Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
मुंबई महानगरपालिकेच्या १६१ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होणार आहे. या ऐतिहासिक विजयामुळे मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात ‘विजयी जल्लोष’ साजरा केला जात आहे. भाजपने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का देत मुंबईच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली आहे.
मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठा प्रवास केला आहे. जनसंघाच्या काळापासून आणि त्यानंतर भाजपची स्थापना झाल्यापासून पक्षाने मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेची किल्ली भाजपच्या हाती येत नव्हती.
17 Jan 2026 06:57 PM (IST)
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळणार आहे. त्यातून देशाच्या सर्वांगीण प्रगतीत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
17 Jan 2026 06:51 PM (IST)
Asaduddin Owaisi: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी जवळपास 25 महापालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे. मुंबईत देखील ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता गेली. महायुतीने मुंबईत मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.
17 Jan 2026 06:21 PM (IST)
BMC Muncipal Election Result 2026 Marathi News: दक्षिण मुंबईमधील शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला आणि शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधील सातपैकी चार प्रभागांमधील बंडखोरी मोडून काढण्यात शिवसैनिकांना यश आले असून, सातपैकी सहा प्रभागांमध्ये मतदारांनी साथ दिल्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली. मनसेच्या वाट्याला गेलेल्या प्रभागातील बंडखोरीमुळे युतीला पराभव पत्करावा लागला. या प्रभागात शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराचा विजय झाल्याने शिवसैनिकांच्या (ठाकरे) जिव्हारी लागला.
17 Jan 2026 06:04 PM (IST)
वडगाव मावळ / सतिश गाडे: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण अशा एकूण पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १६) पासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
17 Jan 2026 05:59 PM (IST)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी हा वाद त्यांच्या व्यवसायाशी नाही, तर त्यांच्या वैयक्तिक नात्याशी आणि त्यांनी विकसित केलेल्या ‘ग्रोक’ (Grok AI) या चॅटबॉटशी संबंधित आहे. मस्कच्या १६ महिन्यांच्या मुलाची, रोम्युलसची आई, २७ वर्षीय अॅशले सेंट क्लेअर यांनी मस्कच्या एआय कंपनी ‘xAI’ विरोधात न्यू यॉर्क सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे. या खटल्यामुळे एआयच्या सुरक्षिततेवर आणि मस्कच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
17 Jan 2026 05:50 PM (IST)
भाजपची निर्णायक बाजी आणि त्यांना मिळालेली शिवसेनेची साथ यामुळे गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर असलेली ठाकरे यांची सत्ता संपुष्टात आली आहे. परिणामी, ठाकरे गटाला आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका करत त्यांना काही प्रश्न विचारले आहे. ट्विटरवर त्यांनी एकनाथ शिंदेंना टॅग करत ७ घणाघाती प्रश्न विचारले आहे.
17 Jan 2026 05:24 PM (IST)
भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील ‘व्यापार युद्ध’ (Trade War) आता एका अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारतीय वस्तूंवर लादलेल्या करांना आता भारताने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने अमेरिकन डाळींवर, विशेषतः पिवळ्या वाटाण्यांवर ३०% आयात शुल्क लावून अमेरिकेच्या कृषी क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकन सिनेटर्सनी आता थेट व्हाईट हाऊसचे दरवाजे ठोठावले आहेत.
17 Jan 2026 04:50 PM (IST)
अँकर..पोलिसांना 500 रुपये देऊन अपमानित केले निवडणूक आयोगाने निवडणुकीचा 5000 हजार मानधन भत्ता द्या अन्यथा राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे हजारो पदाधिकारी उपस्थित राहतील याची नोंद घ्यावी अशा इशारा राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी दिला आहे.
17 Jan 2026 04:40 PM (IST)
बीसीसीआय आयोजित २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच मुंबई संघाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी भारतीय खेळाडू आणि मुंबई संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे. अजिंक्य रहाणे यापुढे या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही.अजिंक्य रहाणेकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवण्यात आले आहे की, तो वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातील रेड-बॉल सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. मुंबई संघ लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन संघ निवडणार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे हैदराबाद आणि दिल्लीविरुद्ध महत्त्वाचे सामने असणार आहेत.
