मुंबई- देशात २०२४ साली लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत, त्यामुळं देशात यावेळी कोणाचे सरकार (Government) येईल याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर काहीनी याचा सर्वे केला असून, याची माहिती समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल की यूपीएच्या बाजूने काही उलथापालथ होईल. सर्वेक्षणात जे समोर आले आहे, त्यानुसार पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार (Modi government) येणार असले तरी त्यांना जागांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याचाच अर्थ त्यांच्या जागा कमी होणारेय. दुसरीकडे भारत जोडो यात्रेत काँग्रेसला फायदा होईल, पण तरीही ते दोन आकड्यांपुरतेच मर्यादित असल्याचे दिसते. म्हणजे १५३ चा आकडा पार करु शकणार नाहीत, असं सर्वे सांगत आहे.
[read_also content=”२०२४ मध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार? आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? अहवालानुसार… https://www.navarashtra.com/india/whose-government-will-be-formed-in-next-loksabha-elections-are-held-today-which-party-will-get-how-many-seats-according-to-reports-364758.html”]
महाराष्ट्रातील काय आहे परिस्थिती?
२०२४ साली आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत, याच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळं राज्यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? किंवा राज्याराज्यात किती खासदार निवडून येतील, याची आतापासून आकडमोडे सुरु झाली आहे. महाराष्ट्राचा विचार करता, राज्यात सध्या शिंद गट व भाजपाचे सरकार आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी असून, वंचितला आता शिवसेनेनं जवळ केले आहे. त्यामुळं मविआचे पारडे शिंद गट व भाजपापेक्षा जड वाटत असल्याचं सर्वेतून समोर आले आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
दरम्यान, २०२४ साली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी आतापासून रणनिती आखयला सुरुवात केली आहे. देशात पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाला अधिक जागा मिळतील, तर काँग्रेस पक्षाला भारत जोडो यात्रेचा फायदा होईल, मात्र जादुई आकडा त्यांना पार करता येणार नाही. तर भाजपाच्या मागच्यापेक्षा यावेळेला जागा कमी येतील असं सर्वेक्षणात म्हटलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी मविआकडे ३४ जागा जिंकून येतील तर, शिंद गट व भाजपाचे १४ खासदार निवडून येतील, असं सर्वेत म्हटलं आहे.