
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार
ब्रिस्टल : फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने काउंटी ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना ९ गडी राखून जिंकला. या विजयासह, यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आता नव्या मालिकेची कामगिरी समोर आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने १५९ धावांचे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले, म्हणजेच संघाने ३६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. एकूणच, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताला केवळ दोनदाच अधिक चेंडू शिल्लक असताना पराभव पत्करावा लागला आहे.
10 Jul 2026 06:20 PM (IST)
भारताची सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने एका ‘टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंडा’ची घोषणा केली आहे. या फंडाचे नाव ‘एसबीआय क्रिसिल-आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४ इंडेक्स फंड’ असे आहे. न्यू फंड ऑफर (NFO) ७ जुलै ते १४ जुलै २०२६ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली राहील.
10 Jul 2026 06:11 PM (IST)
Missing Link Project Controversy: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्स्प्रेसवे) महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून सत्ताधारी आघाडी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार आणि दरडी कोसळण्याच्या घटनांबाबतच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देत कठोर भूमिका घेतली आहे.
10 Jul 2026 05:50 PM (IST)
Indian Women’s Vs England Women’s Test Match Live Updates: इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानावार आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. या मैदानावार आज एक नवा इतिहास रचला आहे . 142 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील या ऐतिहासिक एकमेव कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे.
10 Jul 2026 05:40 PM (IST)
Monsoon Tourism News Marathi : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील रस्त्यांची झालेली मोठी हानी आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
10 Jul 2026 05:30 PM (IST)
Nagpur Vijayawada Expressway: नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्ग भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रवासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. हा ५७७ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती मार्ग केवळ दोन शहरांना जोडणारा रस्ता नाही, तर देशाच्या मध्य आणि दक्षिण राज्यांमधील एक आर्थिक कॉरिडॉरसुद्धा आहे. ‘भारतमाला प्रकल्पा’ अंतर्गत बांधलेला हा महामार्ग मालवाहतुकीतील अडथळे दूर करून वाहतूक व्यवस्थेला एक नवीन दिशा देईल.
10 Jul 2026 05:15 PM (IST)
भारतीय संघाने सलग दोनदा टी- २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने टी-२० क्रिकेटवर दीर्घकाळ वर्चस्व गाजवले आहे. २०२२ पासून, भारताने आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. परंतु, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या अलीकडील पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर, भारत आता आपले अव्वल स्थान गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि याचा थेट परिणाम २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठीच्या पात्रतेवरही होऊ शकतो.
10 Jul 2026 05:01 PM (IST)
धाराशिव : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या हजारो एकर इनाम जमिनींमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी त्रिसदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन केली असून, समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
10 Jul 2026 04:57 PM (IST)
सध्या भारत आणि इंग्लंड क्रिकेटमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यामधील चार सामने पूर्ण झाले आहेत. इंग्लंडने चौथ्या सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे. तसेच इंग्लंडने 3-0 ने भारताविरुद्धची मालिका देखील जिंकली आहे. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने विजयावर भाष्य केले आहे. कालच्या सामन्यात हॅरी ब्रूकने शनदर खेळी केली. यावेळी त्याने भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर...
10 Jul 2026 04:47 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता ४ दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली, यावेळी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपी हजर होते. या तिघांनाही १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाचा सविस्तर...
10 Jul 2026 04:27 PM (IST)
राज्यातील लाखो शेतकरी ज्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या योजनेच्या अंमलबजावणीला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यापूर्वी ही योजना ३० जूनपर्यंत लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अंमलबजावणीची तारीख ५ जुलै जाहीर करण्यात आली. मात्र, ती मुदतही उलटून गेल्यानंतर अद्याप प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. वाचा सविस्तर...
10 Jul 2026 04:17 PM (IST)
“शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनाला जर बाल लैंगिक शोषणाची तक्रार मिळाली, तर त्याची तक्रार करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ते स्वतःहून तपास करू, असा दावा करून हे प्रकरण फेटाळून लावू शकत नाहीत.’ असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मांडलेले महत्त्वाचे मुद्देही जाणून घेणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर...
10 Jul 2026 04:07 PM (IST)
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाचे नियोजन, जनजागृती आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समितीची एकमताने घोषणा करण्यात आली. तसेच २७ जुलै रोजी ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी मोर्चाच्या तारखेवरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर...
