Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 22.09.2026
महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या काळात उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने (IMD) मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जपानमधील एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारताने नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत पदकांची संख्या वाढवली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग विस्कळीत झाले असून, अमेरिकेने मध्यपूर्वेतील काही सागरी व हवाई मार्गांवर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत.आंतरराष्ट्रीय तणाव आणि जागतिक महागाईच्या चिंतेमुळे आशियाई आणि भारतीय शेअर बाजारात (सेन्सेक्स व निफ्टी) आज सावध व्यवहार सुरू आहे
22 Sep 2026 09:40 AM (IST)
India Share Market Update: २२ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निफ्टी गॅप-अप ओपनिंगचे संकेत देत आहे. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी असू शकते. सोमवारी प्रमुख निर्देशांक वधारले, सेन्सेक्स ५६४ अंकांनी वधारला आणि निफ्टीने सलग चौथ्या सत्रात तेजी कायम ठेवली.
22 Sep 2026 09:30 AM (IST)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसाचा उन्हाचा फटका बसत आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. असे असताना आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
22 Sep 2026 09:20 AM (IST)
Tapovan School Controversy: शालेय विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध घालण्याच्या आणि शिस्तीच्या नावाखाली अवाजवी नियम लादण्याच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये नवा वाद पेटला आहे. जेवणाच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याकडून तब्बल ५० रुपये दंड वसूल केल्याची घटना समोर आल्यानंतर, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाईंदर येथील तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शाळेत डब्यामध्ये मेथीची भाजी आणल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे
22 Sep 2026 09:15 AM (IST)
Maharashtra Drought Kharif Crop Damage: राज्यातील अनेक भागांत पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती गंभीर बनली असून सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग आणि बाजरी यांसारखी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसाअभावी मुख्य खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला असून शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाड्यासह विविध बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली आहे






