जालना– मागील काही दिवसांपासून राज्यात थोर पुरुषांबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. दरम्यान, मागील महिन्यात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती औरंगजेब हा क्रुर नव्हता असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले होते. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने (BJP) जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, याचे पडसाद पुन्हा राज्यात उमटण्याची शक्यता आहे.
…तर 10 लाखांचे बक्षीस देऊ
दरम्यान, आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आव्हाड यांच्या या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर व प्रक्षोफक आवाहन केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी आपण ते विधान कोणत्या संदर्भाने केलं हे स्पष्ट करूनही त्यांच्याविरोधात टीका होताना दिसत आहे. तसेच आव्हाडांविरोधात मोर्चे व आंदोलन काढण्यात येत आहेत.
आव्हाड यांचा खुलासा
आपल्या विधानाचे पडसाद उमटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली आहे. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण, अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिलशाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं आव्हाड म्हणाले. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली असून जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे.






