Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, अर्जांची पुन्हा होणार पडताळणी

Maharashtra Breaking News: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सद्यस्थितीत, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि अपात्र ठरलेल्या तब्बल ८० लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. छाननीनंतर आता सुमारे १.६८ कोटी महिलांनाच दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळत आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 05, 2026 | 09:17 AM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Ladki Bahin Yojna: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींपैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही. अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरूनच ती केवायसी केलेली नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा ही केवायसी पडताळणी केली जाईल, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 04 Jun 2026 06:25 PM (IST)

    04 Jun 2026 06:25 PM (IST)

    Koregaon Water Crisis: कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती

    (संजय कदम) कोरेगाव: कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी तारणहार अशी ओळख असलेल्या देऊर जवळील तळहीरा पाझर तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असतानाही या धरणातील पाणीउपसा बंद होत नसल्याने हा तलाव अवघ्या 8 दिवसात कोरडा पडण्याची भीती या भागातील जनतेला आहे याबाबत कोरेगाव प्रांत अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊनही या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे.

  • 04 Jun 2026 06:16 PM (IST)

    04 Jun 2026 06:16 PM (IST)

    Rajesh Exports: अरारा खतरनाक! तब्बल १५ लाख कोटींची हेराफेरीचा आरोप, कोण आहे राजेश मेहता, LIC ला देखील झटका

    बाजार नियामक सेबीने देशातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि तिचे अध्यक्ष राजेश मेहता यांच्या विरोधात अंतरिम आदेश जारी केला आहे. यामुळे आता भारतीय शेअर बाजार हादरला आहे. सेबीच्या तपासात कंपनीच्या आर्थिक माहितीतील फेरफार, निधीचा कथित गैरवापर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कारवाईनंतर, कंपनीच्या शेअरने ५% लोअर सर्किट गाठले, तर कंपनीत मोठा हिस्सा असलेल्या एलआयसीलाही मोठा फटका बसला. हा घोटाळा आणि हे प्रकरण नेमके कसे बाहेर आले आहे ते आपण समजून घेऊया. 

  • 04 Jun 2026 06:06 PM (IST)

    04 Jun 2026 06:06 PM (IST)

    क्रिकेटचा देव बदलणार? केवळ ‘इतक्या’ रन्स अन् इंग्लंडचा Joe Root घडवणार इतिहास

    ENG Vs NZ Test Series: आजपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या लॉर्डस स्टेडियमवर हा सामना होणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचे तट मिशेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. दरम्यान या सामन्यात जो रूटकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

  • 04 Jun 2026 06:00 PM (IST)

    04 Jun 2026 06:00 PM (IST)

    सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव

    Indus Water Treaty : भारत-पाकिस्तानात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला होता. यामुळे आधीच थिरबिथर झालेल्या पाकिस्तान (Pakistan) भारताच्या आणखी एका निर्णयाने पुरता घाबरला आहे. भारत चिनाब नदीचे पाणी व्यास नदीकडे वळवणार आहे. यामुळे पाकिस्तानला पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसावे लागेल. यावरुन पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 04 Jun 2026 05:50 PM (IST)

    04 Jun 2026 05:50 PM (IST)

    Hero Moto Corp : पेट्रोलचे टेन्शन संपले! इथेनॉलवर धावणार तुमची लाडकी स्प्लेंडर

    Hero Splendor Flex Fuel Launch 2026 : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे किंवा पर्यायी इंधनाकडे वळताना दिसत आहेत. सर्वसामान्यांची हीच गरज ओळखून देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी ‘हीरो मोटोकॉर्प’ने (Hero MotoCorp) ऑटोमोबाईल जगतात एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या दोन सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्स ‘स्प्लेंडर+’ (Splendor+) आणि ‘एचएफ डिलक्स’ (HF Deluxe) चे फ्लेक्स फ्युएल मॉडेल सादर केले आहे. भारताच्या १०० सीसी (100cc) कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमधील हा पहिलाच प्रयोग असून, यामुळे मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 04 Jun 2026 05:30 PM (IST)

    04 Jun 2026 05:30 PM (IST)

    पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या

    सातारा, दि. ४ (प्रतिनिधी): सदर बाजार परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी गुरुवारी नगरपालिकेत धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.

