Marathi-Drama – Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War
‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?
मराठी अभिनेत्रींबद्दल काय म्हणाल्या प्राजक्ता कुलकर्णी
प्राजक्ता कुलकर्णींनी शिल्पा शेट्टीचं केलं भरभरून कौतुक
शिल्पा शेट्टीसोबतचा सांगितला ‘तो’ प्रसंग
मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी मराठीसह गाजलेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता कुलकर्णी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या सासूबाईंची भूमिका साकारत आहेत. अभिनयासोबतच त्यांनी ९० च्या दशकात अनेक बॉलीवूड कलाकारांसोबतही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबरचे अनुभव सांगत शिल्पा शेट्टीचं भरभरून कौतुक केलं.
‘अभिजात मराठी फिल्मी’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाल्या, आग या चित्रपटाच्या शूटिंग वेळी शिल्पा शेट्टी आणि मी फावल्या वेळात कादर खान यांच्याकडून उर्दू शिकायचो. शिल्पाचा स्वभाव खूप गोड आहे. तिला मराठी समजतं आणि बोलायलाही आवडतं.”
याच सोबतच प्राजक्ता यांनी मराठी आणि हिंदी अभिनेत्रींसोबत आलेला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “खरं सांगायचं तर, इंडस्ट्रीत काम करताना मला काही मराठी अभिनेत्रींकडून वाईट अनुभव आले. काही कलाकार असे आहेत, ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून काम केलं आहे. पण समोर आल्यावर ते ओळखही दाखवत नाहीत. मी ओळखतच नाही अशा झोनमध्ये ते असतात. पण, शिल्पाने असं केलं नाही.” त्यांचा हिंदी अभिनेत्रींबरोबरचा अनुभव खूप चांगला राहिला असही त्यांनी सांगितले.
Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं
पुढे प्राजक्ता म्हणाल्या, प्राजक्ता म्हणाल्या, “मध्यंतरी एका शूटिंगदरम्यान शिल्पा व्हॅनिटीमध्ये होती आणि मी मेकअप रूममध्ये होते. मला समजलं की तिचं शूटिंग सुरू आहे, म्हणून मी तिला भेटायला गेले. अनेक वर्षांनी आमची भेट झाली होती. मला पाहताच तिने मला मिठी मारली. आमची भेट खूप छान झाली.”
Prahaar Teaser Out: राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ; 1 मिनिट 54 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता
याच मुलाखतीत प्राजक्ता कुलकर्णी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवांची तुलना करताना सांगितलं की, काही मराठी कलाकार समोर आल्यावरही ओळख दाखवत नाहीत. मात्र, हिंदी कलाकारांकडून त्यांना कायमच चांगला अनुभव आला.
Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज
मराठी चित्रपटसृष्टीत गीत-संगीताला नेहमीच विशेष स्थान राहिलं आहे. प्रेक्षकांना भावणाऱ्या कथेसोबतच श्रवणीय गाणीही चित्रपटाची लोकप्रियता वाढवतात. आता आगामी मराठी चित्रपट ‘लाईव्ह’मध्येही अशाच दमदार संगीताची जोड पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील एका खास गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. लावणीचा पारंपरिक ठसका आणि आधुनिक अंदाज यांचा संगम असलेलं हे आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे गाणं नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
‘लागला ठसका ४४०चा झटका…’ असे बोल असलेल्या या गाण्याचे गीतलेखन अश्पाक एफएच शेख यांनी केले आहे. गायिका खुशबू जैन यांनी हे गाणं स्वरबद्ध केलं असून संगीतकार अमन श्लोक यांनी संगीत दिलं आहे. गोरेगाव येथील फीचर स्टुडिओमध्ये या गाण्याचं चित्रीकरण पार पडलं.
‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती सुमित पांडे करत असून रिद्धी बिद्दी व्हिजन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. छबी असीम हल्दर हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत, तर संजीव राय यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
Guru Randhawa Gym Firing Case: गोळीबार करणारे बिश्नोई गँगचे आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी; दोघेही पोलिसांच्या ताब्यात
दिग्दर्शक संजीव राय यांच्या मते, हे गाणं केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चित्रपटात टाकण्यात आलेलं नाही. कथेच्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी आणि एका महत्त्वाच्या वळणावर हे गाणं येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Samantha Ruth Prabhu Pregnancy: गुड न्यूज! समंथा रुथ प्रभूच्या घरी येणार नवा पाहुणा; अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी
‘लाईव्ह’मध्ये समाजातील वास्तव आणि नायिकेच्या संघर्षाची कथा मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, हितेन तेजवानी यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.गौतमी पाटीलच्या खास अंदाजामुळे ‘लाईव्ह’मधील हे गाणं चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेचा विषय ठरलं आहे.
कानावर पडताच पाय थिरकतील! ‘भूतम भयम’च्या ‘गोमु सासरला जाते’ ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम’ प्रदर्शित होण्याआधीच त्यातील ‘गोमु सासरला जाते’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हळदी समारंभाचा जल्लोष, उत्साहाने भरलेली नृत्यरचना आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
लग्नसोहळ्यातील धमाल, मित्रमंडळींची मस्ती आणि एका सुंदर तरुणीभोवती रंगणारी गंमतीशीर चुरस अशा विविध रंगांनी सजलेले हे गाणे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पारंपरिक लग्नसोहळ्याचा माहोल आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो.
गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजाने गाण्याला विशेष ऊर्जा मिळाली आहे. समीर सप्तीस्कर यांचे संगीत आणि अभिषेक खणकर यांचे खुसखुशीत बोल यामुळे गाण्याची रंगत अधिकच वाढली आहे. तर पवन आणि बॉब यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे प्रत्येक फ्रेममध्ये उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळतो.
Dipika Kakar : कॅन्सरशी लढा देणाऱ्या अभिनेत्रीची, पतीसाठी खास पोस्ट! म्हणाली ‘माझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये…’
संगीत दिग्दर्शक समीर सप्तीस्कर यांनी सांगितले की, हळदी समारंभातील आनंद आणि बेधुंद नृत्य डोळ्यांसमोर ठेवून हे गाणे तयार करण्यात आले. पारंपरिक ढंगाला आधुनिक संगीताची जोड दिल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हे गाणे आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूलशेजारी आराम ते गल्ली क्रिकेट! युवराज, अभिषेक आणि नमनची गोवा ट्रिप ठरली चर्चेचा विषय
लेखक-दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांच्या मते, प्रेक्षकांना काही मिनिटांचा निव्वळ आनंद देण्याच्या उद्देशाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. लग्न, हळद किंवा कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये हे गाणे वाजताच लोकांनी मनमोकळेपणाने नाचावे आणि त्या क्षणाचा आनंद घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रेक्षकांच्या लाडक्या ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’, लग्नसोहळ्यातील हळवी प्रेमकथा ठरतेय चर्चेचा विषय
मराठी संगीतविश्वात सध्या अल्बम गाण्यांची आणि त्यातील कलाकारांची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संगीत रसिकांसाठी एक नवीन गाणं भेटीला आलं आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संदेश विठ्ठल गाडेकर, सुरेश विठ्ठल गाडेकर निर्मित ‘चंद्राची कोर’ हे नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा या गाण्यातून मांडण्यात आली आहे. प्रेम, भावना आणि नात्यांची हळुवार गुंफण असलेल्या या गाण्याला आजच्या तरुणाईला आकर्षित करणारा आधुनिक संगीताचा साज देण्यात आला आहे. गाण्यातील दमदार ठेका, सुंदर व्हिज्युअल्स आणि कलाकारांचा डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या गाण्यात अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री सृष्टी आंबवले यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हे या गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे.
