Maharashtra Breaking News Updates Today:
Iran Attack on Dubai : अबू धाबी /तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel VS Iran War) शेजारी आखाती देशांनाही ओढले आहे. इराणने त्यांच्यावरील हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत आखाती देशांवरही हल्ले चढवले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच इराणने दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे परिसरात गोंधळ उडाला असून स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आहे. सर्व उड्डाणेही रद्द करण्यात आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
16 Mar 2026 06:54 PM (IST)
पुणे: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात किंचित घट झाल्याने पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीही ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
16 Mar 2026 06:47 PM (IST)
Israel Strike on Iran’s Mehrabad Airport : जेरुसलेम/तेहरान : मध्यपूर्वेतील युद्धा गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असून या युद्धाचा आज १७ वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायल(Israel)-इराण(Iran) एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. रविवारी (१५ मार्च २०२६) आणि सोमवारी (१६ मार्च २०२६ ) मध्यरात्री इस्रायलने इराणच्या घरात घुसून मोठा वार केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
16 Mar 2026 06:40 PM (IST)
पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग (National Highway) यावर सहा नवीन बोगदे उभारण्याची योजना पुढे आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०४ हेक्टर जमिनीची गरज असून त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( एमएसआरडीसी) यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे. या नव्या बोगद्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावू शकतील, त्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.
16 Mar 2026 06:30 PM (IST)
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगातील बहुतेक देशांमध्ये तेल आणि वायूचा गंभीर संकट निर्माण झाला आहे. महागाई देखील वाढली आहे, परंतु या युद्धामुळे (World War 3) मध्य पूर्वेत तेलापेक्षा पाणी ही मोठी समस्या बनली आहे. या युद्धात पाणी हे एक शस्त्र बनले आहे. तेलापेक्षा पाणी अधिक महत्त्वाचे बनले आहे. तेलाने पर्शियन आखात समृद्ध केले असले तरी, क्षारमुक्त पाणी ते टिकवून ठेवते आणि हेच इस्रायल आणि गाझा यांना लागू होते. (Iran Israel War) इस्रायलने इराणच्या डिसॅलिनेशन प्लांट आणि त्याच्याशी संबंधित पॉवर स्टेशनवर बॉम्बहल्ला केला आणि प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल, कुवेत, बहरीन इत्यादी देशातील अशाच प्रकारच्या पायाभूत सुविधांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यामुळे तेलाऐवजी पाणी हा मध्य पूर्वेतील सर्वात कमकुवत धोरणात्मक बिंदू बनला आहे.
16 Mar 2026 06:21 PM (IST)
PCMC New Commissioner: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी अधिकृतपणे स्वीकारली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार आज डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याला शहरातील विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. . पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
16 Mar 2026 06:13 PM (IST)
West Bengal BJP Candidate List : पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंगालची निवडणूक ही दोन टप्प्यांत मतदान होईल. पहिला टप्पा 23 एप्रिल आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने खास रणनीती आखली आहे. भाजपकडून (BJP Politics) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामधून त्यांनी सर्व समाजातील प्रतिनिधींना संधी दिली आहे. तसेच सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
16 Mar 2026 06:02 PM (IST)
BJP Candidate List in Kerala Assembly Elections 2026: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत केरळसह अन्य 4 राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. केरळमध्ये 23 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. तर केरळ विधानसभेचा निकाल 6 मे रोजी लागणार आहे. दरम्यान केरळमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
16 Mar 2026 05:51 PM (IST)
जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच बुकिंग करावे. जिल्ह्यात दररोज ६५ हजार सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाईची भीती न बाळगता गरज असेल तेव्हाच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.आखाती देशांतील युद्धाच्या पाश्र्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस व इंधन टंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सभागृहात घेतली.
16 Mar 2026 05:31 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश झाला. त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातही पडल्याचे पाहायला मिळत आहे.गाझियाबाद पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींच्या चौकशीत देशभरातील अनेक संवेदनशील रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे पाळत ठेवणारे कॅमेरे बसवल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हे कॅमेरे भारतीय रेल्वेच्या गोपनीय हालचाली आणि सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला थेट प्रसारित केले जात होते. ही माहिती मिळताच, पुणे रेल्वे स्थानकासह संपूर्ण विभागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला.