17 Jan 2026 04:40 PM (IST)
नालासोपारा परिसरात आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. पाण्याने भरलेल्या टँकरचा अचानक टायर पंचर झाल्याने टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या आयशर (Eicher) गाडीला जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारण हा काही पहिलाच अपघात नाही. याच पाण्याच्या टँकरमुळे याआधीही अनेकदा अपघात झाले असून काही निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
17 Jan 2026 04:35 PM (IST)
केंद्रीय कामगार मंत्रालयाला हे लक्षात आले आहे की, ऑनलाइन सुविधा असूनही, लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाला अजूनही पीएफ काढणे, हस्तांतरण करणे किंवा जुन्या सेवेचे विलीनीकरण करणे यासारख्या प्रक्रियांमध्ये अडचणी येतात. माहितीअभावी दावे अनेकदा नाकारले जातात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, ‘सेवा एजंट’ तैनात करण्याचा प्रस्ताव विकसित करण्यात आला आहे.
17 Jan 2026 04:30 PM (IST)
माथेरान शहरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी रोड परिसरातील वन ट्री हिल पॉइंटजवळ असलेल्या कदम टी स्टॉलमध्ये थरारक जबरी चोरीची घटना घडली. चार अज्ञात चोरट्यांनी सिगारेट पाहिजे या बहाण्याने दुकानात प्रवेश करत चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून दुकानमालक नारायण मारुती कदम आणि त्यांच्या पत्नी चंदा नारायण कदम यांना दोराने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील सुमारे एक लाख रुपये रोख तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे फरार झाले.
17 Jan 2026 04:23 PM (IST)
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. यावरून शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सतंप्त होत सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनंत दवंगे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला.
17 Jan 2026 04:00 PM (IST)
गोवा: गोव्यामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या आणि गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले. हत्या झालेल्या महिलांचे नाव एलेना कस्थानोवा आणि एलिना वानीवा असे आहे. तर आरोपीचे नाव अलेक्सी लिओनोव्ह असे आहे.
17 Jan 2026 03:55 PM (IST)
शिक्रापूर : शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मितेश प्रदिप गादिया यांची निवड केली आहे. स्विकृत नगरसेवकपदी अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या राजेंद्र अरुण लोळगे यांची निवड केली आहे. शिरूर नगरपरिषदेच्या रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सभेत ही निवड केली आहे. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व सहाय्यक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी काम पाहिले. यावेळी हात उंचावून केलेल्या या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या युतीसह एका अपक्षाचे मत मिळवून उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार मितेश प्रदिप गादिया यांना १४ नगरसेवकांनी हात उंच करून आपली मते दर्शविली.
17 Jan 2026 03:50 PM (IST)
चहा बनवताना साखर संपली तर, खाली दुकानात जाण्याऐवजी, तुम्ही ताबडतोब तुमच्या फोनवर ब्लिंकिट किंवा झेप्टो App उघडून ते ऑर्डर करू शकता. आता, तुम्हाला प्रश्न पडेल, “तुम्ही एकटेच हे करत आहात का?” नाही, नाही… तुम्ही एकटे नाही आहात. अनेक लोकांनी दुकानात खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन क्विक-कॉमर्स अॅप्सवरून किराणा माल ऑर्डर करायला सुरुवात केली आहे. कल्पना करा की या कंपन्या किती कमावतात? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोट्यवधी रुपयांच्या या कंपन्या तोट्यात चालल्या आहेत.
17 Jan 2026 03:40 PM (IST)
अमेझॉन या पृथ्वीतलावरचे सगळ्यात भयंकर जागा मानली जाते. अमेझॉनचे दाट जंगल इतके मोठे आणि दाट आहे की तिथे सगळ्याच गोष्टींचे संशोधन करणे हे फार अशक्य मानले जाते. त्या दाट जंगलात असे अद्भुत रहस्य आहे, ज्याची कल्पना आपण कधीही केली नसेल. अगदी आपण अजून नावही ऐकले नसेल अशा प्रजाती त्या जंगलात राहत आहेत. त्या जंगलात काय काय आहे? याचे उत्तर शोधणे तसे कठीण पण काही रहस्यांचा उलगडा झाला आहे.