Priyadarshini Chatterjee Engaged: समुद्रकिनाऱ्यावर गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; प्रियदर्शिनीने दिली प्रेमाची कबुली
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय भाटे यांनी ‘चंद्राची कोर’ला संगीत दिलं असून, गायिका सोनाली सोनावणे आणि गायक रवींद्र खोमणे यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. तर गीतकार करण सावंत यांनी लिहिलेले शब्द गाण्याच्या भावनांना अधिक सुंदर बनवतात.
Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल
गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी मानसी आणि दीपक या जोडीने सांभाळली आहे. आधुनिक सादरीकरण, आकर्षक लोकेशन्स आणि भावनिक कथानक यामुळे ‘चंद्राची कोर’ हे गाणं सोशल मीडिया ट्रेंडमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिग्दर्शक जोडी मानसी आणि दीपक यांनी सांगितलं की, या गाण्यात फक्त डान्स नसून एक सुंदर भावनिक कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि फ्रेश अनुभवायला मिळावा यासाठी टीमने मेहनत घेतली आहे.
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक.येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि सनातन परंपरेचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता
कलात्मक सादरीकरण
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा भारतीय सांस्कृतिक अस्मिता, अखंड श्रद्धा आणि अध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा उपक्रम आहे. या पर्वाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील विविध भावविश्व, भक्तीपरंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात येणार आहे.
विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार
या कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे व कलाकार समूह यांचे विशेष अध्यात्मिक सादरीकरण होणार असून, त्यांच्या अभिव्यक्तीतून भक्ती, संस्कृती आणि भारतीय परंपरेचे विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम अध्यात्म आणि कलेचा सुंदर संगम ठरणार आहे. या माध्यमातून उपस्थितांना सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. कला रसिक, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
अंशुला कपूरच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कपूर बहिणींचा जलवा; जान्हवी-खुशी नव्हेतर ‘या’ अभिनेत्रीने वेधलं सगळ्यांचं लक्ष
ऑफिसमधलं प्रेम टिकतं का? लक्षवेधी केमिस्ट्री आणि अनोखी प्रेमकथा; ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ओटीटी विश्वात प्रेमकथांचा वेगळा ट्रेंड पाहायला मिळत असताना ZEE5 मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी आणि वास्तवाशी जवळीक साधणारी प्रेमकथा घेऊन येत आहे. ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या ओरिजिनल वेब सीरिजची घोषणा करण्यात आली असून, ही मालिका प्रेम, करिअर, महत्त्वाकांक्षा आणि आत्मसन्मान यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध घेणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय प्रमुख भूमिकेत झळकणार असून या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही केवळ एक प्रेमकथा नसून आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यातील वास्तव मांडणारी सीरिज असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांच्या मते, ही कथा प्रेम, महत्त्वाकांक्षा, कामाच्या ठिकाणच्या मर्यादा आणि वैयक्तिक मूल्ये यांमधील संघर्ष अधोरेखित करते. आधुनिक व्यावसायिक जगात प्रेम आणि करिअर यांचा समतोल साधताना अनेक तरुणांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याचं वास्तववादी चित्रण या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सीरिजचे दिग्दर्शक गौरव पत्की यांनीही या कथेचा वेगळेपणा स्पष्ट केला. त्यांच्या मते, प्रेमाला सीमा नसतात असं म्हटलं जात असलं तरी अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्यात प्रेम आणि करिअर यांचा समतोल राखणं सोपं नाही. वेगवान कार्यसंस्कृती, शहरी जीवनातील ताणतणाव आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत यांमधून मार्ग काढणाऱ्या तरुण जोडप्याची ही भावनिक कथा आहे. प्रेमाच्या विविध छटा आणि त्यातील अपूर्णतेतील सौंदर्य या मालिकेतून उलगडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन म्हणाला की, ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही पारंपरिक प्रेमकथा नसून आयुष्यातील दडपण आणि जबाबदाऱ्यांमध्ये उमलणाऱ्या प्रेमाची गोष्ट आहे. ऋषी ही व्यक्तिरेखा साकारताना व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक भावना यांमधील संघर्ष जवळून अनुभवता आला. त्यामुळे ही कथा आजच्या प्रेक्षकांना अधिक वास्तववादी आणि जवळची वाटेल, असा त्याचा विश्वास आहे.
Marathi Boy Viral Video: ‘इंडियाज गॉट लेटंट 2’मध्ये छाप पाडणारा हा मराठी मुलगा कोण? आलिया भट्टही झाली फॅन, समय रैना झाला निःशब्द
तर अभिनेत्री जान्हवी उदयच्या मते, अनन्याचा प्रवास अनेक तरुण व्यावसायिकांना स्वतःचा वाटू शकतो. करिअर, महत्त्वाकांक्षा, भावना आणि वैयक्तिक मर्यादा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी ही कथा प्रेरणादायी ठरू शकते. अनेक अडचणींचा सामना करत असतानाही दोन व्यक्ती एकमेकांसोबत कशा विकसित होतात आणि नातं कसं अधिक मजबूत होतं, हे या मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.
रणबीर-आलियाच्या ‘Love and War’च्या सेटवर दुर्दैवी अपघात; 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू, भन्साळी प्रोडक्शनने घेतला मोठा निर्णय
Amruta Khanvilkar : नाटकाने सुवर्ण अंक गाठला अन् अभिनेत्रीने नाटक सोडलं! अमृताच्या जागी ‘या’ नव्या चेहऱ्याला मिळणार संधी
या नाटकात अमृताच्या जागी एक नवीन चेहरा घेण्यात आला आहे.
ती पूर्णपणे या नाटकातून तुटली जाणार नाहीये.
… तिने तिच्या अभिनयाचा डंका गाजवला आहे.
मयसभा प्रस्तुत नाटक ‘लग्नपंचमी’ ने 100 प्रयोग पूर्ण करून एक सुवर्ण अंक गाठला आहे. मुळात, जानेवारी 2026 मध्ये हे नाटक पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. अमृता खानविलकर या नाटकात मुख्य पात्र साकारत होती. दरम्यान, अमृताने या नाटकातून Exit घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे, अमृताच्या चाहत्यांना पुढे ‘लग्नपंचमी’ या नाटकात अमृताला पाहता येणार नाही. परंतु, या नाटकात अमृताच्या जागी एक नवीन चेहरा घेण्यात आला आहे.
Maa Hai Na: शिल्पा शेट्टी आणि सेलिब्रिटी आईंसह करत आहेत धमाल, हिंदी ZEE5 वरील ‘माँ है ना’ पाहण्याची ५ कारणे
मालिका क्षेत्रातील ‘हा’ चेहरा झळकणार ‘लग्नपंचमी’ या नाटकात!
