नाशिक : सध्या कोरोनाचा (Corona) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे, कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे, त्यामुळं मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, दरम्यान, कोरोनाने राजकीय क्षेत्रात देखील शिरकाव केला आहे. राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा कोरोनाबाधित झाले आहेत.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य…
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 28, 2023
भुजबळ यांचे आवाहन…
दरम्यान, कोरोना झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.” असं ट्विट छगन भुजबळ यांनी केलं आहे.
काल प्रकृती बिघडली होती
काल छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अवकाळीग्रस्त लोकांना दहा हजाराची मदत केली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांची अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिकमधील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना काही वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. यामध्ये करोना चाचणीचाही समावेश होता.