17 Jan 2026 03:40 PM (IST)
अमेझॉन जंगल ज्याला पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते, हे दक्षिण अमेरिकेत वसलेले जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन आहे. जगाला सुमारे २०% ऑक्सिजन या जंगलातूनच मिळते. अमेझॉनला आजही रहस्यमय गोष्टींमध्ये मोडले जाते, याचा बराचसा भाग अजूनही मानवाने पाहिला नाही. इथे अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती असल्याचे सांगितले जाते. जंगल सुमारे ७० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले असून, ब्राझील, पेरू, कोलंबिया यांसारख्या अनेक देशांमध्ये विस्तारलेले आहे. दरम्यान आता अमेझॉनच्या रहस्यमय जंगलात राहणारी दुर्मिळ जमात पहिल्यांदाच सोशल मिडियावर दिसून आली आहे. . हा दुर्मिळ व्हिडिओ लेखक आणि चित्रपट निर्माते पॉल रोसोली यांनी शेअर केला आहे, जे अनेक दशकांपासून अमेझॉन वर्षावनाच्या संवर्धनात सहभागी आहेत.
17 Jan 2026 03:30 PM (IST)
Dr. Nisha Verma US Senate hearing 2026 : सध्या सोशल मीडियापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे डॉ. निशा वर्मा (Dr. Nisha Verma). अमेरिकन सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि पेन्शन (HELP) समितीसमोर गर्भपात गोळ्यांच्या सुरक्षिततेबाबत सुनावणी सुरू असताना, एका अनपेक्षित प्रश्नाने या सभेचे रूपांतर वैचारिक युद्धात झाले. रिपब्लिकन सिनेटर जोश हॉली यांनी डॉ. वर्मा यांना थेट विचारले, “तुमच्या मते पुरुष गरोदर राहू शकतात का?” या प्रश्नावर डॉ. वर्मा यांनी दिलेल्या उत्तराने केवळ सिनेटच नाही, तर संपूर्ण इंटरनेट विश्व हादरून गेले आहे.
17 Jan 2026 03:20 PM (IST)
सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून अनेक चांगले विषय देखील पाहायला मिळतात. सध्याचं हे धावपळीचं जग असून अनेकदा मानसिक ताण तणाव जास्त जाणवतो. या सगळ्यात काही सकारात्मक विचार रिल्समधून व्हायरल होत असतात. वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांचे विचार रिल्समधून लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतात. प्रेमानंद महाराजांच्या मठात एका भक्ताने देवाच्या पुजेबाबत प्रश्न विचारला त्यावर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. वृंदावनचे प्रेमानंद जी महाराज भक्तांना केवळ धर्मच नव्हे तर जगण्याची आणि योग्य मार्गाचे अनुसरण करण्याची कला देखील शिकवतात. ते म्हणतात की देवाशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे नाव सतत स्मरण करणे.
17 Jan 2026 03:03 PM (IST)
चहा बनवताना साखर संपली तर, खाली दुकानात जाण्याऐवजी, तुम्ही ताबडतोब तुमच्या फोनवर ब्लिंकिट किंवा झेप्टो App उघडून ते ऑर्डर करू शकता. आता, तुम्हाला प्रश्न पडेल, “तुम्ही एकटेच हे करत आहात का?” नाही, नाही… तुम्ही एकटे नाही आहात. अनेक लोकांनी दुकानात खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन क्विक-कॉमर्स अॅप्सवरून किराणा माल ऑर्डर करायला सुरुवात केली आहे. कल्पना करा की या कंपन्या किती कमावतात? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोट्यवधी रुपयांच्या या कंपन्या तोट्यात चालल्या आहेत.
17 Jan 2026 02:50 PM (IST)
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे, या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि भात यांच्यात खेळला गेला. या पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेऊन अमेरिकेविरुद्ध भारताच्या सहा विकेट्सने विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज हेनिल पटेल म्हणाला की, तो दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डेल स्टेनच्या मैदानावरील आक्रमकतेपासून प्रेरणा घेतो. गुरुवारी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पटेलने १६ धावांत पाच विकेट्स घेतल्या, ज्यामुळे पाच वेळा चॅम्पियन भारताला त्यांच्या मोहिमेची जोरदार सुरुवात झाली.