मालिका क्षेत्रात प्रसिद्ध असणारा चेहरा, अभिनेत्री विदुला चौगुले आता अमृताच्या जागी दिसणार आहे. अमृताने आजवर साकारलेल्या पात्राला विदुला न्याय देऊ शकेल का? असा प्रश्न अमृताच्या चाहत्यांना नक्कीच पडला आहे. परंतु, विदुलाला या मंचावर पाहण्यासाठी प्रेक्षकमंडळी आतुरली आहे, हेही तितकेच खरे! विदुला ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून लोकप्रिय झाली. पुढे ती विविध सिनेमांमध्ये झळकली. परंतु, नुकताच जगासमोर आलेला सिनेमा ‘सुपर डुपर’ मध्ये विदुला सिनेमाच्या मुख्य भूमिकेत झळकली होती, तसेच ती या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरची सहकलाकार होती.
अमृताची पूर्णपणे Exit नाही!
अमृता खानविलकर जरी ‘लग्नपंचमी’ या नाटकातून Exit घेत आहे. तरी ती पूर्णपणे या नाटकातून तुटली जाणार नाहीये. याचे कारण गेल्या 100 पेक्षा जास्त प्रयोगांमध्ये, अमृताने मुख्य अभिनेत्रीची धुरा सांभाळली. याचबरोबर ती ‘लग्नपंचमी’ या मालिकेची निर्माती आहे. त्यामुळे, निर्माती म्हणून ती नेहमीच ‘लग्नपंचमी’ या नाटकाशी जोडली असणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना अमृता सांगते की, “‘लग्नपंचमी’ या नाटकामुळे नाटकात काम करण्याचे माझे स्वप्न अखेर पूर्ण झाले. रंगभूमीने मला प्रेम, समाधान… अगदी सगळं काही दिलं. अशात माझ्या सहकालाकरांसह काम करण्याचा अनुभवही काही ओरच होता. मी प्रेक्षकांची कायम ऋणी राहील.”
Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आता बाबा होणार! डोहाळे पुरवा… सुरजच्या पत्नीचे पार पडले डोहाळे जेवण
‘या’ कारणामुळे घेतली Exit!
अमृता खानविलकर फक्त मराठी सिनेक्षेत्रात झळकली नसून हिंदी सिनेक्षेत्रातही तिने तिच्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. अमृता आता ‘चिरंजीवी हनुमान’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. एकावेळी नाटक आणि सिनेमा दोन्ही हाताळणे शक्य नसल्यामुळे तिने ‘लग्नपंचमी’ या नाटकातून माघार घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ‘श्री रामभूमी’ या चित्रपटातही झळकणार आहे.
इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष रंगमंचावर, ‘पाण्याने पेटला वणवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चवदार तळे सत्याग्रहाचा संघर्ष उलगडणार
आजच्या काळात पाणी ही सहज उपलब्ध गोष्ट असली, तरी इतिहासात असा काळ होता जेव्हा जन्माच्या आधारावर लाखो लोकांना सार्वजनिक पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नाकारला जात होता. या अन्यायाविरुद्ध 20 मार्च 1927 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक न्यायाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा, समानता आणि स्वाभिमानासाठी पेटलेला संघर्ष होता.
या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 23 जून रोजी रात्री 8 वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्यमंदिरात होणार आहे.
नाटकाचे लेखक राजकुमार बडोले यांनी सांगितले की, “इतिहास केवळ स्मरणात ठेवण्यासाठी नसतो, तर त्यातून वर्तमानाला दिशा मिळावी यासाठी असतो. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा विचार आणि त्यामागील सामाजिक जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या नाटकामागचा मुख्य उद्देश आहे.”
दिग्दर्शक प्रशांत निगडे म्हणाले, “चवदार तळे सत्याग्रह हा केवळ ऐतिहासिक प्रसंग नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. या नाटकातून त्या संघर्षाची तीव्रता आणि त्याचा आजच्या समाजाशी असलेला संबंध प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
Ek Hota Malin : मातीखाली गाडली गेलेली स्वप्न! ‘एक होतं माळीण’, सत्य घटनेवर आधारित Marathi Disaster Movie
युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत या नाटकाची निर्मिती शारदा राजकुमार बडोले यांनी केली असून गणेश कृ. मोडक सहनिर्माते आहेत. लेखन आणि गीतरचना राजकुमार बडोले यांनी केली आहे. संगीत दिग्दर्शन मंदार देशपांडे, वेशभूषा सुप्रिया बर्वे, रंगभूषा मिलिंद कोचरेकर आणि नेपथ्य सुशील पांचाळ यांनी सांभाळले आहे.
Marathi Serial Update : लग्नमंडपात होणार मोठा खुलासा; लग्नसोहळ्यात प्रतापरावांची अनपेक्षित एन्ट्री, मोहिनी मालिकेत मोठा ट्विस्ट
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन कालखंडांचा प्रभावी संगम. एका बाजूला महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास उलगडतो, तर दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाकडे पाहणारी आजची पिढी दिसते. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचा अर्थ आजच्या समाजासाठी काय आहे, हा प्रश्न नाटक प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे.
या नाटकात सशांक पांचाळ, मयुरेश मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलारे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुबोध हर्डीकर, सायली नंदा, प्रांजल परब, महादेव जाधव, मृणाल खिस्मतवार, प्रेम जेटीथोर आणि संजना हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत.
Sameer Khandekar: कॉफीशॉपमध्ये मिळाली ‘बनवाबनवी’ची ऑफर; गंमत म्हणून दिलेला होकार ठरला समीर खांडेकरच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट!
अभिनेता समीर खांडेकर ने ‘बनवाबनवी’ नाटकाच्या प्रवासाविषयी बोलताना अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला. एका कॉफी शॉपमधील अनपेक्षित भेटीतून या नाटकाचा जन्म झाल्याचे त्याने सांगितले.
समीर खांडेकर म्हणाला, “एका वेगळ्या प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी मी कॉफी शॉपमध्ये गेलो होतो. तो प्रोजेक्ट तर झाला नाही, पण तिथेच माझी भेट प्रभात थिएटर्सचे निर्माता हर्षद कठापूरकर यांच्याशी झाली. त्यांनी मला ‘बनवाबनवी’ नाटक लिहिण्याची आणि दिग्दर्शनाची ऑफर दिली. गंमत म्हणून दिलेला तो होकार आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरेल, याची तेव्हा कल्पनाही नव्हती.”
तो पुढे म्हणाला की, नाटकाच्या मुहूर्ताच्या दिवशी त्याच्याकडे केवळ ‘बनवाबनवी’ हे नाव होते. “कथा नव्हती, पात्रं नव्हती, संवाद नव्हते. होतं फक्त एक स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द,” असे त्याने सांगितले.
Pranit More Controversy: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य
‘बनवाबनवी’ हे मराठी रंगभूमीवर कंटेंट क्रिएटर्सना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेले वेगळ्या धाटणीचे नाटक ठरले. लाखो फॉलोअर्स असलेले अनेक कंटेंट क्रिएटर्स या नाटकासाठी एकत्र आले. रंगमंचावरील अनुभव नसतानाही त्याने नाटकासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे हे त्याने सांगितले.
“सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली ही मंडळी नाटकासाठी पुन्हा विद्यार्थ्यांसारखी शिकू लागली. दिग्दर्शक म्हणून मी त्याना घडवत होतो, पण तेही मला तितकंच घडवत होते. त्यांच्या विनोदाच्या शैलीचा विचार करूनच नाटकातील विनोद लिहिला गेला,” असे तो म्हणाला.
Sunny Leone CID Notice: CID च्या रडारवर सनी लिओनी; 2400 कोटींच्या घोटाळा प्रकरणात नोटीस जारी, नेमकं प्रकरण काय?
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांपैकी मोठा वर्ग प्रथमच रंगभूमीचा अनुभव घेत होता. “लोक त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटरला पाहायला आले असतील, पण त्यातून त्याची नाळ रंगभूमीशी जोडली गेली, तर त्यापेक्षा मोठं यश दुसरं नाही,” असे समीर खांडेकरने सांगितले.नवीन पिढीला नाटकाकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात ‘बनवाबनवी’ने छोटासा का होईना, पण महत्त्वाचा वाटा उचलल्याचा अभिमानही त्याने व्यक्त केला.
Amruta Khanvilkar: अनस्टॉपेबल अमृता खानविलकर! ग्लोबल ट्रेंडसेटरपासून बिग बजेट चित्रपटांपर्यंतचा प्रवास
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि विविध क्षेत्रांतील यशामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृताने गेल्या सहा-सात महिन्यांत केलेली कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे.
अमृताचा नेटफ्लिक्सवरील डेब्यू ठरलेली ‘तस्करी’ ही वेब सिरीज जागतिक स्तरावर ट्रेंड झाली. या मालिकेतील तिने साकारलेली ‘मिताली कामत’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. मालिकेतील अॅक्शन आणि स्टंट सीक्वेन्समध्येही अमृताने दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे तिचे सर्वत्र कौतुक झाले.
ओटीटीनंतर अमृताने मराठी रंगभूमीवरही दमदार पाऊल टाकले. ‘लग्न पंचमी’ या नाटकातून तिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर निर्माती म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. या नाटकात तिने दुहेरी भूमिका साकारल्या असून अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. लवकरच ‘लग्न पंचमी’चा १०० वा प्रयोग सादर होणार असल्याची चर्चा आहे.
याच काळात अमृताने उद्योजिका म्हणूनही नवा प्रवास सुरू केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिने ‘अमूल्य’ या साडी ब्रँडची सुरुवात केली. हा केवळ व्यवसाय नसून प्रत्येक स्त्रीसाठी खास भावना आणि तिचं स्वप्न असल्याचं अमृता सांगते. अभिनय, निर्मिती आणि व्यवसाय अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “स्त्रिया जन्मतःच उत्तम मल्टिटास्कर्स असतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळालं तर त्या कोणतंही आव्हान समर्थपणे पेलू शकतात. गेल्या काही महिन्यांत मला नीरज पांडे, निपुण धर्माधिकारी आणि मधुगंधा कुलकर्णी यांसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
Milind Gawali : ‘जोड्या स्वर्गात बांधल्या जातात…’, 20 वर्षांनंतरही ‘तो’ क्षण विसरू शकले नाहीत मिलिंद गवळी; भावनिक पोस्ट चर्चेत
तिने पुढे सांगितले की, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका कामाख्या नारायण सिंग यांच्यासोबत काम करण्यासाठी ती उत्सुक आहे. “एक कलाकार म्हणून अशा दिग्दर्शकांसोबत काम करणं ही मोठी शिकवण असते,” असं ती म्हणाली.
Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..
दरम्यान, अमृताच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत ती आगामी ‘रामभूमी’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे अभिनय, रंगभूमी आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या अमृता खानविलकरकडे सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.
Hotel Pithi Bhaat: अभिनेता समीर खांडेकरचं नवं इनिंग, मुंबईत सुरू केलं ‘पिठी भात’ मालवणी रेस्टॉरंट
मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, निरंजन कुलकर्णी, मृणाल दुसानीस, सत्या मांजरेकर, अनघा भगरे या कलाकारांचे फूड व्यवसायही आहेत. त्याच प्रवाहात आता आणखी एका मराठी अभिनेत्याने उद्योजकतेकडे पाऊल टाकलं आहे.
अभिनेता समीर खांडेकर याने मुंबईतील दादर परिसरात स्वतःचं नवीन फूड रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या माध्यमातून त्याने अभिनयासोबतच आता फूड बिझनेसमध्येही प्रवेश केला आहे.दादरमधील हे नवीन रेस्टॉरंट स्थानिक नागरिकांसाठी नवीन फूड स्पॉट ठरण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे कलाकार केवळ मनोरंजन क्षेत्रापुरते मर्यादित न राहता उद्योजक म्हणूनही पुढे येत आहेत.समीर खांडेकरने पिठी भात नावाचं मालवणी रेस्टॉरंट सुरू केले असून 6 जून रोजी याचे उद्धाटन करण्यात आले.
दादरमधील गोखले रोड येथे “पिठी भात” नावाचं हे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटची माहिती समीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. “पिठी भात – तुमची वाट पाहतोय” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.या रेस्टॉरंटमध्ये अस्सल मालवणी व्हेज पदार्थ चाखायला मिळणार आहेत. त्यामुळे मुंबईतील फूड प्रेमींसाठी हा नवा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
MPSC संघर्ष, स्वप्नं आणि निसर्गरक्षणाचा सुंदर संगम; ‘आऊट ऑफ सिलॅबस’ टीझर प्रदर्शित, तरुणाईत वाढली उत्सुकता
समीर खांडेकर हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखीचं नाव आहे. त्याने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.त्याने “काहे दिया परदेस”, “लव्ह लग्न लोचा”, “हम बने तुम बने”, “ती परत आलीये” या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.चित्रपट क्षेत्रातही त्याने आपली छाप सोडली आहे. “घरत गणपती”, “श्रीदेवी प्रसन्ना”, “कॅरी ऑन मराठा”, “पोस्टर बॉइज”, “टाइमपास २” या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.
समीरने “पिठी भात” रेस्टॉरंटच्या माध्यमातून नवा व्यवसायिक अध्याय सुरू केला असून त्याच्या या सोशल मीडियावर पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Marathi Film Corporation Election : मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची एकहाती सत्ता; मेघराज राजेभोसले यांचा दणदणीत विजय
‘आली लखाबाई’ गाण्यात अमृता धोंगडेचा रौद्रावतार; हितेश मोडकच्या संगीताने वेधलं लक्ष
मराठी संगीतविश्वात लोकसंगीत आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम घडवणारं ‘आली लखाबाई’ हे नवं गाणं सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही तासांतच या गाण्याला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री अमृता धोंगडे हिने साकारलेली ‘लखाबाई’ ही भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिचा मोहक अभिनय, दमदार नृत्य आणि हटके लूक यामुळे गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. विशेषतः तिचा रौद्रावतार प्रेक्षकांना भावतो आहे.
संगीतकार हितेश मोडक यांनी या गाण्याला दिलेलं संगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ग्रामीण संस्कृतीचा ठसा जपत उत्सवमय वातावरण आणि पारंपरिक लोककलेचा रंग या गाण्यात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
गाण्याची ठेकाधारी रचना, आकर्षक शब्दरचना आणि भव्य चित्रीकरण यामुळे ‘आली लखाबाई’ प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडत आहे. याआधीही हितेश मोडक यांच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे नवं गाणंही त्या यशाची पुनरावृत्ती करताना दिसत आहे.