16 Mar 2026 05:17 PM (IST)
वाहन निर्माता Honda कडून भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार्सची विक्री केली जाते. आता कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार म्हणून Honda 0 Alpha लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने भारतात या SUV ची टेस्टिंग सुरू केली आहे.
16 Mar 2026 04:55 PM (IST)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रहो, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय. अॅक्टची प्रकरणे निकाली काढली आहेत.
16 Mar 2026 04:50 PM (IST)
मावळ तालुक्यातील बधलवाडी, मेंढेवाडी आणि जाधववाडी येथील पारंपरिक स्मशानभूमी पाडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी वडगाव मावळ (Wadgaon Maval) येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात महिला, पुरुष तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे हद्दीतील बदलवाडी, मेंढेवाडी व जाधववाडी या गावांची पारंपरिक व वहिवाटीची स्मशानभूमी तळेगाव दाभाडे एमआयडीसी कार्यक्षेत्रातील कंपन्यांसाठी पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर आपल्या नातेवाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही संघर्ष करण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
16 Mar 2026 04:45 PM (IST)
मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते. देशभरातून लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येतात. ते स्वप्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मुंबईत घर असणे ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. विरारमध्ये घरांची मागणी वाढली आहे. म्हाडाच्या फ्लॅट्सची विक्री वेगाने होत आहे. विरारमध्ये म्हाडाच्या कोकण बोर्डाच्या घरांची मागणी वाढली आहे. ग्राहक रिकाम्या घरांसाठी रांगा लावत आहेत. कोकण बोर्ड दररोज सरासरी २५ घरे विकत आहे. गेल्या १५२ दिवसांत, विरारमध्ये ३,७५० पूर्ण झालेली घरे विकली गेली आहेत. २०१४ मध्ये, म्हाडाने रहिवाशांना परवडणारी घरे देण्यासाठी विरार बोलिंजमध्ये ९,४०९ घरे बांधली. मात्र पाण्याची कमतरता आणि इतर कारणांमुळे, घरे विकता आली नाहीत.
16 Mar 2026 04:40 PM (IST)
इराण–इराकमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील गॅस पुरवठ्यावरही होताना दिसत आहे. ठाणे शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीचा थेट फटका हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खानावळींना बसत आहे. याचाच आढावा नवराष्ट्रच्या माध्यमातून घेतला आहे. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलेंडरची कमतरता जाणवत आहे. अनेक हॉटेल आणि खानावळ मालकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅसचा तुटवडा वाढत चालल्यामुळे अनेक ठिकाणी मर्यादित प्रमाणातच पदार्थ तयार केले जात आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेल चालक पोळी-भाजीसारखे साधे पदार्थ उपलब्ध करून देत आहेत. सध्या गॅस सिलेंडर मिळण्यात मोठी अडचण येत आहे. वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे आम्हाला पदार्थ कमी प्रमाणात तयार करावे लागत आहेत. दर वाढवणे शक्य नाही, कारण ग्राहकांनाही त्रास होईल. पण जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या काळात हॉटेल किंवा खानावळ बंद करण्याची वेळ येऊ शकते. अस हॉटेल चालकांनी सांगितलं आहे.
16 Mar 2026 04:35 PM (IST)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या संदर्भात पक्षामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला त्यांच्या पक्षातून हकालपट्टीचे पत्र जारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
16 Mar 2026 04:32 PM (IST)
राहुरी तालुक्यातील वळण परिसरात आज सकाळी बिबट्याने शेतमजुरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत मजुराने प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला...राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण येथील मुळा नदी पात्र परिसरातील चव्हाण मळा येथे सकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली...यावेळी जवळच मच्छीमारी करत असलेल्या जालिंदर पवार या आदिवासी मजुरावर बिबट्याने अचानक झेप घेत हल्ला केला. मात्र जालिंदर पवार यांनी प्रसंगावधान राखत हातातील काठीने प्रतिकार केल्याने बिबट्या तेथून पळून गेला.
