नवी दिल्ली– देशात २०२४ साली लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत, त्यामुळं देशात यावेळी कोणाचे सरकार (Government) येईल याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर काहीनी याचा सर्वे केला असून याची माहिती समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल की यूपीएच्या बाजूने काही उलथापालथ होईल. सर्वेक्षणात जे समोर आले आहे, त्यानुसार पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार (Modi government) येणार असले तरी त्यांना जागांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याचाच अर्थ त्यांच्या जागा कमी होणारेय. दुसरीकडे भारत जोडो यात्रेत काँग्रेसला फायदा होईल, पण तरीही ते दोन आकड्यांपुरतेच मर्यादित असल्याचे दिसते. म्हणजे १५३ चा आकडा पार करु शकणार नाहीत, असं सर्वे सांगत आहे.
[read_also content=”अभिनेते अन्नू कपूर यांना दिल्लीत रूग्णालयात दाखल; छातीत दुखू लागल्यानं उपचार सुरु, डॉक्टर म्हणाले… https://www.navarashtra.com/india/actor-annu-kapoor-hospitalized-in-delhi-treatment-started-due-to-chest-pain-doctor-said-364754.html”]
दरम्यान, सर्वेक्षणात अशी काही राज्ये असली तरी, जिथे भाजपला गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी फायदा होत आहे, तर काही राज्यांमध्ये खूप नुकसान होणार आहे. म्हणजेच या राज्यात त्यांच्या कमी जागा निवडूण येतील. देशाच्या मूडच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. आज तक या वृत्तवाहिनीच्या या सर्वेक्षणात जे समोर आले आहे त्यानुसार आज निवडणुका झाल्या तर एनडीएला २९८ जागा मिळू शकतात. म्हणजे जवळपास तीनशेचा आकडा पार करु शकतात, असं सर्वेक्षणात समोर आले आहे.
कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील?
२०२४ मध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर २९८ जागा एनडीएच्या खात्यात जाताना दिसत आहेत. दुसरीकडे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी युपीएला फायदा होताना दिसत असला तरी बहुमतापासून ते अजूनही कोसो दूर आहे. यूपीएच्या खात्यात १५३ जागा जात आहेत, तर इतरांना ९२ जागा मिळू शकतात. म्हणजेच पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करताना दिसत आहे.
मतदानाची टक्केवारी कोणत्या पक्षाला किती
मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर यावेळी एनडीएला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. सर्वेक्षणानुसार, आज निवडणूक झाल्यास ४३ टक्के मते मिळतील, जी मागील वेळेपेक्षा खूपच कमी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ६० टक्के मते मिळाली होती. आणि यावेळी यूपीएला २९ टक्के आणि इतरांना २८ टक्के मते मिळू शकतात.
कोणत्या पक्षाला किती जागा?
जर आज निवडणुका झाल्या तर भाजपला ५४३ पैकी २८४ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे, जरी ती २०१९ च्या तुलनेत खूपच कमी आहे. २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, आज निवडणूक झाल्यास काँग्रेसला ६८ जागा मिळू शकतात, तर इतरांना १९१ जागा मिळू शकतात.