एकूणच, ‘आली लखाबाई’ हे गाणं मराठी संगीतविश्वात नवा ट्रेंड सेट करत असून प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
गाण्याबाबत बोलताना हितेश मोडक म्हणाले, “‘राजा राजा’ नंतर ‘आली लखाबाई’ला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. या गाण्यातील लोकसंगीताचा ठेका, आकर्षक चित्रीकरण आणि अमृता धोंगडेचा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल. हे गाणं नक्कीच प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळेल, असा विश्वास आहे.”
कंगना रणौतला नर्सेसचा युनिफॉर्म का खटकतोय? भारत भाग्य विधाता’च्या रिलीजपूर्वी उपस्थित केला मुद्दा
या गाण्यात निर्माती आणि अभिनेत्री अशा दुहेरी भूमिकेत दिसणारी अमृता धोंगडे म्हणाली, “‘आली लखाबाई’ माझ्यासाठी खूप खास आहे. अभिनयासोबतच निर्मितीची जबाबदारीही सांभाळण्याची संधी मला मिळाली. या संपूर्ण प्रवासात आम्ही खूप मेहनत घेतली असून त्याचा सकारात्मक परिणाम प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसत आहे. माझा रांगडा, रौद्रावतार आणि पारंपरिक लूक प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहून खूप आनंद होतो.”
या गाण्यात अमृतासोबत नॉयरिका भतीजा, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि बालकलाकार आरोह धोंगडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सचिन कांबळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून सौरभ साळुंखे आणि ईश्वरी बाविस्कर यांनी गाण्याला आवाज दिला आहे.
Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा
गावाकडच्या संस्कृतीचा सुगंध, नृत्याची ऊर्जा आणि संगीताची जादू यांचा संगम असलेलं ‘आली लखाबाई’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून संगीतप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.
हिल पोरी हिला’ ची भारताला भुरळ; गौतमी पाटील-भाऊ कदम यांच्या गाण्याने यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये पटकावला 24 वा क्रमांक
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.
दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा नव्या ढंगात सादर केलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. पारंपरिक ठेका, आधुनिक सादरीकरण आणि गौतमी पाटील-भाऊ कदम यांची हटके केमिस्ट्री यामुळे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या यूट्यूब ट्रेंडिंग यादीत ‘हिल पोरी हिला’ हे गाणे 24 व्या क्रमांकावर झळकत आहे. मराठी गाण्याला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या अजरामर गाण्याला आधुनिक संगीत, नव्या धाटणीचे सादरीकरण आणि आकर्षक चित्रीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
या नव्या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची पहिल्यांदाच एकत्र दिसलेली जोडी. दोघांची भन्नाट केमिस्ट्री आणि उत्स्फूर्त सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.
Jahnavi Killekar : “जास्त शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का?” छोट्या पुढारीच्या कमेंटवर जान्हवीचा संताप, नेमकं प्रकरण काय?
या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. कोकणच्या सौंदर्याची झलक या गाण्यातून प्रभावीपणे पाहायला मिळते.
Jennifer Winget : १२ वर्षांनंतर पुन्हा वाजणार सनई-चौघडे! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारा पती?
गाण्यात गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांनी विविध आकर्षक लूक साकारले आहेत. गौतमी पारंपरिक लाल नऊवारी साडीत मोहक दिसत असून, काही दृश्यांमध्ये दोघेही रेट्रो, वेस्टर्न आणि काळ्या वेशभूषेतील हटके अंदाजात झळकतात. त्यांच्या वेगवेगळ्या लूकसह जोशपूर्ण नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Jahnavi Killekar : “जास्त शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का?” छोट्या पुढारीच्या कमेंटवर जान्हवीचा संताप, नेमकं प्रकरण काय?
बिग बॉस मराठी सीझन ५ ची माजी स्पर्धक अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बेधडक आणि रोखठोक म्हणून ओळखली जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिचा आणि अभिनेता ओम यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे एक चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
अभिनेता ओम यादवने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जान्हवी नुकतीच जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी जान्हवी आणि ओमने एकत्र भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं. हा व्हिडीओ पोस्ट करताना ओम यादवने “जेजुरी दर्शन” असे कॅप्शन दिले होते. त्यावर जान्हवीने “यळकोट यळकोट जय मल्हार” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.
बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांसोबत छोट्या पुढारीनंही कमेंट केली आहे. यावर आता जान्हवी किल्लेकर चांगलीच संतापली असून तिने छोट्या पुढारीला तिने चांगलच झापले आहे.व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने, “नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते… पण जेवढ्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत त्यावरून लोकांना प्रश्न नक्कीच पडणार ना… बाकी तुमचं जे असेल ते,” अशी कमेंट केली.
दरम्यान, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यानेही या चर्चेत उडी घेतली. त्याने कमेंट करत, “ओम दादा हे बरोबर नाही बरं… तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे… मी तुमचा लहान भाऊ आहे त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते समजलं असेल… पण देवाला आमचा एक निरोप द्या… आम्हालाही एक वहिनी आली पाहिजे आता,” असे मिश्किलपणे म्हटले.
घनश्यामच्या या कमेंटला ओम यादवनेही तितक्याच मजेशीर अंदाजात उत्तर दिले. “नक्कीच घनश्याम. तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न… प्रॉमिस,” असे उत्तर ओमने दिले.
मात्र, ही कमेंट जान्हवीला पसंत पडली नाही. तिने थेट घनश्यामला सुनावत, “जास्त शहाणपणा करू नकोस… लोकांचं ठीक आहे… पण तुलाही अक्कल नाहीये का?” असे स्पष्ट शब्दांत म्हटले.
बंपर Weekend! ‘तुंबाडची मंजुळा’ची बॉक्स ऑफिसवर मुसंडी; दुसऱ्या दिवशी ओपनिंगपेक्षा जवळपास दुप्पट कमाई
जान्हवीच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काही चाहत्यांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले असून, वैयक्तिक आयुष्याबाबत अनावश्यक चर्चा टाळल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी हा संवाद केवळ मित्रांमधील हलका-फुलका विनोद असल्याचे म्हटले आहे.
52 व्या वर्षीही अविवाहित असलेल्या गीता कपूर यांचा खुलासा; ‘डान्स करून प्रपोज केलं तर…’
ओम यादव आणि जान्हवी किल्लेकर यांच्यातील वाढती मैत्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असली तरी दोघांनीही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र चाहत्यांच्या कमेंट्स आणि त्यावर झालेल्या मजेशीर संवादामुळे हा विषय सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
सोशल मीडियाने बदललं आयुष्य! YouTube-insta मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Content creators कोण?
सोशल मीडियामुळे अनेक मराठी कलाकारांना मिळाली मोठी ओळख
YouTube आणि Instagram मुळे बदललं अनेक creators चं आयुष्य
मेहनत, टॅलेंट आणि सातत्यामुळे तयार झाली वेगळी ओळख
विनायक माळी ते अथर्व सुदामे; जाणून घ्या यशाची कहाणी
मराठी creators कसे बनले लाखो लोकांचे आवडते चेहरे?
कोण आहेत YouTube मुळे प्रसिद्ध झालेले मराठी कलाकार?
