Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात
09 Jun 2026 10:15 AM (IST)
एका मिडीया रिपोर्टनुसार, चारू पांडे यांनी SSC CGL, SSC CPO, SSC CHSL, SSC MTS, SSC GD, IBPS Clerk, IBPS PO, SBI Clerk आणि SBI PO यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. एकूण मिळून त्यांनी सरकारी परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. इतक्या लहान वयात एवढ्या परीक्षा उत्तीर्ण करणे ही एक मोठी गोष्ट आहे.
09 Jun 2026 10:05 AM (IST)
Rajuri Girl Commercial Poilt News : प्रबळ जिद्द, चिकाटी आणि मोठे स्वप्न पाहण्याची धमक असेल तर कोणतेही ध्येय साध्य करणे अशक्य नसते. याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील राजुरी येथी सिद्धी अनंत हाडवळे, जिने अवघ्या २० व्या वर्षी अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले. अमेरिकेच्या फ्लोरिडातून प्रतिष्ठित वैमानिक संस्थेतून अंतिम पायलट परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिच्या या यशामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्याची मान उंचावली आहे.
09 Jun 2026 10:00 AM (IST)
Patna Khan Sir Case Update बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रसिद्ध कोचिंग संचालक फैसल खान उर्फ 'खान सर' (Khan Sir) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पाटण्यातील कदमकुआं पोलीस ठाण्यात खान सरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी खान सरांच्या सुरक्षारक्षकांनी (गार्ड्स) पोलिसांना दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. "खान सरांनीच आम्हाला गोळीबार करण्यास सांगितले होते आणि बाकीचे सर्व मी सांभाळून घेईन असे म्हटले होते," असा दावा रक्षकांनी पोलिसांसमोर केला आहे. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी खान सरांना मुख्य आरोपी करत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
09 Jun 2026 09:55 AM (IST)
बायको सोडून जावयाला सासूच जास्त आवडली आणि त्याने थेट कोर्टात जाऊन सासूसोबतच लग्नगाठ बांधली. दावा केला जात आहे की, व्यक्तीचे त्याच्या सासूच्या साैंदर्यावर प्रेम जडले होते. हे एकतर्फी प्रेम नसून सासूलाही जावई आवडू लागला होता अशात नात्यांची चाैकट भेदून दोघांनी या नात्याला नवे नाव दिले. दोघांच्या विवाहासंबंधित व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला असून ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे.
09 Jun 2026 09:50 AM (IST)
गेमिंगच्या रिलीजबाबत गेमर्समध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. मात्र आता गेमर्ससाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही गेमर्स रिलीजनंतर GTA 6 खेळू शकणार नाहीत. कारण रॉकस्टार गेम्स सध्या या गेमला केवळ नवीन जनरेशनच्या गेमिंग कंसोल्सवर रिलीज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जुन्या कंसोल किंवा पीसीचा वापर करणाऱ्या लाखो प्लेअर्सना सुरुवातीला GTA 6 खेळण्याचा अनुभव मिळणार नाही.
09 Jun 2026 09:45 AM (IST)
भारतात 9 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,168 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,904 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,376 रुपये आहे. भारतात 9 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,51,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,760 रुपये आहे. भारतात 9 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.
09 Jun 2026 09:45 AM (IST)
Nepal Bans Indian Mangoes Fruit भारताकडून शेजारील देशांशी संबंध सुधारण्यासाठी आणि ते दृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे नेपाळ मात्र इतर काही देशांच्या प्रभावाखाली येऊन भारताविरोधी भूमिका घेत असल्याचे चित्र गेल्या काही काळापासून दिसत आहे. यामुळेच दोन्ही देशांमधील पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये पूर्वीसारखा गोडवा राहिलेला नाही. अशातच, भारताला एक मोठा आर्थिक दणका देत नेपाळ सरकारने भारतीय आंब्यांसह इतर काही फळांच्या आयातीवर थेट बंदी घातली आहे.
09 Jun 2026 09:40 AM (IST)
Pune Water Crisis Cut Update: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच काळजीची बातमी समोर आली आहे. पुणे शहराची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे आता संपूर्ण शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. आगामी सोमवारपासून संपूर्ण पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मोठा निर्णय पुणे महापालिका (PMC) प्रशासनाने घेतला आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे ही घोषणा केली आहे.