    सर्वे क्रमांक २४६ ते २४८ परिसरातील रहिवाशांच्या मते, पालिकेच्या खुल्या जागेवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे परिसराच्या नियोजनबद्ध विकासावर परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.

  • 04 Jun 2026 05:15 PM (IST)

    04 Jun 2026 05:15 PM (IST)

    Cockroach Janta Party ला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं समर्थन!

    देशामध्ये Cockroach Janta Partyने धुमाकूळ घातले आहे. देशातील मोठमोठ्या गादीवर बसलेल्या राजकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण दाटून आले आहे. Cockroach Janta Party मध्ये देशातील युवा मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. गेल्या काही वर्षात जेव्हा युवा भडकला तेव्हा नेपाळ, बांगलादेश तसेच श्रीलंकेत काय घडलं? याचे साक्षीदार आपण सगळेच आहोत. त्यामुळे काही राजकारणी लोकांना भीती वाटणे तर स्वाभाविक आहे. अशामध्ये सिनेक्षेत्रातून एका अभिनेत्याने या मुद्द्यात झेप घेतली आहे. दाक्षिणात्य सिनेमात झळकणारे तसेच Bollywood च्या अनेक मोठ्या चित्रपटांना आपल्या अभिनयाने गाजवणारे दिग्गज अभिनेते प्रकाश राज दिल्लीत जंतर मंतर येथे या नव्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचे त्यांना जाहीर केले आहे.

  • 04 Jun 2026 05:03 PM (IST)

    04 Jun 2026 05:03 PM (IST)

    Cooking Tips: मातीच्या भांड्यात पहिल्यांदा स्वयंपाक करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

    भारतीय स्वयंपाकघरात पुन्हा एकदा मातीच्या भांड्यांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पारंपरिक चव, आरोग्यदायी स्वयंपाक आणि नैसर्गिक पद्धतीमुळे अनेकजण आता क्ले पॉट किंवा मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याला प्राधान्य देत आहेत. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न अधिक चविष्ट आणि पौष्टिक मानले जाते. मात्र ही भांडी पहिल्यांदाच वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास फुटू शकतात. त्यामुळे वापरण्यापूर्वी योग्य तयारी करणे आवश्यक आहे.

  • 04 Jun 2026 04:58 PM (IST)

    04 Jun 2026 04:58 PM (IST)

    महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून या महत्त्वाकांक्षी महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत असल्याने विदर्भातील विकासाच्या आशा अधिक दृढ झाल्या आहेत. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा हा महामार्ग भविष्यातील प्रगतीचा नवा मार्ग ठरणार असून, या प्रकल्पाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)कडून ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे अलीकडेच उत्साहात पार पडला.

  • 04 Jun 2026 04:45 PM (IST)

    04 Jun 2026 04:45 PM (IST)

    राज्यातील क्रीडांगणांवर आता CCTV, चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहे अनिवार्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय

    राज्य शासनाने राज्यातील महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बुधवारी मुंबईतील ‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान, महिला खेळाडूंची सुरक्षा आणि सोय सुनिश्चित करण्यासाठी, राज्यातील प्रत्येक क्रीडांगणावर उत्कृष्ट दर्जाची स्वच्छतागृहे, कपडे बदलण्याची दालने, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

  • 04 Jun 2026 04:38 PM (IST)

    04 Jun 2026 04:38 PM (IST)

    ICC World CUP 2027: वेस्ट इंडिजची वर्ल्ड कप ‘एक्झिट’ आतापासूनच सुरू?