10 Jul 2026 04:00 PM (IST)
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यात शासनाची आवश्यक मान्यता न घेता सुरू असलेल्या पाच खाजगी शाळांची यादी जाहीर करत शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. संबंधित शाळांना नोटिसा बजावत दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी अशा शेकडो अनधिकृत शाळा सुरू असल्याची चर्चा असताना केवळ पाच शाळांवरच कारवाई का, असा सवाल उपस्थित होत आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:55 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्याच्यावरील दोषसिद्धी कायम ठेवत त्याच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्याचे वर्तन “संशयास्पद” असल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांना त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१० सालातील आहे. दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘अता पता लापता’ निर्मितीसाठी राजपाल यादवने एम/एस मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकली नाही आणि त्यातूनच हा वाद न्यायालयात पोहोचला. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:50 PM (IST)
US Visa Investigations : वॉशिंग्टन : भारतीयांच्या अमेरिकन स्वप्नावर पुन्हा संकट उभारले आहे. अमेरिकेने व्हिसाच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. यामध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटचे नाव समोर आल्याने भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कंपनीने आरोप फेटाळले असून सध्या चौकशी सुरु असल्याचे सांगितले. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.
10 Jul 2026 03:45 PM (IST)
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि एक विधानपरिषद आमदार शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र होते. आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला असून एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप हे एकत्र आले आहे आहेत. यामुळे मोठ्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:40 PM (IST)
अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राम मंदिराला मिळाल्या देण्यांच्या अपहार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्याऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. येत्या १३ जुलैला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:35 PM (IST)
टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय हॅरिअर आणि सफारी एसयूव्हीचे नवीन स्टेल्थ एडिशन लॉन्च केले आहे. काळ्या रंगाच्या आकर्षक आणि दमदार लूकला पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी हे विशेष एडिशन सादर करण्यात आले आहे. टाटा हॅरिअर स्टेल्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 23.43 लाख रुपये, तर टाटा सफारी स्टेल्थ एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 24.04 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:30 PM (IST)
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविणाऱ्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) राज्य शासनाने तब्बल १६४ महत्त्वपूर्ण फेरबदल प्रस्तावित केले असून, उद्याने, बाजार, कत्तलखाना, बस डेपो, सार्वजनिक सुविधा, पार्किंग, शैक्षणिक आरक्षणे आणि डीपी रस्त्यांमध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत. या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेची विशेष महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:25 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री छाया कदम प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्या आगामी ‘भूतम भयम्’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटातील ‘जठाई’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरणार आहे. नुकताच या रहस्यमय पात्राचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून, त्यातील छाया कदम यांचा भयावह अवतार पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:20 PM (IST)
E20 Petrol Mileage Drop: पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की, E20 मिश्रणामुळे काही वाहनांच्या मायलेजमध्ये ३-५% घट होऊ शकत असली, तरी मायलेज हा केवळ एक निकष आहे; E20 चे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत, जसे की उच्च ऑक्टेन रेटिंग, उत्कृष्ट अँटी-नॉक गुणधर्म, जलद ज्वलन, उत्तम पिकअप, सुरळीत वेग वाढण्याची क्षमता आणि इंजिनचे स्वच्छ कार्य. मंत्रालयाने नमूद केले की, E10 सुसंगततेबाबत वाहन उत्पादकांशी चर्चा २०२०-२१ मध्येच, म्हणजेच बऱ्याच आधी करण्यात आली होती. भारताने जून २०२२ मध्ये E10 चे उद्दिष्ट (पेट्रोलमध्ये १०% इथेनॉलचे मिश्रण) साध्य केले जे २०२०-२१ च्या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (ESY) ठरवलेल्या अंतिम मुदतीपेक्षा पाच महिने आधी होते. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:15 PM (IST)
संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या जॅकवेल दुरुस्ती आणि पंम्पिंगच्या कामातील दिरंगाईवर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी संबंधित एजन्सी व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पंपिंग सुरू झालेच पाहिजे. यापुढे कोणतीही सबब किंवा विलंब सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:10 PM (IST)
स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही आणि लॅपटॉपच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी लवकरच एक दिलासादाक बातमी समोर येणार आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही आणि लॅपटॉपच्या वाढत्या किंमतीमुळे त्रासलेल्या ग्राहकांना आता अखेर दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, फिटनेस बँड आणि स्मार्टटिव्ही तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलवरील बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) आता हटवली आहे. वाचा सविस्तर
10 Jul 2026 03:05 PM (IST)
धाराशिव : विधानसभा पावसाळी अधिवेशनात धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. तुळजापूर शहरात चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा आरोप करत, “हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड झाली का?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. वाचा सविस्तर
10 Jul 2026 02:59 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेली अंतरवाली सराटी दारुच्या विळख्यात अडकलीये. गावात अवैध दारुच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनीही याला दुजोरा दिला आहे. अंतरवाली सराटीत ग्रामभेट दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गावातील महिलांनी अवैध दारु विक्रीची समस्या जिल्हाधिका-यांसमोर मांडली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी अवैध दारु विक्रीबाबतची माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन केलंय.