16 Mar 2026 04:30 PM (IST)
बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे.त्या मार्गिकेसाठी शेतकऱ्यांचे जमिनीचे अधिग्रहण करताना जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा यासाठी आपण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.कर्जत नेरळ भागातील शेतकऱ्यांनी खासदार बारणे यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून द्यायचा प्रश्न मांडला आहे.दरम्यान,मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांचा कर्जत नेरळ भागात पाहणी दौरा केला जाणार असून त्याचवेळी हा विषय देखील पुढे केला जाणार असल्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.
16 Mar 2026 04:28 PM (IST)
५०,००० लोकसंख्ये मागे किमान १ नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे.त्याप्रमाणे २४ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार शहरासाठी ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे.मात्र सध्या महानगरपालिका क्षेत्रात केवळ २१ प्राथमिक आरोग्य केंद्रेच अस्तित्वात आहेत.म्हणजेच शहरात २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता असल्याचे स्पष्ट होते. वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना होऊन तब्बल १६ वर्षे उलटली असून शहराची लोकसंख्या सुमारे २४ लाखांच्या घरात पोहोचली आहे.मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी महानगरपालिकेचे एकही सुसज्ज, अत्याधुनिक रुग्णालय उपलब्ध नसल्याची बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
16 Mar 2026 04:24 PM (IST)
कळंबोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर के.एल.-१, सेक्टर ५-ई आणि आसपासच्या भागातील महिलांनी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.शनिवारपासून परिसरात कमी दाबाने तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठीही स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
16 Mar 2026 03:50 PM (IST)
चिंचेच्या खट्टी-गोड कँडीचे नाव ऐकताच अनेकांच्या बालपणाच्या आठवणी ताज्या होतात. तिचा खास आंबट-गोड स्वाद लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. बाजारात मिळणाऱ्या चिंचेच्या कँडीत मात्र अनेकदा जास्त साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्ज वापरलेले असतात, जे आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात.
16 Mar 2026 03:40 PM (IST)
कठीण परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधने असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे Subramania Bharathi. गरीब कुटुंबात वाढलेल्या भारती यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC Civil Services Examination 2025 परीक्षा उत्तीर्ण करून ७७८ वी रँक मिळवली. त्यांची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
16 Mar 2026 03:20 PM (IST)
अमरावती: घरबसल्या टेलिग्राम अॅपवर ‘स्टार रेटिंग’ देऊन पैसे कमावण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी चांदूर रेल्वे येथील एका नर्सची १ लाख १८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला थोडी रक्कम परत देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी विविध खात्यांमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ही चांदूर रेल्वे येथील रहिवासी असून नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी तिच्या टेलिग्राम अॅपवर एका अज्ञात आयडीवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये घरबसल्या टेलिग्रामवर ‘स्टार रेटिंग’ देऊन पैसे मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला पीडितेने करून दिलेले रेटिंगचे काम पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात १५० रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी १ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास १ हजार ४३० रुपये परत मिळतील, असे सांगितले आणि ती रक्कमही खात्यात जमा केली. त्यामुळे पीडितेचा विश्वास बसला.
वैभववाडी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला वर्क फ्रॉम होम नोकरीचे आमिष दाखवून १५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित तरुणाने राष्ट्रीय सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणाच्या व्हॉट्स अॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने त्याला केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगितले.
16 Mar 2026 03:10 PM (IST)
Anti-Radiation Medicine India : सध्या जगाच्या नकाशावर मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष (US-Israel Iran War) आणि युरोपातील रशिया-युक्रेन युद्ध यामुळे अणुयुद्धाचे (Nuclear War) ढग गडद होताना दिसत आहेत. अशा भयानक परिस्थितीत मानवी अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या संकटाच्या काळात भारताचे औषध निर्माण क्षेत्रातील कौशल्य जगासाठी आशेचा किरण ठरत आहे. अणुकिरणोत्सर्गापासून (Radiation) संरक्षण करणाऱ्या भारतीय औषधांची आणि मेडिकल किट्सची मागणी जागतिक स्तरावर अचानक वाढली आहे. विशेष म्हणजे, भारताने हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे विकसित केले असून, यामुळे आपण आता परदेशांवर अवलंबून राहिलेले नाही.