    2027 मध्ये वर्ल्ड कप होणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी आतापासूनच लढाई सुरू झाली आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. हिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंका क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये वनडे सिरिज खेळवली जात आहे. श्रीलंकेचा संघ 303 रन्स केल्या होत्या. वेस्ट इंडिजडच्या संघाला 262 च रन्स करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे वर्ल्ड कपमध्ये पात्र होण्यासाठी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या संघाला मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

  • 04 Jun 2026 04:28 PM (IST)

    04 Jun 2026 04:28 PM (IST)

    कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! मविआ उमेदवार बाळ माने यांनी घेतला अर्ज मागे, पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

    राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार, ४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता मोठी बातमी येत असून रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • 04 Jun 2026 04:16 PM (IST)

    04 Jun 2026 04:16 PM (IST)

    महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

    महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून भाजपविरोधातील नाराजी अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता आमदार संजय गायकवाड आणि नरेंद्र बोंडेकर यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत, आमदार संजय बुलढाण्याचे गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत मित्रपक्षांनी एकमेकांचे खच्चीकरण करणे महायुतीच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 04 Jun 2026 04:07 PM (IST)

    04 Jun 2026 04:07 PM (IST)

    थरारक! मृत्यूनेही टेकले गुडघे; 8 हजार मीटर उंचीवरून 6 दिवस रांगत खाली आला ‘माउंटन टायगर’ हिलरी दावा शेर्पा

    जगातील सर्वात उंच आणि तितकेच धोकादायक शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरून (Mount Everest) एक अशी अद्भूत आणि अशक्यप्राय वाटणारी घटना समोर आली आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. माउंट एव्हरेस्टच्या बर्फाळ कड्यांमध्ये आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत जर एखादी व्यक्ती ६ दिवस बेपत्ता झाली, तर ती जिवंत राहण्याची शक्यता शून्य मानली जाते. परंतु, अत्यंत अनुभवी नेपाळी मार्गदर्शक (Sherpa Guide) हिलरी दावा शेर्पा यांनी आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या आणि धैर्याच्या जोरावर या निसर्गाच्या क्रूर नियमालाही खोटे ठरवले आहे. ३० मेच्या सकाळपासून बेपत्ता असलेले ५२ वर्षीय दावा शेर्पा तब्बल ६ दिवसांनंतर गुरुवारी बर्फातून स्वतःला फरफटत आणि रांगत बेस कॅम्पजवळ घेऊन आले.

  • 04 Jun 2026 04:00 PM (IST)

    04 Jun 2026 04:00 PM (IST)

    Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव

    महिला क्रिकेटचा दर्जा आणि लोकप्रियता झपाट्याने वाढत असताना ICC ने महिला टी-२० विश्वचषकासाठी (Women’s T20 World Cup 2026) विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. महिला टी-२० विश्वचषकाच्या १०व्या हंगामासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत १२ संघांमध्ये ३३ सामने खेळले जाणार आहेत. १२ संघाना प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. गट १ मध्ये भारत आणि पाकिस्तान आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी यंदा एकूण अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. ही रक्कम मागील स्पर्धेच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मानली जात आहे. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:55 PM (IST)

    04 Jun 2026 03:55 PM (IST)

    NEET UG Re-Exam: परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध?

    NEET 2026 paper leak : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची चौकशी अजून पूर्ण झालेली नसताना आता अगामी पेपरफुटीची चर्चा सर्वेत्र होत आहे. नीट युजी री-एग्जामचा (NEET UG Re-Exam) पेपर लीक झाल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर अनेक पोस्ट असा दावा करत आहेत की, एका खाजगी टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून नीट री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावर एनटीएने नेमके काय उत्तर दिले आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:50 PM (IST)

    04 Jun 2026 03:50 PM (IST)

    दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई;

    पाटस : राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मद्यसाठा, चारचाकी वाहन आणि मोबाईलसह सुमारे 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटस दौंड अष्टविनायक रोडवरील बेटवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:45 PM (IST)

    04 Jun 2026 03:45 PM (IST)

    भारताची तेल आणि वायू पुरवठ्यासाठी मोठी योजना

    इराण युद्ध आणि होर्मुझवरील नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या एलपीजी पुरवठा आणि मागणीबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. पुरवठ्याच्या संकटात, भारताने आपल्या एलपीजी, एलएनजी आणि कच्च्या तेलाच्या आयातीत पूर्णपणे बदल केला आहे. केप्लरच्या जहाज-ट्रॅकिंग डेटामधील नवीनतम आकडेवारी नक्की काय सांगते हे आपण या बातमीतून जाणून घेऊया. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:40 PM (IST)