कुठल्याही क्षेत्रात नाव कमावणे तसेच ते टिकवून ठेवणे फार महत्त्वाचं असतं कारण त्यात खूप सारी जवळची माणसं पण असतात जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. त्यासाठी अजून महत्त्वाचं असतं ते एक प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही तुमचं कौशल्य दाखवू शकता. पण आपण टॅलेंटेड असूनही आपली कला सादर करू शकलो नाही म्हणून आपण कितीतरी वेळा विचार सोडून देतो. पण सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्हाला स्वच्छंदी आयुष्य जगायला मिळतं, जे काही वाटतं ते मुक्तपणे मांडता येतं. त्यासाठी तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे. खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमची कला सादर करू शकता.
एक गोष्ट अजून महत्त्वाची ती म्हणजे प्लॅटफॉर्म असूनही तुमच्यात उपजत कला असावी लागते. ती नसेल तर फार कोणी तुम्हाला महत्त्व देणार नाही. असं असतं तर सगळेच क्रिएटर झाले असते पण तसं शक्य नसतं. म्हणून मराठीमध्ये सोशल मीडियाचा वापर करून जे फेमस झाले आहेत त्या कलाकारांची यादी आणि त्यांची मेहनत जाणून घेऊया.
Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
YouTube मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Creators / कलाकार
१) विनायक माळी
विनायक माळी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी YouTuber आहे. त्याची विनोद शैली इतरांपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे तो लोकांच्या लगेच लक्षात राहतो. आरमुठ्या म्हणून आपली वेगळी शैली त्याने लोकांसमोर सादर केली. प्रेक्षकांना ही त्याची भूमिका फार आवडली म्हणून त्याचे सगळेच व्हिडिओ मिलियन क्रॉस करतात. त्याचे शेठ माणूस तसेच माझी बायको या सिरीज फार लोकप्रिय आहेत. पनवेलमध्ये जन्मलेल्या या YouTuber ने आगरी-कोळी शैलीत आपला ठसा उमटवला आहे.
२) अथर्व सुदामे
ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध शहर म्हणजे पुणे आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरात मराठीमध्ये जेवढे कलाकार दिसतील त्यातले निम्याहून अधिक पुणे या शहरातून आलेले असतील. त्यापैकी एक म्हणजे अथर्व सुदामे. अथर्वाची विनोदी शैली सुद्धा त्याची खास ओळख आहे. इन्स्टंट जोक तयार करून हसवणे ही त्याची खासियत. पुणेरी टोमणे वापरून जोक तयार करणे, त्यावर रील बनवून लोकांना हसवणे म्हणून त्याच्या रील्स फार व्हायरल होतात. अथर्व मराठी चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
३) करण सोनवणे (Focused Indian)
करण सोनवणे हा Focused Indian या नावाने सोशल मीडियावर फेमस आहे. त्याची कॉमेडी काही प्रमाणात आपल्याला अथर्व सुदामे याची आठवण करून देते. करण relatable comedy, social satire आणि entertaining content तयार करून लोकांना हसवण्याचं काम करत असतो. बिग बॉस मराठीमध्येही त्याने भाग घेतला होता. रील्समधून त्याने स्वतःची acting skills दाखवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
४) जस्ट नील थिंग्स
Just Neel Things हा सुद्धा मराठीमधील मोठा content creator म्हणून ओळखला जातो. Just Neel Things या नावाने YouTube चॅनलवर तो आपले दैनंदिन व्हिडिओ publish करत असतो. त्याने प्रसिद्ध मराठी वेड लावलं या गाण्यावर आपली कला सादर केली होती. मराठी YouTube community मध्ये त्याचं मोठं नाव असल्यामुळे Insta Fest वर त्याला प्रसिद्धी मिळाली होती.
५) सौरभ घाडगे
सौरभ घाडगे हा हजरजबाबी comedy creator आहे. विनोद तयार करण्यासाठी त्याला कधी topic ची गरज लागत नाही. कुठल्याही परिस्थितीवर जोक निर्माण करणे ही त्याची खासियत. Short videos तयार करून social punch मारत लोकांना हसवणे आणि रडवणे ही त्याच्या विनोदाची शैली आहे.
६) अथर्व रुके
हा असा content creator आहे ज्याने कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपलं अस्तित्व तयार केलं आहे. स्वतःच्या content वर त्याचा फार विश्वास आहे. त्याची मेहनत त्याला वेगळं बनवते. स्त्री पात्र साकारून विनोद निर्माण करणे ही त्याची खासियत आहे. तुंबाडची मंजुळा या आगामी मराठी चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक गुणी कलाकार म्हणून त्याला लोक ओळखत आहेत.
मराठी content creators पाहिले तर लिस्ट तशी भलीमोठी आहे. पण सोशल मीडियाचा वापर करून आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर नेणारे हे काही मोजके कलाकार आहेत ज्यांनी स्वतःची एक खास ओळख तयार केली आहे.
Small Business Ideas: कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय! ‘हे’ 8 भन्नाट कल्पना तुम्हाला करून देतील बंपर कमाई
ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!
मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे ५ ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक ‘युनिव्हर्सिटी’ असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
शूटिंगचे ‘क्विक डिलिव्हरी’ आणि नाटकाचे ‘लाईव्ह अनुभव’
आपल्या या पहिल्या वहिल्या नाटकाबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते, “मालिकांच्या शूटिंगमध्ये आपल्याला पटकन प्रतिसाद द्यावा लागतो, कधीकधी ‘क्विक डिलिव्हरी’ करावी लागते. पण नाटकाच्या तालमींत एका वाक्याचे विविध अर्थ आणि हावभाव कसे बदलतात, हे शिकायला मिळतंय. मालिकांमधून प्रसिद्धी मिळते, पण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ‘लाईव्ह’ प्रतिक्रियांची जी ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच आहे. मालिकेच्या सेटवर चुका सुधारण्यासाठी १०-१५ दिवस मिळतात, पण रंगमंचावर ‘वन टेक’ मध्ये सगळं परफेक्ट करायचं असतं, त्याची एक वेगळीच धाकधूक आणि एक्सायमेंट आहे!”
सुकन्या मोने-गिरीश ओक; प्रत्यक्ष आयुष्यातील ‘आई-बाबा’
या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे तिचे आई-बाबा साकारत आहेत. याबद्दल ती भावूक होऊन सांगते, “सुकन्या ताईंच्या मायेने आणि गिरीश सरांच्या अनुभवाने मला या भूमिकेत घडवलंय. तालमींच्या वेळी सुकन्या ताईंच्या ‘अलीबाबाच्या गुहेसारख्या’ असलेल्या बास्केटमधून सतत मिळणारे खाऊ आणि त्यांची आपुलकी यामुळे आमच्यात खरोखरच आई-मुलीचं नातं निर्माण झालंय. ही दिग्गज माणसं माझ्यासाठी एका विद्यापीठासारखी आहेत.”
