Maharashtra Breaking News Updates Today
08 Jun 2026 09:55 AM (IST)
सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुण्यानेच आपल्या भाऊजींची सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत व्यक्तीची अपघात म्हणून नोंद झाली होती. मात्र पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
08 Jun 2026 09:45 AM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय परिस्थिती आता अत्यंत भयानक आणि स्फोटक वळणावर येऊन पोहोचली आहे. रविवारी रात्री उशिरा इराण आणि लेबनॉनमधील कट्टरपंथी संघटना हिजबुल्लाहने मिळून इस्रायलच्या भूमीवर एक मोठा आणि भीषण संयुक्त लष्करी हल्ला केला. या अचानक आणि पूर्वनियोजित हल्ल्यामुळे संपूर्ण इस्रायल हादरून गेला असून देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये युद्धाचे धोक्याचे सायरन (Air Raid Sirens) वाजू लागले आहेत. इस्रायली हवाई संरक्षण यंत्रणा (Iron Dome आणि Arrow System) या हल्ल्यानंतर तातडीने सक्रिय करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने देशातील लाखो नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि तातडीने भूमिगत बंकर्समध्ये आश्रय घेण्याचे कडक आदेश दिले आहेत. हा हल्ला केवळ दोन देशांमधील संघर्ष नसून एका मोठ्या जागतिक महायुद्धाची नांदी ठरू शकते, अशी भीती आता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
08 Jun 2026 09:35 AM (IST)
भारतात 8 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,272 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,999 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,454 रुपये आहे. भारतात 8 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,720 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,540 रुपये आहे. भारतात 8 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 264.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,64,900 रुपये आहे.
08 Jun 2026 09:25 AM (IST)
Chhagan Bhujbal Rajya Sabha: महाराष्ट्रात आगामी विधान परिषद निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election 2026) राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीचे मोठे नाट्य समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री
08 Jun 2026 09:20 AM (IST)
US Considers Buying Chagos Islands: हिंद महासागरातील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चागोस बेटांच्या (Chagos Islands) मालकीवरून आता अमेरिका आणि ब्रिटन (UK) या दोन बड्या मित्रराष्ट्रांमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. ब्रिटनला बाजूला सारून व्हाईट हाऊस (White House) थेट मॉरिशसकडून ही बेटे खरेदी करण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहे, असा खळबळजनक खुलासा 'द टेलिग्राफ' (The Telegraph) च्या एका वृत्तात करण्यात आला आहे.
08 Jun 2026 09:15 AM (IST)
केईएम रुग्णालयातील अवघ्या दोन दिवसांच्या नवजात बालकासाठी ओ निगेटिव्ह पीसीव्ही आणि एफएफपी रक्तघटकांची तातडीची गरज निर्माण झाल्यानंतर रक्तपेढ्या, डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या व्हॉट्सअॅप गटांवर मदतीचे संदेश फिरू लागले.या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरात दुर्मीळ रक्तगटासाठी अजूनही सोशल मीडियाच्या आवाहनांवर अवलंबून राहावे लागते का, असा प्रश्न उपस्थित झाला या पार्श्वभूमीवर रक्तसुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील यंत्रणेची क्षमता पुन्हा चर्चेत आली आहे.
08 Jun 2026 09:10 AM (IST)
Israel Airstrike Iran News in Marathi : पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. रविवारी (०७ जून) रात्री इराणने इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही सोमवारी (०८ जून) सकाळी इराणची राजधानी तेहरानसह चार शहरांवर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतरही दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने रविवारी (०७ जून) उशिरा इस्रायवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात फोनवर संवाद झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी इस्रायलने पलटवार न करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जात आहे.
Iran attack Israel ballistic missiles 2026 : मध्य पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय परिस्थिती आता अत्यंत भयानक आणि स्फोटक वळणावर येऊन पोहोचली आहे. रविवारी रात्री उशिरा इराण आणि लेबनॉनमधील कट्टरपंथी संघटना हिजबुल्लाहने मिळून इस्रायलच्या भूमीवर एक मोठा आणि भीषण संयुक्त लष्करी हल्ला केला. या अचानक आणि पूर्वनियोजित हल्ल्यामुळे संपूर्ण इस्रायल हादरून गेला असून देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये युद्धाचे धोक्याचे सायरन (Air Raid Sirens) वाजू लागले आहेत.