10 Jul 2026 02:50 PM (IST)
परभणीतही भेसळयुक्त दूधाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.. डेअरीतून आणलेलं दूध उकळल्यानंतर ते रबरासारखं घट्ट झालं.. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरात हा प्रकार उघडकीस आलाय.. या भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीये.
10 Jul 2026 02:41 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत शिक्षकांची मान्यता रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भरती प्रक्रियेदरम्यान जाहिरातीतील अटी बदलून करण्यात आलेल्या नियुक्त्या वैध नसल्याचे नमूद केले. 2018 पासून प्रलंबित असलेल्या 11 याचिकांवरील या निर्णयामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
10 Jul 2026 02:30 PM (IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर तीन तरुण अचानक आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ताफा थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, वेगवान वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.
10 Jul 2026 02:21 PM (IST)
राज्य सरकारने प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध विभागांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
10 Jul 2026 02:10 PM (IST)
अन्सार मोहल्ला परिसरातील एका घराचा स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य करत घरातील 3 ते 4 जणांना सुरक्षित बाहेर काढले.
10 Jul 2026 02:00 PM (IST)
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आता नाशिकमध्ये नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
10 Jul 2026 01:55 PM (IST)
उच्च शिक्षणाचे आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून परदेशात गेलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा (Kerala) तिच्याच वर्गमित्राने क्रूरपणे अंत केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उझबेकिस्तानमधील बुखारा स्टेट मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये (Bukhara State Medical Institute) एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या केरळच्या २२ वर्षीय सावरिया बसंत हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिचा वर्गमित्र सद्रुल अनम (२२) याला उझबेक पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता सक्तीच्या धर्मांतराचा (Forced Religious Conversion) धक्कादायक अँगल मिळाला असून खळबळ उडाली आहे.
10 Jul 2026 01:45 PM (IST)
देशभरात घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरीकरण, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि स्थिर स्थूल-आर्थिक वातावरणाच्या पाठबळाने निवासी बाजारपेठ मजबूत होत आहे. ८ शहरांत जानेवारी ते जून २०२६ या काळात निवासी विक्री ०.७ टक्क्यांनी वाढून १.७१ लाख युनिट्सवर पोहोचली आहे, असा दावा रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाईट फ्रँकने केला आहे.
10 Jul 2026 01:35 PM (IST)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बैल रस्त्याच्या मधोमध शांतपणे झोपलेला आहे. धक्कादायक म्हणजे एक पठ्ठ्याला कवटाळून झोपलेला आहे. पठ्ठ्या त्याला डोकं टेकवनू आरामशीर झोपला आहे. आजूबाजूने गाड्यांची लोकांची रहदारी सुरु आहे. पण या दोघांनाही जगाचं काय सोयरसुतक नाही. बैल देखील अत्यंत शांतपणे बसून आहे. हे पाहून आसपासचे लोकही चकित झाले आहे. लोक याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगान व्हायरल होत आहे.
10 Jul 2026 01:25 PM (IST)
कोविड-१९ च्या धोक्यामुळे देशातील आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झाला आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक प्रकरण समोर आले आहे, जिथे कोविडसारखी गंभीर लक्षणे असलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (9 जुलै 2026) झालेल्या या संशयास्पद मृत्यूच्या बातमीने परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे. सध्या, आरोग्य अधिकारी या प्रकरणात सावधगिरीने कार्यवाही करत असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुण्यातील प्रतिष्ठित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या (NIV) अंतिम विषाणूशास्त्र अहवालाची वाट पाहत आहेत.
10 Jul 2026 01:15 PM (IST)
सध्या कॉर्पोरेट जगताचा चेहरामोहरा वेगाने बदलत (Corporate Trend 2026 )आहे. आज जगातील अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) प्रचंड नफा कमावत असूनही खर्चात कपात (Cost Cutting) करत आहेत आणि कर्मचाऱ्यांची संख्याही घटवत आहेत. कंपन्यांची रणनीती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही; आता केवळ कमाई वाढवणे हेच ध्येय नसून खर्च नियंत्रित करणे, कामकाज अधिक सुटसुटीत करणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे झाले आहे. आता अनेक कंपन्या नफ्यात असूनही नक्की कोणत्या धोरणामुळे कॉस्ट कटिंग करत आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.