    04 Jun 2026 03:40 PM (IST)

    वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    मुंबई : महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून या महत्त्वाकांक्षी महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत असल्याने विदर्भातील विकासाच्या आशा अधिक दृढ झाल्या आहेत. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा हा महामार्ग भविष्यातील प्रगतीचा नवा मार्ग ठरणार असून, या प्रकल्पाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)कडून ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे अलीकडेच उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते आणि सूत्रसंचालक भारत गणेशपुरे यांनी या संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:35 PM (IST)

    04 Jun 2026 03:35 PM (IST)

    कांद्याबाबत केंद्र, राज्य सरकार सकारात्मक; वळसे पाटलांनी आंदोलकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

    रांजणी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना सकारात्मक चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, मागण्यांबाबत चर्चा करून योग्य सुधारणा करण्याची पूर्ण तयारी असल्याचे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:30 PM (IST)

    04 Jun 2026 03:30 PM (IST)

    इस्रायल पुन्हा दक्षिण लेबनॉनवर हल्ल्याच्या तयारीत

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायल लेबनॉनवर हल्ल्याच्या तायरीत आहे. पुन्हा एकदा इस्रायली लष्कराने लेबनॉनच्या नागरिकांनी झहरानी नदीच्या दक्षिणेकडील भागापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे. या भागात हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करण्याची मोहिम आखण्यात आली आहे. हिजबुल्ल्हाच्या दक्षिण लेबनॉनमधील पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना नष्ट करण्याचे कार्य अद्यापही सुरुच आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने नुकतेच युद्धबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, इस्रायलनेच्या लष्करी मोहिम आणि हवाई हल्ले थांबण्याचे नाव घेईना.

  • 04 Jun 2026 03:25 PM (IST)

    04 Jun 2026 03:25 PM (IST)

    बंगालचे TMC चे माजी प्रादेशिक अध्यक्ष गौतम घोष यांना अटक

    पश्चिम बंगालच्या दुर्गापूर पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी प्रादेशिक अध्यक्ष गौतम घोष यांना अटत केली. दुर्गापूर-फरीदपूर ब्लॉकमधील गोगला परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात सहभाग, स्थानिक रहिवाशांना धमकावणे आणि वाळू व कोळशाच्या अवैध सिंडिकेटमध्ये सहभागी असण्याचे आरोप आहेत.

    Durgapur, West Bengal: Police have arrested Gautam Ghosh, the former regional president of the Trinamool Congress (TMC) in the Gogla area of Durgapur-Faridpur block. He faces allegations of post-election violence, intimidating and threatening local residents, and involvement in… pic.twitter.com/HO8OVAQvBr

    — IANS (@ians_india) June 4, 2026

  • 04 Jun 2026 03:20 PM (IST)

    04 Jun 2026 03:20 PM (IST)

    मराठवाड्यातील उत्पादकांची शेतकरी मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ देण्याची मागणी

    विलास लाटे। नवराष्ट्र ढोरकीन: मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मोसंबीला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोसंबीला केवळ फळ म्हणून नव्हे, तर ‘आरोग्यदायी मिठाई’ म्हणून समाजात मान्यता मिळावी, अशी भावनिक मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी केली आहे. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:15 PM (IST)

    04 Jun 2026 03:15 PM (IST)

    कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, पण...

    छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): हैद्राबाद गॅझेटमधील ५८ लाख कुणबी नोंदीधारकांना प्रमाणपत्रे देणे तसेच यापूर्वी वितरित केलेल्या प्रमाणपत्रांची वैधता निश्चित करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम राज्य सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्के मनावर घेतल्याचे दिसत आहे. सध्या ही जलदगतीने सुरू असून, नुकत्याच झालेल्या आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सात ते आठ मंत्र्यांची उपस्थिती होती. यावरून सरकारची गंभीरता दिसून येत असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली. मात्र, प्रक्रिया सुरू असली तरी ती अर्ध्यावर येऊन थांबणार नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:10 PM (IST)

