डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली– जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था (Economic) कोरोना (Corona) काळानंतर विस्कळीत झाली. अनेक देश देशोधडीला लागले, काही देशांत प्रचंड आर्थिक समस्या निर्माण झाल्यात. अशा स्थितीत भारतात मात्र गेल्या दोन वर्षांत प्रगती होताना दिसतेय. 1 फेब्रुवारी 2023 रोजी या वर्षीचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaramaan) या संसदेत सादर करतील. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडमुकांपूर्वी सादर करण्यात येणारं मोदी सरकारचं हे अखेरचं पूर्ण बजेट असणार आहे. मोदी सरकारच्या काळातील अर्थव्यवस्थेचा विचार केला तर, 2020,2021 आणि 2022 ही तीन वर्ष अत्यंत कठीण होती. या काळात जगावर कोरोनाचं संकट आलं होतं. तसचं रशिया-युक्रेन युद्धानं जागतिक अर्थव्यवस्थेसमोर संकट निर्माण केलं होतं. लॉकडाऊनमुळं देशातील हातावर पोट असणाऱ्यांचं आणि व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. फेब्रुवारी 2022 साली झालेल्या युद्धामुळं जगातील पुरवठा साखळीवर मोठा परिणाम केला.
कोरोना काळ आणि युद्धामुळं वाढली महागाई
कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळं महागाीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यासह जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्यांचा तुटवडाही निर्माण झाला. इंधन आणि कमोडिटी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात याचा फटका सर्वाधिक सहन करावा लागला. यामुळं भारत आयात करत असलेल्या इंधनांवर, वस्तूंवर देशाला जास्त पैसे मोजावे लागले. अमेरिका आणि युरोप यातील काही भागात मंदीचं सावट आल्यानं इंधनाच्या किमती जरा कमी झाल्या.
देशाची वित्तीय तूट वाढली
देशाच्या उत्पन्नात आणि खर्चात असलेलं अंतर वाढलं. त्यामुळं देशाची वित्तीय तूटही वाढलीय. व्यापारी तोटा डिसेंबरमध्ये वाढून २३.८९ अब्ज डॉलर्स म्हणजेच १.९४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलाय. आयात आणि निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या किमीतत मोठी तफावत निर्माण झाल्यानं हा व्यापारी तोटा वाढल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी घसरण आणि निर्यातीत झालेली घट यामुळेही व्यापारी तोट्यात वाढ झाली. जुलै 2022 मध्ये पहिल्यांदा रुपया डॉलरच्या तुलनेत 80 च्या खाली गेला. अद्यापही तो सावरलेला दिसत नाहीये. तर डिसेंबर 2022 मध्ये निर्यातील दरसाल दर शेकडा 12.2 टक्के घट नोंदवण्यात आलीय.
मोदींनी चांगल्या प्रकाराने सांभाळली अर्थव्यवस्था?
इंडिया टुडे आणि सी व्होटोरने नुकतचं एक सर्वेक्षण केलं. त्यात जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मोदी सरकार आणि त्यापूर्वीचे डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार, यात तुलनात्मक काही प्रश्न जनतेला विचारण्यात आले. यातला एक प्रश्न होता की, ‘देशाची अर्थव्यवस्थाा दोघांपैकी कुणी अधिक चांगल्या रितीने हाताळली?’
या प्रश्नाच्या उत्तरात 51 टक्के भारतीयांनी नरेंद्र मोदी यांना मार्क दिले आहेत. म्हणजेच 51 टक्के जनतेला असं वाटतंय की मोदी सरकारने अर्थव्यवस्था सांभाळण्यात चांगली कामगिरी केली आहे. तर 36 टक्के लोकांनी मोदींपेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांची कामगिरी या क्षेत्रात चांगली असल्याचं म्हटलंय. तर 13 टक्के जनतेनं यावर स्पष्ट रुपानं आपलं मत नोंदवलं नाही.