10 Jul 2026 01:05 PM (IST)
महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांनी देशविरोधी कारवाया आणि सोशल मीडियाद्वारे तरुणांची दिशाभूल करणाऱ्या नेटवर्कवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी सकाळी राज्यभरात एक मोठी मोहीम सुरू केली. या जलद कारवाईचा भाग म्हणून, राज्यातील विविध भागांतील एकूण ११२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर पाकिस्तानस्थित कुख्यात गुंड शहजाद भट्टीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे.
10 Jul 2026 01:00 PM (IST)
Typhoon Bavi update 2026 : सध्या संपूर्ण आशिया पॅसिफिक क्षेत्रावर निसर्गाने मोठे संकट आणले आहे. चीन (China) आणि तैवान सध्या एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत. ‘मेसॅक’ (Maysak) वादळाच्या विनाशकारी तडाख्यानंतर आता आणखी एक महाभयंकर ‘बावी’ (Bavi) चक्रीवादळ वेगाने चीनच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे दोन्ही देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. देशातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि वादळांमुळे आतापर्यंत ५० लोकांचा बळी गेला आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी चीन आणि तैवानने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
10 Jul 2026 12:50 PM (IST)
मुंबई महापालिकेच्या सायन, केईएम आणि जे.जे. रुग्णालयांमध्ये रक्ताचा तीव तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सायन रुग्णालयात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात असून, केईएम आणि जे.जे. रुग्णालयांमधील स्थितीही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, रक्तपेढी आणि उपचार करणारे डॉक्टर अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः रक्तदाते शोधून आणण्यास सांगत असल्याची तक्रार करण्यात येत आहे, रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करणे ही यंत्रणेची जबाबदारी असताना ती जबाबदारी रुग्णांच्या कुटुंबीयांवर टाकली जात असल्याने त्यांना धावपळ करावी लागत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
10 Jul 2026 12:40 PM (IST)
Google New Rule: प्रत्येक अँड्रॉईडसाठी त्यांचे गूगल अकाऊंट अतिशय महत्त्वाचे आहे. अँड्रॉईड यूजर्सना गूगल अकाऊंटच्या क्लाऊड स्टोरेजमध्ये मोफत 15जीबी स्टोरेज ऑफर केले जाते. या स्टोरेजमध्ये यूजर्स त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेऊ शकतात. मात्र आता गूगलने फ्री स्टोरेज नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. गूगलने त्यांच्या बॅकअप स्टोरेज पॉलिसीमध्ये बदल केला आहे, ज्याचा थेट वापर अँड्रॉईड यूजर्सवर होणार आहे. कंपनीचे हे नवीन नियम 7 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.
वाचा सविस्तर : Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर
10 Jul 2026 12:30 PM (IST)
अनेक चित्रपटांमध्ये हिरोला लोकांचा जीव वाचवताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण खऱ्या आयुष्यात अशा हिरोला तुम्ही कधी पाहिलंय का? आजच्या धावपळीच्या युगात लोक आपल्या व्यस्त जीवानात इतके रमून गेले आहेत की आजूबाजूला काय सुरु आहे याचेही त्यांना भान नसते. बऱ्याचदा तर एखाद्याचा जीव धोक्यात असल्यास लोक त्याला मदत करायला पुढे जात नाही तर त्या दृष्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी फक्त आपल्या खिशातून स्मार्टफोन बाहेर काढतात. पण म्हणतात ना अजूनही काही लोकांमध्ये माणूसकी शिल्लक आहे आणि याच माणूसकीच्या जोरावर एका व्यक्तीने खऱ्या आयुष्यात आपला जीव धोक्यात घालून एका मुलाची मदत करु पाहिली. याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले.
