बैठक पार पडल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दीर्घकाळ उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या आणि २०१३ पासून संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या २९ वर्षीय स्मृती मानधनाकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.
07 Oct 2026 09:10 AM (IST)
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) माघारी फिरल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केले असले, तरी महाराष्ट्रातील वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे पावसाचे सावट कायम आहे. परतीच्या पावसाने अनेक भागात पाठ फिरवल्याने शेती पिकांची स्थिती गंभीर बनली असून, एकाकी तापमान वाढल्याने राज्यभरात 'ऑक्टोबर हिट'चा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. असे असतानाच हवामान विभागाने हवामानात पुन्हा फेरबदल झाल्याचे सांगत पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा मोठा इशारा दिला आहे.