    04 Jun 2026 03:10 PM (IST)

    Vaibhav Sooryavanshi बाबत सचिन तेंडूलकरचे मोठे विधान

    Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 मध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. क्रिकेटक्षेत्रातून त्याचे भरघोस कौतुक केले जात आहे. त्याने अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. वैभव सूर्यवंशीने सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान लवकरच तो टीम इंडिया ए मधून खेळताना दिसणार आहे. मात्र आता त्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरने याबाबत भाष्य केले आहे. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:05 PM (IST)

    04 Jun 2026 03:05 PM (IST)

    भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले

    भंडारा : भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले आहे. असे असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांनी आपली मते सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांना जिल्ह्याबाहेर अज्ञात ठिकाणी रवाना केले. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सावध पवित्रा घेतला. वाचा सविस्तर

  • 04 Jun 2026 03:00 PM (IST)

    04 Jun 2026 03:00 PM (IST)

    नवऱ्याने पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पैठण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपणासाठी लाकडे तोडण्यास गेलेल्या पत्नीची पतीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पैठण पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून खळबळ उडाली आहे. ही घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी (3 जून) सकाळी घडली. वाचा नेमकं काय घडलं?

  • 04 Jun 2026 02:55 PM (IST)

    04 Jun 2026 02:55 PM (IST)

    आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; नवविवाहितेची आत्महत्या

    गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आंबेगाव परिसरात प्रेमविवाह केलेल्या २० वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पती, सासू व नणंदेवर गुन्हा नोंदवला आहे. याबाबत मृत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 04 Jun 2026 02:45 PM (IST)

    04 Jun 2026 02:45 PM (IST)

    ‘मोहिनी’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न

    कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ प्रेक्षकांसाठी आणखी एका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. आगामी भागांमध्ये शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नसोहळ्यात मोठा गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, प्रतापरावांच्या उपस्थितीमुळे शालिनीच्या भूतकाळाशी संबंधित एक महत्त्वाचे सत्य सर्वांसमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 04 Jun 2026 02:25 PM (IST)

    04 Jun 2026 02:25 PM (IST)

    लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात! विश्वचषक २०२६ मध्ये ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ मिशन

    फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा सोहळा फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) येत्या १२ जूनपासून रंगणार आहे. यंदाचा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि विशेष ठरणार आहे. प्रथमच या स्पर्धेत तब्बल ४८ संघ सहभागी होणार असून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश मिळून १६ शहरांमध्ये या महास्पर्धेचे सह-आयोजन करणार आहेत. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांसाठी यंदाचा वर्ल्ड कप अधिक रोमांचक ठरणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi). कतार २०२२ च्या फिफा विश्वचषक स्पेर्धेत अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मेस्सी आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. ३८ वर्षीय मेस्सीसाठी हा विश्वचषक ऐतिहासिक ठरू शकतो, कारण तो आपल्या कारकिर्दीतील सहावा फिफा विश्वचषक खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे. याशिवाय मेस्सीकडे आता आणखी काही मोठे विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.

  • 04 Jun 2026 02:15 PM (IST)

    04 Jun 2026 02:15 PM (IST)

    RBI च्या ट्रेझरी बिल ऑक्शनमधून मोठा संकेत, MPC देणार का व्याजदर कपातीची भेट?

    RBI ची MPC बैठक ३ जून रोजी सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​शुक्रवार, ५ जून रोजी बैठकीचे निर्णय जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. तथापि, यापूर्वीच, आरबीआयने ट्रेझरी बिल लिलावादरम्यान एका महत्त्वाच्या हालचालीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे येत्या काही दिवसांत दर कपातीची आशा निर्माण झाली आहे. 

    Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने बुधवारी १८२-दिवसीय आणि ३६४-दिवसीय ट्रेझरी बिल लिलावात मिळालेल्या सर्व बोली फेटाळल्या. या कालावधीत केवळ ९१-दिवसीय ट्रेझरी बिलांच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली. ही ट्रेझरी बिले ५.५६% च्या यील्डवर विकली गेली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आरबीआय अल्प-मुदतीच्या बाँड यील्डमधील वाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 04 Jun 2026 02:05 PM (IST)

    04 Jun 2026 02:05 PM (IST)

    ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये मुलींचा ऐतिहासिक विक्रम

    JEE Advanced 2026:  यंदाच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’  परीक्षेच्या निकालाने नवा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच १०,००० हून अधिक विद्यर्थिनींनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT) प्रवेशाच्या शर्यंतीत आपले स्थान पक्के केले आहे. देशातील ‘स्टेम’ (STEM – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणात मुलींचा सहभागच नाही तर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. यंदाच्या आकडेवारीनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ उत्तीर्ण झालेल्या एकूण महिला उमेद्वारांपैकी सुमारे एक चतुर्थांश (२५%) विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा टक्का आहे.

  • 04 Jun 2026 01:55 PM (IST)

    04 Jun 2026 01:55 PM (IST)

    चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत

    रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी डॉ. कांचन मदार यांनी केली मात्र याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.

  • 04 Jun 2026 01:45 PM (IST)

    04 Jun 2026 01:45 PM (IST)

    ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये मुलींचा ऐतिहासिक विक्रम; पहिल्यांदाच १० हजारांहून अधिक विद्यार्थिनी पात्र!

    यंदाच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’  परीक्षेच्या निकालाने नवा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच १०,००० हून अधिक विद्यर्थिनींनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT) प्रवेशाच्या शर्यंतीत आपले स्थान पक्के केले आहे. देशातील ‘स्टेम’ (STEM – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणात मुलींचा सहभागच नाही तर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. यंदाच्या आकडेवारीनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ उत्तीर्ण झालेल्या एकूण महिला उमेद्वारांपैकी सुमारे एक चतुर्थांश (२५%) विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा टक्का आहे.

  • 04 Jun 2026 01:35 PM (IST)

    04 Jun 2026 01:35 PM (IST)

    मानवी इतिहासातील सर्वात मोठे आश्चर्य! समुद्राच्या लाटांवर धावणार ‘फ्रीडम शिप’ शहर

    विज्ञानाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाला अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची सवय लावली आहे. आजपर्यंत आपण जमिनीवर उत्तुंग इमारती आणि स्मार्ट शहरे पाहिली आहेत. पण, आता मानवाने थेट समुद्राच्या अथांग लाटांवर एक संपूर्ण आधुनिक महानगर वसवण्याचा महत्त्वाकांक्षी विडा उचलला आहे. ‘फ्रीडम शिप’ (Freedom Ship Project) नावाचा हा प्रकल्प सध्या जागतिक स्तरावर प्रचंड चर्चेत आहे. हे केवळ एक जहाज नसून समुद्रावर तरंगणारे एक जागतिक दर्जाचे हाय-टेक शहर असेल, ज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना आपले जीवन जगण्यासाठी कधीही जमिनीवर पाय ठेवण्याची गरज भासणार नाही.

  • 04 Jun 2026 01:35 PM (IST)

    04 Jun 2026 01:35 PM (IST)

    कितीही वाढो महागाई, Air India आणि IndiGo साठी 75.6 रुपये लीटर ATF; सरकारची खास भेट

    जर तुम्ही वारंवार विमानाने प्रवास करत असाल किंवा नजीकच्या भविष्यात तसे करण्याची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक ठरेल. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. याचा परिणाम विमान इंधनाच्या (ATF) दरावरही झाला आहे. एटीएफच्या दरवाढीनंतर, आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्या भाडेवाढीची मागणी करत होत्या. आता, केंद्र सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सरकारने विमान इंधनाची (एटीएफ) किंमत मर्यादित कक्षेत ठेवण्यासाठी १०,००० कोटी रुपयांच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे.

  • 04 Jun 2026 01:25 PM (IST)

    04 Jun 2026 01:25 PM (IST)

    पावसाची जोरदार हजेरी! 24 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

    देशभरात हवामानाचे स्वरूप वेगाने बदलत असून भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व हालचाली तीव्र झाल्या असून, पुढील काही दिवस पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा सुरू राहण्याची शक्यता आहे.