17 Jan 2026 02:40 PM (IST)
गेल्या १९ दिवसांपासून इराणमध्ये (Iran) सुरू असलेला जनआक्रोश आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. आर्थिक संकटातून पेटलेल्या या वणव्याने संपूर्ण इराणला कवेत घेतले होते. मात्र, आता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या नाझानिन बारादरन (Nazanin Baradaran) यांना इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) गुप्तचर माहितीच्या आधारे अटक केली आहे. बारादरन या हिंसक निदर्शनांच्या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सरकारने केला असून, या अटकेमुळे आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
17 Jan 2026 02:35 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवकांच्या या महासंग्रामात भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निकालामुळे शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.
17 Jan 2026 02:30 PM (IST)
मागील काही दिवसात थंडीने चांगलाच जोर पकडला होता. अशावेळी अनेकांनी पर्यटनाचे बेत तुर्तास रद्द केले. मात्र आता थंडीचा जोर काहीसा ओसरला असल्याने अनेकांनी आपले पर्यटनाचे आराखडे सुरू केले आहे. जिल्ह्यात पर्यटनस्थळांची संख्या मर्यादित असली, तरी निसर्गसंपन्नता आणि हमखास व्याघ्रदर्शन यामुळे नागरिकांची पहिली पसंती टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यालाच मिळत आहे.
17 Jan 2026 02:25 PM (IST)
भारतातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम इंदूर, गांधीनगर आणि ग्रेटर नोएडा यांसारख्या भागांमध्ये दिसून येतो. शहरांचा वेगाने होत असलेला विकास, पायाभूत सुविधांवरील ताण आणि नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांवर वाढणारा भार यामुळे अनेक निवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. परिणामी, दीर्घकालीन स्वरूपात सर्वसामान्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
17 Jan 2026 02:20 PM (IST)
दिवाळीच्या सुमारास परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका तरुणाचा खून करून वृद्ध दाम्पत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. आता खुनी दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबुराव उर्फ बाबुशा सावळा पवार (वय ६०, रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या दोन साथीदारांसह वालूर झरी आणि पार्डी येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
17 Jan 2026 02:10 PM (IST)
गरोदरपणात लहानशा आजारासाठीही औषध घेताना मातांच्या मनात शंभर शंका असतात. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पॅरासिटामॉल (Paracetamol/Acetaminophen) या सामान्य औषधावरून जागतिक स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता जगातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सेट’ (The Lancet) ने प्रसिद्ध केलेल्या एका व्यापक संशोधनाने कोट्यवधी मातांना मोठा दिलासा दिला आहे. गरोदरपणात पॅरासिटामॉल घेतल्याने जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझम (Autism) किंवा ADHD सारखे आजार होतात, हा दावा या संशोधनाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
17 Jan 2026 02:05 PM (IST)
वॉशिंग्टन/ तेहरान : गेले काही आठवडे मध्यपूर्वेत अमेरिका (America) आणि इराण (Iran) मध्ये तीव्र तणावाचे वातावरण होते. इराणमध्ये सुरु असलेल्या खामेनी सरकारविरोधी आंदोलनावरुन हा वाद सुरु होता. ट्रम्पने इराणवर हल्ल्याचे संकेत दिले होते. परंतु काही तासांपूर्वी इराणने एक मोठा निर्णय घेतला होता. ज्यामुळे ट्रम्प यांनी आपले सुरु मवाळ करत इराणचे आभार मानले होते. इराणने ८०० लोकांची फाशीची शिक्षा रद्द केली होती. यानिर्णयामुळे आणि ट्रम्पच्या बदलेल्या तेवरमुळे जगभरात चर्चांणा उधाण आले होते.
17 Jan 2026 01:55 PM (IST)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला सुरूवात झाली असून घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहेत. आता प्रेक्षक या सीझनचा पहिला भाऊचा धक्क्याची वाट पाहत होते. आज 17 जानेवारी पहिलाी भाऊचा धक्का पार पडणार आहे. या सीझनमध्ये काही स्पर्धकांनी पहिल्याच आठवड्यात घरात धुमाकूळ घातल्याचं आपण पाहिले. यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय बनली ती म्हणजे तन्वी कोलते. पहिल्या दिवसापासून तन्वी घरात मोठ्यांशी उद्धट बोलताना दिसली, मनासारखं झालं नाहीतर रडत होती. या सगळ्याचा आढावा आज रितेश भाऊ घेणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणा कोणाची शाळा घेणार हे पाहणं म्हत्त्वाचे ठरणार आहे.
