पुणे- राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपा (BJP) व शिंदे गटाचे (Shinde group) सरकार अस्तित्वात आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सूडाचे व कुरघोडीचे राजकारण होताना पाहयला मिळत आहे. दरम्यान, आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचे कूरघोडीचे राजकारण यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
आर्थिक मंदीचे भाकित…
कोरोनानंतर देशात सर्व क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. जगातील काही देशात आर्थिक मंदीचे सावट असताना, भारतात देखील आगामी काळात आर्थिक मंदी येऊ शकते, असं भाकित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. देशात सध्या महागाई, बेरोजगारी असे गंभीर प्रश्न आहे. काही दिवसांतच संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहेत. त्यातून सर्वसामान्यांना काय मिळणार? हा सध्याचा सर्वात मोठा मुद्दा असायला हवा. केंद्रीय मंत्र्यानेच जूनपासून देशात आर्थिक मंदी येईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का, अशी भीती लोकांना वाटत आहे, असं सुळे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकत नाहीत
सत्तेत आल्यापासून ईडी सरकार हे प्रशासनात कमी आणि चुकीचेच कामे अधिक करत आहेत. तसेच शिंदे गटातील आमदारांची दादागिरी पाहयला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेली मारहाण दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे आहे. मला वाटत ईडी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मी देशाचा प्रधान सेवक आहे. याचा विसर ईडी सरकारला आहे. त्यामुळे ईडी सरकारकडून केवळ सुडाचे राजकारण करत असल्याची टिका सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
मी बोलणं उचित नाही
वंचितच्या मविआतील समावेशाबद्द महाविकास आघाडीचे प्रमुख नेते भेटतील तेव्हा यावर बोलतील. महाविकास आघाडीसमोर अजून वंचितचा प्रस्तावच आलेला नाही. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सविस्तर बोलले आहेत. त्यामुळे मी काही बोलणे उचित होणार नाही. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावर खूप बोलणं झालंय…
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील खूप बोलले आहेत. त्यामुळे परत काही बोलण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळाच मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर खूप बोलणं झालं आहे, मी काय यावर बोलणार, असं सुळे बोलल्या.