16 Mar 2026 03:05 PM (IST)
मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्या ब्लॉकबस्टर कॉमेडीची आठवण पुन्हा एकदा जिवंत करत आता त्याचा सिक्वेल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून हा धमाल कॉमेडीपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. हलक्याफुलक्या विनोदाने, कुरळे बंधूंच्या भन्नाट गोंधळाने आणि मजेदार प्रसंगांनी भरलेला हा सिक्वेल प्रेक्षकांना पुन्हा एकदा नॉस्टॅल्जियाचा खास अनुभव देणार आहे.
16 Mar 2026 02:45 PM (IST)
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका दि. ९ मार्च रोजी पार पडल्या असून, सर्वच पंचायत समित्यांवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडी बिनविरोध झाल्याने विरोधकांचे अस्तित्त्व जवळपास नामशेष झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पूर्वसंध्येलाच पालकमंत्री उदय सामंत यांनी संभाव्य नावांची यादी जाहीर केली होती.
16 Mar 2026 02:40 PM (IST)
मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) रणांगणावर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आवाज केवळ तेथील वाळवंटातच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत उमटत आहे. या युद्धाचा सर्वात भीषण परिणाम दक्षिण आशियातील बांगलादेशवर होताना दिसत आहे. साउथ एशियन नेटवर्क ऑन इकॉनॉमिक मॉडेलिंग (SANEM) च्या ताज्या अहवालानुसार, इराण-इस्रायल संघर्ष असाच सुरू राहिला, तर बांगलादेशच्या सकल देशांतर्गत उत्पादनाला (GDP) ३ टक्क्यांचा मोठा फटका बसू शकतो. हे नुकसान इतके गंभीर आहे की, यामुळे बांगलादेशला पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या खाईत जावे लागू शकते.
16 Mar 2026 02:32 PM (IST)
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शकिनुसार, नवरात्र वर्षातून चार वेळा येते, त्यापैकी एक शारदीय नवरात्री, एक चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री आहेत. चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत २०२६ मध्ये चैत्र नवरात्री कधी सुरू होत हे जाणून घेऊया.
16 Mar 2026 02:10 PM (IST)
२०२४ मध्ये दिलजीत दोसांझने त्याच्या दिल ल्युमिनाटी टूरने भारतात इतिहास रचला. त्याचा दौरा दोन महिन्यांत सुमारे १० शहरांमध्ये झाला. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर, ही बातमी दिलजीतच्या चाहत्यांना नक्कीच आनंद देईल. EY च्या अहवालात असे म्हटले आहे की दोसांझचा जागतिक “दिल ल्युमिनाटी टूर” हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा संगीत कार्यक्रम बनला आहे.
16 Mar 2026 02:00 PM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या एका जवळच्या मित्राचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने रविवारी इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली. सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट मार्से पेड्रोझो यांच्या निधनाने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. आणि ती खूप दुःखी झाले. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येते की तिला सगळं असह्य आणि भावुक वाटत आहे.
16 Mar 2026 02:00 PM (IST)
ट्रूलकॉलरने भारतात एक नवीन फॅमिली प्रोटेक्शन फीचर सादर केले आहे. या नवीन फीचरचा उद्देश कुटूंबांना स्कॅम आणि फ्रॉड कॉलपासून एकत्रितपणे स्वतःला सुरक्षित ठेवणं असा आहे. या नवीन फीचर अंतर्गत कंपनी एक सेफ्टी सर्कल बनवणार आहे, ज्यामध्ये एकाच कुटूंबातील 5 लोकं समाविष्ट असणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप एक शेयर्ड सेफ्टी सिस्टिम लाँच करत आहे जी कुटुंबातील सदस्यांना अनेक उपकरणांवर संभाव्य धोक्यांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास अनुमती देते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे फीचर कंपनी अशावेळी सुरु करत आहे, ज्यावेळी देशभरातील यूजर्सवर ऑनलाईन स्कॅमद्वारे निशाणा साधला जात आहे. जसे की तोतयागिरी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग आणि डिजिटल अटक घोटाळे वाढत आहेत.