17 Jan 2026 01:50 PM (IST)
मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यामध्ये एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. यूपी वॉरियर्सने अखेर १५ जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून WPL २०२६ मध्ये आपले खाते उघडले. आता, त्याच ठिकाणी आणि त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, मेग लॅनिंगच्या यूपीडब्ल्यूला १७ जानेवारी रोजी पुन्हा हरमनप्रीत कौरच्या एमआयशी सामना करताना लीगमधील त्यांचा दुसरा विजय नोंदवण्याची संधी आहे.
17 Jan 2026 01:45 PM (IST)
महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून ‘शत प्रतिशत’च्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून भाजपने देशाच्या आर्थिक राजधानीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘नोटा’ला तब्बल २४ हजार ५४ मतदारांनी पसंती दर्शवली असल्याचे निकालावरून स्पष्ट होते.एवढ्या संख्येने मतदारांनी पसंती दर्शविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे बहुतांश प्रभागात प्रमुख पक्षासह अपक्षांवरही ‘नोटा’च भारी पडल्याचे दिसून आले. प्रभाग क्र. ११ क मध्ये सर्वाधिक १४८७ मतदारांनी नोटाला पसंती दर्शवत मतदान केले, तर १३ ड मध्ये सर्वात कमी १०३ मतदारांनी नोटाला मतदान केले.
17 Jan 2026 01:35 PM (IST)
पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपाच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले. पुणे महानगरपालिकेत १२० हून अधिक जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.
17 Jan 2026 01:30 PM (IST)
जगाला ‘कोविड-१९’ (COVID-19) च्या संकटात ढकलणाऱ्या चीनमधून आता पुन्हा एकदा एका नवीन आरोग्य संकटाची बातमी समोर येत आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात एका हायस्कूलमधील तब्बल १०३ विद्यार्थ्यांना नोरोव्हायरस (Norovirus) या अत्यंत संसर्गजन्य विषाणूची लागण झाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आजारी पडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
17 Jan 2026 01:25 PM (IST)
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही देश आज क्रिकेटच्या मैदानावर एकत्र आले आहे. भारत आणि बांग्लादेश अंडर 19 यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश सामन्याचे नाणेफेक पार पडले. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
17 Jan 2026 01:15 PM (IST)
तेलंगणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने माहेरून परत येण्यास नकार दिला म्हणून पतीने रागाच्या भरात थेट आपल्या सासरच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. सासरच्या मंडळींनी मागील दाराने पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी माथेफिरू पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निजामपेट येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
17 Jan 2026 01:05 PM (IST)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण शाळा, कॉलेज, ऑफीसमध्ये सर्वत्र एआयचा वापर करतो. इतकंच नाही तर काही लोकं घरातील काम करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी देखील एआयची मदत घेतात. स्मार्टफोन, टिव्ही आणि इतर महत्त्वाच्या गॅझेट्सप्रमाणेच आता एआय देखील आपल्या जिवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. केवळ घरी आणि ऑफीसमध्येच नाही तर आता न्यायालयात देखील एआयचा वापर केला जात आहे. यासंबंधित एक आदेश न्यायालयाने जारी केला आहे.
17 Jan 2026 10:47 AM (IST)
भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना आज म्हणजे शनिवार, १७ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित केला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजता टॉससाठी मैदानात उतरतील. हा सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ विश्वचषक २०२६ चा ७ वा सामना पाहू शकता. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग देखील तुम्ही पाहू शकता. भारत विरुद्ध बांगलादेश अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ सामना ७ जिओहोस्टार अॅपवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
17 Jan 2026 10:39 AM (IST)
जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे वडील मोहन लाल मित्तल यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते आणि त्यांच्या १०० व्या वाढदिवसापासून काही महिने दूर होते. त्यांच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी प्रियजनांच्या उपस्थितीतच अखेरचा श्वास घेतला.
17 Jan 2026 10:31 AM (IST)
मागील 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती. पण यावर्षीच्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने बहुमत गाठत मुंबई महापालिका काबीज केली. काल मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या. पण त्याचवेळी ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले. तर मनसेचा केवळ ६ जागांवर विजय झाला. या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
17 Jan 2026 10:23 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक आहेत, या सामन्याचे आयोजन 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या हाती मालिका लागणार आहे. शुभमन गिल हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आहेत.
