मुंबई- महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. थोर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळं त्यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची (Resigned) मागणी देखील करण्यात आली. मात्र भाजपाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. शेवटी मागील आठवड्यात भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे (Central government) पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नवीन राज्यपाल कोण येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
[read_also content=”शिवसेना-वंचित युतीत नमनालाच खोडा; शरद पवारांबाबत प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत, असं का म्हणाले संजय राऊत? https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-disadvantaged-alliance-why-did-sanjay-raut-say-that-prakash-ambedkar-should-use-his-words-sparingly-regarding-sharad-pawar-364845.html”]
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्यानंतर पुढील राज्यपाल कोण असतील? याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा होत असून, यावर आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन तीन नावे चर्चेत आहेत. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच सुमित्रा महाजन यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहेय, मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावासोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाब काँग्रेसचे काही काळ प्रदेशाध्यक्षही होते. त्यांचे वडील हे पटियाला राजघराण्याचे शेवटचे राजे होते. 1963 ते 1966 या काळात अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करातही आपलं योगदान दिलं आहे. ते 2014 ला काँग्रेसच्या तिकीटावर अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळं त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपाचा मार्ग पत्करला. या दोन नावाव्यतिरिक्त आणखी कोणत्या नावाची भाजपा चाचपणी करतेय का, अशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र जरी या दोन नावाची चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.