यंदाच्या मोसमात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरातील पाणीसाठा झपाट्याने खाली गेला आहे. उन्हाळ्याची तीव्रता आणि वाढते बाष्पीभवन यामुळे उपलब्ध साठा वेगाने कमी होत आहे. भविष्यातील पाण्याची भीषण टंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन (Water Management) करण्यासाठी महापालिकेला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
09 Jun 2026 09:35 AM (IST)
Dahi Mirchi Recipe: जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी कोणताही विकतचा पदार्थ खाण्याऐवजी झटपट तुम्ही खमंग चटपटीत दही मिरची बनवू शकता. दह्याचा आंबटपणा आणि तिखट मिरची चवीला अतिशय भारी लागते. रोजच्या साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी दही मिरची हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारा पदार्थ डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. वाचा सविस्तर-
09 Jun 2026 09:30 AM (IST)
Pune Bhide Bridge Closed Metro Work: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील मध्यवस्तीला जोडणारा, सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा डेक्कन येथील बाबा भिडे पूल (Bhide Bridge) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयानुसार, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. याच मेट्रोच्या सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा एक भाग म्हणून सुरक्षेचा उपाय आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी प्रशासनाकडून भिडे पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील ३ महिने म्हणजेच साधारणपणे ऑगस्ट महिन्या अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीस बंद राहील.
09 Jun 2026 09:25 AM (IST)
Ujjwala Yojana LPG Price Hike: आधीच वाढत्या महागाईमुळे होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रामुख्याने गरीब कुटुंबांना सरकारने आणखी एक मोठा आर्थिक धक्का दिला आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) सबसिडीबाबत एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे 'पंतप्रधान उज्ज्वला योजने'च्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
नव्या निर्णयानुसार, सरकारने उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीवाल्या (अनुदानित) सिलिंडरच्या संख्येमध्ये प्रचंड कपात केली आहे. पूर्वी या योजनेतील ग्राहकांना वर्षभरात एकूण ९ गॅस सिलिंडरवर सरकारकडून सबसिडी दिली जात होती. मात्र, आता ही संख्या निम्म्याहून अधिक घटवण्यात आली असून, लाभार्थ्यांना वर्षाला फक्त चारच सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त लागणाऱ्या सिलिंडरसाठी ग्राहकांना बाजारातील पूर्ण किंमत मोजावी लागेल.
09 Jun 2026 09:20 AM (IST)
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसेचा प्रचंड मोठा भडका उडाला आहे. पीओकेमधील सर्वात मोठी नागरी संघटना 'जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी'वर पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पुकारण्यात आलेल्या 'पीओके बंद' दरम्यान रावलकोट येथे आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
09 Jun 2026 09:16 AM (IST)
Chhatrapati Sambhajinagar Crime: चुलत भावाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत चालली आहे, मात्र त्या तुलनेत आपले कुटुंब मागेच राहत आहे, या अत्यंत टोकाच्या मत्सरातून आणि रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेले आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सिडको पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी कौशल्याने तपास करत या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला असून, चुलत भावाचा खून करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
09 Jun 2026 09:10 AM (IST)
देशभरात राजकीय घडामोडीना आता वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाटिपण्या, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. राजधानी दिल्लीत आज पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत चांगलीच आगपाखड केली आहे. देशाचे नेते राहुल गांधींवर टीका करण्याची तुमची पात्रता नसल्याचे बोलत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
09 Jun 2026 09:00 AM (IST)
नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
09 Jun 2026 08:50 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची शक्यता फेटाळली. दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले.
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच थोड्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने वेग पकडला आहे. 4 जूनला केरळमध्ये दाखल झाल्यापासून मान्सून १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून उत्तर बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे केरळ, तामिळनाडू आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे.
पुढील तीन दिवसांत वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, तसेच उर्वरित ईशान्येकडील राज्ये आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांपर्यंत पाऊस पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 11 जूनपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह वायव्य भारताच्या काही भागांमध्ये आणि बिहारसह पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
सध्या, उत्तर भारतातील तापमान पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसामसह सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचला आहे.