16 Mar 2026 01:55 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटावरील लष्करी तळांना उडवल्यानंतर आणखी एका मोठ्या प्रकल्पावर हल्ला चढवला आहे. इराण(Iran) च्या धोरणात्मक दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या चाबहारवर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली असून हे भारतासाठी धोकादायक मानले जात आहे.
16 Mar 2026 01:45 PM (IST)
आठवड्याच्या सुट्ट्या तर असतात पण इतर सुट्ट्यांमुळे देखील बँका बंद असतात. मार्च महिन्यामध्ये देखील बँका बंद राहणार आहे. मार्च महिन्यात तिसऱ्या आठवड्यात १६ मार्च पासून ते २२ मार्चपर्यंत बँका अनेक दिवस बंद राहतील. पण नेमकी काय कारणं आहे की बँकांना सुट्ट्या आहेत. ते जाणून घेऊनच कामाचं नियोजन करा. या आठवड्यात शब-ए-कद्र, गुढी पाडवा, उगादी, तेलुगू नववर्ष, नवरात्रीचा पहिला दिवस साजिबू नोंगमापानाबा आणि ईद-उल-फित्र असे सण या आठवड्यात येतात. जर तुमचा तुमच्या बँकेच्या शाखेशी काही व्यवसाय असेल तर या आठवड्याची सुट्टीची यादी नक्की तपासा. या बातमीत मार्चमधील येणाऱ्या सुट्ट्यांचीही यादी आहे.
16 Mar 2026 01:40 PM (IST)
बिहार, ओडिशा आणि हरियाणामधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. निकाल आज जाहीर होणार आहेत. यावेळी एकूण ३७ जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यापैकी २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याचदरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने राजद उमेदवाराला पाठिंबा दिल्याने, बिहारमधील सोमवारी रिक्त होणाऱ्या पाच राज्यसभेच्या जागांसाठी होणारी निवडणूक रंजक बनली आहे.
16 Mar 2026 01:35 PM (IST)
प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘रेल वन’ अॅपबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तिकीट बुकिंग केल्यानंतर बँक खात्यातून पैसे वजा होतात. मात्र, अॅपमध्ये तिकीट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.रेल्वेकडून या अॅपची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून वापरात असलेले यूटीएस अॅप टप्याटप्प्याने बंद करून प्रवाशांना ‘रेल वन’ अॅप वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
16 Mar 2026 01:25 PM (IST)
“दंगल” आणि “छिछोरे” सारखे यशस्वी चित्रपट बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या त्यांच्या मोठ्या बजेटच्या “रामायण” चित्रपटात व्यस्त आहेत. त्यांच्या चित्रपटांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कथेचे भावनिक चित्रण. “रामायण” हा चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवला जात आहे, ज्यामध्ये प्रभावी VFX, विस्तृत सेट्स आणि शक्तिशाली कलाकारांचा समावेश आहे. नितेश तिवारीच्या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांच्यासह अनेक अनुभवी कलाकार आहेत आणि आता “पंचायत” चित्रपटाचा स्टार फैसल मलिक देखील या चित्रपटात सामील झाला आहे.
16 Mar 2026 01:16 PM (IST)
‘आम्ही शेवटी प्रशासनात आहोत, कुणी मंत्री म्हणून काम करतोय तर कुणी पदाधिकारी म्हणून. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने काम केले पाहिजे. मात्र, ज्यांना वैयक्तिक राजकारण करायचे असेल त्यांनी ते या जिल्हा परिषदेच्या गेटच्या बाहेर ठेवावे. जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
16 Mar 2026 01:10 PM (IST)
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आजही आपल्या भूतकाळाची साक्ष देत उभे आहेत. त्यापैकी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेला भूपतगड किल्ला हा इतिहासप्रेमी आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण मानला जातो. डोंगरमाथ्यावर वसलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० फूट उंचीवर आहे. सध्या किल्ल्याची अवस्था जीर्ण असली तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असते.