  • 04 Jun 2026 01:15 PM (IST)

    04 Jun 2026 01:15 PM (IST)

    कलेक्टर होण्याचं स्वप्न, संघर्षाची साथ, ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये ट्विंकल यादवची दमदार एन्ट्री

    झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेबाबत उत्सुकता वाढत आहे. या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव ‘गौरी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.कृष्णाईच्या तीन मुलींमधील मधली मुलगी असलेली गौरी खंबीर, आत्मविश्वासू आणि जिद्दी स्वभावाची आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारी गौरी कुटुंबासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्यास तयार असते. आईने आयुष्यभर केलेला संघर्ष आणि त्याग तिने जवळून पाहिल्यामुळे तिचं आईशी अतूट नातं आहे. मात्र, वडिलांविषयी तिच्या मनात खोलवर रागही दडलेला आहे. या भावनिक संघर्षासोबतच गौरीचं मोठं स्वप्न म्हणजे कलेक्टर होण्याचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करताना दिसणार आहे.

  • 04 Jun 2026 01:05 PM (IST)

    04 Jun 2026 01:05 PM (IST)

    एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

    रस्त्यावर वाहन चालवताना घेतलेला एक चुकीचा निर्णय किती महागात पडू शकतो, याची प्रचिती देणारी घटना मंगळवारी पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी बसस्थानक चौकात घडली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत एका कारचालकाने अचानक वळण घेतल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. काही क्षणांतच महामार्गावर भीषण अपघात घडला. या अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ केवळ अपघाताचा थरार दाखवत नसून वाहन चालवताना होणाऱ्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणामही अधोरेखित करत आहे.

  • 04 Jun 2026 12:48 PM (IST)

    04 Jun 2026 12:48 PM (IST)

    पोलिसांनी 'थिंकटेक'च्या मालकाला नाशिकमधून पकडले

    हिंजवडीतील थिंकटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला रातोरात टाळे ठोकून शेकडो आयटी अभियंत्यांना बेरोजगार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ हर्षल ठाकरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल ठाकरे यांनी सुमारे 700 आयटी अभियंत्यांकडून लॅपटॉप डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपये घेतले होते. याशिवाय जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगारही थकवण्यात आले होते. अचानक कंपनी बंद करून व्यवस्थापन फरार झाल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले.

  • 04 Jun 2026 12:36 PM (IST)

    04 Jun 2026 12:36 PM (IST)

    शेतकऱ्यांची क्रूर थट्टा काँग्रेस खपवून घेणार नाही; सपकाळांचा इशारा

    देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये शब्दच्छल करून नियम, अटी व शर्ती टाकून जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • 04 Jun 2026 12:24 PM (IST)

    04 Jun 2026 12:24 PM (IST)

    पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष

    शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसरात सोमवारी (दि. १ जून) सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भररस्त्यात वाहन अडवून गोळीबार, दगडफेक आणि कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा हल्ला पैशाच्या जुन्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत युवक तसेच हल्लेखोर हे विविध गुन्ह्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे.

  • 04 Jun 2026 12:12 PM (IST)

    04 Jun 2026 12:12 PM (IST)

    महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक

    वडगाव शहरातील एका २२ वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तब्बल दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला असून मृत युवतीच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्राण ज्ञानेश्वर येवले (वय २७, रा. वडगाव मावळ) असे असून, तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 04 Jun 2026 12:00 PM (IST)

    04 Jun 2026 12:00 PM (IST)

    पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार

    उत्तर प्रदेशमधून एका सनकी आशिकचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. किरकोळ गोष्टीवरुन प्रियकराला राग आला त्याने थेट चाकूने चाट विक्रेत्यावर हल्ला चढवला. आरोप आहे की, प्रेयसीला पाणीपुरी खाऊ घातल्याने कथित प्रियकराने विक्रेत्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यानंतर आरोपीने तिथून आपला पळ काढला आणि तो फरार झाला. घायाळ विक्रेत्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

  • 04 Jun 2026 12:00 PM (IST)

    04 Jun 2026 12:00 PM (IST)

    iPhone 18 Pro चे 4 नवे रंग झाले Leak, Cherry शेड बाजारात आणणार तुफान; Gen-Z साठी मार्केटमध्ये बवाल!