‘निर्जीव फोन’ आणि ‘जिवंत संवाद’
नाटकाच्या विषयावर भाष्य करताना ऐश्वर्या तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश देते: “आजच्या तरुण पिढीला सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीची सवय लागली आहे. ‘निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट’ असे एक वाक्य नाटकात आहे, जे आजचं भीषण वास्तव आहे. या नाटकातून आम्ही एकच संदेश देतोय – पालकांशी ‘ट्रान्सपरन्सी’ ठेवा आणि पालकांनी मुलांच्या चुकीवर भडीमार करण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन ‘मी तुझ्यासोबत आहे’, हे आश्वासन द्या. हा ‘जनरेशन गॅप’ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
मालिका विश्वात ज्या प्रेमाने प्रेक्षकांनी ऐश्वर्याला स्वीकारले, त्याच प्रेमाची अपेक्षा ती या नाटकासाठी व्यक्त करते. “हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर अनेक मुलींसाठी एक ताकद आहे. तरुण पिढीने आपल्या पालकांसोबत हे नाटक आवर्जून पाहावं आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे,” असे तिने सांगितले.
दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास
Zadhala Piklay Amba song Dubai : दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील  जो BeatXX नावाने ओळखला जातो. त्याने नुकतंच एक गाणं सध्या प्रदर्शित केलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.   “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम”  दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती,  आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.
16 सेकंदांचा थरार! गावात दाटलेला रहस्यमय काळोख, जैकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या हॉरर सिनेमाचा थरारक फर्स्ट लुक समोर
मराठी, भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत
संस्कृती जपणारा कलाकार सागर पाटील हे केवळ संगीत क्षेत्रापुरते मर्यादित नसून UAE मधील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ते प्रथा.UAE या सांस्कृतिक उपक्रमाचे संस्थापक असून या माध्यमातून त्याने विविध पारंपरिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी, दुर्ग मोहिम यांसारख्या उपक्रमांद्वारे UAE मधील नव्या पिढीला भारतीय संस्कृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या कार्यामुळे अनेक मराठी आणि भारतीय कुटुंबांमध्ये सांस्कृतिक जडणघडण अधिक दृढ झाली आहे. मध्यपूर्वेत ढोल-ताशाचा जागतिक ठसा सागर पाटील यांनी मध्यपूर्वेत पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीच्या प्रसारातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईतील विविध मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर त्याने महाराष्ट्रीयन तालवाद्यांची ओळख प्रभावीपणे सादर केली आहे.
सागर पाटीलचा संगीत प्रवास
संगीतकार सागर पाटील (BeatXX) त्याच्या संगीत प्रवासाविषयी सांगतो की, “‘BeatXX’ या कलाकार नावाखाली मी स्वतःची स्वतंत्र आणि वेगळी संगीतशैली निर्माण केली आहे. मी संपूर्ण आखाती देश म्हणजेच मिडल ईस्ट देशात पहिल मराठी ढोल ताशा पथक सुरू केलं. त्यासाठी मला नुकताच महाराष्ट्र शासनाकडून “मराठी भाषा सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. भावना, कथा आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा आधुनिक संगीताशी केलेला संगम यामुळे संगीताची खास ओळख ठरली आहे. दुबईस्थित माझ्या होम स्टुडिओमधून मी विविध क्षेत्रांसाठी संगीत निर्मिती केली आहे, ज्यामध्ये लघुपटांसाठी बॅकग्राऊंड स्कोअर प्रादेशिक व अरबी चित्रपटांसाठी संगीत जाहिरातींसाठी जिंगल्स व ब्रँडेड ऑडिओ कंटेंट यांचा समावेश आहे. माझ नव गाण “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतच प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रसिक प्रेक्षकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येईन.”
“आम्हा बिहाऱ्यांची काळजी घ्या”; Shekhar Suman यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची मिश्कील प्रतिक्रिया चर्चेत
Ata Thambvaych Kas? : तब्बल दशकानंतर रंगमंचावर झळकणार अभिनेत्री! गिरीश ओकांसोबत 30 वर्षांनी करणार नाटकाचे सादरीकरण
अवघ्या 30 वर्षांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार
जेष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने तसेच दिग्गज अभिनेते डॉ.गिरीश ओक झळकणार
Ata Thambvaych Kas"color: #3366ff;">Cannes Film Festival 2026: Jacqueline Fernandezची ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून दमदार एन्ट्री, रेड कार्पेटवर ठरली चर्चेचा विषय
काय आहे ‘आता थांबवायचं कसं?’
‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकात मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने तसेच दिग्गज अभिनेते डॉ.गिरीश ओक झळकणार आहेत. या नाटकाचा विषय आधुनिक कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतो. एकंदरीत, आताच्या कुटुंब पद्धतीत सोशल मीडियाचा वापर सर्रास होतो. घरातली सगळी मंडळी सोशल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आहारी गेली आहे, याचा परिणाम कुटुंबावर कसा होतो? या सगळ्या गोष्टी या नाटकात पाहायला मिळणार आहे.
काय म्हणाले नाटकाचे मुख्य नट ‘डॉ.गिरीश ओक’?
Dr. Girish Oak आणि Sukanya Mone अवघ्या तीन दशकांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार असल्याबद्दल व्यक्त होताना गिरीश ओक म्हणतात की, “सुकण्याबरोबर नाटक करताना, अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिचं आणि संजयचं लग्नही आमच्या डोळ्यादेखत झालं. आज आम्ही दोघं नव्या केमिस्ट्रीसह तब्ब्ल 30 वर्षांनी रंगमंचावर एकत्र आलो आहोत.”
‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाबद्दल सांगताना ते म्हणाले की “या नाटकाची कथा मी पनवेलमध्ये एकदा पहिली होती. एकंदरीत, ती एकांकिकाच होती. मी एका मुलीचा बाप आहे आणि या नाटकाची कथा मला हादरून सोडणारी होती. ही कथा पाहून मला वाटलं की हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणे फार महत्वाचे आहे आणि अर्थातच त्यासाठी मी फार प्रयत्नही केले.” पुढे गिरीश ओक म्हणतात की, “या नाटकात मी वडिलांची भूमिका साकारली आहे. या नाटकातली माझी भूमिका आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात वडील म्हणून माझी भूमिका, यामुळे मी भावनांची तीव्रता समजू शकतो. एकंदरीत, माझा विश्वास आहे की ‘हे नाटक पालक आणि मुलांमधला संवाद अधिक मजबूत करेल.”
Birthday Special: नवाजुद्दीन सिद्दीकी वाढदिवस विशेष: १० अविस्मरणीय भूमिका ज्यांनी घडवली त्यांची वेगळी ओळख
काय म्हणाल्या सुकन्या मोने?
“२०१४ मध्ये ‘सेल्फी’ हे नाटक केल्यानंतर मी रंगभूमीपासून दूर होते. मात्र ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाची संहिता वाचताच ती मनाला भिडली आणि पुन्हा नाटकाकडे वळण्याची इच्छा झाली. ‘कुसुम मनोहर लेले’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर Dr. Girish Oak यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्यातील समजूत आणि ट्युनिंग इतकी सहज आहे की अनेकदा संवादांशिवायही आम्ही एकमेकांना समजून घेतो.”
‘जोडीचा मामला’मधून नव्या कलाकारांची रंगभूमीवर एन्ट्री; विनोदातून मांडणार आजच्या नात्यांचं वास्तव
मराठी रंगभूमी सध्या नव्या विचारांनी, तरुणाईच्या ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी अधिक समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक कथानकांच्या चौकटी मोडून आजचे तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, बदलती सामाजिक मानसिकता आणि नव्या पिढीच्या भावविश्वावर आधारित वेगळे प्रयोग रंगमंचावर साकारत आहेत. अशाच नव्या विचारांच्या वाटेवरून येणारं ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी नवोदित कलाकारांना व्यासपीठ देत या नाटकाची निर्मिती केली आहे.
Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…
या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक Sachin Pilgaonkar यांनी उपस्थित राहून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नव्या कलाकारांमुळे रंगभूमीवर ताजी ऊर्जा निर्माण होते आणि मराठी नाट्यव्यवसायासाठी हे सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या नाटकाची टॅगलाईन आहे “Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!” शुक्रवार १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ठाण्यातील Gadkari Rangayatan येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. बदलती कौटुंबिक नाती, तरुणाईचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडणार आहे.
निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले की, “आजच्या तरुण पिढीचे विचार आणि नात्यांकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना संधी देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.” दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनीही हे नाटक समाजातील वास्तव विनोदातून मांडणारे असून प्रत्येक पात्र प्रेक्षकांना स्वतःशी जोडून घेईल, असे सांगितले.
NEET Paper Leak : Atul Kulkarni यांनी सरकारला लगावला टोला! NEET पेपरफुटीवर केली Sarcastic Post; “गाळलेल्या जागा…”
या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजातील गाण्यांमुळे नाटकाला विशेष रंगत आली आहे. ठाण्यानंतर या नाटकाचे प्रयोग कल्याण, वाशी, दादर आणि माटुंगा येथेही रंगणार असून मराठी रंगभूमीवर नव्या कलाकारांचा हा ताजा प्रयोग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
15 वर्षांनंतर पुन्हा रंगणार सासू-सुनेची जुगलबंदी; ‘पुढचं पाऊल’ची जोडी रंगभूमीवर एकत्र
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी एक खास आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर लोकप्रिय सासू-सुनेची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Pudhcha Paul या गाजलेल्या मालिकेत आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या हर्षदा खानविलकर आणि शर्मिला राजाराम शिंदे या अभिनेत्री आता रंगभूमीवर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
तब्बल १५ वर्षानंतर छोट्या पडद्यावरची सासु-सुनेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेतील शिस्तप्रिय आणि खाष्ट सासू हर्षदा खानविलकर तिच्या ऑनस्क्रीन कट कारस्थानी सुनेसोबत म्हणजेच शर्मिला राजाराम शिंदेसोबत रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेत आहे. या ऑनस्क्रीन सासु-सुनेची जुगलबंदी पुन्हा एकदा सासू सूनेच्याच भूमिकांमध्ये ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींनी ती केमिस्ट्री पुन्हा एकदा जिवंत करणार असल्याचे सांगितले. अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “शर्मिष्ठा अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. ती अत्यंत गुणी तर आहेच. ‘पुढचं पाऊल’च्या सेटवर आम्ही मनापासून कामही केले आणि धमाल, मस्तीही केली. या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा ती केमिस्ट्री प्रेक्षकांसमोर आणायची आहे.”
Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
शर्मिला राजाराम शिंदे म्हणते, “तब्बल १५ वर्षानंतर आम्ही एकत्र येतो आहे. अर्थात मजा तर येतच आहे पण हर्षदा ताईंकडून पुन्हा एकदा शिकायला मिळणार याचा आनंद जास्त आहे. यावेळी सासू सुनेच्याच भूमिकेत परंतु नवीन ढंगात आम्ही प्रेक्षकांसमोर येत आहोत. सोनल प्रॉडक्शन्स निर्मित आणि प्रिया बापट प्रस्तुत या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन अमोल पाटील यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर यांनी सांभाळली आहे.येत्या ९ मे पासून हे नाटक रंगभूमीवर नाट्यरसिकांच्या भेटीस येणार आहे.
या नाटकाचा ट्रेलरही अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर झाला. यावेळी या दोघींसोबत इतरही कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. आता ही सासु-सुनेची जोडी सहकलाकारांसोबत काय जादू करते, याकडे प्रेक्षकवर्गाचं आणि चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
Satrangi – Badle Ka Khel : ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; सूड, सत्ता आणि दुहेरी आयुष्याची थरारक कथा
Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini
सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः अपूर्वाने केले आहे
पद्मिनी ही AI पासून तयार केलेली Micro Drama Series आहे
गावात आता रात्री कुणीही बाहेर पडत नाही
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने ‘पद्मिनी’ नावाच्या सिरीजमध्ये झळकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुळात, पद्मिनी ही AI पासून तयार केलेली Micro Drama Series आहे. या सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः अपूर्वाने केले आहे. सिरीज पाहण्यासाठी तिचे चाहतमंडळी आतुर आहेत.
Raja Shivaji सिनेमातील नवंकोरं गाणं आलं समोर! सई राणीसाहेबांच्या प्रेमाची झलक ‘फूल पारिजात’
नक्की काय आहे ‘पद्मिनी’?
पद्मिनी एक दंतकथा आहे, जी जगासमोर अभिनयाच्या तसेच विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणण्याचे काम अपूर्वा नेमळेकर करत आहे. 11 elevanmedia च्या साहाय्याने, Padmini या दंतकथेला चाहत्यांसमोर मांडण्यात येत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून या AI आधारित सिरीजचा पोस्टर लाँच करत, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना स्पष्टता दिली होती. दरम्यान, या पोस्टरच्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये “ती येते… जेव्हा सगळे झोपतात.” असे आकर्षक टायटल देण्यात आले होते. तसेच दुसऱ्या पोस्टर Release मध्ये कॅप्शन म्हणून “त्या रात्रीनंतर सगळंच बदललं… गावात आता रात्री कुणीही बाहेर पडत नाही.” आणि “पद्मिनी… ती काहीच विसरलेली नाही!” असे काहीसे टायटल दिसून आले. एकंदरीत, या दोन्ही कॅप्शनमधून लागलेली हिंट म्हणजे “पद्मिनी, एक Horror AI Micro Drama Series आहे. पद्मिनी या स्त्रीवर अन्याय झाला आणि तेव्हापासून सूडाच्या हेतूने ती प्रत्येक रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा त्या परिसरात संचार करते.
कधी पाहता येणार ‘पद्मिनी’?
मालिकेची निर्माती, दिग्दर्शक तसेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नवा पोस्टर लाँच केला असून, त्यामध्ये या Drama Series ची रिलीज डेट समोर आली आहे. अपूर्वाच्या चाहत्यांना ही सिरीज ९ मे २०२६ पासून पाहता येणार आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये माहिती देत अपूर्वाने नमूद केले आहे की, “जिथे अन्याय गाडला जातो… तिथे काही आठवणी मरत नाहीत. या ९ मे २०२६ पासून… जागी होणार एक दंतकथा. पद्मिनी! ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली, एक सिनेमॅटिक AI मायक्रो ड्रामा मालिका. ‘भीती. शांतता. सूड. न्याय.’ एका आख्यायिकेची सुरुवात…”
Jai Jai Swami Samarth : अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’! स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा डाव धुळीला मिळणार
कुठे येणार पाहता?
ही मालिका Reel Formate मध्ये लाँच करण्यात येणार आहे. चाहत्यांना मालिका Facebook किंवा Instagram वर पाहता येईल.