मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात या माहितीपटावरुन मोठा वाद (Controversy) झाल्यानंतर आता याचे पडसाद अन्य ठिकाणी देखील उमटत आहेत. दरम्यान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी इशारे देऊनही या विद्यार्थ्यांनी हा माहितीपट पाहिला आहे. आता याबाबत विविध गोष्टी घडत आहेत. खरं तर, पूर्वी बीबीसीची माहितीपट (BBC Documentary Controversy) टीआयएसएसमध्ये दाखवला जाणार होता. याचा निषेध केल्यानंतर बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट दाखवला जाणार नाही, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
नकार असतानाही…
दरम्यान, संस्थेने नकार दिला असतानाही विद्यार्थ्यांनी हा माहितीपट कसा पाहिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कॅम्पसमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसही तैनात करण्यात आले होते. बीबीसी डॉक्युमेंटरीवर झालेल्या गदारोळात, संस्थेने स्पष्ट केले की आमच्या बाजूने पूर्णपणे बंदी आहे. मात्र, नकार देऊनही काही विद्यार्थ्यांनी ते कसे पाहिले, याची चौकशी केली जाईल. असं संस्थेनं म्हटलं आहे, त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याची मोहीम
प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने पीएम नरेंद्र मोदींवर बंदी घातलेला बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्याची मोहीम सुरू केली होती. TISS कॅम्पसमध्ये निषेधाची हाक PSF ने या आठवड्याच्या सुरुवातीला दिली होती. त्यानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानेही पाठिंबा दिला. गेल्या शुक्रवारी जेव्हा विरोध सुरू झाला तेव्हा यानंतर TISS विद्यार्थी संघटनेनेही माहितीपटाचा QR कोड शेअर केला.
नियम भंग केल्याचा आरोप…
संस्थेने गेल्या शुक्रवार आणि शनिवारी दोन सूचना जारी केल्या. असे असतानाही आंदोलक विद्यार्थी आपल्या प्लॅनवर पुढे गेले. तथापि, संस्थेच्या वतीने असे सांगण्यात आले की, काही विद्यार्थी गट बीबीसीच्या माहितीपटाच्या स्क्रीनिंगबाबत २७ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या सल्ल्याचा भंग करणार्या कृत्यांमध्ये गुंतले आहेत. शांतता आणि सुसंवाद… प्रकरण संबंधित संस्थात्मक नियमांद्वारे हाताळले जाईल.