    ॲपलच्या आगामी आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, हे स्मार्टफोन चेरी, लाईट ब्लू, डार्क ग्रे, ब्लॅक आणि सिल्व्हर या चार नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये येऊ शकतात. या वेळी चेरी रंगाची सर्वाधिक चर्चा आहे आणि त्याला एक नवीन सिग्नेचर शेड म्हणून सादर केले जात आहे. ही सिरीज सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. नुकतेच हे रंग कसे असतील त्याबाबत फोटो आणि माहिती लीक झाली आहे.

  • 04 Jun 2026 11:50 AM (IST)

    04 Jun 2026 11:50 AM (IST)

    संतापजनक! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

    ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथे आईच्या प्रियकराने ४ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण करून ठार मारल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शंभू शर्माला अटक केली.

  • 04 Jun 2026 11:40 AM (IST)

    04 Jun 2026 11:40 AM (IST)

    Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला मोठा धक्का; क्रीमिया द्विकल्पावर हल्ल्यामुळे तणाव वाढला

    रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनने रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या तेल केंद्रांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या शांतता चर्चेवर संकटाचे सावट उभारले आहे.

  • 04 Jun 2026 11:30 AM (IST)

    04 Jun 2026 11:30 AM (IST)

    धाडकन कोसळला शेअर बाजार, सलग दुसऱ्या दिवशी Sensex 500 अंकानी घसरला; इन्फोसिस – सनफार्मावर गदा

    देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. पश्चिम आशियातील गंभीर संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांक २४,३०० अंकांच्या खाली घसरला. सकाळी ९:२० वाजता, सेन्सेक्स २८४.५१ अंकांनी किंवा ०.३८% ने घसरून ७४,०६१.६६ वर व्यवहार करत होता. निफ्टी ६७.२५ अंकांनी किंवा ०.२९% ने घसरून २३,३३८.३५ वर बंद झाला. दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी वधारून ९५.६९ वर उघडला.

  • 04 Jun 2026 11:20 AM (IST)

    04 Jun 2026 11:20 AM (IST)

    फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेचा मोठा प्रहार; दोन महिन्यांत ४.३० लाख जणांवर कारवाई

    विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिल ते मे २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी ४ लाख ३० हजार प्रकरणे उघडकीस आणत ३० कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.७५ लाख प्रकरणांमधून १२.०२ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे दंड वसुलीत तब्बल १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून मेल-एक्स्प्रेस गाड्या, उपनगरीय लोकल, एसी लोकल तसेच रेल्वे स्थानकांवर नियमितपणे विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते.

  • 04 Jun 2026 11:10 AM (IST)

    04 Jun 2026 11:10 AM (IST)

    कॅप्टन्सीच्या रेसमध्ये सर्वात पुढे नाव, T20 साठी लवकरच लागणार वर्णी, सूर्यकुमार Out, गौतमच्या होकाराची प्रतिक्षा

    २०२८ च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर एका विशिष्ट नावावर सहमत होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वृत्तांनुसार, वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरची निवड श्रेयस अय्यर आहे, तर गौतम गंभीरने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Web Title: 4th june2026 live breaking news marathi maharashtra national international sports crime share market economics trade news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी नवनीत राणा इच्छुक, पवारांची घेतली भेट
1

Maharashtra Breaking News Updates Today:  सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी नवनीत राणा इच्छुक, पवारांची घेतली भेट

Mount Everest : थरारक! मृत्यूनेही टेकले गुडघे; 8 हजार मीटर उंचीवरून 6 दिवस रांगत खाली आला ‘माउंटन टायगर’ हिलरी दावा शेर्पा
2

Mount Everest : थरारक! मृत्यूनेही टेकले गुडघे; 8 हजार मीटर उंचीवरून 6 दिवस रांगत खाली आला ‘माउंटन टायगर’ हिलरी दावा शेर्पा

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का
3

Vikram Kakade Net Wort: आलिशान बोटी, जय पवारांना १० कोटींचे कर्ज…; विक्रम काकडेंची संपत्ती पाहून बसेल धक्का

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा
4

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.