Railway Gatekeeper Risks His Life to Save Man Seconds Before Speeding Train Near Sirkazhi in Tamil Nadu pic.twitter.com/DJOQhUbnqd
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026
credit - social media and Twitter
10 Jul 2026 12:20 PM (IST)
India Australia Uranium Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाने एका ऊर्जा सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली. यामुळे शांततापूर्ण हेतूंसाठी ऑस्ट्रेलियातून भारतात युरेनियम आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महत्त्वपूर्ण करारामुळे भारताची स्वच्छ ऊर्जेची उद्दिष्ट्ये अधिक मजबूत होतील आणि ऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल. वार्षिक नेत्यांच्या शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत या कराराची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी अणुऊर्जा क्षेत्रात एक महत्वपूर्ण कयार केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल. एका संयुक्त निवेदनानुसार, ऑस्ट्रेलिया आणि भारताने ‘ऑस्ट्रेलिया-भारत अणुसहकार्य करार २०१५’ अंतर्गत ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था अंतिम केली आहे.
10 Jul 2026 12:10 PM (IST)
विजय काते, मिरा-भाईंदर : “450 कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले”, “पाच वर्षांची हमी दिली” अशा मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासनाचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील विविध सेवा वाहिन्यांनी खोदलेले रस्ते आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने तब्बल 42 कोटी 36 लाख रुपयांचे टेंडर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर 450 कोटी रुपये खर्चून झालेले रस्ते अजूनही पाच वर्षांच्या हमी कालावधीत असतील, तर त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा जनतेच्या कराच्या पैशातून 42 कोटी रुपये खर्च करण्याची गरजच काय? हमी केवळ कागदावर होती का? की निकृष्ट दर्जाच्या कामांना अधिकाऱ्यांनीच अभय दिले? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत.
10 Jul 2026 12:00 PM (IST)
नवी दिल्ली : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच या मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये आपत्ती ओढवली असून, गुरुवारी देशभरात मोठ्या प्रमाणावर हाहा:कार उडाला आहे. अनेक राज्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि इमारती कोसळल्याने गंभीर अपघात झाले आहेत. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असताना दिल्ली-एनसीआरमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली, जिथे इमारत कोसळल्याने आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
10 Jul 2026 11:50 AM (IST)
अर्जेंटिनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रशिक्षणादरम्यान फ्लाइट इन्स्ट्रक्टरमे उडत्या विमानातून उडी मारुन स्वत:चे जीवन संपले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पण याच वेळी त्याच्यासोबत असलेल्या २२ वर्षीय ट्रेनी पायलटने प्रसांगावधान राखत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले आहे.
10 Jul 2026 11:45 AM (IST)
भारतीय सैन्यात (Indian Army) सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन आर्मीच्या वतीने शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, यासाठीची अर्ज प्रक्रिया ९ जुलैपासून सुरू झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय सेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (joinindianarmy.nic.in) जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
10 Jul 2026 11:36 AM (IST)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी नुकताच कुवेत आणि ओमानचा आपला महत्त्वपूर्ण दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या दौऱ्यामुळे भारताचे पश्चिम आशियाई देशांसोबतचे संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारी संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. सध्याच्या बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारताची सागरी सुरक्षा आणि धोरणात्मक हितसंबंध वाढवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
10 Jul 2026 11:35 AM (IST)
सध्याच्या काळात शैक्षणिक चक्रांच्या तुलनेत उद्योग जगत खूप वेगाने बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान कंपन्यांची भरती प्रक्रिया, व्यवसायांचे संचालन आणि व्यावसायिकांच्या करिअर घडवण्याच्या पद्धतींवर मोठा प्रभाव पाडत आहे. डेटा, ऑटोमेशन, शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्राला एक नवीन आकार मिळत आहे.
10 Jul 2026 11:33 AM (IST)
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि मध्य आफ्रिकेच्या आसपासच्या भागांमध्ये ‘इबोला’ (Ebola Virus) विषाणूच्या प्रादुर्भावाने अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. ताज्या अहवालानुसार, काँगोमध्ये आतापर्यंत तब्बल १,७९२ लोकांना इबोलाचा संसर्ग झाला असून, ६२५ निरपराध लोकांचा यात मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संयुक्त राष्ट्रांनी (UN) आंतरराष्ट्रीय समुदायाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले असून, हा प्रादुर्भाव अत्यंत विनाशकारी वळणावर असल्याचा इशारा दिला आहे.
10 Jul 2026 11:03 AM (IST)
भारताच्या कृषी आणि अन्न क्षेत्राचा एक मुख्य कणा असलेल्या मत्स्यव्यवसायाचा गौरव करण्यासाठी आणि देशातील लाखो मत्स्य शेतकऱ्यांच्या परिश्रमाला दाद देण्यासाठी आज, १० जुलै रोजी देशभरात ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ (National Fish Farmers Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिकतेच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या मत्स्य उत्पादक व मच्छीमारांच्या योगदानाचा सन्मान करतो.