ओडिसा– देशाच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओडीसा राज्याचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास (Naba Das) यांच्यावर प्राणघातक हल्ला (firing) करण्यात आला आहे. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. ओडीशातल्या झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर जवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ASI ने त्यांच्यावर फायरिंग केलं. या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळी का झाडली ते समोर आलेलं नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे.
पूर्वनियोजित कट…
दरम्यान, कॅबिनेट मंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ASIचे नाव गोपाल दास आहे असंही समजतं आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास आले होते. त्यावेळी ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल दास यांनी नाबा दास यांच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. नाबा किशोरदास यांच्यावर हा हल्ला होणं हा पूर्वनियोजित कट होता. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना घडल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोण आहेत मंत्री नाबा दास?
नाब किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. नाब दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. नब किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 1.14 कोटी रुपये आहे. तसेच 2015 साली विधानसभेच्या अधिवेशनात नाब किशोर दास सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर त्यांचे निलंबित झाले होते.