17 Jan 2026 10:15 AM (IST)
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6c स्मार्टफोन चीनमध्ये एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या सिंगल व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 799 म्हणजेच सुमारे 11 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑर्किड पर्पल आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून Oppo ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी केला जाऊ शकतो.
17 Jan 2026 10:07 AM (IST)
आयपीएल सामने स्टेडियममधून बाहेर नेले जाऊ नयेत म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज ३०० ते ३५० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि ४.५० कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च उचलण्याचीही ऑफर दिली आहे. आरसीबीने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला अधिकृत पत्राद्वारे हा प्रस्ताव दिला आहे. गेल्या वर्षी आरसीबीच्या आयपीएल ट्रॉफी विजेत्या समारंभात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममधील सर्व क्रिकेट क्रियाकलाप थांबवण्यात आले होते.
17 Jan 2026 09:59 AM (IST)
India vs Bangladesh U19 : भारतीय अंडर 19 चा आज दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिला सामना यूएसविरुद्ध डिएलएस पद्धतीने जिंकला होता. तर आता दुसरा सामना हा बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. वैभव सुर्यवंशी पहिल्या सामन्यामध्ये फेल ठरला होता त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर टिकून असणार आहे.
17 Jan 2026 09:55 AM (IST)
नागपूर : अपेक्षेप्रमाणे मनपावर चौथ्यांदा भाजपचा भगवा फडकला. २००७ पासून सलग विजयाचा झेंडा रोवणाऱ्या भाजपने काँग्रेसला पुन्हा एकदा चारीमुंड्या चित केले. भाजपचे विक्रमी जागांचे स्वप्न मात्र भंगले. शहरात एमआयएमची एंट्री तसेच मुस्लिम लीगचे मनपात रिएंट्री लक्षवेधी ठरली. बसपाचा रथ रोखला गेला. काँग्रेस गेल्यावेळच्या तुलनेत ‘किंचित’शी वाढली.
17 Jan 2026 09:50 AM (IST)
तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांपासून गेमिंगच्या नवीन अपडेटची वाट बघत आहात का? मग आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. कारण गेमिंग कंपनी गरेनाने प्लेअर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी OB52 अपडेट अखेर जारी केलं आहे. यासाठी डेवलपरने पॉपुलर जॅपनीज एनीमे सीरीज Jujutsu Kaisen (JJK) सोबत हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ असा आहे की, गेममध्ये पॉपुलर सीरीज संबंधित कॅरेक्टर्स आणि थीम-आइटम मिळणार आहेत, ज्यांचा वापर मॅच दरम्यान केला जाऊ शकतो. कॅरेक्टर्स आणि थीम-आइटम्समुळे तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे.
17 Jan 2026 09:40 AM (IST)
राजस्थान: राजस्थानमधील उदयपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका तरुणीवर फार्महाऊसमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे. तर इतर दोघांचा शोध सुरु आहे.
17 Jan 2026 09:35 AM (IST)
हिंदू धर्मात मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचे केंद्र असलेली ही स्थळे केवळ पूजेसाठीच नाहीत, तर अनेक रहस्येही स्वतःमध्ये दडवून ठेवतात. भारतात सूर्यदेवांना समर्पित अनेक प्राचीन आणि गूढ मंदिरे आहेत. मान्यतेनुसार, नियमितपणे सूर्यदेवांची उपासना केल्यास घरात सुख-शांती नांदते. कलियुगात सूर्यदेव हे प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला दररोज जल अर्पण केल्याने कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात.
17 Jan 2026 09:30 AM (IST)
WPL 2026 Points Table : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये RCB ने गुजरात जायंट्सचा एकतर्फी ३२ धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणखी एकदा त्याच्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले. त्याच्या या कमालीच्या कामगिरीमुळे गुणतालिकेमध्ये पहिले स्थान राखून ठेवण्यात यश मिळाले आहे.
17 Jan 2026 09:25 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 17 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,339 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,144 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,754 रुपये आहे. भारतात 17 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,540 रुपये आहे. भारतात 17 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 291.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,91,900 रुपये आहे.