16 Mar 2026 01:05 PM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबैरने तिच्या अभिनयाने आणि शैलीने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या ती “लाफ्टर शेफ्स ३” मध्ये दिसली आहे. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता जबरदस्त आहे. तथापि, जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्याबद्दल अलीकडेच धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्नत झुबैर आणि अयान झुबैर यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला पनवेल येथे करण्यात आला आहे. वृत्तानुसार, जन्नत झुबैर आणि अयान झुबैर दोघेही हल्ल्यात जखमी झाले आहेत. जन्नत झुबैर बद्दलच्या या बातमीने तिच्या चाहत्यांमधील चिंता वाढली आहे.
16 Mar 2026 01:00 PM (IST)
भारतात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईचा फायदा IndianOil ONE अॅपला होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सच्या यादीत IndianOil ONE ने बाजी मारली आहे.
16 Mar 2026 12:55 PM (IST)
मध्यपूर्वेतील तणावाने सध्या गंभीर रुप घेतले आहे. इराणच्या आखाती देशांवरील हल्ल्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान सौदी अरेबियाने इराणविरोधात इस्रालयशी हातमिळवणी केली आहे.
16 Mar 2026 12:50 PM (IST)
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी संजय नडगे बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी डोंगरावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळला. आत्महत्या की अन्य कारण, याचा तपास पोलीस करत आहेत.
16 Mar 2026 12:45 PM (IST)
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुणे जिल्हातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या मंदिराचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र सत्ताधारी भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. खासदार दुबे यांनी दर्शन घेतले. यावरुन आता जोरदार वादंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
16 Mar 2026 12:40 PM (IST)
बाजारपेठेतील उधवा-संजाण या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले असताना या प्रश्नाची दखल थेट दिल्लीपर्यंत पोहोचली. सामाजिक कार्यकर्ते तबरेज शकील कुरेशी यांनी पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा यांना या समस्येची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चौकशी केली. संसद अधिवेशन सुरू असतानाही खासदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
16 Mar 2026 12:35 PM (IST)
16 Mar 2026 12:30 PM (IST)
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रेल्वे प्रवासादरम्यान तर जागेवरुन सतत वाद होतात. रेल्वेत प्रचंड गर्दी असताना वाद सुरु होतो आणि या वादाचे हाणामारीत रुपांतर होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
16 Mar 2026 12:25 PM (IST)
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी आता संघाची नजर दुसऱ्या विजयावर संघाची नजर असणार आहे. तथापि, दुसऱ्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज जखमी झाला आहे.
16 Mar 2026 12:20 PM (IST)
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 16 वा दिवस असून भारतासह जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये एलपीजी, एसपीजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात तर एलपीजी गॅस सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात तणाव वाढत चालली आहे. खेड्यापांसून मोठमोठ्या शहरांमध्येही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्यामुळे एक तणावची परिस्थिती आहे. अशातच केंद्र सरकारने आता गॅस सिलिंडरबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. यामुळे ज्यांच्याकडे गॅसचे दुहेरी कनेक्शन आहे. त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
16 Mar 2026 12:15 PM (IST)
ऑस्कर २०२६ ने यावर्षी भारतीय चाहत्यांना निराश केले आहे. धर्मेंद्र यांना ऑस्कर २०२६ च्या इन मेमोरियम विभागात सामील करण्यात आले नाही. त्यांना श्रद्धांजली देण्यात आली नाही, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आहेत.
16 Mar 2026 12:10 PM (IST)
भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक मैत्री एका निर्णायक वळणावर आली असतानाच, अमेरिकेच्या एका स्वायत्त आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा गदारोळ माजला आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) आपल्या २०२६ च्या वार्षिक अहवालात चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची बाह्य गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) वर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. या शिफारसींमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
16 Mar 2026 11:57 AM (IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये देशातील पाच राज्यांसह पोटनिवडणूकांची देखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील बारामती मतदारसंघ (Baramati News) आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीवर दुखाची झळ पसरली आहे. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.






