ठाणे- ठाण्यात संस्कृती फेस्टिवलचे (Sanskruti festival) आयोजन करण्यात आलं आहे, यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हजेरी लावली. ठाण्यात आता दरवर्षी संस्कृती फेस्टिवलचे आयोजन होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शिंदे व फडणवीस यांची गाडी वेगाने चालू आहे, आमचं सरकार नसतं.. तर गोविंदा, गणपती उत्सव साजरा झाला नसता. सरकार आलं म्हणून असे कार्यक्रम, उत्सव साजरे होतं आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
[read_also content=”पंकजा मुंडे यांच्या बीडच्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, ‘या’ कारणासाठी पाठवली नोटीस… https://www.navarashtra.com/maharashtra/financial-offenses-branch-notice-to-vaidyanath-bank-of-beed-belonging-to-pankaja-munde-for-this-reason-364806.html”]
दरम्यान, राजस्थानमध्ये मला भरभरून प्रेम मिळालं.. पण ठाण्यातला कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे..पुढच्या काही काळात बदलेलं ठाणे दिसेल.. टप्याटप्याने सर्व काम पूर्ण होतील.. भारतातुन लोकं ठाणे बगायला येतील..असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर आम्ही गुवाहटीला गेलेलो तेव्हा मला काय विकास कराल विचारलं होतं… आता मला भरभरून निधी दिला मिळालं, अंस आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
सर्वात जास्त निधी मिळाल्यांच प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गुवाहटीत असताना सगळ्यावर त्यांच्यावर सह्या करत होतो. अडीच वर्षे सर्व काही बंद होते, आमचं सरकार आलं नसत तर सगळं बंद असत, कारण चायनामध्ये कोरोना आला आहे. तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत, जेवढी कामे गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत. मला वाटते इतर मतदारसंघात कुठे तेवढे झालेले नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.